text
stringlengths
0
6.48k
तर, पालिकेतर्फे कृत्रिम तलावाचे काम यंदा शक्य नसून वसईतील कोणत्याही संस्थेला, पक्षाला अशी काही संकल्पना राबविण्याचा मानस असल्यास पालिका त्यांना अडविणार नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पटणा- सुशांतसिंह राजपूतच्या केसच चौकशी आता सेन्ट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) करत आहे.
सुशांतचे वडील केके सिंह आणि त्याच्या बहिणीने सुशांतच्या बॉलिवूडमधील संबंधांवर चर्चा केली.
फरीदाबाद येथे सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले.
रिपोर्टनुसार, सीबीआय चौकशी दरम्यान सुशांतच्या वडिलांनी सुशांतची हत्या झाल्याचे सांगितले.
'तुझ्या कुटुंबावर सुशांतच्या हत्येचा आरोप आहे', प्रश्न ऐकताच संतापली रियाकुटुंबियांनी केला हत्येचा आरोपटाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या बहिणीने सीबीआयला सांगितलं की, सुशांतची केस आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी नाही तर या प्रकरणाकडे हत्येच्या दृष्टीने पाहिले पाहीजे.
सुशांतच्या वडिलांनीही हत्येचा आरोप केला आहे.
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं होतं.
पटणामध्ये दाखल केलेल्या या केसमध्ये रियाच्या कुटुंबियांविरोधातही अनेक आरोप करण्यात आले आहेत.
सुशांतच्या वडिलांनी रियावर केले गंभीर आरोपया एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करणं, मानसिक शोषण आणि त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची हेराफेरी यांसारखे गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईला गेली होती.
यावेळी मुंबई पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.
सुशांत केस- समोर आले रिया चक्रवर्तीचे आयटीआर, एफडीचे डिटेल्सदरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीशी केलेल्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत.
या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली.
सुशांतच्या सीएनेही काही रक्कम घेतला असल्याचा आता संशय व्यक्त केला जात आहे.
सुशांतच्या कंपनीचं अकाउंट सांभाळणाऱ्या दोन सीएच्या अकाउंटमध्ये मार्चमध्ये काही रक्कम गेल्याचं खुलासा रियाने ईडीच्या टीमकडे केला.
२ कोटी ६५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची एफडी केली होती.
मात्र सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर रिया तिचा भाऊ शौविक आणि दोन सीएच्या मदतीने त्या एफडीमधले जवळपास अडीच कोटी रुपये काढले.
यानंतर एफडी फक्त २ कोटींचेच राहिले.
प्रसिद्ध संगीतकार, गायक अजय गोगावले, गायिका वैशाली भैसने माडे, बॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावला, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, लेखक, विचारवंत कुमार सप्तर्षी या सर्वांचा वाढदिवस आहे.
यांच्यासह आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा.
..आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला आढावा.
..चंद्राचा कन्या प्रवेश 'या' पाच राशींना लाभदायक; आजचे राशीभविष्यआगामी वर्षात आपल्यावर गुरु, केतु, बुध या तीन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील.
भविष्याची नाहक चिंता आपणास सतावत राहील.
याचा मानसिक आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दिलेला शब्द आणि हाती घेतलेली कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करावीत.
अन्यथा विनाकारण आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकेल.
आपल्याबद्दलचा विश्वास कायम ठेवावा.
हरितालिका तृतीया : 'असे' करा व्रत; जाणून घ्या मुहूर्त, कहाणी व आरतीऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे.
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत.
आपल्यापेक्षा श्रेष्ठ, शक्तिमान व्यक्तींशी शत्रुत्व, संघर्ष पत्करू नये.
अन्यथा आपणास नुकसान होऊ शकते.
गणेशोत्सव : ५ हजार वर्षांपासून केले जाते पार्थिव गणपती पूजन?
वाचा तथ्यडिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत विवाहेच्छूक मंडळींसाठी आनंदवार्ता मिळण्याचे योग.
विवाहाची बोलणी पुढे सरकतील.
घरात मंगल कार्ये घडतील.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात कामानिमित्त प्रवास संभवतात.
देशाटनाचे योग आहे.
एकूणच प्रवास सार्थकी लागतील.
एप्रिल व मे महिन्यात वैयक्तिक ज्ञान, माहिती, मनोरंजन यांवर पैसे खर्च होतील.
हे खर्च लाभदायक ठरतील.
दुर्वांशिवाय गणेश पूजन अपूर्ण; वाचा, महत्त्व, मान्यता आणि कथाजुन आणि जुलै महिन्यात अथक परिश्रम, कठोर मेहनत, नियोजन, व्यवस्थापन यांच्या जोरावर हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्यावी लागतील.
विद्यार्थी आणि महिलांसाठी आगामी वर्ष उत्तम असेल.
अपेक्षित यशप्राप्तीसाठी शक्य असल्यास नियमितपणे बुधवारी पिवळ्या रंगाची फळे, खाद्य पदार्थ दान करावेत.
मुंबई: सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवल्याचं मला माहीत नाही.
आम्हाला रोज शे-पाचशे नोटीस येतात.
नोटीस आली की नाही बघावे लागेल.
हा सुशांतच्या कुटुंबीयातील आणि माझ्यातील प्रश्न आहे.
मी संवेदनशील माणूस आहे.
