text stringlengths 0 6.48k |
|---|
’ |
वृत्तसंस्था, नवी दिल्लीदिल्ली विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन बसण्यास (ओबीई) दिल्ली उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचनांसह परवानगी दिली आहे. |
या परीक्षा येत्या १० ऑगस्टपासून सुरू होणारआहेत. |
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत, विद्यार्थ्यांना ईमेल आणि विद्यापीठाच्या पोर्टलवर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाव्यात. |
तसेच उत्तर पत्रिका अपलोड करण्यास त्यांना अतिरिक्त वेळ देण्यात यावा, असे निर्देश न्यायमूर्ती प्रतिभा एम. |
सिंह यांनी दिले. |
तसेच विद्यापीठाने विद्यार्थ्यांना 'ऑटो जनरेटेड' ईमेल पाठवण्याचे निर्देश देतानाच, विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर, याची माहिती देणारा मेलही विद्यार्थ्यांना गेला पाहिजे, असे स्पष्ट केले. |
त्याचप्रमाणे नोडल अधिकारी आणि सेंट्रल इमेल आयडीच्या संदर्भातील माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. |
यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली विद्यापीठाने ठरवलेल्या अंतिम वर्ष पदवीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये पुस्तक घेऊन बसण्याच्या निर्णयाला एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. |
यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. |
यावेळी न्या. |
सिंह यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी शुभेच्छाही दिल्या. |
येत्या १० ते ३१ ऑगस्ट या कालावधीत दिल्ली विद्यापीठाच्या ऑनलाइन ओपन बुक परीक्षा (ओबीई) होणार असून, जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार नाहीत, त्यांना वर्गामध्ये बसून परीक्षा देण्याचीही संधी मिळणार आहे. |
या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील. |
न्यायालयाचे निर्देश- या परीक्षांचे निकाल हे तातडीने लावण्यात यावे आणि उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी पाठवण्यात यावी. |
- प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यात आणि उत्तरपत्रिका अपलोड करण्यात येणाऱ्या समस्यांसह विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. |
- तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्या तक्रार समितीकडे पाठवण्यात याव्यात. |
- निवृत्त न्या. |
प्रतिभा रानी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार समिती स्थापन करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या तक्रारी पाच दिवसांच्या आत सोडवाव्यात. |
- परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठ आणि समितीने आपापला अहवाल सादर करावा. |
अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. |
नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांना आधीच करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. |
तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही अस्वस्थ वाटू लागले असून ते आज करोनाची चाचणी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. |
नवीन राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा दहा जणांना करोनाची लागण झाली आहे. |
आई-वडिलांना करोनाची लागण झाल्याने रवि राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेले आहेत. |
तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत. |
मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला. |
करोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी करोनाची टेस्ट केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. |
त्यामुळे त्यांनाही आता रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. |
तर दुसरीकडे आई-वडिलांसोबत नागपूरमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनाही त्रास जाणवू लागल्याने ते आज करोनाची चाचणी करणार आहेत. |
राणा यांच्या कुटुंबात दहा जणांना लागण झाल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कातील लोकांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आणि क्वॉरंटाइन होण्याचे आवाहन केल्याचं सूत्रांनी सांगितलं. |
नवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते. |
करोनाचं संकट असल्याने करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच विभागांमध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेण्याचं काम त्या करत होत्या. |
शिवाय त्यांनी मतदारसंघात स्वत: धूर फवारणी केली होती. |
सतत कार्यकर्ते आणि मतदारांच्या त्या संपर्कात होत्या. |
त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. |
अभिनेता समीर शर्माची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफासदरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला आहे. |
दरम्यान, करोना संकटाच्या काळात आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि अत्यावश्यक वस्तूच्या वाटपासाठी काही भागांत दौऱ्यावर गेले होते. |
यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही त्यांच्यासोबत होत्या. |
रवी राणा यांच्या वडिलांना करोनाचा संसर्ग कसा झाला, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये. |
ब्रायन लाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह? |
जाणून घ्या सत्यखासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी भन्नाट आयडिया |
लखनऊ: श्राराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. |
नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता. |
त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली. |
त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. |
नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत आहेत. |
त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आग्र्याचे सीएमओ आणि इतर डॉक्टर्स पोहोचले आहेत. |
८ दिवसांपूर्वीच, ५ ऑगस्ट या दिवशी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच महंत नृत्यगोपाल दास हे देखील उपस्थित होते. |
