text
large_string
सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकूण ११५ पदे भरणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट centralbankofindia. co. in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. पदाचे नाव आणि पदसंख्या : शैक्षणिक पात्रताः पद क्र. 15: (i) पदवीधर (ii) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी कि...
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराषट्रीय स्टेडियममध्ये 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करत असलेल्या टीम इंडियाचा सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने 26 धावा करताच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli...
माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे ही बाब मी स्वीकारत नाही. त्याच्या मृत्यूचे कारण वेगळे आहे असं मृत युवकाच्या आईने आरोप केला. १८ वर्षाच्या कोट्यधीश युवकाचा लग्नाच्या काही तासांतच मृत्यू झाला आहे. तो शाळेत शिकायला होता. त्याला वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा प्राप्त झाला होता. या मुलाने समलैंगिक विवाह केला. ज्याच्याशी युवक...
Latest Delhi Crime News : आलिशान जीवन जगण्यासाठी हल्लीची तरुणाई काय करेल याचा भरोसा नाही. असात एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे. इथे एका तरुणाने ११२ दिवस मस्त ५ स्टार हॉटेलमध्ये आराम केला आणि २४ लाखांचं बिल केलं. पण यानंतर तरुणाने कोणालाही काही न बोलता धूम ठोकली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्या...
नवी मुंबई ः कोव्हीड 19 च्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव शासनाने निर्गमित केलेल्या कोव्हीड सुरक्षा नियमावलीच्या कक्षेत काटेकोरपणे साजरा व्हावा तसेच कुठेही गर्दी होणार नाही याकडे महापालिका व पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांग...
यांकी मेणबत्ती नवीन डिझाइनसह स्वाक्षरी संकलन लाँच करते - बातमी\nयांकी मेणबत्ती पुन्हा डिझाइन केलेल्या जहाजांसह एक नवीन संग्रह लाँच करत आहे\nनवीन महिना = नवीन घर सुगंध. यांकी मेणबत्ती पूर्णपणे नवीन डिझाइन केलेल्या भांड्यांमध्ये नवीन सुगंधांचा संग्रह लाँच करेल. मेणबत्ती कंपनी पदार्पण करेल स्वाक्षरी संग्रह मार्चमध्ये, दहा...
लंडन, 26 जानेवारी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा, अनमोल असा क्षण असतो. त्यामुळे आपल्या लग्नात आपलं कुटुंब, नातेवाईकांसह आपली बेस्ट फ्रेंडही असावीच असं बहुतेकांना वाटतं. पण एका महिलेने मात्र हद्दच केली. तिने आपल्या लग्नात सर्व मित्रमैत्रिणींना बोलावलं पण तिने आपल्या बेस्ट फ्रेंडलाच बॅन केलं (Bride best...
'मोतीचूर चकनाचूर'च्या ट्रेलरला न्यायालयाची स्थगिती - Majha Paper\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आथिया शेट्टी, नवाजुद्दीन सिद्दीकी, मुंबई उच्च न्यायालय, मोतीचुर चकनाचुर / October 11, 2019 October 11, 2019\n'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. १० ऑक्टोबरला ...
पल्लवी जोशी यांनी लहान वयात रंगमंचात काम करणं सुरु केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का नावाचे दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी झाला. त्यांनी १९७९ साली आलेल्या झालेल्या दादा ह्या चित्रपटात एक कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीच्या भूमिका साकारली होती. १९८० आणि १९९० च...
प्रकाशकाचे मनोगत चिखलदरा नगर मेळघाटाच्या सातपुडा पर्वताच्या पठारावर वसलेले अतिशय सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. शहराच्या दक्षिणेकडील असलेल्या डोंगर माथ्यावर उभारलेल्या गाविलगड किल्ल्याचे अवशेष दुरूनही दिसतात. पर्यटकांना दुरून होणारे गाविलगडाचे हे मनोहारी दर्शन त्यांची उत्सुकता वाढवते. चिखलदऱ्याला येणारा पर्यटक गाविलगडावर ...
मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू ख्रिस मॉरिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ( international cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी त्याने 69 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने ही बातमी जाहीर केली.(IPL's most expensive player abruptly retires from international cricket, will now be...
