text stringlengths 0 6.48k |
|---|
नेमका हाच धोका लक्षात घेता, प्रादेशिक मनोरुग्णालयाने मनोरुग्णांच्या हृदयाचे इव्हॅल्युशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. |
या माध्यमातून त्यांना भविष्यातील हृदयरोगाचे अचूक निदान करता येऊ शकणार आहे. |
अतिउच्च रक्तदाब, ताण तणाव, मधुमेहात हृदयरोगाची पाळेमुळे दडलेली असतात, असे वैद्यकशास्त्र म्हणते. |
उच्च रक्तदाबामुळे हृदयाची स्पंदन क्षमता अशक्त होते. |
निरोगी माणसात अशुद्ध रक्त हृदयात जाणे आणि ते शुद्ध होऊन परत शरीराकडे जाण्यासाठी हृदयाच्या झडपाची वा रक्ताभिसरणाची क्षमता ६० असावी, असा निकष वैद्यकशास्त्रात आहे. |
वैद्यकीय परिभाषेत याला 'इजेक्शन फॅक्शन' म्हणतात. |
मात्र अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाबामुळे हृदयाची ही रक्ताभिसरणाची क्षमता कमी होते. |
मुख्य धमन्यांमध्ये अवरोध निर्माण होऊन, हृदयविकाराचा धोका त्यामुळेच बळावतो. |
अद्ययावत झालेल्या वैद्यकीयशास्त्रामुळे हा धोका वेळीच ओळखता येणे, आता शक्य झाले आहे. |
त्यासाठी सर्वांत आधी एखाद्याचा इको काढून हृदयात डोकावता येते. |
नुसते इको काढून हे ओळखणे शक्य नाही. |
त्यासाठी इसीजी आणि इकोत दिसलेल्या सूक्ष्म बदलांना टिपणेही महत्त्वाचे असते. |
आधिच मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या अशा वैफल्यग्रस्तांच्या संभाव्या हृदयरोगाचे निदान करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. |
माधुरी थोरात आणि नव्यानेच फिजिशिअन म्हणून सेवा देत असलेले डॉ. |
श्रीकांत करोडे यांनी उपचारांसाठी भरती सर्व रुग्णाचे स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला. |
यात सर्व रुग्णांचे इसीजी, इको, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन निदान, कोलेस्ट्रॉल आदी चाचण्या केल्या जात आहेत. |
विशेष म्हणजे, आतापर्यंत केलेल्या निदानातून तब्बल ४० ते ५० रुग्ण उच्च रक्तदाबाच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रशासनाला आढळले. |
याचे पुढचे पाऊल म्हणून आता सर्वच रुग्णांच्या रक्तापासून ते त्यांच्या शरीरातील अवयवांचेही पूर्णत: मॉनिटरींग केले जात आहे. |
मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भविष्यातील हृदयरोगाचा धोका आहे का, याचेही या माध्यमातून निदान करणे शक्य होणार असून, राज्यातला हा बहुधा पहिलाच प्रयोग राहणार आहे. |
याला दुजोरा देताना डॉ. |
करोडे म्हणाले, मनोरुग्ण आधीच दुर्लक्षित असतात, हा आजवरचा आमचा अनुभव आहे. |
पण इथे आल्यानंतर रुग्णांची जबाबदारी प्रशासनाची असते. |
त्यामुळे त्यांच्या भविष्यातील संभाव्य आजाराचे निदान करता आले, तर पुढील गुंतागुंतही टाळणे शक्य होणार आहे. |
शिवाय यातून मधुमेह, उच्चरक्तदाबाचेही निदान करून तशी उपचार दिशाही ठरविता येणार आहे. |
प्रतिनिधी ,औरंगाबाद: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्याच्या खिशातील रोख एक हजार १६० रुपये चोरून नेणाऱ्या दोघा आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. |
दोघा आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. |
वाडकर यांनी शुक्रवारी दिले. |
बबन उर्फ गबऱ्या भागाजी मकळे (३५, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) व अनिल अंबादास माळवे (४५, रा. |
प्रकाश नगर, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. |
या प्रकरणात शुभम भिकुलाल जाट (२६, रा. |
जयभवानीनगर, मुकुंदवाडी) याने तक्रार दिली. |
