text
large_string
नागपूर : मिहान-सेझमधील रिलायन्स एडीएजीच्या प्रस्तावित धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यासाठी रिलायन्स डिफेन्सने फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनसोबत सोमवारी करार केला आहे. कंपनीने मिहानमध्ये जागा खरेदी केल्यानंतर तब्बल १४ महिन्यानंतर करार केला आहे, हे विशेष. २८ आॅगस्ट २०१५ ला रिलायन्स डिफेन्...
औरंगाबाद : औरंगाबाद येथे पक्षाच्या वतीने आयोजित व्हिजन 2019 शिबिरादरम्यान शिवसेनेला सोबत यायचं असेल तर त्यांनी आमच्या पक्षाच्या हायकमांडशी चर्चा करावी असा सल्ला देत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला एकप्रकारे ऑफरचं दिल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये सत्ता पक्षाला सत्तेबाहेर खेचण्यास...
असेल, तर रोग्याला सातव्या दिवशी इकडे तिकडे फिरावयास परवानगी दिल्यासही ती त्वचेची जखम फुटण्याची किंवा पुढे क्षतचिन्ह कर्म (sear hernia) होण्याची भीति नसते. रोग्याला अंथरुणातून उठून लौकर इकडे तिकडे फिरण्याची परवानगी दिल्यामुळे शस्त्रक्रिया पश्च होणारी घनास्रता (Post-operative thrombosis) होण्याचा धोका टळतो व त्याचप्रमाणे...
अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुल (Kabul) पुन्हा मोठ्या स्फोटाने हादरले आहे. शहरातील सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर हा स्फोट झाला असून हा अतिरेक्यांनी केलेला आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे (Terrorist Attack). घटनास्थळावरून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगित...
अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन - पुरातन मंदिर वास्तूचा इतिहास नष्ट करणे, पूर्वीपासून चालू आलेल्या पूजा पद्धती व अभिषेक पद्धत बंद करणे, मंदिर येणाऱ्या दिगंबर सैतवाल जैन समाजाच्या धर्मगुरुंचा अपमान करुन त्यांच्याप्रती अभद्र भाषेचा वापर करणे, मंदिरांच्या वास्तूची मनमानी पद्धतीने पाडापाडी करणे व फेरबदल करणे, असे कृत्य बेकायद...
आरमोरी : तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाची बदली केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. कोरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने यावर्षी नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू करून वर्ग पाच ते आठवीपर्यंत सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरू केले. या वर्गा...
T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. ग्रुप २ मधील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने हार मानण्यास त्यांनी भाग पाडले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १ धावेने पराभूत होण्याची ही पाकिस्ताची दुसरी वेळ आहे. २०१०मध्ये न्यूझीलंडने त्यांना असे पराभू...
पुणे : ग्लोबल स्टार फाऊंडेशनच्या स्पर्धा महोत्सवाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल, संगीतरत्न, नृत्यरत्न आदी स्पर्धांचा समावेश होता. फाऊंडेशनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी नगरसेविका राणी भोसले, नगर...
सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. त्यातच लाचखोरही शेतकऱ्यांची परीक्षा पाहत असल्याचे दिसून येते. मात्र, तालुक्यातील एका शेतकऱ्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला चांलगाच धडा शिकविला आहे. हेमंत विठ्ठल खैरनार उर्फ पप्पू असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आह...
महत्त्वाचे - तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांसह शिपायांचीही पदे रिक्त! ! शहरातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांची 4, तर तर शिपायांची 4 अशी एकूण 8 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील इतर कार्यरत २४ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ✅खुशखबर! ४६४४ पदांची तलाठी भरती जाहिरात आली! ✅अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांच...
लोकमत सखी मंच सभासद नोंदणी-२०१७ करिता मंगळवारी ७ फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. चंद्रपूर : लोकमत सखी मंच सभासद नोंदणी-२०१७ करिता मंगळवारी ७ फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. सखींसाठी चंद्रपूर शहरात तब्बल ११ केंद्रावर एकाच वेळी नोंदणीला सुरूवात करण्यात येत आहे. सकाळी १० ते...
आहे - स्पष्ट आहे. मागील सर्किटमध्ये (Circuit) या दोन बदलांसह, हे दोन बदल; तर, हे बदलले गेले आहे मल्टी इमीटर ट्रान्झिस्टरने (Multi emitter transistor) हे बदलले आहे. आणि हे दुसऱ्या ट्रान्झिस्टरने(Transistor) बदलले आहे आपण तिथे असलेल्या सर्किटवर(Circuit) जाऊ.मी याबद्दल थोडे नंतर बोलेन- याचे महत्व काय आहे - ठीक आहे. तर, आ...
सहकाऱ्याच्या यशाकडे जास्त पहातो. अमरनाथाचे शतक पूर्ण व्हावें म्हणून मेजर नायडूंनी काही काळापूर्वी थोडासा स्वार्थत्याग केला. नायडूंनीं धांवांचें सहस्र पुरें केलें असतें तर जें कौतुक केले गेलें असतें त्याच्या सहस्रपट कौतुक त्यांच्या या स्वार्थत्यागानें केले गेले. 'नव्या' चे 'नांव ' व्हावें म्हणून ' जुन्या'नें मार्ग काढू...