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देताना संबंधित लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे पॅनकार्ड नसल्याने ही रक्कम देताना अडचणी येत होत्या. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देताना संबंधित लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. मा...
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १ : रेल्वे तिकीट बुक करणे आता अधिकच सुलभ झाले आहे. कारण आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार तिकिटांचे बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकिटे बुक होतात. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज गुरुवारी आयआरसीटीसीच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. हे संकेतस्थळ आता अद्ययावत करण्यात आले अस...
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सोहळ्याला गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या ११ जणांचा उष्माघातान...
पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की..., पाहा व्हिडीओ\nBy टीम थोडक्यात On September 19, 2021 1:35 pm\nPhoto Credit- Twitter/Dallas\nनवी दिल्ली । अनेक पती-पत्नींमध्ये लग्नाच्या काही काळानंतर वाद सुरु होतात. यातून वैतागलेला पती नाही तर पत्नी बाहेर कुठं तरी रमतात. मात्र ही बाब जोडीदाराला समजल्यानं...
थिम्पू - भावी पिढ्यांवर प्रभाव टाकू शकेल, अशी शैक्षणिक कामगिरी करण्याची भूतानमधील विद्यार्थ्यांत क्षमता आहे. त्यामुळे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून वाटचाल करावी आणि हिमालयातील या देशाला नवी उंची प्राप्त करून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. राॅयल विद्यापीठात रविवारी माेदींनी मार्गदर्शन केले. त...
Uttar Pradesh Election 2022: बटाट्याची दारू रंगतेय. . गुंडांची नशा उतरतेय! फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. फिरोझाबाद : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. आता सर्व नेत्यांचं लक्ष तिसऱ्या टप्प्याकडे वळालंय....
बंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकात सरकार स्थापन होऊन अवघे काही महिनेच झाले असताना आता पुन्हा एकदा सत्तेसाठी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. २ अपक्ष आमदारांनी राज्यातील काँग्रेस-निजद सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात आले आहे. कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडी वेगाने सुरू असल्याने राजकीय अस्...
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्राची सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा उद्यावर गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत हे प्रकरण पोहोचले नाही त्यामुळे पुन्हा ही सुनावणी उद्यावर गेली आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं विधिज्ञ कपिल सिब्बल आणि अभिषेक...
Rama Steel Tube Share Price । शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स 2. 64% वाढीसह 36. 95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या ही कंपनी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे, कारण कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकाना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज शेअर बाजरी ...
चिंचवड : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पिंपरी-चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे भाजपबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढायचीच नाही, तर ती...
"त्यामुळे पुढच्या आयुष्यावर पकड येते आणि ते जगायला सोपंही जातं. आपण ते सुखलेले नातं ओढत ताणत गेलो कि मग त्रास होतो, जखम होते. हे ते स्वताशीच म्हणाले..... कारण सरळ होतं माझ्या त्या लहान बुद्धीला ते अजिबात समजणारं नव्हतं. मात्र आज त्याचा अर्थ कळतो आहे. हळू हळू आमचं काम सुरु होतं. एक एक टप्पा आमचा पुढे जात होता. हळू हळू फ...
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात आढळल्या 'एवढ्या' BLUE FILMS (पॉर्न सीडी) मुंबई : वृत्तसंस्था - ओशिवरा पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध मीरा टॉवरमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना तब्बल 'अडीच लाख' पॉर्न सीडी सापडल्या. या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ज्यावेळी छापा मारला त्याव...
मुंबई, 26 मे- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकरांनासह विक्रम भावेला काल मुंबईत सीबीआयने अटक आली. आज या दोघांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेकडून कटाची माहिती मिळवायची आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे ज्यांची विल्हेवाट लावली, त्याबाबत माह...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५० वी बैठक आज संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये रू. १२,९६९. ३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता मिळाली असून त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक - मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल व मुंबईकारांचा प...
परभणी : जिल्ह्यात गोदावरीच्या कुशीत वसलेले जांभूळ बेट पर्यटन स्थळ व्हावे, म्हणून विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी मंगळवारी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पालम तालुक्यातील जांभूळबेट या निसर्गरम्य ठिकाणाला मंगळवारी (दि...