२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी शुभम हा मुकुंदवाडी येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसलेला होता. |
त्यावेळी तेथे दोघे आरोपी आले. |
त्यांनी शुभमकडे दारू पिण्यासाठी २० रुपयांची मागणी केली. |
त्यावर शुभमने नकार दिला. |
त्यामुळे आरोपींनी त्याला शिवीगाळ करून,'तू पोलिसांचा खबऱ्या आहेस,' असे म्हणत अनिल माळवेने शुभमच्या खिशातून बळजबरी एक हजार १६० रुपये काढून घेतले. |
बबन उर्फ गबऱ्या याने शुभमनचे दोन्ही हात पकडले. |
अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. |
शुभमने आरडा ओरडा करताच दोन्ही आरोपींनी तेथून धूम ठोकली. |
या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. |
सांगली: पोलीस निरीक्षकाने तरुणीवर केला बलात्कारधक्कादायक! |
नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कारझुंडबळी: महिलेला सायकलची धडक, बेदम मारहाणीत ६० वर्षीय वृद्ध ठारघात! |
संशयाचं भूत मानगुटीवर; मित्राची गळा आवळून केली हत्यापोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. |
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत आहेत. |
आरोपींनी चोरलेली रक्कम जप्त करणे आहे; तसेच आरोपींचे कोणी साथीदार आहेत काय, याबाबत देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील गौतम कदम यांनी केली. |
ही विनंती मान्य करून आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. |
करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर तलवारीने मुंडके छाटेल; डॉक्टरला धमकीमावशीच्या घरी आलेल्या मुलीवर शेजाऱ्यांनी केला सामूहिक बलात्कार'त्याचं' बहिणीवर प्रेम होतं; प्रियकराचा जीव जाईपर्यंत केले चाकूने वार |
अमरावती: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवरच टीकास्त्र सोडलं आहे. |
आधी सोयाबीनची बियाणे बोगस निघाली. |
आता सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग आला आहे. |
राज्यातील कृषी खाते झोपले आहे का? |
, अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. |
विदर्भात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. |
मात्र, आधी बोगस बियाणांमुळे परेशान असलेल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग आल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे. |
सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. |
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी चांदूरबाजार येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. |
यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. |
सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी शेतात पेरले, पण बोगस बियाणांमुळे पीक आलं नाही. |
आता पीक आलं तर अज्ञात रोगाने ते मारून टाकलं आहे. |
शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असताना राज्यातील कृषी खाते काय झोपले आहे का? |
असा सवाल बच्चू कडू यांनी केला. |
जेव्हा बियाणे बाहेर येतात तेव्हा ते प्रामाणिकीकरण करूनच बाजारात आणली जातात. |
मात्र, हे बियाणे बाजारात आणतानाच बदमाशी केली जाते की काय? |
अशी शंका घेण्यास वाव आहे. |
महाबीजवाल्यांनी बाजारातून २ ते ३ हजार क्विंटलचं सर्वात बेकार बियाणं घेऊन शेतकऱ्यांना ७ हजाराच्या भावाने विकलं असावं, असा माझा आरोप आहे, असंही ते म्हणाले. |
जळगावात शिवसेनेचं भाजपविरोधात अनोखं आंदोलन; लोक बघतच बसले! |