जास्त अंतरासाठी धावणे हे अतिरीक्त वजन दूर करण्यास, सहनशक्ती विकसित करण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण कल्याणासाठी सुधारणा करण्याची उत्तम संधी आहे. क्रीडा क्षेत्रातील या तंत्रज्ञानाचा अर्थ असा होतो की किमान तीन किलोमीटरवर किंवा अॅथलीटवर वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते, म्हणजे ते एका तासात किती अंतराने मात करू शकतात. लांब अंतरा...
नवी मुंबई : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून घणसोलीत गावदेवी वाडी परिसरातील २०० पेक्षा अधिक नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाण्यातून जंतू, किडे येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील अनेकजण ताप, सर्दी, पोटदुखीसारख्या आजाराने ग्रस्त आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गावदेवी वाडीत पाणी...
उल्हासनगर महापालिका शाळा मैदानांवर चक्क प्रांत कार्यालयाकडून सनद दिल्याने, एकच खळबळ उडून नगररचनाकार विभाग व प्रांत कार्यालय वादात सापडले होते. उल्हासनगर - कॅम्प नं-५ दुर्गापाडा धर्माजी पाटील कॉलनी येथील मोकळ्या भूखंडावर बांधकाम सुरू असल्याचे पत्र महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रांत कार्यालयाला दिले. त...
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळीकडे चर्चा सुरूये ती शिवसेना कुणाची होणार? कारण शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला परवानगी दिलीये. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा निर्णय कशाच्या आधारे घेणार याबद्दल बरीच चर्चा रंगू लागलीये. जूनमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाड...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - अभिनेता विकी कौशल हा बॉलीवूडमधील एक संवेदनशील नट. 'उरी', ' राझी' अशा अनेक चित्रपटातून आपण ते अनुभवलं आहे. इतरवेळी देखील फारसा कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा विकी कतरीना कैफसोबत लग्न झाल्यावर एकदम प्रकाशझोतात आला. आपल्या नवऱ्याचं कौतुक प्रत्येक बायकोला असतं, तसं ते कतरिनाला देखील आहे. विकीचं ...
High Court on Divorce Case: गुजरात हायकोर्टाने (Gujarat High Court) विवाहित जोडप्यामधील परस्पर कलह प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून येथील बनासकांठा येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नीने त्याच्या विरोधात अपील केले होते. पतीने उच्च न्यायालयातही ध...
ची नवीन घटना जवळपास त्याच्या मालकासह आयफोनला आग लागली तंत्रज्ञानाच्या माध्यमांच्या पहिल्या पृष्ठांवर परत आणते. ही पहिलीच वेळ नाही जी आपल्याला यासारखी प्रकरणे दिसतात आणि बर्याच वेळा आयफोनने हे लक्षात ठेवण्यासाठी आग पकडण्याचा निर्णय घेतला असे दिसते की सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानसुद्धा शंभर टक्के परिपूर्ण नाही (खरोखर, बॅटरीसह...
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेशात उपमुख्यमंत्रीपद नसेल असेही एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं काय झालं? मध्यप्रदेशात कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यम...
अतिवृष्टीमुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळूर महामार्ग आज सकाळी ११ च्या सुमारास सुरू झाला. सध्या या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पूर्ण क्षमतेने हा महामार्ग अद्याप सुरू झाला नाही. नागरिकांनी, प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. सध्या या मार्गावरून अत्...
नागपूर : निवडणुकीनंतर 'चौकीदारा'ची चौकशी केली जाईल आणि त्याला तुरुंगात टाकले जाईल अशा शब्दात कॉन्ग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीत कॉन्ग्रेस आघाडीच्या नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवारां...
why to discriminate between prisoners? एकाच गुन्ह्यातील दोन कैद्यांना शिक्षेत सवलत देऊन सुटका करण्याच्या संदर्भात भेदभाव कसा केला, असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारने नुकतीच कानउघाडणी केली आहे. त्याचबरोबर सरकारच्या संबंधित प्रशासनाची कृती भेदभावपूर्ण असल्याचे निरीक्षण नोंदवून संबंधित कैद्याची सु...
आयपीएल स्पर्धेत गेल्या वर्षीपर्यंत एक खेळाडू आपले नाणे खणखणीत वाजवत होता. अचानक तो कुठेतरी गायब झाला. आता यंदाच्या मोसमात दमदार शतक फटकावून त्याने पुन्हा एकदा आपण परतल्याचे बिगूल वाजवले. व्यंकटेश अय्यर हे याच खेळाडूचे नाव. यंदाच्या स्पर्धेत त्याने शतकी खेळी केली व काठावर पास झाला आता त्याच्यासमोर उर्वरित लढती आहेत व त्...
वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. पीएम केयर्स फंडातून महाराष्ट्राला पुरवण्यात आलेले अनेक व्हेंटिलेटर्स हे सदोष आहे. ते निम्म्या क्षमतेनेच काम करु शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकताच केला होता. केंद्र सरकारवर अशाप्रकारे थेट आरोप केल्यामुळे ...