Kon Honar Crorepati : ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati). 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व 29 मेपासून सुरू होत आहे. 'को...
बेस्ट उपक्रमामधील पहिली इलेक्ट्रिक बस (Electric Bus) सेवा मुंबईकरांसाठी आजपासून (9 सप्टेंबर) सुरु होणार आहे. तसेच या बसचा क्रमांक 302 असा ठरवण्यात आला असून सहा वातानुकूलित आणि चार विनावातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात दहा इलेक्ट्रिक बसची सोय करण्यात आली आहे. म...
Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Bail : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता. 24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाची ...
मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांची असलेली भीती दूर करण्यासाठी तसेच नवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग ब्रिटीश कौन्सिलची मदत घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ब्रिटीश कौन्सिल इंडियाच्या संचालक बार्बरा विकहॅम,...
दूरदर्शन ही एक अशी गोष्ट आहे, ज्याबद्दल आपण सर्वांनी जागरूक असले पाहिजे. गेल्या दोन दशकात टीव्हीच्या जगात अनेक बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी जसं लांबलचक अँटेना असायचे, त्याद्वारे खेडोपाडी दूरदर्शन दिसत होते. यानंतर डीटीएच (डीटीएच)चा प्रवेश झाला आणि त्यामुळे हळूहळू अनेक टीव्ही चॅनेल्स भारताच्या घराघरात पोहोचल्या. आपल्य...
भारतीय हवाई हद्दीत इराणच्या पॅसेंजर जेटवर 'बॉम्ब' असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॅसेंजर जेट आता चीनच्या दिशेने जात आहे, तर सुरक्षा एजन्सींची एक टीम विमानावर नजर ठेवण्यासाठी जमली आहे. हे विमान भारतीय हवाई हद्दीतून जाणार होते. त्यानंतर दिल्ली विमानतळावरून जयपूर विमानतळापर्यंत माह...
चक्कर येत असतांना होणारी डोळ्याची हालचाल. चक्कर या विकारास इंग्रजीत 'व्हर्टिगो' असे म्हणतात.बऱ्याच वेळ भोवळ व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे. एकाच जागी बसले असतांना गरगरल्यासारखे वाटणे,चालतांना तोल जाणे,डोके भणभणणे व हलके झाल्यासारखे ...
'हे गणराया' बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस! गणेशस्तुती हा रसिकांच्या पसंतीचा विषय आहे. शब्द, संगीत आणि गायन ह्याचा त्रिवेणी संगम या गाण्यात आपल्याला दिसून येईल . कलेची देवता असलेल्या अधिपती गणपती बाप्पाला या गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा या सर्व कलाकारांनी पोहोचवली आहे. श्रवणीय संगीत, शब्दमधुर गीत आणि शंकरजींच्या...
औरंगाबाद : शहरातील सार्वजनिक शौचालये लोकसंख्येच्या प्रमाणात नगण्य असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातही महापालिकेला कमी शौचालयांमुळे तीन वर्षांपासून कमी गुण मिळत आहेत. महापालिका स्वतःहून १०० शौचालये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. खाजगी संस्थेच्या सहकार्याने शौचालय उभारणीच...
मुंबई । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी (२७ मे) इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्ट्समुळे या चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघातून लढावे...
डाल्टन, जॉन -(१७६६-१८४४)- हा इंग्रज पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्रज्ञ कंवरलंडमध्यें ईगल्स फॉल्ड येथें तारीख ६ सप्टेंबर १७६६ रोजीं जन्मला. याचा बाप जोसेफ डाल्टन हा गरीब कोष्टी होता. याच्या आईचें नांव डेबोरा ग्रीनप असें होतें. याला जोनाथन व मेरी या नांवांची दोन भावंडे होतीं. जॉन याचें प्राथमिक शिक्षण त्याच्या बापाजवळ व ज...
पळवे : पिंपळनेर (ता. पारनेर) येथे संत सेना महाराज मंदिरात संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात झाला. यावेळी कोरोनाचे नियम पाळून तालुक्यातील काही बांधव उपस्थित होते. पूजा करुन भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पठारवाडी व पिंपळनेर भजनी मंडळाने भजन सेवा केली. त्याबद्दल भजनी मंडळींचे पारनेर तालुका नाभिक ट्रस्टच्या वतीने स...
