text
large_string
अजय आणि विजय दोघेही एकाच कंपनीत मॅनेजर आहेत. दोघांचा पगारही एकसारखाच आहे, मात्र इन हॅण्ड सॅलरीमध्ये मोठी तफावत का आहे ? वारसाहक्कात संपत्तीसोबतच कर्जही मिळतं. मात्र, आपण कर्जाकडे लक्ष देत नाही. माहिती मिळते तोपर्यंत कर्जाची रक्कम वाढलेली असते.
हास्य हे प्रभावी औषध आहे. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. आत्मविश्वास वाढतो. शरीरातील ऊर्जेच्या स्तरावरही प्रभाव पाडतो. ऊर्जेमुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे कामात गुणवत्ता वाढवता येते. आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही. हसतमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते. नागपूर : हास्य हे प्रभावी औषध आहे. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. आत्मविश्वास वाढतो. शरीरातील ऊर्जेच्या स्तरावरही प्रभाव पाडतो. ऊर्जेमुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे कामात गुणवत्ता वाढवता येते. आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही. हसतमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते. स्पर्धेच्या युगात माणूस हसणे विसरत चालला आहे. इंटरनेटच्या आभासीमय दुनियेमुळे आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला आहे. ताणतणावात जगणे वाढले आहे. जीवनशैली बदल्याने नकारात्मक विचार, भावना वाढल्या आहेत. नैराश्याच्या गर्तेत अडकणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. हे टाळण्यासाठी साधा सरळ उपाय म्हणजे खळखळून हसणे. हसत राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात, वागणे सकारात्मक राहते. हसणारे नेहमी उत्साही राहतात. यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हसण्याचे बरेच फायदे आहेत. हसल्यामुळे आयुष्य वाढते. आरोग्याच्या दृष्टीने हसणे किती उपयोगी आहे हे वैद्ययकीय शास्त्रानेदेखील मान्य केले आहे. म्हणूनच डॉक्टरही हसत राहण्याचा, आनंदी राहण्याचा सल्ला देतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी, आनंद हाच त्यामागील भाव असतो. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी म्हणाले, धकाधकीच्या जीवनात मित्र व परिवारांमध्येही खदखदून हसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, नकारात्मकतेमध्ये वाढ होऊन ताणतणावात जगणे वाढले आहे. त्याचा परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहे. हे टाळण्यासाठी साधा सरळ उपाय म्हणजे म्हणजे हसत राहा. कृत्रिम हसत राहिले तरी चालेल, परंतु हसत राहणे आवश्यक आहे. डॉ. जोशी म्हणाले, मानसोपचारामध्ये 'अँगल ऑफ माऊथ' म्हणजे ओठाचे दोन टोक जर खाली असेल तर नकारात्मक विचार करणारा, अशांत असलेला मानला जातो. परंतु जर ओठांचे हेच दोन टोक वर असेल तर मनात शांतता, आनंद, प्रसन्न व सकारात्मक विचारा करणारा असल्याचे मानले जाते. यामुळे मेंदूमधील 'हॅपीनेस सेंटर अॅक्टिव्ह' होते. याचे फायदे मनावर व शरीरावर होतात. - खळखळून हसल्याने आयुष्यातील दुःखाचे विस्मरण होते. - हसल्याने जीवन निरोगी राहते, आत्मविश्वास वाढतो. - शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो, कामात गुणवत्ता वाढवता येते. - आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही. - हृदयाचे आरोग्य हेल्दी राहते. - हसत राहिल्याने चांगले विचार येतात, वागणे सकारात्मक राहते. - हसल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. चेहरा टवटवीत दिसतो. - आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकारक्षमता सक्षम होते.
नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामचंद्रांविषयी एक पोस्ट व्हायरल झाली असून 'फेसबुक'वर शेअर झालेल्या पोस्टनुसार, दसर्यानंतर २१ दिवसांनी देशात मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जाते. या मागे खास कारणही आहे. ते म्हणजे, दसर्याच्या दिवशी रावणाचा वध केल्यानंतर श्रीराम श्रीलंकेहून अयोध्येसाठी पायी निघाले होते. २५८६ किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी २१ दिवसांत पूर्ण केला होता. या पोस्टचे वैशिष्ट्य म्हणजे, फेसबूकवरील पोस्टसोबत 'गूगल मॅप'चा एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. श्रीलंका ते अयोध्येतील अंतर २५८६ किलोमीटर आहे. हे अंतर पायी चालून पार करायचे झाल्यास २१ दिवस (५१४ तास) लागतात, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, दररोज जवळपास १२३ किलोमीटर पायी चालावे लागेल. तेही न थांबता. एक तासांत पाच किलोमीटर चालावे लागेल. ही पोस्ट फेसबुक व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपवरही मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे. 'ट्विटर'वर देखील 'रामअयोध्यारोडट्रिप' नावाने हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगने अनेक यूजर्स रिट्वीट करत आहे. बहुतांश यूजर्सनी या पोस्टचे समर्थन केले आहे तर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. श्रीराम पायी नव्हे, पुष्पक विमानाने लंकेहून अयोध्येत परतले होते. 'गूगल'वर हा रुट (मार्ग) श्रीलंकेतील डमबुल्लामधील चांदनाहून सुरु होतो. किंबिसा, गलकुलामा, मिहिंटाले, मेडवाछिया व्हाया तलाईमन्नारपर्यंत पोहोचतो. समुद्रमार्गे हा मार्ग रामेश्वरम् पोहोचतो. रामेश्वरम् हून कुंबोकोणम, कांचीपुरम, तिरूपती, नेल्लोर, ओंगले, सूर्यापेट पोहोचतो. महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूरमार्गे मध्यप्रदेशातील सिवनी, जबलपूर, कटणी, रीवा. नंतर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, सारोन, प्रतापगड, सुल्तानपूर, रेहटमार्गे अयोध्येत पोहोचतो. प्रश्न-उत्तराची वेबसाइट 'क्योरा'वर देखील या मुद्द्यावर २०१५ पासून चर्चा सुरु आहे. 'दसर्यानंतर श्रीराम किती दिवसांत अयोध्यात परतले होते? हा प्रश्न 'क्योरा'वर विचारण्यात आला होता. यावर अनेक लोकांनी आपापली मते नोंदवली आहेत. काहींनी फोटो तर काहींनी ग्राफिक्सच्या माध्यमातून टिप्पणी दिली आहे. काही लोकांनी तर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी दुसर्या वेबसाइट्सच्या लिंक देखील शेअर केल्या आहेत. आतापर्यंत ४१ हजार ४०० हून जास्त लोकांनी हे पेज पाहिले आहेत.
