text
large_string
नारायणगाव-भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कार्य आणि त्यांची राजकीय कारकीदर लक्षात घ्...
सातारा - महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे-उडतारेदरम्यानचा सेवा रस्ता गत महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात खचला आहे. मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. बुधवारी रात्रीच्या यावेळी या सेवारस्त्याने निघालेली कार खचलेल्या रस्त्यात अडकून पडली. सुदैवाने ही कार पलटी झाली नाही, अन्यथा अनर्थ झाला ...
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की "भाजपासोबत सरकार नको, ही शिवसेनेची भूमिका फडणवीस सरकारच्या काळातलीच होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना मिळून सरकार स्थापन करावं, असा प्रस्ताव शिवसेनेचे वरीष्ठ नेते घेऊन आले ...
ठाणे : महाविकास आघाडातील (Maha vikas Aghadi) वरिष्ठ नेत्यांची महापालिका निवडणुकीस (Thane municipal corporation) एकत्रित सामोरे जाण्याची धारणा आहे; मात्र बुधवारी पार पडलेल्या ठाण्याच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते शानू पठाण (Shanu pathan) यांनी महापौरांच्या (Mayor) डायसवर येऊन थेट लोटांगण घातल्याने शिवसेनेच्या (Shiv...
जुन्या कपड्यांचा पुनर्वापर - Majha Paper\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / जुने कपडे, पुनर्वापर, लाईफस्टाईल / November 14, 2019 November 14, 2019\nशर्ट किंवा कुर्त्यापासून बनवा उशीचे कव्हर - वापराविना पडून असलेले शर्ट किंवा कुर्ते उशीच्या आकारात कापा. त्यापासून खोळ बनवता येईल. तसेच उशीच्या आकाराचे काप करून त्यात ...
इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयामार्फत शहरातील विविध ठिकाणी रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवसांत भाजी मंडईतील १६२ जणांच्या, तर शहरात इतर ठिकाणी १७० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तथापि त्यांच्यावर तातडीने पुढील उपचार केले जात नसल्याचे दिसून आले. वाळवा...
नाटो-NATO Information In Marathi\nनाटो-NATO Information In Marathi नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ही उत्तर अटलांटिक महासागराच्या सीमेवर असलेल्या 30 देशांची युती आहे.युतीमध्ये यू.एस., युरोपियन युनियनचे बहुतेक सदस्य, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि तुर्की यांचा समावेश आहे.या संस्थेची स्थापना का झाली आणि ती आज कशी का...
भारताचा 'अ' संघ यंदा इंग्लंडचा दौरा करून या दौऱ्यात भारतीय खेळाडू इंग्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज 'अ' संघांशी सामने खेळतील. दोन जून रोजी भारत 'अ' संघ इंग्लंडमध्ये दाखल होईल. यॉर्कशायरविरूध्द हेडिंग्लेला तसेच विंडिज 'अ' संघाबरोबर सरे कौंटीतील क्रायडॉन येथे भारत 'अ' संघ सामना खेळेल. स्कॉटलंड, नॉर्दम्प्टन, लिस्टर, वूस्टर,...
निया शर्माचा लेस्बियन किस होतोय व्हायरल, म्हणतेय- पुरुषाला किस करणे जास्त सोपे! या सीनवरून आणि एकंदरच या वेबसीरिजच्या अनुभवावर विचारलेल्या प्रश्नांना नियाने उत्तर दिली आहेत. या सीनमुळे आपल्या वेबसीरिजला फायदा झाल्याचे तिने म्हटले आहे. या सीनच्या चित्रीकरणावेळी मनात आलेल्या अनेक शंकाकुशंका तिने बोलून दाखवल्या. ती म्हण...
नवापूर । तालुक्यातील धुलीपाडा येथील फोरेस्ट विभागातील वन जंगलात मंगळवारी दुपारी 3 वाजता आग लागली. या आगीत सुमारे 60 हेक्टर जमिन वरील चारा झाडे पक्षी, ससे, आगीत होरपळून राख झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे वृत्त कळताच तहसिलदार प्रमोद वसावे, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम यांनी धुलीपाडा गावात तातडी...
IND vs AUS 1st T20I Highlights: मोहालीः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (australia) तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना भारताने (India) 4 गडी राखून गमावला आहे. केएल राहुल आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण गोलंदाजांनी आपल्या लौक...