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या समर्थकांशी तसेच, मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चा केली. |
या बरोबरच मुख्यमंत्री योगी यांनी मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशी चर्चा केली आणि महंत नृत्यगोपाल दास यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत सूचना केल्या. |
मथुरेत आहेत नृत्यगोपाल दासकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नृत्यगोपाल दास हे मथुरेत येत असतात. |
आज त्यांची तब्येत अचानक बिघडली. |
त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. |
या नंतर त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. |
त्यानंतर त्याला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. |
काही दिवसांपूर्वी अयोध्येतील रामलल्लाचे पुजाऱ्याला देखील करोनाची लागण झाली होती. |
या व्यतिरिक्त तेथील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती. |
त्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. |
त्यावेळी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. |
वाचा- देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली २३,९६,६३८ वरदेशात सुमारे २४ लाख कोरोना रुग्णयावेळी, देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या २४ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. |
गेल्या २४ तासांत जवळजवळ ६७ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. |
तर २४ तासात ९४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. |
आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३७ एवढी आहे. |
वाचा- प्रणव मुखर्जींची प्रकृती नाजूक; प्रणवदांचे पुत्र प्रसारमाध्यमांवर भडकले, म्हणाले. |
..कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ४७ हजार ३३ लोक मरण पावले आहेत. |
तसेच आतापर्यंत करोनावर मात करत १६ लाख ९५ हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत, तर देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ५३ हजार ६२२ इतकी आहे. |
आकडेवारीनुसार, देशातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ७० टक्क्यांहून अधिक आहे. |
यासह देशभरात एकाच दिवसात सर्वाधिक ७ लाख ३३ हजार ४४९ चाचण्या घेण्यात आल्या. |
ही बातमी देखील वाचा:संजय राऊत यांच्या विरोधात पाटण्यात तक्रार, अटकेची मागणी |
मुंबई:गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला पीपीपी मॉडलनुसार देशातील सहा विमानतळाचे अधिकार मिळाले आहेत. |
आता अदानी समूहातील अदानी एटरप्रायझेस लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमधील ७४ टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. |
हा सौदा पूर्ण झाल्यानंतर अदानी कंपनी खासगी क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा एअरपोर्ट ऑपरेटर ठरेल. |
वाचा- सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मोदी सरकारने या गोष्टी केल्या स्वस्तअदानी समूहाला याआधीच देशातील सहा विमानतळाच्या व्यवस्थापनाचे अधिकार मिळाले आहेत. |
त्याचत मुंबई एअरपोर्टमधील जीव्हीके समूहाकडील ५०. |
५ टक्के हिस्सा अदानी समूहाने खरेदी केला. |
आता अन्य हिस्सेरादांपैकी दक्षिण आफ्रिकेतील कंपनी ACSA आणि बिडवेस्ट ग्रुप यांच्याकडील अनुक्रमे १० आणि १३. |
५ टक्के हिस्सा अदानी समूह विकत घेणार, असे वृत्त बिझनेस स्टॅडर्डने दिले आहे. |
वाचा- 'या' वस्तू होणार स्वस्त ; केंद्र सरकारने जीएसटी दर कमी केलाहा हिस्सा खरेदी केल्यानंतर अदानी ग्रुप सर्वात मोठा शेअरधारक होईल. |
जीएमआर हा समूह देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर आहे. |
वाचा- गेल्या वर्षी भारतीयांनी केली ही चूक; झाला ५६१ कोटींचा दंड! |
एका वृत्तानुसार अदानी समूह हिस्सा विकत घेण्यासाठी १५ हजार कोटी रुपये मोजू शकते. |
इतक नव्हे तर मुंबईत तयार होणाऱ्या नवी मुंबईतील विमानतळाचा मालकी हक्क अदानी समूहाला मिळू शकतो. |
कारण MIAL मध्ये त्यांचा ७४ टक्के वाटा आहे. |
वाचा- मोदी सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना दिली आनंदाची बातमीजयपूर, गुवाहटी, तिरुवनंतपूरम एअरपोर्ट अदानी समूहाला ५० वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. |
पीपीपी मॉडेलनुसार अदानी समूहाला देशातील सहा विमानतळाचे संचालन, देखरेख आणि विकासाचा अधिकार मिळाला आहे. |
यात अहमदाबाद, लखनऊ, मंगलोर, जयपूर, तिरुवनंतपूरम आणि गुवाहटी यांचा समावेश आहे. |
वाचा- या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक; लवकरच येतोय IPOयांनी केला विरोधदरम्यान केरळचे मुख्यमंत्री पी. |
विजयन यांनी तिरुवनंतपूरम विमानतळ खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला आहे. |
या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहले आहे. |
प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल-डिझेल वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विद्युत वाहनांसह सीएनजी, एलपीजी गाड्यांवर भर देत आहेत. |
वैध पीयूसी नसल्यास वाहननोंदणी रद्द करा, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे. |
वैध पीयूसी नसलेल्या वाहनांबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. |
यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. |
यानुसार महाराष्ट्रातदेखील अंमलबजावणी होणार असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. |
लॉकडाउनमध्ये मुंबईसह अनेक शहरांतील हवेची योग्यतापातळी सुधारली होती. |
अनलॉक काळात सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. |
यामुळे खासगी वाहतुकीचा वापर वाढत आहे. |
त्यातच अनेकजण करोनासंसर्ग होण्याच्या भीतीने खासगी वाहनांला पसंती देत आहेत. |
याकाळात पीयूसीसह अन्य कागपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन आयुक्तालयातील अधिकारी सांगतात. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.