पुणे, 18 मार्च : पुण्यातील कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे कारण पुण्यात आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. एका महिला रुग्णाला कोरोना झाला असल्याची माहिती पुण्याचे जिल्हा दंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यात एकूण 18 तर महाराष्ट्रात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या रुग्ण महिलेचा फ्रान्स आणि नेदरलँड असा प्रवासाचा इतिहास आहे. गेल्या काही दिवसांत त्रास सुरू झाल्याने 15 तारखेलाा चाचण्या केल्या असता त्या पॉझिटिव्ह आल्या. रुग्णावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात काल मुंबई आणि पिंपरी चिंचवड इथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यात आज पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना देण्यात येत आहे.
मुंबई - रिअल इस्टेट क्षेत्रावरील प्रीमियम 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे रिऍल्टी क्षेत्र लवकर पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल असे विकासकांनी सांगितले. त्यामुळे आहे ते प्रकल्प लवकर पूर्ण होतील. नव्या प्रकल्पाचा पुर्ततेचा कालावधी कमी होईल. तसेच या क्षेत्रात नवे भांडवल येण्यास मदत होईल, असे विकसकांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने या अगोदरच मर्यादित काळासाठी घरावरील मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घरांची विक्री वाढली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे विकसकाबरोबरच केंद्र सरकारने कौतुक केले आहे. असे असतानाच सरकारने एक वर्षासाठी प्रीमियम मध्ये 50 टक्के घट करण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी आणि व्यावसायिक बांधकामातील विविध विस्तारीत बाबींवर सरकारकडून प्रीमियम आकारला जातो. मुंबईमध्ये जिना, लीफ्ट, लॉबी अशा प्रकारच्या 22 बाबीवर प्रीमियम घेतला जातो. हा प्रीमियम एक वर्षासाठी निम्मा होणार आहे. महाराष्ट्रातील प्रीमियमची संख्या इतर शहरांपेक्षा जास्त आहे. बंगलोरमध्ये दहा बाबीवर, दिल्लीमध्ये पाच, हैदराबाद मध्ये तीन बाबींवर प्रीमियम घेतला जातो. रिअल इस्टेट क्षेत्राच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी काय करता येईल या संदर्भात दीपक पारेख समिती नेमण्यात आली होती. समितीने मुद्रांक शुल्क कमी करण्याबरोबरच प्रीमियम कमी करण्याची गरज व्यक्त केली होती. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय नव्या आणि जुन्या प्रकल्पासाठी लागू राहणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियम मध्ये 50 टक्के सवलत मिळणार हा अत्यंत स्वागतार्ह निर्णय आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीतून जात असलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळेल. आर्थिक अडचणींमुळे गेल्या 2 वर्षात अपेक्षित प्रमाणात नवीन बांधकाम प्रकल्प सुरू झाले नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे नवीन प्रकल्प सुरू करण्याचा बांधकाम व्यावसायिक विचार करतील. अर्थात या निर्णयाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्याचे सखोल विश्लेषण करता येईल.
नवी दिल्ली : भारतात पहिल्या दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचार्यांना कोविड-19 च्या लसीचा डोस देण्यासह आजपासून (16 जानेवारी) जगातील सर्वात मोठे लसीकरण (Corona Vaccination) अभियान सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी साडेदहा वाजता देशात पहिल्या टप्प्यातील कोविड-19 लसीकरण (Corona Vaccination) अभियानाची सुरूवात करतील. संपूर्ण देशात एकावेळी लसीकरण अभियानाची सुरुवात होईल आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यासाठी एकुण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आली आहेत. राजस्थानमध्ये जयपुरच्या सवाई मान सिंह मेडिकल कॉलेजचे प्राचार्य सुधीर भंडारी यांना सर्वप्रथम लसीचा डोस दिला जाईल, तर मध्यप्रदेशमध्ये एका हॉस्पीटलच्या सुरक्षा रक्षकाला आणि एका सहायकासह अन्य लोकांना सर्वप्रथम लस दिली जाईल. मोदींनी म्हटले आहे की, देश कोरोना व्हायरस महामारीच्या विरोधात शनिवारी निर्णायक टप्प्यात प्रवेश करेल. त्यांनी ट्विट केले, 16 जानेवारीला देशस्तरावर कोविड-19 लसीकरणाला सुरुवात होईल. शनिवारी साडेदहा वाजता अभियानाचा शुभारंभ होईल. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, हे जगातील सर्वात मोठे लसीकरण असेल, ज्यामध्ये संपूर्ण देश सहभागी केला जाईल आणि लोकसहभागच्या सिद्धांतावर याच्या सुरुवातीसाठी सर्व तयारी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्माण भवन परिसरात बनवण्यात आलेल्या विशेष कोविड-19 नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला.