पेशवे-गायकवाड तंटा मिटविण्यासाठी इंग्रजांची मध्यस्थी गायकवाडीत इंग्रजांचा पक्का पाय : इ. स. १८०२ मध्ये इग्रजांनी गायकवाडांस कडीच्या मल्हाररावाचा बंदोबस्त करण्यास मदत केली. त्याच वर्षी त्यांनी अरब लोकांस गायकवाडीतून काढून लाविले. यास्तव दोन हजार ब्रिटिश सैन्य व युरोपियन तोफखाना गायकवाडांनी तैनातीत ठेवून त्यांचा खर्च द्य...
Jio Phone 5G । रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर जिओच्या फोनमुळे सर्वसामान्यांनाही स्मार्टफोनच्या आवाक्यात आणलं आहे. त्याचबरोबर रिलायन्स जिओ लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लाँच करू शकते. विशेष म्हणजे यावेळी कंपनी ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. जिओने गेल्या वर्षी आपला पहिला स्मार्टफोन ल...
ठाणे : राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल दुपारी पालिसांनी अटक केली होती. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना महाड पोलिसांनी जामीनही मंजूर केला. यासर्व घडामोडीं दरम्यान राज्यभर राणेंविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आं...
औरंगाबाद- दुष्काळ स्थितीमुळे यावर्षी पीक विम्याचे संरक्षण घेण्यासाठी सर्वत्र झुंबड उडाल्याचे दिसून आले. २८ जून ते ३१ जुलैदरम्यान खरीप २०१५ राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील ११ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी सुमारे ८७ कोटी ४७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा उतरवल्याची प्राथमिक नो...
जळगाव :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले, त्यांची तपासणी कोणत्या डॉक्टरने केली? याची माहिती शिवसेनेचे (Shivsena)नेते गजानन मालपुरे यांनी माहिती अधिकारात मागितली. तर, या प्रमाणपत्रावर शंका व्यक्त करत याबाबत चौकशी करा, अशी मागणी अपंगांच्या काही संघटनांन...
ग्रेटा गार्बो तथा ग्रेटा लोव्हिस्टा गुस्टाफसन (१८ सप्टेंबर, इ.स. १९०५ःस्टॉकहोम, स्वीडन - १५ एप्रिल, इ.स. १९९०ःन्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही हॉलिवूडमधील १९२० आणि १९३०च्या दशकातील अभिनेत्री होती. हिने वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा गोस्टा बर्लिंग्स सागा या स्वीडिश चित्रपटात काम केले. १९२५-३० दरम्यान गार्बो हॉलिवूडमधील अने...
Palghar 9 Year Old Boy Drown: रिसॉर्ट मधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पालघरमधील ही घटना असून यामुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पालघरः नाताळच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला बाहेर पडलेल्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. रिसॉर्टला सुट्टी घालवण्यासा...
छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज आहेत. कोल्हापूरच्या राजघराण्याशी ते संबंधित आहेत. त्यांना समाजकारणाचीही आवड आहे. यातूनच त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. अनेक सामाजिक क्षेत्रात ते काम करत आहेत. एम. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या संभाजीराजे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे आहेत. छत्रपती...
पणजीः पोलिसांच्या यादीत असलेल्या कुख्यात गुंड पावलूच्या ताळगावातील घराजवळच त्यावार दुसऱ्या गटानं तलवारींनी हल्ला केला. पण पावलू घरामागच्या शेतातून पळ काढण्यात यशस्वी ठरला. त्याचा एक भाऊ या हल्ल्यात जखमी झाला. या प्रकरणी पावलूच्या भावाने पणजी पोलिसांत तक्रार दाखल केलीये. हे प्रकरण घडलंय. जूनला. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआ...
राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई : राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभ...
जळगाव : आगामी महानगरपालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी सदस्यता नोंदणी उपक्रम राबवला जाणार आहे. 25 जानेवारी रोजी रा. कॉ. पक्षाच्या या अभियानला सुरुवात केली जाणार आहे. तसेच वन बुथ टेन युथ ही संकल्पना देखील राबवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात सर्...
करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती. याच पार्टीतील करिना आणि करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. पण ब्रह्मास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीत...