याप्रकरणात चुकीचं काही बोललो असेल तर त्यांच्या कुटुंबीयांशी जरूर बोलेल, असं सांगतानाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुशांतसिंह प्रकरणी केलेल्या लिखाणावरून माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील स्तंभातून सुशांतसिंहच्या कुटुंबातील खासगी बाबींवर प्रकाश टाकला होता.
त्याच्या वडिलाने दुसरं लग्न केलं होतं.
त्यामुळे सुशांत नाराज होता.
वडिलांशी त्याचं जमत नव्हतं, असं राऊत यांनी म्हटलं होतं.
त्यावर सुशांतच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता.
सुशांतचा चुलत भाऊ नीरज सिंह याने राऊत यांना आज नोटीस पाठवली होती.
राऊत यांनी ४८ तासात माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा या नोटीशीतून राऊत यांना देण्यात आला होता.
त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवल्याचं मला माहीत नाही.
मला बरीच कामे आहेत, असं सांगतानाच बिहारमध्ये बसून जशी त्यांच्या कुटुंबीयांना काही एक माहिती मिळते आणि ते बोलतात, तशी मलाही माहिती मिळाली त्याआधारावर मी बोललो.
या प्रकरणात चुकीचं काही बोललो असेल तर त्यांच्या कुटुंबीयांशी जरूर बोलेल.
याप्रकरणात मीडियाने पडण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले.
मुंबई पोलिसांना ५० वर्षे ओळखतो, माझा पूर्ण विश्वास आहे: शरद पवारदरम्यान, सुशांत प्रकरणाचं राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं.
सुशांत प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये.
काही लोक सरकार पडण्याच्या डेडलाइन देत आहेत.
त्याला आत्मानंद म्हणतात, अशी टीकाही त्यांनी केली.
Sanjay Raut: संजय राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस, ४८ तासांत माफी मागा नाहीतर.
..जून महिन्याच्या १४ तारखेला सुशांतनं त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती.
त्याच्या मृत्यूला जवळपास दोन महिने उलटल्यानंतरही त्यावरून चर्चा, वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
राज्यातील विरोधी पक्षाने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्याने व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव यात अप्रत्यक्षरित्या घेतलं जात असल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे.
शिवसेनेनेही तातडीनं पुढं येत सर्व आरोप फेटाळले आहेत.
भोंदू डॉक्टरनं ऑपरेशनची नवी तारीख दिलीय; 'सामना'तून राणेंवर बोचरी टीका
मुंबई-सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआयने आपल्या हाती घेतला आहे.
पहिल्या दिवसापासूनच सीबीआयची टीम जोमाने कामाला लागली आहे.
प्रत्येक साक्षीदाराचा आणि संशयीतांचा पुन्हा जबाब नोंदवला जात आहे.
दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने संदीप सिंह संदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे.
मुंबईतील करणी सेनेचे६ उपाध्यक्ष सुरजितसिंह राठोड यांनी टाइम्स नाऊशी बोलताना दावा केला की, सुशांत प्रकरणात संदीप सिंहची वागणूक संशयास्पद आहे.
कूपर इस्पितळाच्या इथे, संदीप सिंह आणि पोलिसांमध्ये दुबईसंदर्भात बोलणं झाल्याचा दावा राठोड यांनी केला.
सीबीआयच्या रडारवर आहे संदीप सिंहपहिल्या दिवसापासून संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर आहे.
असं म्हटलं जातं की, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या फ्लॅटमध्ये पोहोचणाऱ्यांमध्ये संदीपही होता.
या दरम्यान.
संदीपचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
यात तो सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पोलिसांना थम्सअप करताना दिसत आहे.
याशिवाय वृत्तवाहिनीवरही संदीपने आपली विधानं वारंवार बदलली आहेत.
१३ जूनच्या रात्री सुशांतच्या घरच्या लाइट्स अचानक झाल्या होत्या बंद, शेजाऱ्यांचा खुलासा१५ जून रोजी रियासोबत शवागारात गेला होता सरजित सुरजितसिंह पुढे म्हणाले की, ते १५ जून रोजी कूपर इस्पितळात गेले होते.
करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना रियासोबत जाण्यास सांगितले.
सुरजित म्हणाले की, ‘कर्मचार्‍यांना विनंती केल्यानंतरच रियाला सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी देण्यात आला होता.
रियाने सुशांतला पाहिल्यावर तिने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि सॉरी बाबू फक्त एवढंच म्हणाली.
'संदीपने विचारले तू कोण आहेस' सुरजितच्या म्हणण्यानुसार त्यांना इस्पितळाच्या बाहेर संदीप सिंह भेटला होता.
संदीपने त्यांना तुम्ही कोण असा प्रश्नही विचारला.
यावर आपण करणी सेनेचा सदस्य असल्याचे सुरजितने सांगितले.
हे ऐकल्यावर संदीप अचानक तिथून निघून गेला.
त्यावेळी तिथे कागदपत्रांची कारवाई होत होती.
डॉक्टरांनी केलं कबुल, मुंबई पोलिसांच्या सांगण्यावर घाईत केलं पोस्टमॉर्टम'मला येथून काढायला पोलिसांना सांगितले' सुरजित पुढे म्हणाले की, त्यावेळी संदीप तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांकडे गेला.
तिथे पोलीस आणि संदीप यांच्यात दुबईवरूनही काही गोष्टी झाल्या.
संदीपने पोलिसांना मला तेथून काढण्यास सांगितले.
जेव्हा पोलीस माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सांगितले की मी करणी सेनेचा सदस्य आहे आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी इथे आलो आहे.