रासायनिक गुणधर्म व स्वरूप किण्व, यकृत, अंड्यातील पांढरा भाग आणि व्हे (नासवणी) यातून शुद्ध स्वरूपात रिबोफ्लॅवीन वेगळे काढण्यात आले. या सर्व पदार्थातून अलग केलेल्या जीवनसत्त्वाचे रासायनिक स्वरुप सारखेच होते. या जीवनसत्त्वाचे नामाभिधान पुढीलप्रमाणे झाले. कर्बाचे पाच अणू असलेली 'रायबोज' (Ribose) नावाची साखर आणि फ्लेविन (Fl...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने जून महिन्याचा अहवाल जाहीर केला असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या अहवालानुसार येत्या काही दिवसांत देशात फक्त जिओ आणि एअरटेल हेच नेटवर्क सर्वाधिक वापरले जाईल. नवी दिल्ली : TRAI Report of June Month : दूरसंचार क्षेत्रात जिओ आणि एअरटेल यांचा सध्या दबदबा अ...
TMC Budget: ठाणे महापालिका अर्थसंकल्प सादरीकरणात गोंधळ पाहायला मिळालाय. ठाणे महापालिकेचं ऑनलाइन अर्थसंकल्प सादरीकरण करत असल्यानं काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजप (BJP) नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan) आणि भाजप नेते मिलिंद पाटणकर (Milind Patankar) यां...
रात्री गाढ झोप लागल्यामुळे सकाळी उठल्यावर छान फ्रेश वाटत होतं.. आज दोन तीनच पर्यटन स्थळे बघायची असल्यामुळे आम्ही आरामात आवराआवर केली.. नाश्त्याची वेळ झाल्यामुळे आधी नाश्ता करून घेतला.. नाष्ट्यामध्ये ब्रेड ऑमलेट, भुर्जी , पोहा असे दोन तीन प्रकार होते.. आम्ही पोटभर नाश्ता करून पॅकिंग करायला घेतले.. आता चेक आऊट करून , दोन...
SGJ/ KGS/ ( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) ( विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य घोषणा देत बर्हिगमन करतात. (विरोधी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य एकाच वेळी उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करीत असतात.) श्री. रामदास कदम : सभापती महोदय, मंत्रीमहोदयांनी मूळ प्रश्नाला उत्तरच दिलेले नाही. श्री. राजेंद्र दर्डा : सभापती महोदय, मूळ ...
'तू मुझे अच्छी लगती है' अस म्हणत धावत्या रिक्षेत रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. केवळ इतकेच नव्हे रिक्षात आरडाओरडा करूनही रिक्षाचालकाने रिक्षा तशीच भरधाव ठेवली म्हणून घाबरून गेलेल्या तरूणीने चालत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये पिडीत तरूणी गंभीर जखमी झाली आहे. नेमकं काय घडलं ? नाशिकच्...
घर बातम्या ब्लॉग आपल्या मुलाची स्क्रीन वेळ व्यवस्थापित करण्यात आपणास दोषी वाटते? "बर्याचदा मी जेव्हा कुटुंबांसमवेत काम करतो तेव्हा मी स्क्रीन-टाइमच्या शारीरिक प्रभावांविषयी चर्चा करून सुरुवात करतो. स्क्रीनचा वेळ विशिष्ट लक्षणांमध्ये कसा अनुवादित होईल आणि विस्तारीत अंमलबजावणी कशी करावी इलेक्ट्रॉनिक वेगवान (किंवा स्क्रीन...
मुंबई :महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत रात्रभर पाऊस पडल्यानंतर हवामान खात्याने येथे नैऋत्य मोसमी पाऊस सुरू झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथे गेल्या २४ तासांत ६१. ८ मिमी, तर सांताक्रूझमध्ये ४१. ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Monsoon in Mumbai: Monsoon hits Mumbai, rains with thunderstorms...
जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून अवकाश कार्यक्रमाला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. या कोरोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान-३ मोहिमेला विलंब झाला होता. मात्र, आता २०२१ च्या सुरुवातीला चांद्रयान-३ मोहिम लाँच होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा भारताचे यान चंद्राच्या...
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव. राष्ट्रीय युवा संसद मध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा ! पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग? आज किंमतीत काय बद...
पिढ्यान्पिढ्याच्या सस्कारामुळे असो, दागदागिने, जमीनजुमला किवा इमारती वगैरेत पैसे गुतवावे आणि आपल्या मुलाच्या मागची ददात नाहीशी करावी असल्या विचारसरणीचा ब्रह्मी जनतेवर पगडा बसूच शकला नाही. फक्त कपडे आणि इतर राहणी सोडली तर त्याच्या मनावर बौद्धधर्मीय वैराग्याचा परिणाम झालेला स्पष्ट दिसतो. ब्रह्मी घरात आकर्षक असे काही वाटा...