उस्मानाबाद : कोरोना महामारीमुळं शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्गाद्वारे अभ्यास अशा उपक्रमांचा गेल्या सहा महिन्यातील परिणाम जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चाचणी घेणार आहे. यंदा चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा असे वर्षाचे वेळापत्रक अंमलात आलेले नाही. वर्गातील अध्यापनाप्रमाणे नाहीतर ऑन...
मुंबई । राज्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात चर्चेत आलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांना NIA च्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता २५ मार्चपर्यंत NIA कडून सचिन वाझे यांनी कसून चौकशी...
आदित्य रॉय-कपूरसोबत श्रद्धा कपूरने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि दोघांची जोडी हिट झाली. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. त्याची पुष्टीच आता मिळाली आहे. आदित्य रॉय-कपूरसोबत श्रद्धा कपूरने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि दोघांची जोडी हिट झाली. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही रंगू लागल्...
आजकाल प्रेम आणि नात्यामध्ये वयातील अंतराचा (Age Difference) जास्त फरक पडत नाही. अनेकवेळा आपण पती-पत्नी किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमध्ये 10 हून अधिक वर्षांचे अंतर पाहिले आहे. विशेषतः परदेशात तर अशी अनेक नाती सापडतील. सध्या असेच एक नाते सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. 44 वर्षीय ज्युलीने (Julie) आपल्या 15 वर्षांनी लहान असण...
दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा लाठीमार केला असा आरोप करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल करण्यात आली आहेत. तसेच या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही या याचिकांमध्ये करण्या...
No. 124] पो छ २९ राजव श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेक्सी विनंती सेवक गोपाळ गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. ता. छ २१ रजबूपार्वती स्वामीचे रुपावलोकने मेवकाचे वर्तमान येथास्थित असे विशेष. स्वामीनी कृपापत्र पाठविले ते उतम समई प्रविष्ट होऊन परम समाधान जाले. इकडील वर्तमान विढनूरचा गुता उरकून तुंगभद्रातीरी ...
सॅमसंग गॅलेक्सी Galaxy S20 सीरिजचा पहिला सेल आज ७ मार्चपासून सुरू झाला आहे. या स्मार्टफोनची प्री बुकिंग कंपनीने लाँचिंगवेळी सुरू केली होती. ज्या युजर्संनी या फोनची बुकिंग केली आहे. त्या युजर्संना ६ मार्चपासून डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. गॅलेक्सी S20 आणि S20+ या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला...
IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण! आयपीएल 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँग...
मूर्तिजापूर : तालुक्यातील घुंगशी येथील गोपाल सौंदळे यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा निमित्ताने आप्त नातेवाईकांसाठी २८ फेब्रुवारी रोजी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याच जेवणातून १५० विषबाधा झाल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. सोमवारी रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रमात जेवण घेतल्या नंतर झोपी जेवण गेलेल्या लोक...
नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण बारावीच्या परीक्षेबाबत काहीही स्पष्ट केले नाही. २३ एप्रिलपासून बारावीच्या परीक्षा होणार होत्या. पण कोरोनाचे संक्रमण अचानक वाढल्याने त्याही पुढे ढकलाव्या लागल्या. सद्या बारावीच्या परीक्षेवरून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा होई...
समाजवादी पक्ष (Samajwadi Party )हा भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय आहे. त्याची स्थापना ४ ऑक्टोबर १९९२ रोजी झाली. समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि संरक्षक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) हे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री राहिले आहेत. उत...
साहित्य संमेलनानिमित्ताने छत्रपती संभाजीराजे ग्रंथनगरीत आयोजित ग्रंथप्रदर्शनाला विविध स्तरांमधील वाचकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत या प्रदर्शनात सुमारे एक ते दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. म. टा. प्रतिनिधी, संत सोपानदेव साहित्यनगरी, सासवड साहित्य संमेलनानिमित्ताने छत्...
नाणार' प्रकल्प आता रोह्यात रोहा, अलिबाग आणि मुरूड तालुक्यांतील किनारपट्टीवर तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ही वसाहत सिडकोच्या माध्यमातून उभारली जाणार असल्याची वृत्त येत असतानाचा रायगडचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यानी रायगड जिल्हयामध्ये एकही रासायनीक प्रकल्प नको या मुद्दावर आपण ठाम...
सिंधुदुर्ग, 19 जूनः शिवसेना भवननंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर झालेला वाद थंड होत नाही. तोवर पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाज...