'गोलंदाजांनी नियमानुसारच गोलंदाजी करावी. अन्यथा गोलंदाजांनी आपल्या शैलीतच बदल करावे,' असा सल्ला श्रीलंकेचा माजी विश्वविक्रमी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने दिला आहे. शारजाः 'गोलंदाजांनी नियमानुसारच गोलंदाजी करावी. अन्यथा गोलंदाजांनी आपल्या शैलीतच बदल करावे,' असा सल्ला श्रीलंकेचा माजी विश्वविक्रमी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनन...
संत विविध सद्गुणांचे जे वर्णन करतात, त्यात मार्दवाचंही अनेकदा येतं पण आपलं त्याकडे काहीसं दुर्लक्ष होतं. ज्ञानी पुरुषाचं व्यक्तिमत्त्व ज्या ज्या गुणवैशिष्टय़ांनी जडत-घडत असतं, त्यात मार्दवाचं महत्त्व विशेष आहे. संत विविध सद्गुणांचे जे वर्णन करतात, त्यात मार्दवाचंही अनेकदा येतं पण आपलं त्याकडे काहीसं दुर्लक्ष होतं. ज्ञ...
शेतात असताना अचानक समोर आला बिबट्या,हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू ! अहमदनगर ब्रेकिंग : उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने ११ वर्षांच्या चिमुकलीस जाळले ! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम काकाला झाली ही शिक्षा ! अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !
अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. याप्रकरणी आता अनेक नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी या प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीम अॅप कार्यालयावर छापे टाकले होते. यावेळी पोलिस...
You are here: Home » बातम्या » मॅचचा फिव्हर आमदारांवरही, विधिमंडळाच्या कामकाजानंतर वानखेडेवर हजेरी ? मॅचचा फिव्हर आमदारांवरही, विधिमंडळाच्या कामकाजानंतर वानखेडेवर हजेरी ? March 31, 2016 12:35 PM0 commentsViews: 31 मार्च : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार ...
किम फोटो शेअर करताना म्हणते की, रात्रीच्या वेळी स्विमिंग इन्जॉय करते आहे. नाइट स्विम'. (Photo Credit- @kimkardashian/Instagram) किमचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. इतकचं नाही तर सेलिब्रिटीजदेखील तिच्या या फोटोंवर कमेंट करीत आहेत व तिचं कौतुक करत आहेत (Photo Credit- @kim...
पुणे : शहातील नायडू रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांचे केंद्रबिंदू आहे. आजघडीला या रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, याच रुग्णालयातील एका वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेला. परंतु, सुराक्षकांजवळ पीपीई किट नसल्यामुळे त्या...
पुणे । संत तुकोबांची पालखी आज (१२ जून) दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान करणार आहे. राज्यातील कोरोनास्थितीमुळे पहिल्यांदाच या पालखी सोहळ्यात अगदी मोजक्याच वारकऱ्यांचा सहभाग असणार असल्याचे सांगितले जात आहे. केवळ ५० जणांना या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. दरवर्षी तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानावेळी इं...
मुंबई : जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी हवा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळेच मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १०. ४५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्यावर्षी वर्षभर पुरेल असा पाणी साठा होता. मात्र ...
27 Advocates In Amravati Municipal Corporation For Avoiding Opposition । विरोध टाळण्यासाठी मनपात २७ वकिलांची फळी - Divya Marathi\n27 Advocates In Amravati Municipal Corporation For Avoiding Opposition\nविरोध टाळण्यासाठी मनपात २७ वकिलांची फळी\nअमरावती - महापालिकेच्या पॅनलवर एक-दोन नव्हे, तर २७ विधिज्ञांची निवड झाल्यामुळ...
चाफळ - विभागात गत आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ९० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरी भागात पिकांची उगवण चांगली झाल्याने विभागातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. बळीराजा कोळपणीच्या कामात व्यस्त आहे. यावर्षी विभागात वळीव पाऊस चांगला झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली. तरीही तळभाग...
