text stringlengths 0 6.48k |
|---|
पीयूसी नसलेल्या वाहनांमुळे कार्बनचे उत्सर्जन अधिक होते. |
यामुळे हवेची योग्यतापातळी खालावते. |
त्याचबरोबर अनेक नागरिकांना श्वसनाचाही त्रास उद्भवतो. |
अनेक वाहनधारकांकडून पीयूसीबाबत गांभीर्य नसल्याने राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने २०१५मध्ये वैध पीयूसी नसलेल्या वाहनांना इंधन देऊ नये तसेच वाहननोंदणी निलंबित करण्याचे आदेश दिले होते. |
केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील नियम ११५ आणि ११६नुसार, पीयूसी नसल्यास वाहननोंदणी निलंबित किंवा सहा महिने तुरुंगवास किंवा १० हजारांचा दंड अशी तरतूद आहे. |
वैध पीयूसी नसल्यास नियमांनुसार कारवाई करण्यात येते. |
वाहनचालकांकडे वैध पीयूसी नसल्यास सात दिवसांची मुदत देण्यात येते. |
त्यानंतर संबंधितांने पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी निलंबित करण्याची मुभा आहे. |
यानंतर ही पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी रद्द करण्यात येईल. |
- अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त |
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे या वर्षी चीनमधून होणारी आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होत आहे. |
पण एप्रिल महिन्यापासून त्यात वेगाने घसरण होत असल्याचे दिसत आहे. |
एप्रिल महिन्यात सीमेवर चीनने केलेल्या कुरापतीमुळे देशात लोकांच्यात त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला. |
त्यानंतर चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. |
याचा मोठा फटका चीनला बसल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत होते. |
आता त्यासंदर्भात अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. |
वाचा- शेअर गहाण ठेवून कर्ज काढले; असा अडकला भारताचा रिटेल किंगचीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने असा दावा केल्या आहे की चीनमधून भारता आयात होणाऱ्या वस्तूमध्ये घट झालेली नाही. |
पण ग्लोबल टाइम्सने दिलेली आकडावारी आणि भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेली आकडेवारी यात मोठी तफावत आहे. |
वाचा- 'RBI'चा खातेदारांना दणका; 'ओव्हरड्राफ्ट'मधील 'चालू'गिरीवर घातली मर्यादाग्लोबल टाइम्सच्या दाव्यानुसार भारताने या वर्षी जून महिन्यात चीनमधून ४. |
७ अब्ज डॉलरच्या वस्तू आयात केल्या आहेत. |
पण वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार ही आकडेवारी फक्त ३. |
३२ अब्ज डॉलर इतकी आहे. |
जी गेल्या वर्षाच्या जून महिन्यापेक्षा ४३. |
७३ टक्क्यांनी कमी आहे. |
वाणिज्य मंत्रालयाने अद्याप जुलै महिन्याचे आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. |
जर जुलै महिन्यासाठी ग्लोबल टाइम्सने आयातीची आकडेवारी जी ५. |
६ अब्ज डॉलर आहे, जी बरोबर आहे असे मान्य केले तरी गेल्या वर्षाच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ती फारच कमी आहे. |
वाचा- मोठ्या रकमेचे चेक व्यवहार करताय : नवे नियम जाणून घ्याभारताच्या वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जुलै महिन्यात चीनमधून भारतात ६. |
१८ अब्ज डॉलर इतकी आयात झाली होती. |
मे महिन्यात चीनमधून आयात थोडी कमी झाली होती. |
तेव्हा वैद्यकीय गोष्टींची आयात झाल्याचे मंत्रालयाने सांगितले. |
वाचा- मोदींनी अयोध्येत झाड काय लावले; कमालच झाली, स्टॉक संपला! |
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी महिन्यात देखील चीनमधून आयातीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. |
कारण जवळपास २०० वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली गेली आहे. |
तसेच अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्यात आलय. |
यामुळे आयात वाढण्याची शक्यता नाही. |
विशेष म्हणजे या वर्षा आतापर्यंत एकाही महिन्यात चीनमधून भारतात होणारी आयात वाढलेली नाही. |
वाचा- अंबानींच्या पुढे आता फक्त तिघेच; श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरकाही दिवसांपूर्वी सरकारने रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घातली होती. |
तसचे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. |