अमृता सुलतान खिलजीची दिवानी! />जिने आपल्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांना घायाळ केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचे आज असंख्य फॅन आहेत. मात्र ती पण कोणाची ना कोणाची फॅन असणारच हे जाणून घेण्याचीही रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळते. तर ती एका कलाकाराची मोठी चाहती आहे. हे तिच्या सोशल मीडिया ...
पुणे, ता. १३ : भाजप किसान मोर्चा, एग्रीकॉस किसान मोर्चाच्यावतीने देशव्यापी भरडधान्य आहार जनजागृती मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेची सुरवात पुणे शहरातून करण्यात आली. शहरातील नागरिकांना भरडधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि भरडधान्याचे आरोग्यासाठीचे फायदे, आहारातील महत्त्व, उपलब्धता, ओळख आणि शेतकऱ्यांसाठीही भरडधान्य क...
अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील जुना पूल काल रात्री ८ वाजता कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली. वाहनांमधळी 6 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र यात एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मुरुडकडे जाणारा वाहतूक पर्यायी मार्...
संघाचे 'हमारे दो'! । Saamana (सामना) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. मुरादाबाद दौऱयावर असलेल्या सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी 'हम दो हमारे दो' अशी यापुढील संघाची भूमिका असल्याचे संकेत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देश...
नवी दिल्ली : देशभरातील अनेक तुरुंगातील कैद्यांची कोरोनाच्या काळात चांदी झाली होती. तुरुंगात गर्दी होऊ नये आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आले होते. 6,740 कैद्यांची अशा प्रकारे दिल्लीच्या तिहार जेलमधूनही इमर्जन्सी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. आता त्यापैकी 3,4...
पुणे - पिंपरी-चिंचवड परिसराचा पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात केवळ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. 'एल् निनो' प्रवाहाच्या प्रभावामुळे वर्ष २०२३-२४ च्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जून २०२४ पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा आराखडा सिद्ध करण्या...
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या निधीतून शहरात गुजरातच्या धर्तीवर 'ग्लो गार्डन' विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे. त्यासाठी तीन एकर जागेची गरज असून, जमीन उपलब्ध झाल्यास सुमारे तीन हजार नागरिकांची करमणूक होईल, असे उद्यान विकसित केले जाणार आहे. 'कलाग्राम' भागात यासाठी जागेची मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री ड...
सम्राट अशोक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय पंढरपूर औरंगाबाद येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती (दि9)रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पी एम पाटील हे होते . तर प्रमुख पाहुण्या श्रीमती रायकर व श्रीमती सांगवीकर मॅडम या होत्या. कार्यक्रमाचे वक्ते मा. सुधीर शेषवरे सर होते. त्यांनी सम्राट अशोक य...
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या वस्तीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सिमेंटचा रस्ता, बांधकाम, पिण्याचे पाणी, गटारे आणि समाजभवन बांधण्याचे शासनाचे धोरण आहे. भंडारा : दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या वस्तीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सिमेंटचा रस्ता, बांधकाम, पिण्याचे पाणी, गटारे आणि समाजभवन बांधण्य...
दरम्यान करिश्मा पूर्वीपेक्षा आता पारंपरिक कपडे जास्त प्रमाणात परिधान करत असल्याचं दिसतंय. पण तिच्या आउटफिट्समध्ये काही-न्-काही हटके प्रयोग असतातच. सोनम कपूरच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीमध्येही करिश्मा सुंदर अवतारात पोहोचली होती, पाहुया फोटो. . . (फोटो सौजन्य - करिश्मा कपूर इंस्टाग्राम/इंडिया टाइम्स) (नणंदेच्या लग्नात मला...
हॅलो बॉलीवूड । दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हाऊसफुल 4 रिलीज झाला. बॉलिवूडसाठी दिवाळी व इतर महत्वाचे सण खूप शुभ मानले जातात. हाऊसफुल चित्रपट सिरीज नेहमीच हिट ठरली असून चित्रपटाचा चौथा सिक्वेलही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. पहिल्या तीन हाऊसफुल चित्रपटांच्या तुलनेत मात्र ह्या चित्रपटामधील कहाणी ही जरा वेगळी ...
