text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यांचा जानेवारीतील वीजवापर २०६ युनिट होता. |
फेब्रुवारीमध्ये तो १६४ युनिट असल्याचे 'बेस्ट' च्या बिलात नमूद आहे. |
त्यानंतर मार्चमध्ये वीजवापर २७० युनिट दाखविण्यात आला आहे. |
याहून धक्कादायक म्हणजे, पुढे एप्रिल ते जुलै, हे सलग चारही महिने त्यांचा वीज वापर २७० युनिटच असल्याचे दर्शविण्यात आले असून त्यानुसार या ग्राहकाला बिल पाठविण्यात आले आहे. |
लॉकडाऊन काळात मागील तीन महिन्यांच्या सरासरीचे बिल पाठवावे, असा निर्देश महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिला होता. |
या महिलेस फेब्रुवारी ते मार्चदरम्यान पाठविण्यात आलेल्या बिलाची सरासरी काढल्यास एप्रिलमध्ये त्यास २१३ युनिटचे देयक पाठवणे अपेक्षित होते. |
परंतु 'बेस्ट'ने सलग पाच महिने २७० युनिटचेच बिल पाठवले आहे. |
याबाबत तेथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी सांगितले की, 'ज्या ग्राहकाबाबत हे घडले आहे, ती एक विधवा महिला आहे. |
एका लहान घरांत फक्त ट्यूबलाइट, पंखा, टीव्ही अशी सर्वसामान्य सामग्री आहे. |
तसे असतानाही ३-३ हजार रुपयांचे देयक ग्राहकाला येत आहे. |
याकडे लक्ष देण्याची गरज आहे. |
संध्या लिमये, दापोली-मंडणगडनिसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीतून आपली घरे महत्प्रयासाने सावरत मोठ्या धीराने उभ्या राहिलेल्या कोकणातील शेतकऱ्यांपुढे भविष्यकाळातील उदरनिर्वाहाच्या शाश्वतीचा प्रश्न आता आ वासून उभा आहे. |
आंबा, काजू, नारळ, सुपारी, जायफळ, कोकम, फणस अशा वर्षातून एकदाच येणाऱ्या फळपिकांवर येथील बहुतांश शेतकऱ्यांचा चरितार्थ पूर्णपणे अवलंबून आहे. |
आपत्तीग्रस्त किनारी भागात प्रामुख्याने नारळ, सुपारी, कोकम, जायफळ या बागा ९० टक्के जमीनदोस्त झाल्या आहेत, तर डोंगराळ भागातील आंबा आणि काजूच्या ६० ते ७० टक्के बागा नष्ट झाल्या आहेत. |
या बागांमध्ये पुनर्लागवड करून पुढील पीक हाती येण्यास किमान ७ ते ८ वर्षांचा कालावधी लागेल. |
या काळात उदरनिर्वाहासाठी काय करायचे या प्रश्नाने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. |
त्यातच करोनाच्या वाढत्या फैलावामुळे रोजगारासाठी शहरांची वाटही बंद झाली आहे. |
त्यात एक मोठी समस्या उभी आहे ती संपर्ककक्षेच्या बाहेर असण्याची. |
अनेक गावांमध्ये महिनाभरानंतर वीजपुरवठा सुरू झाला. |
मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी १० याच वेळेतच वीज उपलब्ध असते. |
अनेक ठिकाणी मेन वायर खेचून वीजपुरवठा करण्यात आला असून, डीपी बसवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. |
जे काम झाले आहे ते देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, सायंकाळी ७ ते सकाळी १० या वीजपुरवठ्याच्या मर्यादित काळातही अनेकदा तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होतो. |
लँडलाइन फोन यंत्रणा पूर्ण कोलमडललेली आहे. |
ठिकठिकाणी टॉवर्स पडल्याने मोबाइल सेवाही अद्याप पूर्ववत झालेली नाही. |
या यंत्रणा पूर्ववत करण्याचे विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. |
वीज व इंटरनेटच्या अभावी बँका, पोस्ट यांची कामे रखडली आहेत. |
शासनाकडून आपत्कालीन मदत म्हणून मिळालेली तुटपुंजी रक्कम आपल्या खात्यातून काढताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. |
शहरांतून आपल्या गावाकडे मदत घेऊन निघालेल्या अनेकांना ई-पास संमत न झाल्याचे कारण देत जिल्ह्यांच्या सीमेवरून आल्यापावली परत पाठवले जाण्याचे प्रकारही घडत आहे. |
पुनर्लागवडीची पूर्वतयारी हेच मोठे आव्हानबागांमधील पडलेली झाडे झुडपे साफ करून जमीन पुनर्लागवडीसाठी तयार करणे हे सध्याच्या स्थितीत एक मोठे आव्हान आहे. |
त्याशिवाय पुनर्लागवड केवळ अशक्य आहे. |
मात्र या स्वाभाविक खर्चाकडे शासन यंत्रणेकडून पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. |
यासाठी शासकीय यंत्रणेकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. |
प्रत्येक शेतकऱ्याला त्याची पडझड झालेली बाग साफ करण्यास किमान ५० हजार ते दीड लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. |