गर्ल्स कॅन नॉट प्ले बास्केटबॉल ! जेव्हा पहिल्यांदा हे ऐकले तेव्हा हसायला आले. कारण मुलींशी अशीच चिडवाचिडवी खेळायचे वय ते. त्यात शाहरूख आपला बालपणीपासूनचा क्रश. तो जे बोलेल तो आपला डायलॉग, आणि मग याची मालिकाच सुरू झाली. गर्ल कॅन नॉट प्ले फूटबॉल, गर्लस कॅन नॉट प्ले क्रिकेट, गर्लस कॅन नॉट प्ले कबड्डी. . लंगडी... खोखो. पत...
'मला श्वास घेता येत नाहीय' हे अमेरिकेतल्या एका कृष्णवर्णीय माणसाचं वाक्य जगभरात गाजतंय. या माणसाचा जीव एका गोऱ्या पोलिसामुळे गेला. ही ठिणगी पडताच आता देशभरात वणव्यासारख्या दंगली पसरल्या आहेत. आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या अमेरिकेत हे नवं मोठं संकट आलंय. तिथे जाळपोळ, लुटालूट होतेय. 40 शहरांमध्ये कर्फ्यू लागलाय. पण अस...
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकार मधील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होतं आहे. सरकार पाच वर्ष टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केलं की, राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार जर पाच वर्षे टिकावयचं असेल तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा, सरकार आणि पक्षात मतभेद न...
भारताने चीनवर दुसऱ्या बाजूने लष्करी दबाव निर्माण करावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत आणि चीन.. भाषा, संस्कृती, राजकीय विचार यांच्याबाबतीत परस्परांहून भिन्न असलेले दोन शेजारी देश. अशी भिन्नता असली तरी गेल्या अडीच हजार वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. भारत व चीनमधील १८ तज्ज्ञांच्या लेखा...
सर्व विकासकामांना ब्रेक! । पुढारी\tTop\nTue, Apr 23, 2019 06:17\nहोमपेज › Pune › सर्व विकासकामांना ब्रेक!\nसर्व विकासकामांना ब्रेक!\nPublished On: Sep 02 2018 1:39AM । Last Updated: Sep 02 2018 1:38AM\nसर्वोच्च न्यायालयाने राज्यात घातलेल्या बांधकाम बंदीच्या आदेशामुळे पुण्यातील तब्बल बारा ते पंधरा हजार इमारतींच्या चालू ...
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आता कर्नाटकातही असेच प्रकरण समोर आले आहे. राज्यातील बागलकोटमध्ये एका व्यक्तीने आपल्या वडिलांची हत्या करून मृतदेहाचे 32 तुकडे केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने हे तुकडे उघड्या बोअरवेलमध्ये फेकले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अर्थ मूव्हर्सच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला. व...
आज 'वामन जयंती' (१७. ९. २०२१) या दिवशी सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची आई सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर यांनी पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्र पुढे दिली आहेत. (भाग १) सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन राजंदेकर यांना तिसर्या ...
शेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो. अनेक योजनांत अनुदानही दिले जाते. गोंदियाः शेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो. अनेक योजनांत अनुदानही दिले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात धानपीक वगळता इतर शेती कर...
पावभाजी न खाणारा माणूस तसा विरळाच! घरी भाज्या खाताना नाक मुरडणारी बच्चे कंपनीदेखील बाहेरच्या पावभाजीवर ताव मारते. तव्यावर काविलत्याचा टण टण असा आवाज आला की, भूक नसतानाही पावलं आपोआप त्या दिशेने वळतात. मागाहून आलेल्या पास्ता, पिझ्झाच्या वावटळीतही पावभाजीने आपलं हक्काचं स्थान मेन्यू कार्डवर टिकवून ठेवलंय. सर्वसाधारणपणे ...
कोणतंही वृत्तपत्र अथवा नियतकालिक सुरू करताना त्याची नोंदणी रजिस्टार ऑफ न्यूजपेपर दिल्ली यांच्याकडं करावी लागते.तसं न करणारं वृत्तपत्र हे बेकायदा केलेले कृत्य असतं आणि त्यासाठी योग्य ती शिक्षेची तरतूदही कायद्यात आहे.टीम अरविंद केजरीवालला याची माहिती तरी नसावी किंवा आपण कायद्याच्या वर आहोत अशा अहंकारात तरी ही मंडळी वागत ...
Avishkar darvekar: स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोपही केले होते. ज्यामुळे अविष्कारला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु, अलिकडेच अविष्कारने या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. छोट्या पडद्यावर अलिकडेच बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) तिसरं पर्व सुरु झालं. हे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. कधी...
एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर आपल्या सेवेसाठी वेटर उपलब्ध असतात. हे वेटर आपली ऑर्डर घेण्यापासून ती वाढण्यापर्यंत आणि त्यानंतर आपले बील देण्यासाठी तत्पर असतात. पण आता एखाद्या व्यक्तीऐवजी ही सेवा तुम्हाला एखाद्या रोबोटने दिली तर? सध्याच्या घडीला अशक्य असे काहीच नाही. हे सर्वकाही प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे आण...
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी अटक केली. या संदर्भात 10 तारखेला समन्स बजावूनही मंडल सीबीआयसमोर हजर न झाल्याने सीबीआयने ही कारवाई केली. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय सशस्त्र दलासह सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने मंडल यांना बीर...