गर्भपात गोळ्यांची बेकायदा विक्री करणा-या राज्यातील १,४५३ होलसेल आणि किरकोळ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५९० विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नोटिसा पाठविण्याची कारवाई केली आहे. - १४५३ विक्रेत्यांची तपासणी- आठ विक्रेत्यांविरोधात पोलिसांत गुन्हेम. टा. प्रतिनिधी, पुणेगर्भपात गोळ्यांची बे...
लिहावंच एकदा "प्रेमपत्र"... (व्हॅलेंटाईन डे स्पेशल😍) जमलीच तर स्वतःची नाहीतर बिनधास्त चोरलेली एखादी सुंदर कविता किंवा चारोळी लिहावी आणि एखाद्या सुरेख पाकिटात अत्तर शिंपडावं आणि बंद करून पाठवून द्यावं, खरंच प्रत्येकाने एकदातरी एखादेतरी प्रेमपत्र लिहावं. मग अगदी स्वतःच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला ! कदाचित वेडेपणा...
मुंबईः खाजगी हॉटेलचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट रोखण्यासाठी एसटी महामंडळाने '30 रुपयांत चहा-नाश्ता' ही योजना आणली आहे. लांबच्या मार्गावरील सध्या 22 अधिकृत थांब्यांवर ही सेवा सुरु केली आहे. '30 रुपयांत चहा-नाश्ता' ही योजना ऑगस्ट महिन्यातच सुरु करण्यात आली. मात्र प्रवाशांना याची माहिती नसल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर ...
नोकियाचा 3310 हा फोन पुन्हा बाजारात येत आहे. दमदार बॅटरी बॅकअपसाठी प्रसिद्ध असलेला हा फोन 4 हजार रुपयांमध्ये रिलाँच केला जाऊ शकतो अशी माहिती आहे. 17 वर्षांपूर्वी हा फोन 2 हजार रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनचा बॅटरी बॅकअप चांगला आहे. त्यामुळे युझर्सना हा फोन सेकंडरी फोन म्हणून वापरता यावा, यासाठी कंपनीने हा ...
आशियाई क्रीडा स्पर्धेतील गतविजेत्या राही सरनोबतने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना ६४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई केली. नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७...
आज महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी. आजही मराठीत पु.ल.च बेस्टसेलर लेखक आहेत. सर्वात लोकप्रिय स्टँड अप आहेत. आजची तरुण पिढीही त्यांना मिस करतेय. म्हणून जो आपल्या चेहऱ्यावर निर्मळ, निखळ हसू आणतो तो खूप ग्रेट असतो आपल्यासाठी. चार्ली, लॉरेल अँड हार्डी, हल्ली मिस्टर बिन हे सगळे आम्हाला खूप ख...
नवी दिल्ली । लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठेवला होता. दरम्यान, कार्यकारिणीच्या सदस्यांकडून जरी हा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधी मात्र आपल्या राजीनाम्याच्या निर्...
उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - घरकाम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सेवानिवृत्त बॅंक अधिकारी भीमराव दाणी (वय-६८) यांच्या परिवारातील मंडळी बाहेरगावी गेल्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास २३ वर्षीय विवाहित मोलक...
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू के.एल.राहुल दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे. Published on : Athiya- Rahul Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) आनंदाचे वातावरण आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रत्येक कलाकारांची जोडी आपल्या चाहत्यांना 'गु...
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये शनिवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ केलेल्या कारवाईत ३ घुसखोर ठार झाले. त्यांच्याकडून १८० कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सांबा सेक्टमधील भारत-पाक दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषाव...
पा. रंजितचा 'नक्षत्रम नगरगिरदू' हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या 'काला'नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आ...
नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील १२ नागरिकांपैकी १ नागरिक एकदा तरी बाधित झाल्याची अधिकृत नोंद आहे. तर कोरोनाचा पहिला बळी नाशिक जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० या दिवशी गेला. तेव्हापासून आतापर्...
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhgat Singh Koshyari) यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे (NCP leader Rupali Patil-Thombare) यांनी राज्यपाल यांचा चांगलाच समाचार घेतलाआहे. मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसे गेली तर मुंबईत काय उरेल? असं वादग्रस्त वक्तव्य...
Chokeberry एक सजावटीच्या झुडूप आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थ आणि पेयांमध्ये स्वयंपाक करताना खूप स्वादिष्ट फळे आहेत. उदरांची रचना शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असणा-या अनेक विविध घटक समाविष्ट करते. काळ्या रंगाच्या पिठ्यापासून द्राक्षारसासाठी उपयुक्त आहे की नाही हे पाहण्यास अनेक लोक उत्सुक आहेत, कारण हे पेय त्याच्य...
