text stringlengths 0 6.48k |
|---|
प्रत्यक्ष उपस्थित नसून स्वत:ची स्वाक्षरी देऊन अनेक ठिकाणी वैद्यकीय अहवाल दिल्याप्रकरणी ठाणे पॅथोलॉजिस्ट असोसिएशनतर्फे सचिव डॉ. |
राजेश बुताला यांनी डॉ. |
दोशी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. |
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एम. |
एम. |
सी. |
) यांच्याकडून डॉ. |
संकेत दोशी यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. |
दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे निबंधक संजय देशमुख यांनी डॉ. |
संकेत दोशी यांची आर्थिक चणचण आणि हतबल स्थिती लक्षात घेऊन कमी कालावधीची शिक्षा जाहीर केल्याचे पत्र जारी केले आहे. |
करोनाच्या काळात वैद्यकीय उपचार सेवेतील वाढते बाजारीकरण, खासगी दवाखान्यातील अनावश्यक शस्त्रक्रिया, तपासण्या, महागडी औषधे, कमीशनबाजी यातून रुग्णांची व त्यांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. |
याच काळात हा निर्णय जाहीर झाल्याने नागरिक, डॉक्टर आणि रोगनिदानतज्ज्ञ संघटनेला दिलासा मिळाला आहे. |
सदर प्रतिवादी डॉ. |
दोशी यांची रोगनिदानतज्ज्ञ म्हणून नोंदणी घाटकोपर, कुर्ला या भागातील असूनही त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर ठाणे, बदलापूर, पनवेल, उल्हासनगर, डोंबिवली, नालासोपारा, भिवंडी, वाशी, मुलुंड अशा विविध ठिकाणच्या लॅबमध्ये आढळून आला. |
तपासणीदरम्यान डॉ. |
दोशी आंध्र प्रदेशातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्याचे उघड झालेच, शिवाय डॉ. |
दोशी यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या पत्नीने पात्रता नसूनही अनेक अहवालांवर सह्या केल्याचेही समोर आले. |
डिजिटल सहीचा वापर केला गेल्याने अनेक रुग्णांचे निदान आणि त्यामुळे उपचारही चुकीचे झाल्याचे आढळले. |
संकेत दोशी यांनी पत्नीच्या कर्करोगाच्या उपचार खर्चासाठी आणि अपत्याच्या वाढत्या शिक्षण खर्चामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि मानसिक ताणामुळे हे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. |
विमा कंपनीने डिजिटल स्वाक्षरीचे अहवाल ग्राह्य धरू नका असे सूचित केले आहे. |
जोशी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. |
माझी सगळ्या डॉक्टरांना हीच विनंती आहे की सह्याजीराव रोगनिदानतज्ज्ञांना प्रोत्साहित करू नका. |
डिजिटल स्वाक्षरी योग्य नाही. |
प्रत्यक्ष तपासणी होऊनच योग्य अहवाल रुग्णांपर्यंत पोचला पाहिजे. |
अल्प लाभासाठी असे उद्योग करू नका. |
माझ्या इतर सहकारी डॉक्टरांनी या प्रकरणातून योग्य तो बोध घ्यावा. |
दिनकर देसाई, अध्यक्ष, द पॅथोलॉजीस्ट असोसिएशन, ठाणे |
नवी दिल्लीः HMD Global या महिन्यात अनेक नवीन फोन लाँच करण्याच्या तयारी आहे. |
कंपनी अँड्रॉयड ओएसचे नोकिया फीचर फोनवर काम करीत आहे. |
आता एका नवीन स्केचवरून ही माहिती समोर येत आहे की, अँड्रॉयड बेस्ड नोकिया फीचर फोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. |
वाचाः रेडमी नोट ८ प्रोला मिळतोय लेटेस्ट MIUI 12 अपडेटNokia 3310, Nokia 8110 आणि Nokia 5310 यासारख्या क्लासिक फोन्सला नवीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. |
कंपनी नवीन नोकिया फीचर फोनला लाँच करणार आहे. |
जो गुगलच्या अँड्रॉयड ओएसवर चालेल. |
आता या नोकिया फीचर फोनचे स्केच समोर आले आहे. |
ज्यात गुगल असिस्टंटसाठी एक वेगले बटन दिले जावू शकते. |
स्केचला Nokiamob ने शेयर केले आहे. |
तसेच हे चर्चित अँड्रॉयड ओएसचा नोकिया फीचर फोन आहे. |
वाचाः जगातील सर्वात फास्ट इंटरनेट स्पीड, एका सेकंदात पूर्ण Netflix डाउनलोडगुगल असिस्टंट शिवाय फोनची ओव्हरऑल डिझाईन पाहिल्यास हा कोणत्याही नोकिया फीचर फोन सारखा दिसतो. |
