text stringlengths 0 6.48k |
|---|
पोलिसांनी जपानसह अन्य काही आरोपींना गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. |
शार्प शूटर जपानला अधिक चौकशीसाठी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. |
जिग्नेश ठक्कर याची गेल्या शुक्रवारी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ गोळ्या झाडून हत्या केली होती. |
ठक्कर आपले काम उरकून कार्यालयातून आपल्या घरी जात होता. |
त्यावेळी त्याच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. |
ठक्कर याचे कल्याण, ठाणे, उल्हासनगरमध्ये क्लब आहेत. |
तसेच तो क्रिकेट सट्टेबाजही होता. |
तसेच बुकी म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. |
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, त्याचा बालपणीचा मित्र धर्मेश उर्फ ननू शाह त्याला व्यवसायात मदत करत होता. |
पण काही दिवसांपूर्वी आर्थिक देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला होता. |
२९ जुलै रोजी ठक्कर याचे धर्मेश आणि त्याचा मित्र चेतन पटेल याच्याशी भांडण झाले होते. |
त्यानंतर मारहाणही झाली होती. |
त्यानंतर धर्मेशने जिग्नेशला ठार मारण्याची धमकीही दिली होती. |
पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे दिरासोबत लग्न लावले; सासूने वेश्याव्यवसायात ढकललेभयानक! |
तरुणाला घराबाहेर फरफटत आणलं, मारहाणीनंतर मूत्र पाजलंधर्मेशने गेल्या आठवड्यात जयपाल दुलगज आणि अन्य साथीदारांच्या मदतीने ठक्करवर गोळ्या झाडल्या होत्या. |
या प्रकरणाचा तपास ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडूनही सुरू होता. |
शार्पशूटर जपान हा अहमदाबादमध्ये असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. |
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमीरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांच्या पथकाने अहमदाबादमध्ये धडक दिली आणि जपानच्या मुसक्या आवळल्या. |
न्यायालयाने जपानला पोलीस कोठडी सुनावली आहे. |
बॉयफ्रेंडसोबत लग्नाला विरोध; गर्लफ्रेंड १०० फूट उंच वीजेच्या टॉवरवर चढली अन्. |
..मुलांच्या भांडणावरून पेटला वाद; दोन गटांत तुफान दगडफेक, गोळीबारधक्कादायक! |
शरीरात 'भूत' असल्याचे सांगून पतीसोबत सेक्स करण्यास महिलेला बंदी |
प्रतिनिधी, सिल्लोडसिल्लोड तालुक्यातील शिवना येथे उद्घाटन होऊन पंधरवाडा लोटला तरी कोविड केअर सेंटर बंद असल्याने कोरोना रुग्णांची तारांबळ होत आहे. |
त्यामुळे रुग्णांना तपसणीकरिता स्वॅब देण्यासाठी अजिंठा किंवा सिल्लोड येथे जावे लागत आहे. |
तालुक्यात शिवना, पानवडोद व धोत्रा येथे करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. |
त्यांच्यावर सध्या अजिंठा, सिल्लोड येथील कोविड केअर सेंटरमध्ये इलाज केला जात आहे. |
या दोन ठिकाणच्या सेंटरमध्ये खाटा कमी पडल्यास रुग्णांना कोठे ठेवायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. |
दरम्यान, शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. |
पंधरवाडा उलटला, तरी ते अद्याप सुरू झालेले नाही. |
राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटनही करण्यात आले. |
सेंटर सुरू करण्यासंदर्भात त्यांनी आरोग्य विभागाला आदेश दिले होते. |
पण आरोग्य विभागात समन्वय नसल्याने हे कोविड केअर सेंटर अद्याप सुरू झालेले नाही. |
ही नवीन इमारत सात वर्षांत पावणेचार कोटी रुपये खर्च करून बांधली आहे. |
उर्वरित महत्त्वाच्या कामासाठी दीड कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. |
परंतु करोना महामारीमुळे येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे ठरविण्यात आले. |
त्यामुळे करोना संकटकाळात या इमारतीचा लाभ मिळेल, असे नागरिकांना वाटत होते. |
या इमारतीची सुरक्षा भिंत, शवविच्छेदन गृह, निवासस्थाने आदी कामे अपूर्ण आहेत. |
त्यामुळे आरोग्य विभाग इमारत ताब्यात घेण्यास तयार नाही. |
ही कामे पूर्ण झाल्यानंतरच इमारत ताब्यात घेऊ, अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. |
या बाबत वरीष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. |
सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. |
कोविड केअर सेंटरला काम करणारी एक विशेष टीम तयार ठेवली आहे. |
पण तेथील वैद्यकीय अधिकारी यांची नकारघंटा आहे. |
परंतु लवकरच हे कोविड सेंटर सुरू करणार आहोत. |
-डॉ. |
योगेश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी |
नगर:करोना संसर्गामुळे एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. |
करोनाची लक्षणे दिसताच तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर अनेकजण स्वतःहून क्वारंटाइन होतात. |
तर, काही जणांना प्रशासनाकडून सक्तीने क्वारंटाइन करण्यात येते. |
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मात्र आता जनावरांनाच क्वारंटाइन करण्याची वेळ पशूपालकांवर आली आहे. |
गोधेगाव भागातील सात जनावरे " लम्पी स्किन डिसीज ' या आजाराने बाधित झाली आहेत. |
हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा फैलाव इतर जनावरांमध्ये होऊ नये, यासाठी तातडीने बाधित जनावरांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांचे विलगिकरण (क्वारंटाइन) करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने संबंधित पशूपालकांना दिल्या आहेत. |