मात्र, या कामात शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याबाबत शासकीय यंत्रणेकडून साधा विचारही करण्यात आलेला नाही. |
ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत जनकल्याण समितीद्वारे तसेच मुंबई-पुणे येथील काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लोकसहभागातून बागा स्वच्छ करण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. |
या कामासाठी उभारण्यात आलेली 'निसर्ग सहयोग' ही संस्था सर्वतोपरी सर्वसमावेशक प्रयत्न करू पाहत आहे. |
या स्वयंस्फूर्त कामाला शासकीय यंत्रणेकडून मनरेगा अंतर्गत पाठबळ मिळाल्यास बागायत साफसफाईच्या कामाला अधिक गती येईल व नवीन लागवड करण्याचे काम मार्गी लागेल. |
राज्य सरकारचा कृषी विभाग, पंचायत समितीचा कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ ह्यांच्या कामात समन्वय नसल्यामुळे आपत्कालीन मदत कार्यामध्य़े अनागोदींची स्थिती निर्माण झाली आहे. |
कृषी विद्यापीठासाठीही कसोटीचा काळडॉ. |
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जवळजवळ पाच दशकांमध्ये कृषी संशोधनामध्ये मोलाची कामगिरी बजावली. |
विद्यापीठाचे हे संशोधन आता आपल्या दाराशी उभ्या ठाकलेल्या या भीषण आपत्तीत शेतकऱ्यांना खात्रीशीर भरीव कृषी उत्पन्न मिळवून देण्यासाठी सक्षम करण्यास कसे आता सहाय्यभूत ठरेल, याकडे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. |
सरकारने तातडीने कृतिआराखडा तयार करावानिसर्ग चक्रीवादळामुळे कोकणचा हा आपत्तीग्रस्त प्रदेश २० ते २५ वर्ष मागे फेकला गेला आहे. |
शासनाकडून मिळालेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. |
यातून भविष्यातील शाश्वत विकासाची कोणतीही हमी मिळत नाही. |
शेतकऱ्यांना नव्या उमेदीने उभे करून स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शासकीय स्तरावरून तातडीने कृतिआराखडा तयार करणे व राबवण्याची गरज आहे. |
त्यासाठी शासनामार्फत एक सर्वसमावेशक 'टास्क फोर्स' नेमला जाणे अपेक्षित आहे, मात्र या दृष्टीने अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. |
यामध्ये सकारात्मक बाब म्हणजे कोकण कृषी विद्यापीठाने कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुनर्लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबतच्या कामाची आखणी सुरू केली आहे. |
पण प्रत्येक यंत्रणा आपल्या मर्यादेत राहूनच काम करू शकत असल्याने यातून सर्वसमावेशक व्यापक धोरण आकारास येणे कठीण झाले आहे. |
- विनय महाजनकृषी उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, दापोली तालुका अध्यक्ष आत्मा (कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था) |
विशेष प्रतिनिधी, मुंबई महापालिकेतर्फे सातरस्ता येथील कस्तुरबा रूग्णालयात उभारण्यात येणारे करोना रुग्णालय काही महिन्यांसाठी लांबणीवर पडले आहे. |
मुंबईत करोना नियंत्रणात असल्याने तसेच उपचारासाठी मुबलक प्रमाणात खाटा उपलब्ध असल्याने ही योजना पुढे ढकलली आहे. |
मुंबईत मेपासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णालयांची संख्या अपुरी पडू लागली होती. |
त्यामुळे पालिकेने कस्तुरबा रूग्णालय परिसरात विलगीकरणासाठी दोन मजली रुग्णालय उभारण्याचे निश्चित केले होते. |
त्यासाठी निविदा मागवल्या होत्या. |
त्यासाठी ७० कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. |
मात्र रुग्णालय उभारणी प्रकल्पात अनेक त्रुटी राहिल्याने टीकेचा विषय ठरला होता. |
या रुग्णालयाबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, तूर्त या रूग्णालयाची आवश्यकता नसल्याने त्याला दुय्यम प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगितले. |
सध्या विविध करोना आरोग्य केंद्रे व करोना काळजी केंद्रात मिळून सुमारे एक लाख खाटांची व्यवस्था आहे. |
मे ते जून या काळात तातडीची गरज असल्याने काही आरोग्य केंद्रे उभारणे आवश्यक होती. |
कस्तुरबामधील रुग्णालय उभारणीसाठी तीन महिने लागणार आहेत. |
मात्र आता शहरातील करोना नियंत्रणात आल्याने हे रुग्णालयाचा प्रस्ताव मागे ठेवण्यात आला आहे. |
याचा अर्थ हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे असे नाही, असेही स्पष्ट केले. |