Bollywood Debut: रवीना टंडनची मुलगी राशा आणि अजय देवगणचा भाचा अमन देवगण लवकरच केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात अजय देवगणही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. केदारनाथ या चित्रपटातून सारा अली खानने पदार्पण केले होते. दरम्यान, राशा आणि अमान या जोड...
निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगावात सत्तांत्तर । पुढारी\tTop\nहोमपेज › Ahamadnagar › निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगावात सत्तांत्तर\nPublished On: Dec 28 2017 2:00AM । Last Updated: Dec 28 2017 2:00AM\nसहा ग्रामपंचायतींच्या निकालाने नगर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहेत. निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगाव सिध्दी येथील सत्ता...
लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या प्रवासी मजुरांना दिलासा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी काही निर्देश जारी केले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंपाकघर उघडण्यास सांगितले आहे जेणेकरुन मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना दोनवेळचे जेवण मिळेल. कोर्टाने सांगितल...
दिलीप संघवी (१ ऑक्टोबर, १९५५ःअमरेली, गुजरात, भारत - ) हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी सन फार्मास्युटिकल्स कंपनीची स्थापना केली आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. इंडिया टुडे नियतकालिकाने त्यांना २०१७ मध्ये भारतातील सर्वात शक्तिशा...
'जाणत्या राजा'ने दिला 'कानमंत्र': अन् 'पुनश्च हरिओम'चा नारा देत सुरू झाला राज्यकारभार! सध्या श्रावण हिरवी शाल पांघरून आलाय. हा सणांचा पवित्र महिना. त्यात वसा घेतला जातो, व्रत-वैकल्ये पाळतात. सणा-वारांच्या कहाण्या पारंपरिकरित्या ऐकवल्या जातात. अशीच एक कहाणी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ऐका जनताजनार्दन देवा तुमची (कर्म)कह...
मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या एड. गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात घोषणा दिल्या. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या तीव्र आंदोलनानंतर ...
कसे तलावातील साठी क्वार्ट्ज वाळू फिल्टर निवडण्यासाठी? सध्या वेळी, पोहण्याचे तलाव साठी क्वार्ट्ज वाळू फिल्टर अनेक प्रकार वापरले. हे लक्षात घेतले पाहिजे कृत्रिम आणि नैसर्गिक, या सामग्रीचा यशस्वीरित्या निर्देशीत साधन एकत्र आहे. आपण फिल्टरची निवडा तेव्हा पूल साठी क्वार्ट्ज वाळू गुणवत्ता लक्ष देणे आवश्यक आहे. आपण पाणी दूषि...
उदरनिर्वाहासाठी तो स्वतः भाजी विकत असून त्यातुन दोन पैसे कमावत आहे. कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिका आणि सिनेमाचं शूटिंग बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. मात्र असेही काही क...
शनिवार-रविवार जोडून सुट्टी असल्यामुळं लोक सुट्टी प्लान करुन फिरायला जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) सातारा बाजूकडं जाताना आज सकाळपासून 'चक्का जाम'चा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. घाटामध्ये रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असल्यामु...
नवी दिल्ली -परकीय चलनातील अस्थिरता आणि जागतिक पातळीवर कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे भारतातील बहुतांश कार कंपन्यांनी अगोदरच दरवाढ जाहीर केली आहे. त्यात आता इसुझु मोटर्स इंडिया या कंपनीची ही भर पडली आहे. शनिवारी इसुझु मोटर्स इंडियाने आपल्या काही उत्पादनांच्या दरात दोन टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयाची अंमलब...
अनेक ऑफिसेस किंवा हॉटेल्स अशी असतात जिथे सतत गोंगाट असतो. किंवा रेल्वे स्टेशन्सवरच्या उद्घोषणेचं उदाहरण घ्या. स्टेशनवरच्या कोलाहलात मोठ्याने सुरू असलेल्या उद्घोषणाही नीट ऐकू येत नाहीत. तुमच्या कदाचित चटकन लक्षात येत नसेल मात्र हा मोठा आवाज तुम्हाला प्रचंड अस्वस्थ करत असतो. याउलट, वॉशिंग्टन डीसीतल्या नॅशनल आर्ट गॅलरीमध...