पेण : काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उन्हाचा पारा वाढला आहे. दोन दिवसांपासून तर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पेण तालुक्यातील भातशेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या कामांमध्ये व्यग्र झाले आहेत. राज्यात तीन वर्षांपासून सतत मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, तोक्ते वादळ, वादळ वाऱ्या...
मुंबई, 19 नोव्हेंबर : हल्ली लोक आपल्या वाढत्या वजन आणि वाढत्या पोटाच्या घराकडे खूप लक्ष देतात. पोटाचा वाढत घेर कुणालाच आवडत नाही. म्हणून तो कमी करण्यासाठी लोक सगळे शक्य ते सर्व प्रयत्न करतात. मात्र काही लोकांना जास्त व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला एका योगासनाबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही जेवण ...
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या. 2 सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे. 3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे. 4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास. त्याच्या पवित्र पादासन...
मुंबई : सध्या सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सरकारने प्रधानमंत्री जन धन खाते योजनेंतर्गत खाती उघडली होती. पीएम जन धन योजनेअंतर्गत, सरकार खात्यात रोख रक्कम नसली तरीही १० हजार रुपये काढण्याची सुविधा देते. म्हणजेच तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही १० हजार रुपयांप...
नांदेड - अशोक चव्हाणांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना प्रचारासाठीही भाडोत्री नेता आणावा लागला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. नांदेडच्या भोकरमधील सभेत ते बोलत होते. राज ठाकरे यांनी नांदेडमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राशी क...
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात बंदी असलेला सॅटेलाईट फोन पोलंडच्या नगरीकाजवळ आढळून आल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. डॅमियन रोमन झेल्नसिकी(२६, रा.पोलंड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून दंडात्म...
घरात वडीलधारी मंडळी स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआप वळतील. वृषभ - (शुभ रंग- पिस्ता) व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. प्रतिष्ठेची काळजी घ्या. कष्टाने यश साध्य होईल...
आपल्या जुन्या सोळा वर्ष करडू परदेशी भाषेतील शाळा आणि शेवट मैत्री येथे ह्या पूर्णपणे सर्व समस्या मदत केल्याबद्दल येतो. आपण राजकारण, क्रीडा आणि नवीन टीव्ही मालिका बोलत तास खर्च करू शकता. आपण त्याला बोलू शकत नाही की काही आहे की विचार होईल. आणि हा, सत्य आपल्या मुलाला आपण भोगावी लागली तेव्हा तो समलिंगी आहे की एक वेळ येते पर...
रावेर : सर्वांना संधी दिली जाते, मग मलाच का डावलले जाते ? असा प्रश्न उपस्थित करीत रावेर पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे या खासदार रक्षा खडसे यांच्याशी बोलत असताना त्यांना रडू कोसळले. तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनावेळी हा प्रकार घडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परी...
सिडको प्राभाग २८ मधील वृंदावन नगर येथे सभापती सुवर्णा मटाले यांनी डेंगू, चिकनगुनिया याबाबत पाहणी दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली. सध्या डेंग्यू ,चिकनगुनिया याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी जनजागृती करून मोहीम राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पा...
विदेशी दारू दुकानदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी राहुल अशोक बनसोड आणि नीलेश शेलार याला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. औरंगाबाद ः विदेशी दारू दुकानदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी राहुल अशोक बनसोड आणि नीलेश शेलार याला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. गारखेडा परिसरात राजू मनकानी यांचे एएनटी वाइन शॉप आ...
मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही. लंडन : मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही. त्यामुळे भारतीय तपासी यंत्रणांना माझे काही जाब-जबाब घ्यायचे असतील तर त्यांनी इथे लंडनमध्ये याव...
बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधान आणि ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. १२ मे रोजी त्यांचा आगामी सरकार -३ हा मल्टिस्टारर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच राम गोपाल वर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे. ते आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. रामगोपाल वर्मा विरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉर...
नवी दिल्ली, 20 जानेवारीः सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) च्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) तेजी पाहायला मिळाली. दरम्यान देशांतर्गत बाजारात याचा परिणाम दिसला नाही. दिल्ल...
कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आदिवासी समाजात विविध प्रकारचे गैरसमज असून, लस घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजला असून, यात बाधितांचे प्रमाण आणि मृत्यू यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांमध्ये दहशत आहे. कोरोनापा...
नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे. यामुळे मिरज पूर्वभागातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून पान व्यवसायाला मरगळ आली होती. कोरोना काळात १० कवळी (एक कवळी ३००...
मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यन्त उद्यापासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार दि. २२ जून पर्यन्त तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मोसमी पावसाच्या साधारण वळवाच्या सरींची शक्यता जाणवते. २२ जूनपर्यन्त हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण व गोवा उपविभागपर्यंतच कदाचित मर्यादित असु शकतो असे वाटते. पूर्वम...
नागपूर : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात गृहमंत्रीपद गमावणारे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय लोकांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. मुंबईहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर कार्यालयाच्या मदतीने चार ठिकाणी कारवाई केली. ईडीच्या धाडीमुळे देशमुख आणि त्यांच्याशी जुळलेल्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत...
दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नस...
५. तपश्चर्या व तस्वबोध स्पष्टीकरणाला त्याची मदत होण्यासारखी असल्यामुळे तो येथे देण्यांत आला आहे. चार आर्यसत्यांचें स्पष्टीकरण जगांत दुःख आहे हें कोणालाही नाकबूल करतां येत नाही. परंतु जो तो आपलें दुःख कसें नष्ट होईल याच विचारांत असतो. त्याचा परिणाम असा होतो की, दुसऱ्याचा घातपात करून देखील प्रत्येकजण आपण सुखी होऊं इच्छि...
चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा "पिरीयारूम पेरूमल"\nDecember 13, 2018 December 12, 2018 Raj Jadhav101 Views 1 Comment Film, Film Review, Pariyarum Perumal, tollywood\n'परीयेरूम पेरूमल' सुरू होतो आणि पुढच्या दहाच मिनिटात तो पुढे काय दाखवणार आहे याची प्रचिती मिळते. अगदी सुरुवातीपासून ह...
जॉन सीना (John Cena) 27 जुलैला पुन्हा एकदा RAW मध्ये परतत आहे. जॉन सीना सध्या प्रो-रेसलिंगच्या जगातला सर्वात मोठा स्टार आहे. जॉन सीना 27 जुलैला पुन्हा एकदा RAW मध्ये परतत आहे. जॉन सीना सध्या प्रो-रेसलिंगच्या जगातातील सर्वात मोठा स्टार आहे. 20 वर्षांच्या कारकिर्दीत, त्याने WWE मध्ये अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. त्याचबरोब...
पाकमध्ये असुरक्षित हिंदू ! कराची (पाकिस्तान) - पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे ...
गेली दोन वर्षं इरफान न्युरोएंडोक्राईन ट्युमर या आजाराने ग्रस्त होता. कारवा हा सिनेमा रिलीज होण्यापुर्वीच ही बातमी समोर आली होती. यावेळी आजारपणात सदोदित सोबत असलेल्या सुतापाबाबत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. सुतापा एक डायलॉग रायटर आहे. तिने शब्द, खामोशीः द म्युझिकल, सुपारी या सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहे...
नाशिक : नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागण्याचे आदेश शनिवारी स्वागताध्यक्षांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी नितीन मुंडावरे यांनी संमेलन स्थळ, परिसर आणि उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी करून विविध खात्यांच्या अधिकाऱ...
अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तू लग्न केले, तर सासरच्या लोकांना आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडिओ दाखवेन, अशी धमकी देत वारंवार अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रवींद्र मधुकर लोखंडे (चिखलठाण वाडी, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील मांजरी येथे प्रशिक्षण घेत असताना पीड...
Arvind Kejriwal : काँग्रेसचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा? काँग्रेस अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काँग्रेस अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आज पाटणा येथे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अ...
ही शंका बरोबर नाही. कारण उपांशु व अंतर्याम हे दोन ग्रह प्राणरूप व अपानरूप आहेत. प्राण व अपान या दोन वायूंची निष्पत्ती झाल्यानंतरच इतर इंद्रियांची स्थिती होत असते. अर्थात् चक्षुरादिइंद्रियरूप अशा ऐंद्रवायवादि ग्रहांच्या ग्रहणापूर्वीच प्राणापानरूप उपांशु व अंतर्याम या ग्रहांचे ग्रहण करण्यात येणे हे निर्विवादच आहे. त्यांच...