मातृवंदना योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला, तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. गर्भवतींना पाच हजार रुपये पंतप्रधान मातृवंदन योजनेंतर्गत देण्यात येतात. हे पाच हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांत...
मुंबई । राज्य मंत्रिमंडळाच्या आज (२० फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत एमएमआरडीएचा विस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, शौर्यपदक व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना अनुदान देण्यात येणार असल्याची देखील घोषणा या मंत्रिमंडळाच्या बैठ...
देशाच्या सीमेवर सैन्याच्या मदतीला असलेल्या शस्त्रांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. त्यातून नागरिकांनाही प्रेरणा मिळते. शिवाय सौदर्यिकरणाच्या दृष्टीने त्याचा उपयोग करून घेता यावा यासाठी अकोला आणि वाशीम जिल्ह्यात आठ ठिकाणी डमी वॉर टँँक (रणगाडे) बसविण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिलेल्या ...
ध्यानीमनी नसताना आणि प्रशासनाचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना एखाद्याला अचानक फार मोठ्या पदाची लॉटरी लागावी व त्यानंतर एकापाठोपाठ एक असे विविध प्रश्न समोर आ वासून उभे ठाकावेत आणि ते सोडविण्याच्या प्रयत्नांत कशी भंबेरी उडावी, अगदी तशी गत सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली आहे. र...
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची लाट ओसरली असताना अचानकपणे देशात पुन्हा एकदा देशात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. प्रदीर्घ काळानंतर पाठिमागील 24 तासात देशभरात 3,712 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. या आकड्यामुळे संबंध देशभरातील रुग्णांची संख्याही लक्षनियरित्या वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही...
अँड्रयू सायमंड्सच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. खूप लवकर गेलात, माझ्या तुमच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहेत, असं ट्विट हरभजन सिंग यानं केलं आहे. हरभजन सिंग आणि सायमंड्स यांच्यात २००८ मध्ये सिडनी कसोटीत मंकीगेट वाद झाला होता. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँड्रयू सायमंड्स हा दोन वेळा विश्वकप जिंकलेल्या टीमचा भाग राह...
नाशिक : घरपट्टीची थकबाकी साडेतीनशे कोटीच्या घरात गेली असताना व कर्मचार्यांना वसुलीत येणार्या अडचणी लक्षात घेत महापालिकेने एक हजार २९८ कोटी बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर वसुलीसाठी मंगळवारी (दि. १८) ढोल वाजविण्यात आले. बदनामीच्या भीतीने दुसर्या दिवशी थकबाकीदारांकडून एक कोटी ९ लाख ६६ हजार ३३५ रुपयांची वसुली करण्यात यश आले...
टीम इंडिया (Team India) पाव वर्षानंतर निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये शुक्रवारी इंग्लंड विरुद्ध पहिली T20 खेळण्यासाठी उतरेल. पाच मॅचच्या या T20 सीरिजपासून यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपची तयारी सुरु होईल. भारतीय टीममधील अंतिम 11 जागांसाठी 19 खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर निवडीचा पेच (Selection Chall...
घरी आलो. तेंव्हा सर्व बायका तोंडाला पदर लावून माझ्याकडे पाहत होत्या. काही आप्तस्वकीय बायांचा आतून रडण्याचा आवाज येत होता. बाहेर माणसांची गर्दी जमलेली होती. कुणी एक तिरडी बांधण्यात व्यस्त होते, तर काही लाकडांची जमवाजमव करीत होते. मी आईला दिसताच तिने हंबरडा फोडला. आणि ती रडायला लागली . मी ही आता डोळ्यांतून अश्रू गाळू लाग...
जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. प. न. लुंकड कन्याशाळेत आषाढी एकादशी निमित्त शालेय परिसरात शाळेतील विद्यार्थीनी यांनी पंढरपूर येथील वारीचा, दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून गौरविले जाते. संतांचे कार्य केवळ अध्यात्मिक क्षेत्रापुरतेच नाही तर समाज सुधारणेतही त्यांनी मोलाची कामगिर...
इच्छा असणें, मदत करणें, दानधर्म करणें, माणसाच्या हातून चुक्या होणार नाहींत असें करण्याची, त्यांची चित्तवृत्ति गुंग करून टाकणाऱ्या गोष्टींचा उलगडा करण्याची, त्यांच्या विपत्ति कमी करण्याची, व आपणांस ज्या स्थितींत जग आढळलें त्यापेक्षां तें जास्त सुखांत ठेवून मरण्याची इत्यादि इच्छा बाळगणे ह्या सुविचारांस सामाजिक हिताचे वि...