वाचा: राज्यात करोनाची स्थिती किती गंभीर? |
; आजचे आकडे चिंता वाढवणारे"लम्पी स्किन डिसीज" हा आजार दक्षिण आफ्रिकेतील जनावरांत दिसतो, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागातून देण्यात आली. |
महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात या आजाराची लक्षणे गडचिरोली व बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये काही जनावरांमध्ये दिसली होती. |
आता या आजाराने बाधित झालेली जनावरे नगर जिल्ह्यातील गोधेगाव (ता. |
नेवासा) या भागात प्रथमच आढळली आहेत. |
या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या सात असून आजाराचा फैलाव वेगाने होऊ नये, यासाठी तातडीने बाधित जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवण्याच्या सूचना संबंधित पशूपालकांना देण्यात आल्या आहेत. |
तसेच जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. |
सुनील तुंबारे यांनी तातडीने जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. |
नगर जिल्ह्यात आणखी किती जनावरांना या आजाराची लागण झाली आहे, याची पाहणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. |
वाचा: कोल्हापुरात आतापर्यंतच्या सर्वाधिक करोनाबळींची नोंदअशी आहेत आजाराची लक्षणे :"लम्पी स्किन डिसीज' या आजाराने बाधित झालेल्या जनावरांमध्ये सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे जनावरांना ताप येतो. |
तसेच जनावरांच्या डोळ्यातून, नाकातून स्राव गळणे, भूक मंदावणे, डोके, मान, पोट, पाठ, पाय, तसेच शेपटीखाली त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटरच्या गाठी येतात. |
नाक-तोंडाच्या आतील भागात गाठी आढळून येतात. |
ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे, अशी लक्षणे आढळतात. |
"लम्पी स्किन डिसीज" या आजाराचा नगर जिल्ह्यातील गोधेगाव (ता. |
नेवासा) येथील सात जनावरांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. |
हा आजार गाय व म्हशी यांच्यामध्ये होतो. |
पण आपल्याकडे मात्र ही लक्षणे फक्त गायीमध्ये दिसली आहेत. |
बाधित जनावरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. |
या रोगाचा फैलाव बाधित पशूधनापासून डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो. |
उष्ण व दमट हवामानात याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. |
त्यामुळे बाधित जनावरांचे विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. |
सुनील तुंबारे, पशूसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषदवाचा: करोनाशी लढा: वयस्करांसाठी 'ही' लस ठरणार संजीवनी! |
नागपूर : सिव्हिल लाइन्स येथे महामेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन लाइन हॅक करून ९ लाख ८४ हजार ५१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. |
महामेट्रोने याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. |
मेट्रो हाउस या कार्यालयातील एप्रिल-मे महिन्याचे टेलिफोन बिल पावणेदहा लाख रुपये आल्यानंतर टेलिफोन विभागाने यावर शंका व्यक्त केली. |
बीएसएनएलचे एवढे बिल अचानक कसे आले, याबाबत माहिती घेतली असता मेट्रो हाउसमधील आयएसडी कॉल हॅक करण्यात आल्याचे लक्षात आले. |
त्यानंतर ही लाइन 'लॉक' करण्यात आली. |
पोलिस याबाबत तपास करीत असून सायबर सेलचीही मदत घेतली जाणार आहे. |
टेलिफोनच्या लाइनचा वापर कुणी आणि कशासाठी केला, याचा तपास सुरू आहे. |
पोलिसांकडून बीएसएनएलला सर्व कॉल्सची माहिती मागविण्यात आली आहे. |
प्रतिनिधी, औरंगाबादअयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला. |
संवेदनशील अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. |
जातीय दंगलीबाबत औरंगाबाद कुप्रसिद्ध आहे. |
१९९२मध्ये अयोध्येतील कारसेवेनंतर औरंगाबाद दंगलीत होरपळले आहे. |
या दंगलीच्या खुणा अद्यापही कायम आहेत. |
या प्रकरणानंतर फक्त औरंगाबादमध्येच 'काळा दिन' आणि त्याच्या विरोधात 'शौर्य दिन' पाळण्याची पद्धत सुरू झाली होती. |
बुधवारी अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. |
या अनुषंगाने हिंदुत्ववादी संघटनांनी चौकाचौकांत आनंदोत्सव साजरा केला. |
हा आनंदोत्सव वगळता शहरात कोणतीही विरोधात प्रतिक्रिया दिसून आली नाही. |
शहरातील जुने शहांगज, चेलिपुरा, शहाबाजार, बुढीलेन, रोशनगेट, चंपा चौक भागात नागरिक नित्याप्रमाणे त्यांचे काम करताना दिसून आले. |
'लॉकडाऊन'मध्ये व्यापार बंद होता. |
त्यामुळे व्यापारी, छोटे विक्रेते संकटात सापडले आहेत. |
बाजारपेठेत बुधवारी नेहमीप्रमाणे गजबजलेले दिसून आले. |
अनुचित प्रकार घडू शकतो या चिंतेने धास्तावलेले पोलिस प्रशासन मात्र शहरवासीयांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सुखावून गेले. |
प्रतिनिधी, मुंबईलॉकडाउननंतर ग्राहकांना आलेल्या भरमसाट बिलांमुळे राज्यभर गोंधळ निर्माण झाला आहे. |
अशातच 'बेस्ट'च्या एका ग्राहकाला पाच महिन्यांपासून सतत २७० युनिटचेच बिल येत आहे. |
यामुळे बिलांमध्ये घोळ असल्याचा संशय निर्माण झाला आहे. |
नरिमन पॉइंट येथे राहणाऱ्या एका महिला ग्राहकास हा अनुभव आला. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.