शरद पवार नाशिकला पोहोचण्याआधीच 'या' अधिकाऱ्याची उचलबांगडीदरम्यान, बोगस बियाण्यांमुळे झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना लवकरच मदत केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. |
बियाणांमुळे रोग पडला की वातावरणामुळे रोग पडला याचीही तपासणी केली जाणार आहे. |
ज्यांनी विमा काढलाय त्यांना विम्याचे पैसे मिळतील आणि इतरांना शासनाकडून मदत केली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. |
शेतकऱ्यांना बियाणं चांगलं मिळालं असं एकही वर्ष जात नाही. |
दरवर्षी बियाणांची समस्या असतेच. |
या प्रकरणात जो आरोपी आहे. |
कंपनीचा मालक आहे, त्यांना धरून चोप दिला पाहिजे, असंही ते म्हणाले. |
कांदा निघाला बांगलादेशला |
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या डायरीच्या छेडछाड प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. |
मीडियाला मिळालेल्या त्याच्या पर्सनल डायरीची काही पानं गायब आहेत. |
सुशांतच्या चुलत भावानेही सांगितले की पोलिसांनी त्याची पर्सनल डायरी घेतली होती पण ते यासोबत छेडछाड करतील असं कधी वाटलं नव्हतं. |
यासोबतच सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याच्या दोन वेगवेगळ्या जबाबांनी या प्रकरणाची गुंतागुंत अजून वाढली आहे. |
सुशांतच्या डायरीची सहा पानं गायब आहेत. |
सिद्धार्थ म्हणाला कोणतंही पान फाटलेलं नव्हतंसुशांतच्या मृत्यूची गुंतागुंत सतत वाढत आहे. |
बिहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी नव्याने सुरू केली होती. |
पण आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. |
टाइम्स नाउला सुशांतची पर्सनल डायरी मिळाली. |
असं म्हटलं जातं की, या डायरीतील काही पानं फाडलेली होती. |
यावर सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू म्हणाला की, त्याला डायरी लिहायची सवय होती. |
माझ्यासमोरच पोलिसांनी त्याच्या ४- ५ डायरी घरून नेल्या होत्या. |
सुरुवातीला मला वाटलं चौकशीसाठी ही चांगली गोष्ट आहे. |
पण मला वाटलं नव्हतं की, पुराव्यांची छेडछाड करण्यात येईल आणि मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा देशासमोर येईल. |
सुशांत केसमध्ये रियासहीत ६ लोकांमध्ये ही आहे मोठी लिंकसिद्धार्थ पिठानीचे दोन वेगवेगळे जबाबसुशांतच्या डायरीची पानं फाटल्याचे कळल्यानंतर सिद्धार्थने दोन वेगवेगळे जबाब दिले. |
ज्यामुळे नक्की खरं काय ते कळू शकले नाही. |
सिद्धार्थने सुरुवातीला सांगितलं की सुशांतच्या डायरीची पानं फाटली नव्हती. |
यानंतरच्या जबाबात त्याने म्हटलं की, सुशांत अनेकदा स्वतःचं पानं फाडायचा. |
विजय माल्ल्या आणि सुशांत राजपूतच्या केसचं सीबीआय 'कनेक्शन'सुशांतच्या मित्राने व्यक्त केला संदेहसुशांतचा मित्र नीलोत्पल मृणालच्या मते, फाडलेल्या पानांची चौकशी होणं गरजेचं आहे. |
रिया नक्कीच काहीतरी लपवत आहे. |
तो म्हणाला की, कोणी काहीही लिहू शकतं आणि काहीही लपवू शकतं. |
डायरीवरचे बोटांचे ठसे मिटवले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ठश्यांचीही तपासणी केली गेली पाहिजे. |
पिठानीने पोलिसांना दिले मेसेजसिद्धार्थने त्या पुराव्यांबद्दलही सांगितले जे मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. |
यात चावीवाल्याला केलेल्या मेसेजपासून अनेक गोष्टींचा समावेश आहे. |
वृत्तसेवा , ठाणे डिजिटल स्वाक्षरी विकल्याप्रकरणी डॉ. |
संकेत दोशी यांचा परवाना नुकताच रद्द करण्यात आला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.