नाथांचे रुचिमणी स्वयंवर श्रोत्यांनी नाथांना कौतुकानें विचारले, "कृष्णाला कोणीं नाचविलें । नवरीला कोणी नाचविलें ?" वधू ज्या दिवशीं वराच्या घरीं जाते त्या दिवशी वधूवरांस कडेवर घेऊन त्यांवर कुलदेवतांचा आशीर्वाद मागण्यासाठीं मनुष्यें नाचतात. हा कुलाचार सध्यां शहरांत कोठें दिसून येत नाही. खेडयांत हा प्रचार अजूनहि असण्याचा स...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लवकरच आपन वापरत असलेला आयफोन बदलणार आहे कारण थोड्याच दिवसात आयफोनचे नवीन अपडेट सुरु होणार आहे. अनेक दिवसांपासून आयफोन iOS 13 या ऑपरेटिंग सिस्टीमचे टेस्टिंग सुरु होते. iOS 13.1 हे 30 सप्टेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे. OS 13 ऑपरेटिंग सिस्टम (operating system) सगळ्या iPhone XS, iPhone XS Max...
भुसावळ :- येथील भाजपचे नगरसेवक व नगरपालिकेचे बांधकाम समिती सभापती रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घराबाहेर सोमवारी मध्यरात्री गोळीबार करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांच्या तपासानंतर अक्षय माहुरकर या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने घटनास्थळी गोळीबार केल्याची कबुली देत त्याच्याकडून गावठी कट्टा पोलिसांनी जप्त ...
नाशिक : कर्मचार्यांच्या बेमुदत संपामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात कर्मचार्यांना कामावर हजर होण्याबाबत नोटीस देणार आहेत. कामावर हजर न झाल्यास आंदोलनात सहभागी कर्मचार्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या प्रसूतीस...
मुंबई : नववर्षाच्या पार्टीसाठी दिल्लीहून आणलेल्या १२० कोटी किमतीच्या ३४ किलो चरस तस्करी प्रकरणात हिमाचल कनेक्शन उघड होताच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासाबरोबर जालना, बीड, चंद्रपूर, नागपूर, पुणे, धुळे या जिल्ह्यांत गांजाच्या संबंधित दाखल १२ गुन्ह्यांचा तपास मंगळवारी एटीएसकडे व...
देशात सरकार पाडण्यासाठी आणि बनवण्यासाठी सर्वपक्षांकडून आमदारांचा घोडेबाजार होतो, हे आता नवीन राहिलेले नाही ! अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! रांची (झारखंड) - झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी मला १ कोटी रुपये आणि मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, असा दावा काँग्रेसचे आमदार ...
जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्यात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली क्रांती ही अभूतपूर्व आहे. नागपूर : जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्यात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली क्रांती ही अभूतपूर्व आहे. त्यांच्यामुळे शोषित- वंचितांना मिळालेल्या आरक्षणानेच देशात गुणवत्ता निर्माण होऊ शकली, असे प्रतिप...
9 मे रोजी झालेल्या हिंसाचारात लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाउस (जिना हाऊस) वर झालेल्या हल्ल्यातील ती मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात आगडोंब उसळला. इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आणि देशभर वणवा भडकला. इम्रान खान यांची अटक बेकायदा असल्याचं सांगत सुप्रीम...
वनस्पति, आवृतबीज उपविभाग : या वनस्पती सामान्यतः सपुष्प वनस्पती (फुलझाडे) म्हणून ओळखल्या जातात. आधुनिक वनस्पतींमध्ये या वनस्पतींचा गट सर्वांत मोठा व सुस्पष्ट आहे. यांच्या जातींची संख्या २,५०,००० पर्यंत व एकूण वनस्पतींचीही संख्या सर्वाधिक असून आजमितीस पृथ्वीतलावरील वनश्रींमध्ये त्या प्रमुख आहेत. अगदी शंकुमंत (सूचिपर्णी) ...
नगर - जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या कमी होऊ लागली आहे. लाखाच्यावर मजूर क्षमता असलेली 33428 कामे उपलब्ध असताना सध्या जिल्ह्यामध्ये रोहयो अंतर्गत 1595 कामे सुरू असून त्यावर एकूण 6 हजार 164 मजूर काम करीत आहेत. जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये ब...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपरमालक-चालक यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणा-या मोर्चावर बेफाम लाठीमार करणारे जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली. मुंबई- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपरमालक-चालक यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणा-या मोर्चा...
काय आहे प्रकरण? चहल आणि धनश्रीमध्ये काहीतरी बिनसलंय अशा बातम्या सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या. आणि त्यामागचं कारण आहे धनश्री वर्मानं इन्स्टाग्रामवरुन हटवलेलं चहल हे आडनाव. धनश्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आधी धनश्री वर्मा-चहल असं लिहिलेलं होतं. पण तिनं चहल हे नाव हटवलं आणि चर्चा सुरु झाली ती त्यांच्या नात्यातल्या ...
पुणे ः भारतातून यंदा चालू विपणन वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत कापूस आयात वाढली मात्र निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक झालीये. तसेच सूत (Yarn) आणि कापड निर्यातही (Fabric export) यंदा अधिक झाल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने (USDA) म्हटले आहे. भारतातून २०२०-२१ च्या विपणन वर्षात ७९ लाख २६ हाजर ९४८ गाठ...