रियमली स्मार्टफोन लवकरच एक जबरदस्त टेक्नोलॉजी घेवून येत आहे. १२५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टचा स्मार्टफोन कंपनी लाँच करू शकते. यामुळे या फोनला अवघ्या काही मिनिटात चार्ज केले जावू शकते. जाणून घ्या डिटेल्स. नवी दिल्लीः गेल्या वर्षी जुलै महिन्यात रियलमी अधिकृत पणे आपली 125W UltraDart फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीची घोषणा केली ...
फेब्रुवारी २०१९नंतर कोरोना व्हायरसमुळे टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. आता जवळपास ९ महिन्यांनी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यासाठी रवाना होत आहे. आयपीएलमध्ये आपल्या यॉर्करने सर्वांना अचंबित करणाऱ्या टी नटराजनचा ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला. सुरुवातीला वरुण चक्रवर्थीला संधी मिळाली होती, ...
अवैध बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात सोनू सूदने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील शक्ती सागर या सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामु...
फलटण : फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनानुसार आमिरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शि...
मुंबई - करोना विषाणूची साथ आपल्या जीवनात बऱ्याच काळापासून आहे, ज्यामुळे जवळजवळ प्रत्येकाच्याच जीवनावर परिणाम झाला आहे. करोनामुळे बराच काळ लॉकडाऊन करण्यात आले होते. आणि आताही या विषाणूमुळे अनेक लोक आपापल्या घरातून कार्यालय किंवा इतर काम करत आहेत. या व्यतिरिक्त, लहान मुले बऱ्याच काळापासून घरी आहेत आणि सद्य परिस्थितीत,...
कोन्हेरी येथील शारदा विद्यालयाचे प्राचार्य सुधीर पुळजे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आ. दत्तात्रय सावंत सुभाष माने, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड, कोमल ढोबळे,भिमराव जरग,समाधान शेळके,राजकुमार पाटील,सुधीर गायकवाड,रामचंद्र शेळके,सुभाष पाटील,प्राचार्य चिदानंद...
ArticleFeb 21, 2019\nसद्गुरुः जशी तुमची सजगता आवश्यक तेवढी तीक्ष्ण किंवा धारदार बनते, तेंव्हा सर्वप्रथम अगदी सहजतेने होणारी जाणीव म्हणजे तुमचा श्वास. श्वासोच्छवास ही शरीरात अविरत आणि सतत सुरू असणारी यांत्रिक क्रिया असल्याने, बहुतांश व्यक्ती त्याप्रती सजग न राहताच कसे जगतात हे एक मोठे आश्चर्यच आहे. परंतु एकदा का श्वासाच...
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक जण बाजारांमध्ये खरेदी करणे टाळत आहेत. मुंबई : देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक जण बाजारांमध्ये खरेदी करणे टाळत आहेत. दरवर्षी सजावटीच्या वस्तू, मखर, कंठ्या...
हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा 16 मार्च ते 22 मार्च या आठवड्यातील तुमचे भविष्य. अहो विचार काय करत बसलाय आता कामाला लागा नाही तर वेळ निघून जाईल कामाला यश देणारा सप्ताह आहे. कामातून भाग्य मिळवून देणारा सप्ताह व ह्या सोबत आर्थिक लाभ मिळवून देणारा. नोकरी हवी प्रयत्न करा. छ...
तैमूर, अबरामला विसरा या मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलीचे फोटो एकदा पाहा! नुकताच डॉटर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच डॉटर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता श्रेयस तळपदेने ही आपल्या...
काबूल- अफगणिस्तान सर्वोच्च न्यायालयाजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 जण ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजिबुल्लाह दानिश यांनी सांगितले की, शहरामध्ये असलेल्या अफगणिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ आज दुपारी आत्मघाती दहशतवाद्यांनी मोटारीद्वारे बॉम्बस्फोट घडवून...
न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. लंडन, दि. 13 - भारतीय बँकांचे 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयच्या न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. तसेच मीडियाला उ...
fort, sindhudurgnews सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवणमधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला. मालवण : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. अंबानीच्या घराजवळील स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सहभागी संशयित मर्सिडीज कार देखील जप्त ...
भारतीय जनता पार्टी निवडणूक २०२० ते २०२३ सालाकरिता तालुका कार्यकारणी साठी बैठक पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश चित्ते आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी बैठक च्या सुरवातीला निवडणूक अधिकारी प्रका...