जागेचा शोधकरोनासह साथीच्या अन्य आजारांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. |
पाच हजार खाटांचे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी जागेचा शोध पालिकेने सुरू केला आहे. |
मुलुंड येथे एक जागा आहे. |
त्यापेक्षा अधिक चांगली जागा मिळते का हे पाहिले जात आहे. |
या रुग्णालय उभारणीसाठी 'स्वारस्य अभिरुची' मागवण्यात आली आहे. |
प्रतिनिधी, खुलताबाद पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना दिनेश अंभोरे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख दहा हजार रक्कम, असा एक लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. |
ही घटना १४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. |
या प्रकरणी दिनेश अंभोरे यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
माजी सभापती अर्चना अंभोरे व माजी उपसभापती दिनेश अंभोरे हे पशू वैद्यकीय शासकीय निवासस्थानात राहतात. |
ते गुरुवारी म्हैसमाळ येथे मुक्कामी गेले असता चोरांनी डाव साधला. |
मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. |
बेडरूममध्ये सामान उचकटून कपाटातील दागिने व रोख दहा हजार रुपये चोरून नेले. |
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, हेडकॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी यांनी पंचनामा केला. |
घटनास्थळावरून ठसे घेण्यात आले असून सहायक पोलिस निरीक्षक पंकज उदावंत हे तपास करत आहेत. |
करोना महामारी सारख्या आजारात मास्क घालणे आवश्यक आहे बाहेर जातांना अनेक नागरिक बिना मास्क चे फिरताना दिसून येतात त्या मद्ये फॉर व्हीलर मद्ये असलेले नागरिक कायद्याचे पाय मोडून ५-६जण विना मास्क प्रवास करताना दिसून येतात या साठी पोलिसांना मोकळीक देऊन त्यांच्या वर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे वारंवार नागरिक सांगून ऐ... |
नवी दिल्लीः Samsung ने आज Galaxy Unpacked Event मध्ये आपली लेटेस्ट Galaxy Note 20 Series ला लाँच केले आहे. |
कंपनीने या सीरीजला एका व्हर्च्यूअल कार्यक्रमात लाँच केले आहे. |
या सीरीज अंतर्गत कंपनीने Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra स्मार्टफोन्स ला लाँच केले आहे. |
नोट २० सीरीजच्या स्मार्टफोन्समध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप, एस पेन आणि दमदार बॅटरी यासारखे फीचर्स दिले आहेत. |
वाचाः आजपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्सगॅलेक्सी नोट २० अल्ट्रा चे वैशिष्ट्ये १२९९ डॉलर (जवळपास ९७ हजार ५०० रुपये) किंमतीसोबत लाँच केलेल्या या फोनमध्ये 3088x1440 पिक्सल रेजॉलूशन आहे. |
फोनमध्ये ६. |
९ इंचाचा sAMOLED WQHD इनफिनिटी-O डायनामिक 2x कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. |
फोनमध्ये 19. |
3:9 चा आस्पेक्ट रेशियो आणि 120Hzचा रिफ्रेश रेट दिला आहे. |
८ जीबी रॅम आणि १२जीबी रॅम असे दोन पर्याय दिले आहेत. |
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ SoC प्रोसेसर दिला आहे. |
हा फोन १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबीच्या रॅम ऑप्शनमध्ये येतो. |
वाचाः फ्लिपकार्टवर आजपासून सेल; फोनवर ४०% तर TVवर ५०% सूटफोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. |
यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत दोन १२ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. |
सेल्फीसाठी फोनमध्ये १० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. |
फोनमध्ये दिलेला S Pen 9 मिलिसेकंड्स च्या लेटेंसी सोबत येतो. |
फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. |
वाचाः वनप्लस नॉर्डचा ४ ऑगस्टला अॅमेझॉनवर ओपन सेलगॅलेक्सीनोट २० चे खास वैशिष्ट्ये फोन मध्ये 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६. |
७ इंचाचा Infinity-O Super AMOLED+ डिस्प्ले दिला आहे. |
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिला आहे. |
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर दिला आहे. |
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. |
यात ६४ मेगापिक्सल आणि दोन १२ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.