हिरडाःस्त्री पुरूषांच्या भेटचशी काय, पण कित्येक मोठमोठ्या पुरूषाना नऊ महिन्याची बात तर सोडून द्या,-नऊ क्षणसुद्धा आईच्या उदराचा स्पर्श झालेला नाही.आई आणि बाप नुसते नेत्रकटाक्षापुरते जबाबदार.आपल्या द्रोणाचार्यांची उत्पत्ति अशीच चमत्कारीक आहे. बेहडाः हा बेटा द्रोणाचार्य आईच्या ऐवजी बापाच्या पोटी जन्माला आला असावा, असं मला...
मुंबई, 23 फेब्रुवारीः कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन पर...
अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी बुधवारी राज्यातील विजाग येथील मेडटेक कंपनीने कंपनीद्वारे तयार केलेली कोरोनाची 'टेस्टिंग किट' लॉन्च केली. या किटने सॅम्पल टेस्ट केल्यानंतर अवघ्या ५५ मिनिटात कोरोनाबाबचे निदान होते. मेडटेक कंपनीचा दावा आहे की या दोन मशिनच्या साहाय्याने सॅम्पल टेस्ट केल्यानंतर ५५ मिनिट...
रायगड : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तीन विद्यार्थीनींचा जागीच मृत्यु झाला आहे. (Fatal accident at Kashedi Ghat on Mumbai-Goa highway; Three female students died along with the rickshaw driver) माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिस...
पणजी : आपण राज्याचे क्रीडामंत्रिपद स्वीकारल्यानंतर हरियानात झालेली खेलो इंडिया यूथ गेम्स पहिलीच मोठी स्पर्धा होती. गोव्याची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक ठरली. या अपयशाची गंभीर दखल घेण्यात आली असून यासंदर्भात जून महिनाअखेरीस आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी दिली. क्रीडामंत्र...
अजाईल मेथडॉलॉजी -भाग ७ - टेक मराठी\nअजाईल मेथडॉलॉजी -भाग ७\nया लेखमालेतील मागील लेख आपण येथे वाचू शकता\nअजाईल मेथडॉलॉजी - भाग -५\nअजाईल मेथडॉलॉजी - भाग -६\nस्क्रममधील स्प्रिंटबद्दल चर्चा केल्यानंतर आता प्रत्येक स्प्रिंटच्या शेवटी काय घडतं ते पाहू.\nस्क्रम ही iterative आणि incremental पद्धत असल्यामुळे प्रत्येक स्प्रिंटच...
करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी करोना लसीकरण सुरू आहे. मात्र, लवकरच करोनाचा आजार हा सर्दी-तापासारखा होणार आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन विकसित करण्यात येत असून या वर्षाखेरीस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कः करोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या संपूर्ण जगासाठी एक चांगली बातमी समोर...
आपणही मोठ्या पडद्यावर झळकावे, हिरो बनावे, असे स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. काहींचे सत्यात उतरते तर काहींचे स्वप्नच राहते. असेच हिरो बनण्याचे स्वप्न एका खेड्यातील सामान्य तरुणाने पाहिले आहे. 'स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात! ' अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड आणि अखेर त्याचे त्...
जिल्ह्यात वन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या विविध कामांचा दर्जा सूमार असून गेल्या २५ वर्षात वन विभागाला एकही झाड वाचविता आले नाही. गडचिरोली : जिल्ह्यात वन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या विविध कामांचा दर्जा सूमार असून गेल्या २५ वर्षात वन विभागाला एकही झाड वाचविता आले नाही. त्यामुळे वन विभागांतर्गत झालेल्या सर्व व...
सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. अमरावती : सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणव...
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या माध्यमातून आणि नाधवडे गावचे सुपुत्र श्री. रमेश इस्वलकर आणि श्री अभिनंदन यादव यांच्या प्रयत्नातून वैभववाडी तालुक्यासाठी 10 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख श्री. मंगेश लोके यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्...
मतदारसंघातील भेटीगाठींदरम्यान उमेदवाराचा प्रचार करणे महत्त्वाचे असते. ठाणे : मतदारसंघातील भेटीगाठींदरम्यान उमेदवाराचा प्रचार करणे महत्त्वाचे असते. असे असूनही त्यातूनच सवड काढून रॅलीमधून सेल्फी काढण्याचा मोह पदाधिकाऱ्यांना आवरत नसल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे. अनेक ठिकाणी भरउन्हात अशा भेटीगाठींदरम्यान दिवसाला १० ते १५...
मानवी जीवनाचे सर्व अंग विकसीत व्हावे, माणसाचे व्यक्तिमत्त्व सर्व अंगाने खुलावे, तो उत्तम पुरुष व्हावा, या करिता प्राचीन काळी समाजकर्त्यांनी हे सोळा संस्कार घालून दिले आहेत. मानवावर जर हे संस्कार केले तर त्याचा फार मोठा परिणाम त्याच्या जीवनावर होत असतो. त्याचे जीवन हे प्रभावशाली असे बनते.\nआपल्या माहितीसाठी खाली हे सोळा...
England vs New Zealand Kane Williamson Devon Conway 3rt Test: इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला असून तिसऱ्या सामन्यापूर्वी महत्त्वाचे फलंदाज मुकण्याची शक्यता होती. कर्णधार केन विल्यमसन (Kane...