धर्म आणि शास्त्र णकोणत्या बाबतींत व किती चालू द्यावी ह्याबद्दलही फार बंधनें केली आहेत. तात्पर्य, सरकारी अधिकार एका व्यक्तीच्या हातांतून निघून सध्यां बहुजनसमा जाच्या हातीं गेला आहे; एवढेंच नव्हे, तर त्या अ धिकाराच्या मर्यादाहि फार आकुंचित झाल्या आहेत. पुनः इंग्रज लोकांचेंच उदाहरण घेऊं. आतां हें खरें की, इंग्लंड देशांत सरकारच्या अधिकारास अमुक अ मुक मर्यादा असाव्या अशाबद्दल विशिष्ट कायदे के लेले कोठे दिसत नाहींत; पण प्रत्यक्ष व्यवहाराकडे पाहूतां, तशा कांहीं मर्यादा आढळून येतात; व त्या सर्वजण मुकाट्याने मान्य करितात. प्राचीन काळचे राजे पाहिजे तितक्या माणसांचे आपल्या देवांस बळी देत, व याप्रमाणे प्रजेच्या जीवितावरही आपला हक्क आहे असे दाखवीत. आतां, पार्लमेंटास तसा अधिकार नाहीं असे ठरविण्यास इंग्लंडांत मुद्दाम कायदा पसार केलेला आहे अशी गोष्ट नाहीं. पण असा अधिकार गाजविण्याचे पार्लमेंट सभेनें जर कर्धी मनांत आणिलें, तर त्याचा परिणाम एवढाच होईल की खुद्द पार्लमें टाच्या अस्तित्वावर कुन्हाड येईल; लोकांच्या मानेवर येण्याचें तर स्वमींही नको. प्राचीनकाळचे राजे आपल्या प्रजेस सार्वजनिक किंवा खाजगी कामे करण्यास जबरीनें लावीत असत. मोंगल बादशहांच्या अमदानीत ताजमहालासारख्या ज्या भव्य व अमोलिक इमारती वगैरे झाल्या त्या असल्याच मजुरीवर झाल्या आहेत; व सध्यां जीस सरकारी वेठ म्हणतात ती ह्याच चालीचें पुच्छ आहे. असो. पण इंग्लंडांत अशा प्रकारचा कायदा पसार करण्याचें जर पार्लमेंटानें म नांत आणिले, तर प्रजेच्या व्यक्तिस्वातंत्र्यांत सरकारास कोणत्याही रीतीनें हात घालतां येऊं नये एतदर्थ तेथील लोकांनी किती चोख उपाय योजून ठेविलेले आहेत, ही गोष्ट एकदम निदर्शनास येईल. प्राचीनकालच्या कांहीं लोकसत्ताक राष्ट्रांत अशी चाल असलेली दिसून येते कीं, कधीकधी सर्व प्रजेची खासगी मिळकत एकत्र करून ती सर्वांस सारखी वांटून द्यावी. अशा प्रकारची वांटणी करण्याचे आज इंग्लंडांतील एकाद्या मुत्सद्यानें सुचविण्याचें जर धाडस केले, तर हजारों लोक एकदम ' काव् ' 'कावू ' करीत उठतील, व प्रजेच्या खासगी मिळकतीवर सरकारचा काडीभरही हक्क पोहोंचत नाहीं असें त्यास निक्षून सांगतील. सध्यांच्या काळी सरकारच्या विरुद्ध प्रजेचे जे हे अगढ़ीं मुख्य हक्क तेवढेच इंग्लंडांत स्था पन झालेले आहेत असें नाहीं; तर दुसरेही कांहीं बारीकसारीक हक स्थापन झालेले आहेत. प्रजेनें पोषाक अमुकच त-हेचा करावा, अन्न अमुकच तऱ्हेचें खावें, अमुकच तऱ्हेने बोलावें, अमुकच तऱ्हेनें चालावें, इत्यादि जे प्राचीनकाळचे कायदे ते तर नष्ट होऊन कित्येक शतकें झाली; व त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची जर सरकारानें किंचितूहि सटपट केही तर असल्या गोष्टी कायद्याच्या आटोक्यांत मुळीच येऊं शकत ना हीत असे टोकमत लागलेच गाजूं लागेल. प्राचीनकाळी सरकार सांगेल त्या धर्मानर प्रमेम विश्वास ठेवावा डांगे; मग प्रजेस तो धर्म सोटा पाटो अगर सरा वाटो. हाडीं
India vs West Indies, 3rd T20I Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणखी एक क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व शेवटचा ट्वेंटी-२० सामना आज ईडन गार्डनवर होणार आहे. पण, आता हा सामना होणार की नाही, यावरच संभ्रम निर्माण झाले आहे. बीसीसीआयने काही मिनिटांपूर्वी एक फोटो पोस्ट केला आहे आणि तो पाहून हा सामना होण्याची शक्यता फार कमीच दिसत आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामना जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी बायो बबल सोडून १० दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहेत. रोहित शर्मा व ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात सलामीला येण्याची शक्यता आहे. ऋतुराजला मागील दोन सामन्यांत संधी मिळाली नव्हती. त्याच्या जागी इशान किशन सलामीला खेळला, परंतु आजच्या सामन्यात किशन मधल्याफळीत खेळण्याची शक्यता आहे. विराटच्या जागी संघात श्रेयस अय्यरचे पुनरागमन होण्याचा अंदाज आहे. भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद सिराजची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. त्यात आता कोलकाता येथे पाऊस पडत असल्याने संपूर्ण मैदाना कव्हर केले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार रात्री ८ वाजेपर्यंत पावसाची शक्यता आहे. Web Title: IND vs WI, 3rd T20I Live Updates : It's raining in Eden Gardens right now, and the prediction of rain is upto 8 pm tonight. Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
कोरोना साथीनंतर जगावर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परीषदेची संकल्पना 'एशिया अॅन्ड द इर्मजिंग वर्ल्ड ऑर्डर' ही आहे. गुरूवारी उद्घाटन सत्रात ज्येष्ठ शास्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थितांचे स्वागत करतील. प्रमुख रस्त्यांवर रोषणाई केली जात आहे. परंतु त्याच शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे मात्र ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे उलटे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून महापालिकेवर प्रशासक असून सामान्य नागरिकांसोबतची महापालिकेची नाळ तुटल्याचे पदोपदी दिसून येत आहे.