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर हे #MeToo मोहीमेमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. एम. जे. अकबर हे संपादक असताना त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप 6 महिला पत्रकारांनी केला आहे, त्यानंतर अकबर यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. मात्र या आरोपांबद्दल चौकशी करावी लागेल असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यां...
मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला समजली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे...
गोंधळाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ! मुंबई, ३ मार्च (वार्ता. ) - राज्यपालांच्या अभिभाषणाने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पाला प्रारंभ होतो; मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा दिल्या. या वेळी सभागृहात झ...
'हर हर महादेव' या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. पुणे - 'हर हर महादेव' या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशप...
आज खूप छान साडी नेसून ती ऑफिसला गेली,फेंट गुलाबी रंगाची साडी अगदी साजेशीच jwellary व matching ची purse घेऊन ती निघाली. आज खूप नाराज होती नेहा, पण काय करणार सगळ्या बायकांनी theme ठरवलेली त्यामुळं सजून गेली ती.आज office मध्ये खूप छान वातावरण होतं, महिला दिन होता त्यामुळं सगळ्या ladies स्टाफ छान पैकी सजून सवरून आल्या होत्...
रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे. पुणेः रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना दंड करण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिका आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना लक्ष्य करणार आहे. अशा नागरिकांना १८० रूपये दंड करण्यात येणार आहे. लवकरच ही मोहीम सुरू होणार असून त्याची तयारी घनकचर...
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा पूर्वभाग. जत शहरापासून चाळीस किलोमीटरवर जालिहाळ बुद्रुक. दुष्काळ पाचवीला पूजलेला. दारिद्र्य, अशिक्षितपणा, निरक्षरता, बेरोजगारी फणा काढून उभे! हे सगळं आता गावकऱ्यांनीच बदलायला घेतलंय. - आणि त्यासाठीचं माध्यम आहे रेडिओ ! दोनवेळच्या खाण्याची ददात असणाºया बाईच्या पोटाला खंडीभर पोरं, त्य...
महिन्या-दीड महिन्यात तुझी बदली करतो, असे त्याला सांगून त्याला राजगडचा किल्लेदार म्हणून नेमले. तोरण्यावर अशीच तात्पुरती नेमणूक करण्यात आली. सिंहगडचा किल्ला देवीसिंग बुंदेला यांजकडे देण्यात आला. हे सर्व झाले तरी मराठ्यांच्या हालचालीमुळे औरंगजेब अस्वस्थ होता. पुणे प्रांतातून निघून त्याने भीमाकाठी खेड येथे मुक्काम करण्याचे...
IND vs WI 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरूवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ या टप्प्यातील भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर दाखल झाला आहे. युवा खेळाडूंना सोबत घेऊन भारताला ही मालिका जिंकाय...
रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना (Accident) घडली आहे. त्यामुळं रेल्वे चालकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, यामुळं उद्रेक झाला आहे. आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली. लासलगाव- सोमवारी सकाळी लासलगावमधून (Lasalgaon) एक मोठी दु...
समुपदेशकांकडे पेपरतपासणीच्या कामाची चौकशी, परीक्षार्थ्यांना सतत 'बिझी' टोन । Saamana (सामना) परीक्षेदरम्यान मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली हेल्पलाइन काही मॉडरेटर्स आणि नियामकांमुळे सतत 'बिझी' आहे. या हेल्पलाइनवर मॉडरेटर्सच आपल्या व्यथा मांडत असून 'पेपरतपासणीसाठी बोर्डाकडून अद्याप विचारणा झालेली...
ब्रुसेल्स- अँड्रॉईडमार्फत एकाधिकाराचा दुरुपयोग केल्याप्रकरणी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलकडून तब्बल २० हजार कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो. ही कारवाई गुगल कंपनीवर या आठवड्यात केली जाऊ शकते. मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गुगल आपले अँड्रॉईड सॉफ्टवेअर मोफत देते, पण गुगल त्या बदल्यात वेब ब्राउझर व सर्च इंजिनसारखे ...