किरकोळ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना ते आवर्जून वस्तू चीनच्या असल्याचे सांगतो. |
गेल्या दोन महिन्यात दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगच्या फोनची भारतातील विक्रीत १० टक्के इतकी वाढ झाली आहे. |
यावरून हे सिद्ध होते की लोक व्यापारी चीनी वस्तू विकत नाहीत आणि ग्राहक देखील त्या घेत नाहीत. |
नवी दिल्लीः चॅटिंगला मजेदार बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप नवीन-नवीन फीचर्स एका पाठोपाठ आणत असते. |
कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही युजर्संसाठी व्हॉट्सअॅप स्टीकर्स रोलआउट करणे सुरू केले आहे. |
तसेच हे नवीन अॅनिमिटेड स्टीकर्स या अॅप स्टीकर्स स्टोर्सवर रेग्यूलर स्टीकर पॅक सोबत दिसतील. |
यात स्वीट लाईफ, मूडी फुड्स आदी स्टीकर्सला इन्स्टॉल करु शकतात. |
सण, उत्सवावर शुभेच्छा देण्यासाठी स्टीकर पेक्षा आणखी दुसरे काही चांगले नाही. |
त्यामुळे तुम्हाला जर जन्माष्टमीनिमित्त आपल्या मित्रांना, कुटुंबातील व्यक्तीना या खास स्टीकरवरून खास शुभेच्छा देता येवू शकतात. |
वाचाः रियलमीचा स्वस्त स्मार्टफोनचा आज सेल, किंमत ७,४९९ ₹आज जन्माष्टमीआज १२ ऑगस्ट रोजी श्रीकृष्णांच्या जन्म उत्सव साजरा करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. |
त्यामुळे आज तुम्हाला जन्माष्टमी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातलगांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर कस्टम मेड व्हॉट्सअॅप स्टीकर शेयर करा. |
तसेच क्रिएट करू शकतात. |
वाचाः शाओमीचा ट्रान्सपॅरंट स्मार्ट टीव्ही लाँच, जबरदस्त फीचर्सअसे क्रिएट करा स्टीकर >> यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड किंवा iOS फोनमधील व्हॉट्सअॅपच्या बॅकग्राउंड एरेजर आणि स्टीकर मेकर अॅप डाउनलोड करावा लागेल. |
>> त्यानंतर गॅलरीमधून एक इमेज सिलेक्ट करा किंवा आपल्या व्हॉट्सअॅपला स्टीकर बनवण्यासाठी फोटो कॅप्चर करा. |
>> आता बॅकग्राउंडला इरेजर अॅपवर जा. |
तसेच फोटोला PNG मध्ये सेव्ह करा. |
>> स्टीकर मेकर अॅपवर जा. |
तुम्ही बनवलेल्या स्टीकरला जोडण्यासाठी '+' याच्यावर टॅप करा. |
>> या स्टीकरला आपल्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्टमध्ये शेयर करा. |
वाचाः भारतीय अॅपची जबरदस्त कमाल, १५ कोटींहून अधिक डाउनलोडजर तुम्हाला व्हॉट्सअॅप साठी आधीच जन्माष्टमी स्टीकर डाउनलोड करायचे असल्यास तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅट उघडावी लागेल. |
त्यानंतर इमोजी बटनावर टॅप करून आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप स्टिकरसाठी तिसऱ्या आयकॉनला सिलेक्ट करू शकता. |
आता अधिक स्टीकर जोडण्यासाठी '+' वर क्लिक करा. |
त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि गेट मोर स्टिकरवर टॅप करा. |
त्यानंतर गुगल प्ले स्टोरवर जा. |
या ठिकाणी जन्माष्टमीसाठीचे अनेक व्हॉट्सअॅप स्टीकर अॅप मिळतील. |
वाचाः रेडमी नोट ८ प्रोचे स्पेशल एडिशन लाँच, जाणून घ्या डिटेल्सवाचाः सॅमसंगने शाओमी आणि विवोला मागे टाकले, जाणून घ्या डिटेल्सवाचाः रियलमी स्मार्ट टीव्ही आता दुकानात मिळणार, जाणून घ्या किंमत |
करोनाचे संकट कधी दूर होणार आणि कधी सर्व परिस्थिती सामान्य होणार, याच चिंतेत आज सर्व जण आहेत. |
अशा परिस्थितीत एकीकडे वैद्यकीय कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून करोना युद्धात सहभागी होत आहेत. |
दुसरीकडे अपुऱ्या सुविधांच्या अभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे प्रकार समोर येत असून सरकार व सरकारी प्रशासने त्याला तोंड देण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. |
मात्र, अशावेळी सर्वांनी एकजुटीने लढणे अपेक्षित असताना समाजातील काही घटक या संकटाकडे संधी म्हणून पाहत गैरफायदा घेताना दिसत आहेत. |
नफेखारी, काळाबाजार, साठेबाजी करत सर्वसामान्यांची आणखी कोंडी करण्याचा अक्षम्य गुन्हा अशी मंडळी करत आहेत. |
करोना युद्धातील या नकारात्मक बाजूवर प्रकार टाकणारा हा रिपोर्ताज. |
मास्कचे बनावटीकरणमास्कची साठेबाजी, कृत्रिम टंचाई, चढ्या दराने विक्री हे सर्व सुरू असतानाच बनावट मास्कही बाजारात विक्रीसाठी आले. |