पुणे -मुळशी तालुक्यातील आगीच्या घटनेतील 17 मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, मृतदेह पूर्ण जळाल्यामुळे त्यांची ओळख पटत नसल्याने डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये पोलिसांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय डीएन चाचणी करता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आज (दि. 8) संध्याकाळी सर्व डीएनए चाचण्या पूर्ण झाल्या, अशी माहिती बी. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना बोलविण्यात आले. मात्र, या चाचण्यांसाठी आवश्यक कागदपत्र, अर्ज या सर्व प्रक्रियेला दिवस गेला. त्यामुळे ससून परिसरात मृतांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त करीत गोंधळ घातला. त्याबाबत डॉ. तांबे म्हणाले की, डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबला कळविण्यात आले होते. मृतांच्या नातेवाइकांची ओळख पटविण्यासाठी काही प्रक्रिया आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा अर्ज नातेवाइकांकडून भरून घेणे अपेक्षित आहे. त्या नातेवाइकांचा फोटो असणे आवश्यक आहे. मृतांच्या नातेवाइकांची ओळख पटविताना प्रथम आई-वडील यांना प्राधान्य दिले जाते. ते नसतील तर मुल, भाऊ, बहीण यांना प्राधान्य दिले जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे ओळख पटविण्याच्या प्रक्रियेला उशीर लागत आहे. मृतांसह नातेवाइकांच्या रक्ताचे नमुने डीएनएसाठी घेण्याकरीता डीएनए किटची आवश्यकता असते. हे कीट न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून पोलिसांना आणायचे असते. ते कीट ससून रूग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे ते कीट आमच्याकडे नाही असा अपप्रचार झाला. ते चुकीचे आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
घोटाळ्यांमुळे प्रसिद्धीस आलेले आणि बँकांचे पैसे बुडवून परदेशात फरार झालेल्या भारतातील काही कर्जबुडव्या बड्या उद्योजकांच्या आयुष्यावरील वादात सापडलेला माहितीपट (डॉक्युसीरिज) 'बॅड बॉय बिलेनिअर्स' अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सीरिजचे पहिले तीन भाग नेटफ्लिक्सवर रिलीज झाले असून, त्याच्या प्रदर्शनाला सहाराचे सुब्रतो रॉय, बी रामलिंगा राजू, मेहुल चोक्सी यांनी विरोध केला होता. 'नेटफ्लिक्स'वर या सीरिजबाबत म्हटलंय की, हा संशोधनात्मक माहितीपट पैशाची हाव, फसवणूक आणि भ्रष्टाचार यातून साम्राज्य उभं करणारे आणि नंतर हेच साम्राज्य संपुष्टात आलेल्या भारतातील कुप्रसिद्ध उद्योजकांवर आधारित आहे. सीरिजचे पहिले तीन भाग चोक्सीचा भाचा आणि पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी, सहारा ग्रुपचा सुब्रतो रॉय, एसबीआयला ९ हजार कोटींचा चुना लाऊन फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा चेअरमन विजय मल्ल्या यांच्या भ्रष्टाचारावर आधारित आहे. तर 'बॅड बॉय बिलेनिअर्स' सीरिजचा चौथा भाग हा सत्यम घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी रामलिंगा राजू याच्या घोटाळ्यावर आधारित आहे. पण हैदराबादमधील न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा एपिसोड अद्याप प्रदर्शित झालेला नाही.. बिहारमधील स्थानिक अरारिया कोर्टाने 'बॅड बॉय बिलेनिअर्स' या वेबसीरिजच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती दिली होती. या कोर्टात सहारा उद्योगाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी वेबसीरिजच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. तसेच पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याने देखील दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन वेबसीरिज प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र दिल्ली हायकोर्टाने मेहुल चोक्सीची याचिका फेटाळून लावली.
५ लाख कर्करोग पीडितांचा पैशांअभावी मृत्यू - Majha Paper\nआरोग्य / By माझा पेपर / ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, कर्करोग, सर्वेक्षण / May 28, 2016 May 28, 2016\nपॅरिस : दोन वर्षांमध्ये जवळपास ५ लाख कर्करोग पीडितांना जगात आलेल्या आर्थिक संकटामुळे आपला जीव गमवावा लागला. आर्थिक संकटामुळे हे पीडित स्वतःवर उपचार करून घेऊ शकले नाहीत, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात या लोकांना नोकरी गमवावी लागणे हे देखील कारण सांगण्यात आले. ओईसीडीचा (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट) अहवाल २००८-२०१० च्या दरम्यान झालेल्या संशोधनावर आधारित आहे. फक्त २ वर्षांमध्ये कर्करोगाच्या जवळपास ५ लाख पीडितांचा मृत्यू फक्त योग्यवेळी उपचार करू शकले नाहीत असे या अहवालात म्हटले आहे.\nयूरोपीय संघादरम्यान जवळपास १६००० कर्करोग पीडितांच्या मृत्यूची नोंद झाली. तर फक्त अमेरिकेत हे प्रमाण १८००० एवढे होते. फ्रान्समध्ये या कालावधीत जवळपास १५०० कर्करोगांचा मृत्यू रकमेच्या कमरतेमुळे झाला. २०१२ मध्ये जवळपास ८.२ दशलक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण कर्करोग होता. २००८-२०१० दरम्यान आलेल्या मंदी आल्याने अनेक जण बेरोजगार झाले होते, असे अध्ययनकर्ते मुरूथप्पू यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.\nबेरोजगारीच्या तावडीत सापडलेल्या कर्करोग पीडितांची स्थिती आणखीनच दयनीय झाली होती. यामुळे ते स्वतःवर योग्य आणि पूर्ण उपचार करू शकले नाहीत आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. याच्या अध्ययनासाठी डब्ल्यूएचओ आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीचा देखील वापर करण्यात आला. यात जगाच्या ७० देशांना समाविष्ट करण्यात आले होते.
'लोकप्रियतेचे रिपब्लिक! ' हे संपादकीय वाचले. रिपब्लिक इंडियात (भारतात) सुद्धा काही पत्रकार स्वतःला 'रजत', 'सुदर्शन'धारी विष्णूचा अवतार मानू लागले असावेत. 'जगातील सगळय़ात मोठा घोटाळ्यां' (टूजी स्पेक्ट्रम, कोळसा)बद्दलचे 'कॅग' अहवालही जर-तर च्या भाषेत होते. 'लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभा'तले अनेकजण सध्या भक्तिरसात न्हाऊन, शिंगे मोडून नाचण्याचे काम करीत आहे. भक्तिरसाचे झरे प्रत्येक देशात वाहतात पण त्या रसाचे रसायन अति प्रमाणात झाले की खाविंदचरणी लोटांगण घालण्याचे काम सुरू होते आणि राजकीय विरोधकांमध्ये देशद्रोही दिसू लागतात. अशा पत्रकारांसंदर्भात, जहीर कुरेशी यांच्या गझलमधील एक ओळ आठवते, "मैं कैसे मान लूं वो लोग हो गए है निडर, जो बार बार किसी डर की बात करते है। "-परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला) तिथे प्रवृत्ती ठेचली तरी गेली. . आपुलकी, संवाद यांतच खरे सौख्य! हितगुज शतकाची थोरवी काय वाणू! पत्रकार परिषद घेण्याच्या प्रथेला छेद देत 'कुटुंबप्रमुखाचे हितगुज' या स्वरूपाच्या 'मन की बात' या कार्यक्रमाची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न बोलता वृत्तपत्रांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, ही पतेकी बात सहस्रबुद्धे यांनी कदाचित विनयाने नोंदली नसावी! अवघड प्रश्न सोडून सोपे प्रश्न प्रथम सोडवा हे शाळेत शिकलेले शाहणपण पुढे उपयोगी पडते, याचे उदाहरण म्हणून या कार्यक्रमाचे महत्त्व आहे. (या पत्रासाठी सुचलेल्या शीर्षकास 'करुणाष्टकां'ची चाल लागते, हा एक योगायोगच! ) -गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई) समाजहित की 'समूहस्वार्थ'?