फोनच्या वरच्या भागात एक सेल्फी कॅमेरा दिला आहे. |
या फोनला स्केच पाहिल्यास एक अँड्रॉयडवर चालणारा नोकिया फीचर फोन सारखा वाटतो. |
गुगलच्या जवळ फीचर फोनसाठी अँड्रॉयड ओएसचे कोणतेही व्हर्जन नाही. |
वाचाः Nokia C3 भारतात लवकरच होतोय लाँच, जाणून घ्या डिटेल्सवाचाः रियलमी ७ आणि ७ प्रो भारतात होतायेत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्सएका व्हिडिओत नोकिया फीचर फोनला अँड्रॉयड व्हर्जन सोबत पाहिले गेले आहे. |
या फोनमध्ये गुगल अॅप्स यासारखे यूट्यूब व क्रोम प्री इन्स्टॉल येते. |
फोन गुगल असिस्टेंट व्हाइस सर्च सपोर्ट करतो. |
ज्या बटनला प्रेस करून अॅक्टिवेट केले जावू शकते. |
आता अँड्रॉयड बेस्ड फीचर फोनसंबंधी गुगल आणि नोकियाकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आली नाही. |
वाचाः रोज २ जीबी डेटा-कॉलिंगचे प्लान, किंमत १४९ रुपयांपासून सुरूवाचाः ओप्पोचा नवा स्मार्टफोन भारतात येतोय, २०२० मधील सर्वात स्लीम फोननोकियाचा एका फोनला बेसिक वैशिष्ट्यांसह FCC सर्टिफिकेशन मिळाले होते. |
परंतु, आता नोकिया फीचर फोनमध्ये अँड्रॉयडची कोणतीही माहिती नाही. |
नवीन नोकिया फीचर फोन सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. |
वाचाः मायक्रोमॅक्स पुढच्या महिन्यात लाँच करणार मेड इन इंडिया स्मार्टफोनवाचाः स्मार्टफोनची स्क्रीन फुटलेल्या ग्राहकांसाठी सॅमसंगची भन्नाट ऑफर |
पुणे: लॉकडाऊनला विरोध करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करोना महामारीवरून केंद्र सरकारची पोलखोल केली आहे. |
देशात महामारी आहे तर मग देशातील मृत्यूदर अर्ध्यापेक्षा कमी कसा? |
, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. |
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून हा सवाल केला आहे. |
त्यांनी गेल्या वर्षीच्या मृत्यूची आणि यंदा करोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी देऊन सरकारला धारेवर धरले आहे. |
मार्च ते मे २०१९ दरम्यान अंदाजे १,२३,५१२ मृत्यू झाले. |
तर २०२० मध्ये याच काळात अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले. |
मग महामारी आली असेल तर हा मृत्युदर अर्धा कसा काय झाला? |
, असा सवाल करतानाच महामारी नसतानाही सामान्य माणसाला रस्त्यावर आणणारं लॉकडाऊन किती दिवस मान्य करायचं हे जनतेने ठरवावं, असं आवाहन आंबेडकरांनी केलं आहे. |
सरकारच्याच अहवालानुसार ८० टक्के भारतीयांमध्ये करोनाच्या विरोधातील अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. |
तर १५ टक्के लोकांमध्ये त्या तयार होत आहेत. |
उरलेल्या ५ टक्के लोकांमध्ये करोनाच्या अँटिबॉडी तयार झालेल्या नाहीत. |
या लोकांना सरकारने शोधून काढून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत. |
पण सरकार त्यांना शोधण्याऐवजी ९५ टक्के लोकांना लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठिस धरण्याचं काम करत आहे. |
सरकारच्या या मनमानी धोरणामुळे छोट्याछोट्या व्यावसायिकांचं आणि समाज घटकांचं मोठं नुकसान होत असून सरकारला त्याचं काही पडलेलं नाही, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. |
इतर देशांत सुरू असलेल्या लॉकडाऊनचं अंधानुकरण थांबवण्याचं आवाहन ही त्यांनी केलं. |
... तर आधी केंद्रातील सरकार पडेल; सुशांतसिंह प्रकरणावरून राऊतांचा इशारादरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून आंबेडकरांनी लॉकडाऊन विरोधात भूमिका घेतली आहे. |
त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची मतं, निरीक्षणं आणि आकडेवारीचा हवालाही दिला आहे. |
