text
stringlengths
0
6.48k
सेल्फीसाठी फोनमध्ये १० मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे.
वाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्याअँड्रॉयड 10 ओएस वर बेस्ड One UI वर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4300mAh बॅटरी दिली आहे.
फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
चार्जिंगसाठी यात USB-C चार्जिंग पोर्ट दिला आहे.
फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते.
पाणी आणि धूळ यापासून वाचवण्यासाठी फोनमध्ये IP 68 मिळतो.
फोनमध्ये खास S Pen दिला आहे.
२६ मिलिसेकंड्सची लेटेंसी दिली आहे.
अमेरिकेत या फोनची किंमत ९९९ डॉलर (जवळपास ७५ हजार ४०० रुपये) किंमत आहे.
वाचाः मित्रों अॅप ३ कोटींहून जास्त डाउनलोड्स, एका महिन्यात ९०० कोटी व्ह्यूजवाचाः नवा उच्चांक!
भारतात २,२२५ कोटी रुपयांचे स्मार्टफोन आयातवाचाः रिलायन्स जिओची कमाल, ३ महिन्यात १ कोटी नवीन ग्राहक
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात (sushant singh rajput case) सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
केंद्र सरकारने याप्रकरणी आपल्याला एक पक्षकार करण्याची मागणी केली आहे.
आज बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिची अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) चौकशी केली.
तिच्यासोबत तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शोविक चक्रवर्तीही ईडी कार्यालयात पोहोचले.
ईडीने रिया चक्रवर्ती विरोधात मनी लाँड्रिगचा (money laundering) गुन्हा दाखल केला आहे.
रियाची सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी आज शुक्रवारी चौकशी करण्यात येणार होती.
त्यासाठी या अभिनेत्रीला समन्स बजावण्यात आले होते.
पण तिने ईडीला ही चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
आपली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने ही चौकशी पुढे ढकलली जावी असे तिने म्हटले होते.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे अभिनेत्रीने आपल्या जबाबाचे रेकॉर्डिंग स्थगित करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले होते.
ईडीने मात्र रियाची ही विनंती नाकारली होती, त्यानंतर रियाला ईडीच्या कार्यालयात जावे लागले.
पैसे काढणे, फसवणूक करणे आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे असे आरोप करत सुशांतसिंहच्या कटुंबीयांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ईडीने रियाला सकाळी ११.
३० वाजता चौकशीसाठी कार्यालयात येण्याची वेळ दिली.
रिया काही मिनिटांनंतर ईडीच्या कार्यालयात पोहोचली.
वाचा- सुशांतसिंह प्रकरण: रियाने डिप्रेशनची चुकीची थिअरी तयार केली- बिहार सरकारईडीने सुशांत राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आणि रियाचा माजी मॅनेजर श्रुती मोदी यांनाही या प्रकरणात समन्स बजावले आहेत.
ईडी या प्रकरणी रियाला १५ कोटींच्या 'संशयास्पद व्यवहार'प्रकरणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुशांतच्या कुटुंबासह बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची दखल ईडीने घेतली आहे.
वाचा- केरळ भूस्खलन: १५ ठार, १२ जणांना सुखरूप बाहेर काढले; बचावकार्य सुरूचरियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून तिने बिहारमधील नोंदवलेला खटला मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
ईडी व्यतिरिक्त सीबीआयनेही या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांवर आत्महत्या, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी यासारख्या आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
सुशांत राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयची एसआयटी टीम करीत आहे.
त्यात डीआयजी मनोज शशिधर आणि एसपी नुपूर प्रसाद यांचा समावेश आहे.
२५ जुलै रोजी बिहार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३४१, ३४८, ३८०, ४०६, ३०६, ५०६, ४२०,१२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने देखील आपल्या एफआयआरमध्ये हीच कलमे घातली आहेत.
वाचा- भूमिपूजन: ब्राह्मणाला मोदींकडे दक्षिणा मागू दिली नाही, इशाराही केला पण.
..
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत जितके सिमकार्ड वापरायचे त्यातलं एकही सिम कार्ड त्याच्या नावावर नव्हतं.
यातलं एक सिम कार्ड त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीच्या नावावर रजिस्टर होतं.
सध्या बिहारची टीम सुशांतच्या कॉल डिटेल रेकॉर्डवर लक्ष ठेवत आहे.
यासोबतच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या कुटुंबियांशीही बोलणार आहे.
दिशाचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी झाला होता.
याआधी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी या चौकशीत मुंबई पोलिसांच्या असहयोगाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘आमच्याकडे अजूनपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज या अशासंबंधीची कोणतीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली नाही.
आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी मुंबई पोलिसांना बिहार पोलिसांना सहकार्य करण्यास सांगावं.
’सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला मिळत आहेत धमक्यायासोबतच बिहार पोलिसांना या प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा असं वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर देताना डीजीपी म्हणाले की, ‘आम्ही निष्पक्ष चौकशी करण्यात सक्षम आहोत.
आम्हाला आशा आहे की मुंबई पोलीस आम्हाला साथ देईल आणि हे प्रकरण आम्ही सोडवू.
’ सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांच्यावतीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पटणात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली.
याशिवाय या प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी करण्यात येणार आहे.
सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
पण त्याने ही आत्महत्या का केली या मागची कारणं सध्या शोधण्यात येत आहेत.
आतापर्यंत ४१ हून अधिक लोकांचे यासंबंधीचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
यात सुशांतच्या कुटुंबियांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
सुशांतसिंह राजपूत- एक कॉल आणि मुंबई पोलिसांची फाइल झाली डिलीट!