कायदेशीर हॉटलाईन, जेथे आपण एक लवचिक आणि व्यावसायिक, सक्षम सल्ला फोन किंवामेल नक्की आपल्याला आवश्यक तेव्हा - काळजी न करता की. अनेक उद्योजक आणि लहान व्यवसाय आहे बदलेला आवश्यक आहे कायदेशीर सल्ला आणि मत आहे की एक टणक संबंधित. येथे नियुक्त करण्यासाठी एक अनुभवी व्यवसाय वकील साठी एक निश्चित किंमत. कायदेशीर वाद आणि समस्या उद्भवू शकतात अचानक त्वरित गरज कायदेशीर सल्ला आहे. आम्ही उपलब्ध आहेत टेलिफोन सेवा दिवसभर. आम्ही भाग आहेत, एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क अनुभवी वकील मध्ये सर्व कायदेशीर अधिकार क्षेत्रे. त्यामुळे, आपण हे करू शकता मिळविण्यासाठी त्वरित प्रवेश व्यापक कायदेशीर कौशल्य आहे. कायदेशीर हॉटलाईन सह व्यापक अनुभव कायदेशीर सल्ला प्रदान करण्यासाठी उद्योजक आणि लघु उद्योगांसाठी. काय कायदेशीर स्वरूपात (एकमेव मालकी, मर्यादित भागीदारी आहे, एकच कंपनी, सहकारी सोसायटी वैयक्तिक जबाबदारी, मर्यादित दायित्व कंपनी, किंवा फॉलो करा फॉलो करत आहे). कसे माझ्या दायित्व उलट कर्ज, तेव्हा मी संस्थापक एक, एकमेव मालकी, सामान्य भागीदारी, मर्यादित दायित्व कंपनी, मर्यादित दायित्व कंपनी किंवा फॉलो करा फॉलो करत आहे. स्पर्धा आणि रोजगार करार, आणि किती वेळ नाही, अशी कलमे केल्यानंतर कर्मचारी निरस्त पासून त्याचे स्थान. च्या, आम्ही नेहमी चांगले येथे डोळा पातळी देते, आम्हाला वेळ आणि दृष्टीकोन काय लक्ष केंद्रित करणे आम्ही सर्वोत्तम करू, बहुदा कार्यरत एक गंभीर आम्ही फक्त शकता, खूप जोरदार शिफारस वकील असफ फझल सर्व येथे आहे. येथे आपण सर्वकाही प्राप्त आणि अधिक आपण काय मागणी जलद आणि कार्यक्षम दोन मार्ग संवाद, एक सर्व नैसर्गिक, सल्ला, मार्गदर्शन, तीक्ष्ण, प्रचंड कायदेशीर लायकी, अंतर्ज्ञान मध्ये सर्व संबंधित विषय, तसेच ज्ञान की व्यावसायिक करते त्याला एक उल्लेखनीय उत्तम वकील डेन्मार्क मध्ये. गेल्या, पण निश्चितपणे किमान, आसाफ एक आहेत, तसेच आर्थिक समजून दृष्टिकोन विविध कंपन्या आणि लोक. तो त्याला एक खरोखर आयोजित सॉलिसिटर एक लेवींनी मानवी समज वैयक्तिक सर्वात घटनांमध्ये, समजुती, होप्स, आणि स्वप्ने. मी खूप समाधानी हे कठीण आहे, तेव्हा आपण एक लहान व्यवसाय म्हणून येतो मध्ये मळणे प्रमुख, पण असफ फझल मला मदत तयार करण्यासाठी एक विहंगावलोकन एक अतिशय गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करून नळदुर्ग पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अणदूर येथे वास्तव्यास असलेल्या एका १४ वर्षीय मुलीच्या घराशेजारीच आरोपी तरुण वास्तव्यास होता. २७ जानेवारी रोजी दुपारी घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून शेजारच्या युवकासह अन्य दोन युवकांनी तिला आरोपीच्या घरी नेले. या ठिकाणी तिघांनी मिळून या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, मुलगी घरात नसल्याचे पाहून पीडितेच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, २८ जानेवारीच्या पहाटे ती मुलगी अत्यवस्थ अवस्थेत घरी परतली. तिची अवस्था लक्षात घेऊन कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने नळदुर्ग ठाणे गाठून तीन युवकांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील दोन आरोपींना शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत, तर तिसरा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूर : नागपुरातल्या एका 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येला धक्कादायक वळण मिळालंय. जन्मदात्या आईनेच लेकीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या वाडी परिसरातल्या आंबेडकर नगरात राहणाऱ्या अंकिता मेश्राम या तरुणीनं 14 जुलै रोजी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. घरातच गळफास लावून अंकितानं आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली होती. मात्र ही आत्महत्या नसून तिच्याच जन्मदात्या आईनं केलेली हत्या असल्याचं उघड झालंय. अंकिताच्या आत्महत्येनंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना काही अज्ञात व्यक्तींनी पोलिसांना अंकिताच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं अंकिताचा मृतदेह ताब्यात घेत तिचं पोस्टमार्टेम केलं आणि त्यात तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालंय. चौकशीनंतर पोलिसांनी अंकिताची आई मुक्ताबाई मेश्रामला अटक केलीय. अंकिताचं प्रेमप्रकरण असून त्यातून ती गर्भवती राहिल्याचा त्यांना संशय होता आणि याच संशयातून त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचं उघड झालंय.