भूपेन हजारिका यांचे कुटुंबीय 'भारतरत्न' स्वीकारणार नाहीत\nनागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचा निषेध\nकोलकाता : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ दिवंगत शास्त्रीय गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला 'भारतरत्न' पुरस्कार न स्वीकारण्याचा इशारा त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. मूळचे आसामचे असलेले हजारिका यांना यंदाच्या प्...
गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदविताना केरळला दशकभरानंतर नमविण्याची किमया साधली. त्यांनी सामना 7 विकेट राखून जिंकला. पदार्पणात पहिल्या डावात शतक आणि नंतर फिरक घेणाऱ्या खेळपट्टीवर 155 धावांचे लक्ष्य गाठताना प्रेक्षणीय नाबाद अर्धशतक केलेला ईशान गडेकर सामन्याचा मानकरी ठरला. केरळमध...
Raju Shetti Criticize Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बदल्यांबाबत राजू शेट्टींनी मुक्ताफळे उधळू नयेत असे विधान केले. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्त्युत्तर दिले. राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारमधील वजनदार मंत्री आहेत. खरोखरच विखे पाट...
परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार! - Jagrukta\nपरभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. राज्यासहीत जिल्ह्यात देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्...
Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look । 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगनचं फर्स्ट लूक झालं प्रदर्शित, व्हायरल झाली त्याची मनोरंजक नवाबी स्टाईल ! Avneet Kaur New Car । अवघ्या 20 वर्षाच्या अवनीत कौरनं खरेदी केली चक्क 2 कोटीची Range Rover ! Priyanka Chopra Viral Photo । आई झाल्यानंतर प्रियंका चोप्रानं शेअर के...
मुंबई : राज्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सर्व यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांत एका अंगणवाडी सेविकेने खारीचा वाटा उचलला आहे. जामखेड तालुक्यातील जवळा येथील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपल्या एक महिन्याचा पगार जामखेडमधील डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी म्हणून दि...
चौथी अखिल भारतीय व्याघ्र व मांसभक्षी प्राणी गणना आज (दि. 20) पासून सुरू होत आहे. त्यामुळे दाजीपूर येथील अभयारण्य गुरुवार (दि. 25) पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार आहे. जगातील अतिसंवेदनशील संरक्षित वनांपैकी एक असणार्या पश्चिम घाटात दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे. विपूल जैवविविधता असलेले हे अभयारण्य 351चौरस कि...
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलू लागले आहेत तर नरेंद्र मोदी गप्प झाले आहेत. सध्या नरेंद्र मोदी यांचा मनमोहन झाल्याचा हा पुरावा आहे अशी बोचरी टीका करण्यात आली आहे. म...
सेवाकार्याला नवा परिमाण आणि परिभाषा 'केशवस्मृती प्रतिष्ठान' आणि त्यांच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी दिली आहे. मी लहान असतानाची गोष्ट. माझी एक आजी. तिला वाकून नमस्कार केली की ती आशीवार्द द्यायची- "म्हातारा हो! ". आणि मी रडून गोंधळ करायचो, मला म्हातारा व्हायला सांगते म्हणून. मग घरातले सगळे हसायचे. 'म्हातारा हो' चा अर्थ...
स्मरण समतावादी डॉ. राममनोहर लोहियांचे! - डॉ. रविनंद होवाळ (प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान) महाराष्ट्रात तरी फार मोठी चर्चा होताना दिसत नाही. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने ती आपल्याला करता येईल. बर्लिनच्या हुम्बोल्ट विद्यापीठातून मीठ आणि सत्याग्रह या विषयावरील डॉक्टरेट मिळवणाऱ्या लोहियांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान व...
युरोपात जवळ जवळ सगळ्याच देशांना दुसऱ्या लॉकडाऊनची चाहूल लागली आहे. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये तशी जाहीर घोषणाही झाली आहे. तर इंग्लंडमध्ये जिल्हा आणि राज्यनिहाय लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. फ्रान्समध्ये मंगळवारी एकाच दिवसांत 33 हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर लगेचच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ल...
नवी दिल्ली : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे अशी भूमिका मांडणारी केंद्र सरकारने केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सामाजिक आणि आर्थिकृदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारलाच आहेत ही आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयाने कायम...