बिहार पोलिसांना मिळत नाही मुंबई पोलिसांकडून मदतसध्या बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली असून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची ते चौकशी करत आहेत.
यात मुंबई पोलीस बिहार पोलिसांना मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे.
बिहार टीमला लीड करण्यासाठी मुंबई पोहोचलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांनाही मुंबईत एका गेस्ट हाउसमध्ये जबरदस्ती क्वारन्टीन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, पुणे: उच्चशिक्षित तरुणीवर पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरला १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी सुरेश वडियार (वय ३६, आयुर क्लिनिक, शिवराजनगर, अप्पर इंदिरानगर) या डॉक्टरला अटक केली आहे.
त्याच्या विरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पीडित तरुणी २२ वर्षांची आहे.
वडियार संबंधित तरुणीच्या कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर होता.
त्यामुळे मार्च २०१८पासून ती पाठ व खांद्याच्या दुखापतीच्या उपचारांसाठी वडियारकडे जात होती.
बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर शिवराज नगर येथे सर्वे नंबर १० येथे सुरेश वडियार याचे आयुर नावाचे क्लिनिक आहे.
संबंधित तरुणी उपचारांसाठी त्याच्या क्लिनिकमध्ये गेली असता त्याने तिचे चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर वडियारने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
त्याच्या अत्याचाराला कंटाळून तिने घडलेला प्रकार घरी सांगितला.
तिचे वकील.
अॅड हेमंत झंजाड, अॅड.
अरविंद खांडरे यांच्यामार्फत पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.
चहावाल्याला पोलिसांकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल'ती' भेट शेवटची ठरली!
गर्लफ्रेंडच्या हत्येनंतर बॉयफ्रेंडनेही केली आत्महत्यामुलगी तरुणाच्या प्रेमात पडली; बापाने एकुलत्या एक मुलीची केली हत्याआरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले.
आरोपी डॉक्टरकडून त्यांनी चित्रीकरण केलेले व्हिडियो जप्त करायचे आहेत, ते व्हिडियो स्टोअर केले आहेत का, असल्यास ते सर्व साहित्य जप्त करायचे आहे; तसेच त्यांनी आणखी कोणाची या पद्धतीने फसवणूक केली आहे का, याबाबत तपास करायचा आहे, त्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी कोर्टात केली.
आरोपी विक्षिप्त मनोवृत्तीचा असून, त्याने संबंधित तरुणीचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे.
त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद फिर्यादीतर्फे अॅड.
हेमंत झंजाड यांनी कोर्टात केला.
पाणीपुरी खाता-खाता जडलं प्रेम; 'ती' पाणीपुरीवाल्यासोबत गेली पळूननिर्दयी आई; पैशांसाठी मुलीवर देहविक्रेयसाठी दबाव, पण.
वृत्तसेवा, वसईकरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशविसर्जन मिरवणुकीला प्रशासनातर्फे मज्जाव करण्यात आला आहे.
तसेच, कृत्रिम तलाव उभारण्यासही नकार दिला आहे.
मात्र पालिकेने 'फिरते कृत्रिम तलाव करून ते थेट भाविकांच्या दारात आणावेत', असा प्रस्ताव पालिकेपुढे मांडला आहे.
पालिकेने ही संकल्पना न राबविल्यास बहुजन विकास आघाडी स्वतः हा प्रयोग शहरात राबविणार आहे.
करोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच, गणेशोत्सव शक्य असल्यास रद्द करावा, असे आवाहनही करण्यात आले होते.
मात्र त्याला वसईतून फार प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान करोनाचा संसर्ग कसा रोखता येईल, यासाठी महापालिकेसह सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.
वसईतील अनेक गणेश मंडळांनी गणेशमूर्तीच्या उंची सरकारच्या नियमात राहून मर्यादित ठेवल्या आहेत.
तर, अनेक मंडळांनी उत्सवाचे दिवस कमी केले आहेत.
मात्र गणेशमूर्तीच्या विसर्जनावेळी संसर्गाचा धोका आहे.
यासाठी विसर्जन मिरवणुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
तर, घरच्या घरीच विसर्जन करण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.
मात्र ज्यांना शक्य नाही, अशांना मूर्ती विसर्जन करण्यासाठी बाहेर पडावेच लागणार.
यावर तोडगा म्हणून 'फिरते कृत्रिम तलाव करून ते थेट भाविकांच्या दारात आणावेत', असा प्रस्ताव आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिकेसमोर ठेवला आहे.
'छोट्या टेम्पोमध्ये हे कृत्रिम तलाव असतील आणि हा टेम्पो विसर्जनाच्या दिवशी थेट भाविकांच्या दारात जाऊ शकेल.
यामुळे विसर्जनासाठी बाहेर पडण्याची गरज लागणार नाही,' असे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले.
'पालिका यंदाच्या वर्षीही कृत्रिम तलाव तयार करणार नाही.
त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव पालिकेला दिला आहे.
पालिकेने तो मान्य न केल्यास पक्षातर्फे शहरातील नऊ प्रभागांत 'फिरते कृत्रिम तलाव आपल्या दारी' हा प्रयोग राबविला जाणार असल्याचे ते म्हणाले.
घरगुती मूर्ती दोन फुटांची असते.
ज्यांना अशा फिरत्या कृत्रिम तलावात विसर्जन करायचे आहे, त्यांची नावे आगाऊ नोंदविल्यास टेम्पोचे नियोजन करता येणार आहे.