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांनी निसटता विजय मिळवला. पिसाळ यांना 37 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मिनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली. अवघ्या 1 मताने विजयी झालेले उमेदवार अंबादास पिसाळ यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर रविवारी सूचक शब्दात टीका केली. पवार यांनी निवडणूक हातात घेऊन प्रतिष्ठेची केली होती, असे ते म्हणाले. आपला विजय म्हणजे पवारांचा पराभव, असा त्यांच्या प्रतिक्रियेचा मतितार्थ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगरमध्ये जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले. 21 पैकी 17 जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी मतदान होऊ आज मतमोजणी पार पडली. या चार जागांपैकी भाजपला 2 तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे मोठ्या फरकाने निवडून आले. दरम्यान नगर तालुका सेवा सोसायटी मतदार संघातून विजयी झालेले कर्डीले व कर्जत सेवा सोसायटी मतदार संघातून विजयी झालेले पिसाळ एकत्र आले. निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल दोघांनी एकमेकांचा सत्कार केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पिसाळ म्हणाले की, माझी निवडणूक अतिशय चुरशीची होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती व स्वतःच्या हातात घेतली होती. माझ्याकडे मतदार अजिबात नव्हते. मात्र, माझी इच्छाशक्ती होती, विजयी होईल अशी खात्री होती. त्यामुळे आमच्या गावचे ग्रामदैवत सदगुरु गोदड महाराज यांच्या कृपेने मी अवघ्या एक मताने निवडून आलो. याआधी समान मते पडल्याने चिट्ठीवर मी पराभूत झालो होतो. त्यानंतर एका निवडणुकीत 4-5 मतांनी मी निवडून आलो. ही माझी संचालक होण्याची चौथी निवडणूक आहे व आता ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. - अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम ।
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) ची लेखी परीक्षा उद्या 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. एकूण परिक्षार्थींची संख्याः बारावीच्या बोर्ड परिक्षसाठी 7,92,780 विद्यार्थी 6,64,441 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10,388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3195 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थी संख्याः यंदाच्या या परीक्षेत विज्ञान शाखेतून 6,60,780 विद्यार्थी, कला शाखेत 4,04,762, वाणिज्य शाखेत 3,45,532, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) मध्ये 42,959,आणि टेक्निकल सायन्स (ITI) शाखेत 3261 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेची ठळक वैशिष्टयेः फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्यात आलेली असून सरल डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी कालपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य घरावे. विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्तीः फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचे वेळापत्रक 30 डिसेंबर रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. असे असतील नियमः परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परीक्षा केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करावयाचे आहे. तसेच संपूर्ण केंद्रपरिसराचे चित्रीकरण करावयाच्या सूचना या परीक्षेपासून संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (स्नर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे. परिक्षेचा कालवधीः सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket ) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. 10. 30 वाजता व दुपार सत्रात दु. 2. 30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळ सत्रात स. 11. 00 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 3. 00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. दहा मिनिटे वाढवून दिलीः परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. तथापि पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेसाठी प्रथमच लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्याथ्र्यांसमोर शिक्षा सूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करणेबाबत सर्व माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत सूचित करण्यात आलेले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलतः इ. 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 ऑक्टोबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. विद्यार्थ्याने कॅलक्युलेटर स्वतःचा आणावयाचा आहे. सदर कॅलक्युलेटर फक्त कॅलक्युलेटर स्वरूपातीलच असावा. मोबाईल मधील अथवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅलक्युलेटर वापरता येणार नाही. कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष योजनाः संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा 'गैरमार्गाशी लढा' या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे व त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, इ. द्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. दक्षता समित्यांची नियुक्तीः परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रिकरण इ. उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हेही वाचाः Shivsena Bhawan : शिवाई ट्रस्ट अन् शिवसेना भवन विरोधात तक्रार, ठाकरेंचे टेन्शन वाढणार?
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून मनसे कडून चालू असलेली बांग्लादेशी हटाव मोहीम फसलेली पाहायला मिळत आहे. शनिवारी बालाजीनगर मध्ये मनसेचे ५० कार्यकर्ते नागरिकांचे ओळखपत्र तपासात होते , तेव्हा बांग्लादेशी असल्याचा संशयावरून ३ जणांना ताब्यात घेतले होते. परंतु ते तिघे जण मूलतः भारतीय असल्याचे समजताच पुणे पोलिसांनी त्यांना सोडून दिले आहे. पुण्यातील धनकवडी भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बांग्लादेशी घुसखोरांचा शोध सुरु केला असून, तीन जणांना बांग्लादेशी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले, पण ते भारतीयच निघाले. अटक केलेली तिन्ही कुटुंब ही धनकवडीं येथील बालाजीनगर येथे राहतात, त्यांनी तपासणीच्या वेळी आपली सर्व कागदपत्रे मनसे कार्यकर्त्यांना दाखवली होती आणि आपण बांग्लादेशी नसून पश्चिम बंगालचे रहिवासी आहोत असे ते सांगत होते, परंतु पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ते भारतीयच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसेची ही मोहीम फसल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने ठाणे, बोरिवली या भागात बांग्लादेशी हटाव मोहीम सुरु केली होती. या वेळी ठाण्यात ३ कुटुंब बांग्लादेशी असल्याचे समोर आले होते, त्यांच्याजवळ आधार कार्ड , पॅनकार्ड आदी ओळखपत्रे होती त्यासोबतच महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बांग्लादेशी पासपोर्ट सुद्धा अढळ होता असे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. बांग्लादेशी की बिहारी ? बालाजी नगरमध्ये सापडलेले संशयित हे भारतीयच होते, परंतु आधी कागदपत्रांची विचारणा मनसे कार्यकर्त्यांनी कलेची असता, त्यांनी आपण बांगलादेशी नाही तर बिहारी असल्याचे सांगितले त्यामुळे गोंधळ निर्माण झाला, म्हणून पुढील चौकशी पोलिसांनी केली. मनसे ने एकूण आठ कुटुंबाच्या ओळखपत्राची तपासणी केली, लोकांना संशय आल्याने ५ घरे ही बंद अवस्थेत आढळून आली. ही कुटुंब बालाजीनगरमधील गुलमोहोर अपार्टमेंटमध्ये राहत होती. अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरात सुद्धा बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई केली गेली होती. यावेळी १२ पुरुष, १ अल्पवयीन मुलगा आणि १० महिलांचा समावेश होता. हे सर्व बांग्लादेशी रहिवासी असून या ठिकाणी ते बेकायदेशीरपणे राहत होते. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दशतवाद विरोधी पथक आणिअर्नाळ पोलिसांनी एकत्रितपणे केली .