एन-९५ मास्क सुरक्षित असल्याचे समजताच या मास्कची मागणी वाढली. |
बाजारात या मास्कचा तुटवडा पाहता ठाणे, भिवंडी परिसरात बनावट मास्कची निर्मिती करून त्यांची मुंबईत विक्री करण्यात येत होती. |
एका नामांकित कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेले हे मास्क मुंबईत विक्रीसाठी आणण्याकरिता आलेल्या एका टेम्पोचालकाला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अटक केली आणि नित्कृष्ट दर्जाचे तब्बल १७ हजार बनावट मास्क जप्त केले. |
ई-पासचाही गोरखधंदाकरोनाच्या संकटात लोकांच्या गरजा ओळखून भामट्यांनी प्रत्येक संधीचा पुरेपूर गैरफायदा घेतला. |
लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. |
मुंबईबाहेर जाण्यासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला. |
या पाससाठी अर्ज करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे हे सर्वसामान्यांसाठी अवघड होत असल्याचे हेरून भामट्यांनी आपला डाव साधला. |
त्यांनी अनेकांना बनावट ई-पास देण्याचा गोरखधंदा सुरू केला. |
विशेष म्हणजे हे पास बारकाईने तपासले जात नसल्याने या एजंट लोकांचे फावले. |
पाच हजारांत ई-पास, ‘क्यूआर कोड’मध्येही फेरफारबोगस कागदपत्रांवर ई-पास बनवून देणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट-७च्या पथकाने भांडुप येथे कारवाई करून पकडले. |
यातील मुख्य आरोपी पुण्यातील आहेत. |
मूळचे पुणे जिल्ह्यातील असलेल्या भांडुप, घाटकोपर परिसरात राहणाऱ्या अनेकांना त्याने पाच हजार रुपयांत पास काढून दिले आणि वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यास त्याचे एक हजार रुपये अधिक घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. |
तर चेंबूरमधून मनोज नावाच्या व्यक्तीला डोंगरी पोलिसांनी अटक केली. |
तो आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने मुंबई पोलिस आयुक्त, नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या पासच्या ‘ऑनलाइन क्यूआर कोड’मध्ये फेरफार करून बनावट ई-पास बनवून देत होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले. |
मुंबईकरांना ठाण्यातून पास, टूर्स अँड ट्रॅव्हल्सवालेही सक्रियमुंबईतील नागरिकांना ठाणे पोलिस आयुक्तालयातून दुसऱ्या जिल्ह्यात बोगस ई- पास देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने युनिट-१ने पर्दाफाश केला. |
पोलिसांनी याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकासह दोघांना अटक केली. |
मुंबई पोलिसांकडून पासला मंजुरी मिळत नाही असे सांगून ही टोळी इतर जिल्ह्याच्या नावे पास देत होती. |
टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायातीलही काही जण यात गुंतले असल्याने अन्य एका प्रकरणातून समोर आले. |
पोलिस कुठे पास तपासतात, करोनामुळे सुरक्षित वावरचा नियम पाळूनच पास तपासला जातो, पास खरा आणि की खोटा हे तपासण्याची यंत्रणा नाही, या सर्वांची त्यांना कल्पना असते. |
त्यामुळे त्यांनी एका संगणक तज्ज्ञाची मदत घेत बनावट ई-पास बनवून विक्री केली, असे गुन्हे शाखा युनिट-३च्या कारवाईतून समोर आले. |
या पथकाने तिघांना कोकणातून तर एकाला पालघरमधून अटक केली. |
रुग्णवाहिकांवर आरटीओची वेसण करोना काळात रुग्णवाहिकांची कमतरता प्रकर्षाने जाणवली. |
अपुऱ्या रुग्णवाहिकांमुळे रुग्णवाहिका चालकांनी तसेच रुग्णवाहिका मालकीच्या रुग्णालयांनीही अवाजवी भाडे दर आकारून रुग्णांची पिळवणूक सुरू केली. |
साध्या रुग्णवाहिकांचे दरही हजारोंच्या पार गेले होते. |
रुग्णाचा जीव वाचणे गरजेचा असल्याने नातेवाईकांनाही हुज्जत न घालता भाडे देणे भाग पडत होते. |
मुंबईतच नव्हे तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, रायगड, पनवेल, पालघरपर्यंत पसरलेल्या मुंबई महानगर प्रदेशात रुग्णवाहिकांकडून अशी खुलेआम लूट सुरू होती. |
परिणामी हा विषय मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचला. |
अखेर करोना संकट काळात रुग्णवाहिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पनवेल आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर निश्चितेचा प्रस्ताव मांडला आणि परिवहन प्राधिकरणाने त्याला मंजुरी दिली. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.