BBC News, व्हीडिओ, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक कसा झाला? आणि परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सक्षम आहेत का? पुणे जिल्हा पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय का? व्हीडिओ, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं वेगळेपण काय? लॉकडाऊन लावून ती जाईल का? राजेश टोपे मुलाखतः 'महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली कारण. . . ' भारतात कोरोना लसीकर...
Pandharpur Live March 08, 2019 pandharpur, मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने दि.8 मार्च 2019 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, माता रमाई आंबेडकर, तमाम शि...
देशभरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न महामंडळ अधिनियम 1९६५ अंतर्गत भारतीय खाद्य महामंडळ (एफसीए) स्थापन करण्यात आले. सध्या या महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. मोदी सरकारच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात महामंडळावरील कर्ज तिप्पट वाढले आहे. हे महामंडळ सेवा क्षेत्रातील आहे. न...
Papaya Health Benefits : रोज रिकाम्या पोटी पपई खाल्लीत तर काय होईल? Papaya Health Benefits : तुम्ही सर्वांनी पपईचे सेवन केले असेल. कच्ची आणि पिकलेली दोन्ही पपई खाल्ली जातात. हे फळ अनेक औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत, तज्ञ देखील आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. पपई खाल्ल्याने तुम्हाला ...
हसरे अश्रू - ललितांबिका अंतर्जनम आणि वेदनेची लिपी ? मग लिहून घ्या. मी कहाणी सांगू ? कित्येक दिवसांपासून मनात दडवून ठेवलीय. आज ती प्रगट व्हायला तडफडत आहे. पुष्कळ लोक तयार झाले, पण तिला उपयुक्त स्थायी भाव कोणाजवळ नाही. त्या त-हेचा कागदही नाही. अखेर तुमच्याजवळ आले आहे. बोला, सावलीची कान्ती, सौंदर्याचे स्मित या दोन्हींना ओ...
गेल्या पंधरवड्यात कायद्याचे राज्य आहे म्हणून मनोहर जोशींचे वस्त्रहरण झाले, तर कायदा राबविला म्हणूनच पुणे महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्रे अरुण भाटिया यांच्याकडून काढून घेण्यात आली. पहिल्या प्रकरणाने कथित शिवशाहीचा पहिला मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून फौजदारी खटल्याला सामोरे गेला, अशी नोंद झाली. तर दुसऱ्या प्रकरणा...
जेव्हा आपल्याला कॉम्प्यूटर स्क्रीनवरून व्हिडिओ जतन करायचा असेल तेव्हा बंदीम प्रोग्राम वापरला जातो. आपण वेबिनार, व्हिडिओ ट्यूटोरियल किंवा पासिंग गेम रेकॉर्ड करत असल्यास, हा प्रोग्राम आपल्यास मोठ्या मदतीसाठी असेल. महत्वाच्या व्हिडीओ फाइल्सचे रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि बांधायला सक्षम होण्यासाठी बँडिकमच्या मूलभूत कार्याचा व...
कोरोना लस घेण्यात नर्स सर्वात पुढे; डाॅक्टर मागे! कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. वाशिम जिल्हा सामान्य...
बापरे! महिलेने युवकाला जबरदस्तीने शारीरिक संबंधास भाग पाडले अन्. . . युवकाने फिर्याद दिल्यानंतर कोंढवा पोलिसांनी प्रगती इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या महिलेसह तिच्या ३ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे : सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रामवर पनवेलच्या युवकाची एका अनोळखी महिलेसोब...
शरीराचं 'ऐकत' गेलो, म्हणून. . संसर्ग होणं म्हणजे माळरानावरून अनवाणी चालताना सराटा टोचणं ! एखाद्याच्या पायाला टोचेल, एखाद्याच्या नाही! संसर्ग झाल्यानंतर तुमचं मन-शरीर कसं प्रत्त्युतर देतं, हे महत्त्वाचं ! 1) आपलं काय होणार, मरणार की वाचणार, कोरोना संसर्गाचं स्वरूप काय असेल असलं काहीच एकदाही मनात आलं नाही. त्यासाठी 'थि...
नागपूर : हल्ली कार्पोरेट कंपन्यांची शक्ती वाढली आहे. सर्वच क्षेत्रात या कंपन्यांचे प्रस्थ वाढताना दिसत आहे. असे असले तरी 'बिना सहकार, नही उद्धार' हे सर्वांनी लक्षात ठेवावे. पारदर्शी सहकार क्षेत्रच या कंपन्यांना टक्कर देऊ शकते, असा संदेश सहकार वाचवा परिषदेने नागपुरात दिला. या सोबतच, सहकार क्षेत्राने काही बंधने स्वीकाराय...
भारतातूनच नवे तर पाकिस्तानमधून देखील अनेक कलाकारांनी आपली हजेरी बॉलिवूडमध्ये लावून, आपले नाव निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे काही भारतीय कलाकार देखील आहेत,ज्यांनी भारतातील छोट्या आणि मोठया पडद्यावर तर आपली ओळख निर्माण केलीच, परंतु पाकिस्तानमधल्या चित्रपटात, आणि अनेक टीव्ही कार्यक्रमातसुद्धा आपली उत्तम कामगिरी दाखवली आहे...