आहार, निद्रा, भय, मैथुन या माणसाच्या मूलभूत अंतःप्रेरणा (Basic Instincts) आहेत.. प्रत्येक सजीव प्राण्याचं 'जगणं' म्हणजे याचा अर्थ त्याने फक्त 'खावे आणि श्वसन करावे' असा नसून, त्याने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त असले पाहिजे, हे महत्त्वाचे असते.. त्या दृष्टीने पोटाची भूक आणि लैंगिक भूक हे सजीव तंदुरुस्तपणे जगण्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.. एखाद्या खाद्यपदार्थाचा तुकडा माणूस तोंडात टाकतो, म्हणजे त्याला भूक लागलेली आहे, असा त्याचा अर्थ नसतो. अन्नाचा निव्वळ आस्वाद घेण्यासाठी किंवा कुणाला साथ-सोबत करण्यासाठी किंवा स्वतःचा वेळ घालविण्यासाठी किंवा मनाचा ताण, नैराश्य आणि शीण कमी करण्यासाठी, एकटेपणा विसरण्यासाठी माणूस खात (किंवा पीत) असतो.. म्हणजेच 'पोटाची भूक' या नैसर्गिक ऊर्मीचे माणूस स्वतःचे मन स्वस्थ ठेवण्यासाठी उपयोग करून घेतो. तसंच शरीरसंबंधातूनही लैंगिक उत्कटता (orgasm) प्राप्त झाल्यास माणूस दैनंदिन ताणातून मुक्त राहू शकतो, उत्साह अथवा सकारात्मक ऊर्जा मिळवू शकतो. भिन्नलिंगी आकर्षण आणि लैंगिक इच्छा ही प्रत्येक सजीवाला निसर्गाची देण आहे.. पण मानवप्राण्यात मात्र विवाहसंस्थेच्या उगमानंतर लैंगिक इच्छांचे नियमन करण्यात येऊ लागले.. आणि ते योग्यही होते.. पण नंतरनंतर काही संस्कृतीत तर ती बंधने इतकी वाढली की, पती-पत्नीने आपसातली प्रेमभावना, ओढ लपवायची, एकमेकांजवळ बसायचे नाही, हास्यविनोद, गप्पा करायच्या नाहीत आणि फक्त रात्रीपुरतेच एकत्र यायचे, इतक्या टोकापर्यंत स्त्री-पुरुष (पती-पत्नी) संबंध हे हास्यास्पद आणि कृत्रिम होऊन गेले.. ते केवळ विवाहाच्या आणि भन्नाट नैतिक तसेच धार्मिक कल्पनांच्या अट्टहासामुळे ! प्राण्यांपेक्षा मानवाची लैंगिकता वेगळी आहे. स्त्री-पुरुष प्रत्येक वेळेस अपत्य होऊ देण्यासाठीच शरीरसंबंध करीत नाहीत हे आता सिद्ध झाले आहे. स्त्रीचा जननकाळ संपल्यावरसुद्धा स्त्री व पुरुषांमध्ये आकर्षण असते आणि शरीरसंबंधाची इच्छाही (Desire) असते. अर्थात या वयातील लैंगिक संबंधाचा आनंद हा मूल मिळविण्यासाठीचा नाही हे तर स्पष्टच आहे. पण तरीही स्पर्शाच्या आणि orgasm च्या परमोच्च आनंदातून शारीरिक- मानसिक ताणाचा निचरा होऊन त्यायोगे 'मानसिक फिट' राहण्यासाठी हे शरीरसंबंध उपयुक्त असतात हे लक्षात येते. पुरुषांनी हस्तमैथुनाद्वारे लैंगिक उत्कटतेचा (orgasmचा) अनुभव घेणे हेही स्वाभाविक मानले जाते, ती विकृती नाहीये. Orgasm पुरुषाला संभोगक्रियेतून मिळू शकतो. परंतु स्त्रीला मात्र ही उत्कटता संभोगक्रियेतून खात्रीलायकपणे मिळेलच असे नाही. याला पुरुषांची "आपलं 'झालं' की झालं.." ही वृत्ती कारणीभूत असते.. स्त्रियांसाठी सेक्स म्हणजे केवळ 'घर्षण' नसते, त्याचं प्रवेशद्वार मनातून असते हे पतीला समजत नसेल किंवा जमत नसेल, तर असंख्य विवाहित स्त्रिया अशा परमोच्च सुखाच्या क्षणापर्यंत (Orgasmपर्यंत) पोहोचतच नाहीत. त्यामुळे अंतर्यामी त्या अस्वस्थ आणि नैराश्यग्रस्त राहू शकतात. त्यांच्यासाठी सेक्स ही फारशी "आनंददायी कृती" रहात नाही.. (सेक्समध्ये ती ऍक्टिव्ह नसणे किंवा तिला त्याचा आनंद घेता न येणे, यासाठी तिच्यावरचा पारंपरिक विचारांचा नैतिक पगडा आणि धार्मिक समजुती ही कारणे देखील आहेत, पण त्याचा विचार आपण इथे करणार नाहीत). अशावेळी मग स्त्रिया यासाठी फारशा उत्सुक नसतात किंवा मग डोकेदुखी कंबरदुखी वगैरे कारणे देतात.. कालांतराने सेक्स ही त्यांना पतीने लवकर उरकून घेण्याची कृती वाटते.. (पत्नी सेक्समध्ये 'ऍक्टिव्ह' नसल्याची बऱ्याच पुरुषांची तक्रार असते, पण याला काही टक्के आपणही कारणीभूत आहोत हे मात्र त्यांच्या गावीही नसते..) माणसाचे मन आणि शरीर ही एकमेकांना जोडलेली 'अवलंबित अवस्था' असल्यामुळे मनावरील ताणाचा निचरा लैंगिक उत्कटपणातून (ऑर्गझम मधून) होऊन जाणे, ही physiological क्रिया अशावेळी थांबते. मग आपण नेमके कशामुळे असमाधानी (dissatisfied) आहोत, हे स्त्रियांना कळत नसल्यामुळे, पत्नी-पत्नीच्या संसारात हे असमाधान 'धुसफूस' या स्वरूपात पत्नीकडून बाहेर पडत राहते. काही वेळेला याबाबत मनःशांती मिळविण्यासाठी स्त्रिया देव-धर्मात स्वतःला बुडवून टाकतात, तर अनेक स्त्रिया बुवाबाजी करणाऱ्या पुरुषांच्या नादी लागतात. तर अत्यल्प स्त्रिया विवाहबाह्य संबंधात याचं उत्तर शोधतात.. पण बहुतांश स्त्री-पुरुष आध्यात्मिक प्रवचनांतून या असमाधानाचे, बेचैनीचे उत्तर शोधू पाहतात.. पण उत्तर दुसरीकडेच असते.. काही स्त्रिया उद्वेगाने किंवा भांडण वगैरे झाल्यास पतीबरोबरच्या संभोग क्रियेलाच विरोध करतात, कारण संभोगातून 'फक्त पतीला सुख मिळते', असं मानण्याचा