- आंतरराष्ट्रीय न्यायालयातल्या निर्णयानंतर पाकिस्ताननं पहिल्यांदाच आज भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत दिली जाणार आहे. - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, कुलभूषण जाधव यांना सोमवारी राजनैतिक संपर्क उपलब्ध करून दिला जाईल. - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं की, व्हिए...
त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथील आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेच्या आश्रमशाळेतील पहिलीचा विद्यार्थी निवृत्ती बाळू चावरे (६, रा. कळमुस्ते (ह) ता. त्र्यंबकेश्वर) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी सदर मुलाचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल...
नवी दिल्लीः फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने(एसीसी) सन १९८८ व १९९९ बॅचच्या देशभरातील २० अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. त्यात शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी व सदानंद दाते यांनाही पोलीस महासंचालकपदी बढती ...
एमपीसी न्यूज - आळंदी येथे दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने फुटपाथवर व रस्त्यावरील दुकानांवर अतिक्रमणांविरोधात कारवाई केली. नगरपरिषद चौक ते माऊली मंदिर परिसर, महाद्वार चौक ते शनी मंदिर परिसर, चाकण रस्ता भाजी मंडई ते चावडी चौक, तसेच प्रदक्षिणा रस्ता या ठिकाणी फुटपाथवर व रस्त्यावर असणाऱ्या दुकानांवर अतिक्र...
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. कोरोना महामारीचा जगातील अनेक देशांवर वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीत, न्यूझीलं...
याकूब मेमनला फाशी होऊ नये यासाठी राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया अर्जावर भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची स्वाक्षरी असणे लज्जास्पद बाब आहे. नवी दिल्ली - याकूब मेमनला फाशी होऊ नये यासाठी राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया अर्जावर भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची स्वाक्षरी असणे लज्जास्पद बाब आहे. याकूबसाठी दयेची मागणी करणा-...
अनेक जणांसाठी पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. त्यांचे घरातील व्यक्तींकडून लाडकोड होतात, ते घरात अगदी हक्काने सगळीकडे वावरत असतात, लोळत-फिरत असतात. प्राण्यांसोबत राहणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी-आनंदासाठी चांगलंच आहे. पण तुमच्याकडे पाळीव प्राणी असेल तर काही मुलभूत काळजी घेणंही गरजेचं आहे, जेणे...
नवी दिल्ली । केंद्रीय विश्वस्त मंडळाची (Central Board of Trustees) बैठक पुढील महिन्यात 4 मार्च रोजी श्रीनगर येथे होणार आहे. ज्यात काही मोठे निर्णय अपेक्षित आहेत. अनिवार्य पीएफच्या पगाराची मर्यादा वाढविण्याचा सरकारचाविचार आहे. सरकार यूनिव्हर्सल मिनिमम वेज़च्या अनुषंगाने पीएफ कपातीसाठी सध्याची वेतन मर्यादा वाढवण्याची तया...
तृष्णा.. । काय वाटेल ते........\nबंबैय्या हिंदी.. →\nPosted on March 6, 2011\tby महेंद्र\nतृष्णा , फोर्ट मुंबई.\nपरवाच टाऊन साईडला कामानिमित्त गेलो होतो. दुपारी ३ वाजे पर्यंत कामाच्या रगाड्यात काही वेळ मिळाला नाही जेवायला! कडकडून भूक लागली होती. "महेश लंच होमला' जाऊ या का रे??" बरोबर असलेल्या मित्राला विचारले, पण त्याल...
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी 'नामा'चे महात्म्य आणि महत्त्व आपल्या आत्म साक्षात्कारी प्रवचनांमधून आत्मानुभवाच्या वाणीने असे काही फुलवले की हा 'नमा' चा अपूर्व मोगरा कैवल्य-सुगंध उधळत अवकाशभर पसरला. श्री महाराज पहिल्या वर्गातील प्रवचनकार होते. ज्यांना उत्तम जीवन म्हणजेच आनंदाने भरलेले समाधानी जीवन जगावे अशी खरी...
दर वर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत असून 'सडक सुरक्षा जीवन रक्षा' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कापूरबावडी माजीवडा ब्रिजच्या जवळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कापूरबावडी वाहतूक उपवि...