करोना संसर्ग हा इतर आजारासारखाच आजार आहे. |
त्यासोबतच आपल्याला रहावे लागणार आहे. |
त्यामुळे या आजाराबाबतची काळजी घेऊन जनजीवन सुरळीत केलं पाहिजे. |
करोना हटवण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही, असं सांगतानाच आम्ही लॉकडाऊनला विरोध करत असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. |
करोनाने चिंता वाढवली; जगभरात भारतात एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूगडाख शिवसेनेत येताच चित्र बदलले; भोळ्या शंकराचा 'वाघ' झाला! |
कुणाल लोंढे, पनवेल: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. |
सीबीआयच्या पथकाकडून या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी केली जात आहे. |
मात्र, केवळ नामसाधर्म्यामुळे पनवेलच्या डॉक्टरांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. |
सुशांतचे अनेक चाहते या डॉक्टरांना फोन करून सुशांतचा शवविच्छेदन अहवाल खोटा दिला असल्याचा आरोप त्यांच्यावर करत आहेत. |
या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे. |
पनवेल शहरातील नेत्रचिकित्सक म्हणून परिचित असलेले डॉ. |
संदीप इंगळे अनेक वर्षांपासून येथे रुग्णांना सेवा देत आहेत. |
इंगळे यांना गेल्या आठवड्यापासून काही अनोळखी व्यक्तींकडून मोबाइलवर फोन येत आहेत. |
सशांतसिंहचा शवविच्छेदन अहवाल तुम्ही खोटा बनविला आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. |
हे तुम्ही चुकीचे केले आहे, असा आरोप फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती करत आहेत. |
तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर पनवेलचे डॉ. |
संदीप इंगळे हे नेत्ररोगतज्ज्ञ असताना त्यांनी सुशांतसिंहचे शवविच्छेदन केले कसे, असे प्रश्न विचारणारे चाहत्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. |
'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं सत्य बाहेर यावं ही जनतेची इच्छा'सुशांतचे कपडे, ५६ स्टेटमेन्ट; वांद्रे पोलिसांनी सीबीआयला दिले महत्त्वपूर्ण पुरावे'ते' चॅट उघड झाल्यानंतर रिया आणि महेश भट्ट पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर चार ते पाच फोन आल्यानंतर डॉ. |
इंगळे यांनी या प्रकाराची माहिती घेतली. |
शवविच्छेदन अहवालात डॉ. |
संदीप इंगळे नावाच्या डॉक्टरांचा उल्लेख असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. |
मात्र, नेमके ते डॉक्टर कोण हे माहीत नसणाऱ्या सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांकडून मला नाहक त्रास होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. |
तसेच या प्रकरणी पनवेलच्या डॉक्टर इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली. |
पनवेल शहर पोलिसांनी सुरुवातीला ही बाब गांभीर्याने घेतली नाही. |
इंगळे यांच्या घराचा पत्ता, क्लिनिकचा पत्ता सांगून समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी केली जात असताना, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. |
त्यामुळे डॉ. |
इंगळे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती तक्रार अर्जाद्वारे दिली आहे. |
अद्यापही पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतलेली नाही. |
सुशांतसिंह प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना केवळ नामसाधर्म्यामुळे मला सुशांतच्या समर्थकांचे फोन येत आहेत. |
सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. |
पण माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. |
सुशांतच्या मृतदेहाचे विच्छेदन करणारा डॉक्टर मी नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.