आपल्याकडे पारंपरिक प्रघात आहे. आणि त्यांना स्वतःलाही असंच वाटत असतं.. पण 'आपल्यालाच त्यातून सुख घेता येत नाही' किंवा 'मिळू शकत नाही', हे मात्र त्यांच्या गावीही नसते.. पतीला 'धडा' वगैरे शिकवायच्या नादात आपणही मानसिक ताणतणावाचे कारण निर्माण करत आहोत हे त्यांना मान्यच नसते.. त्यामुळे पती-पत्नी संबंध आणखीच तणावपूर्ण बनतात. असे वारंवार होऊ लागल्यास त्या जोडप्यांना समुपदेशनाची गरज असते, पण त्याऐवजी मग एकमेकांवर अनेक व्यक्तिगत चुकीचे आरोप करणे/संशय घेणे वगैरे सुरू होते.. आणि कालांतराने त्यात इतरही वाद मिसळून त्यांचे घटस्फोट अथवा mental separation घडून आलेले पाहावे लागतात. एकमेकांबद्दल मनात फक्त कोरडेपणा उरतो.. एकमेकांच्या ओढीऐवजी संसार हा 'kids oriented' सुरू होतो.. अशांनी कौन्सिलरकडे जाऊन समुपदेशन करून घेण्याची गरज आहे.. (टीप - असमाधान आणि नैराश्य यांच्या अनेक कारणांपैकी फक्त 'लैंगिक अतृप्ती' या कारणाचाच विचार या लेखात केला आहे..) दुसरीकडे, ज्या पुरुषांना लैंगिक सुख पत्नी देऊ शकत नाही, किंवा त्यासाठी पत्नीकडून अडवणूक केली जाते, असे लोक मग अस्वस्थ, चिडचिडे, असमाधानी किंवा नंतरनंतर विक्षिप्त आणि कालांतराने antisocial बनत जातात.. म्हणजे पत्नीच्या अडवणुकीमुळे पतीची चिडचिड आणि कटकटी, आणि पुन्हा त्या कटकटींना वैतागून पत्नीकडून पतीची परत सेक्ससाठी अडवणूक.!! असे ते vicious cycle बनत जाते.. त्याचेही बहुतांश वैवाहिक तक्रारींचे (marital disharmony चे) मूळ हे sexual dissatisfaction मध्ये दडलेले असते.. विवाहबाह्य संबंध किंवा लैंगिक अत्याचार ही त्याचीच पुढची पायरी आहेत, पण ते ज्याच्यात्याच्या संस्कारावर (moral values) ठरते.. विवाहबाह्य संबंध हे नेहमी शारीरिकच असतात असे नाही, मानसिक आणि भावनिक कुचंबणा हे त्याचे मोठे मूळ आहे.. बरेच पुरुष हे टिपिकल पुरुषी अहंकारामुळे स्त्रीच्या कोमल भावना समजून घेऊ शकत नाहीत, अथवा त्यांना समजूतदारीने ट्रीट करू शकत नाहीत.. ज्या घरात पती पैशांसाठी आणि पत्नी सेक्ससाठी एकमेकांची अडवणूक करतात ते घर हे 'घर' नसून केवळ दोन माणसांचे हॉस्टेल असते.. पुढचा मुद्दा, मानसिक ताणसुद्धा स्त्री आणि पुरुषांचे वेगवेगळे आणि कमी-अधिक तीव्रतेचे असतात. याला स्त्री-पुरुषाची नैसर्गिक जीवनशैली आणि वृत्ती कारणीभूत आहे. जगातील बहुसंख्य स्त्रियांना मातृत्वामुळे नवनिर्मितीचा आनंद मिळतो. आणि त्या निर्मितीचे पुढे अनेक वर्षे संगोपन करण्यामधून स्त्रियांच्या मानसिक ताणाचा निचरा होत असतो. स्त्री जितकी आपल्या मुलांमध्ये मानसिक-भावनिक गुंतलेली असते, तितका पुरुष निसर्गतः नसतोच. (म्हणून अलीकडे 'चांगले मनःस्वास्थ्य' राहण्याकरिता, मुलांच्या संगोपनात स्वतःला पुरुषांनी गुंतवावे, असा त्यांना सल्ला दिला जातो.) स्त्रीकडे असणाऱ्या या नैसर्गिक देणगीमुळे, तिच्या आयुष्यातील ताणतणावांचा आणि लैंगिक उत्कटतेच्या असमाधानकारक अनुभवाचा ती बऱ्यापैकी सामना करू शकते. पुरुष व्यक्तिमत्त्वात ही नैसर्गिक त्रुटी आहे. शिवाय पुरुषाची वृत्ती ही जास्तकरून स्पर्धात्मक आणि (म्हणून) सूडात्मक आहे, जी कोणत्याही दोन नरांमध्ये नैसर्गिकपणे वसलेली असते. बाहेरच्या जगात वावरताना, स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या या स्पर्धेला तोंड देताना पुरुषाला स्त्रीच्या तुलनेत जास्त ताणाखाली जगावे लागते.. व्यसन करण्याचे जरी नाकारले तरी, ताणमुक्तीचे इतर चांगले पर्याय माहिती नसल्याने म्हणा किंवा तेवढा वेळ नसल्याने, आणि बालसंगोपन वा तत्सम कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषाला भाग घेता न येण्याची अनेक कारणे असल्यामुळे, केवळ "सेक्स अॅक्टिव्हिटी" हा एकमेव पर्याय ताणमुक्त होण्याकरिता कित्येक पुरुषांसमोर शिल्लक राहतो. त्याकरिता पत्नीवर जबरदस्ती किंवा मग विवाहबाह्य़ संबंध, बलात्कार अशा मिळेल त्या मार्गाने पुरुष जेव्हा स्वतःला satisfaction मिळवू पाहतो, तेव्हा पुन्हा 'स्त्री'लाच त्याच्या अन्याय, अत्याचाराचे बळी व्हावे लागते. सेक्सबाबत स्त्री-पुरुषांमधील निःसंकोच भावना या नैसर्गिक आहेत. त्यात "वाईट चालीचे" वगैरे काहीही नाही..पण हे सर्व "विवाहाच्या पार्श्वभूमीवर" वाईट ठरवणे भाग पडलेले आहे, हे नेमके आपण लक्षात घेत नाही. विवाहाने स्त्री-पुरुषांच्या लैंगिक इच्छेचे खासगीकरण करून टाकले आहे. हे खासगीकरण स्वीकारताना 'चोरून पाहणे' किंवा 'लपूनछपून करणे' या (प्रति)क्रिया दाबून टाकलेल्या लैंगिक भावना व्यक्त करण्यासाठी अपरिहार्य झालेल्या दिसतात. त्यातून निर्माण होत गेलेली स्थिती आणि परंपरा नैतिक म्हणायच्या का, हे आता एकदा ठरवावे लागेल.. विवाहामुळे व्यवस्था उत्तरोत्तर 'पुरुषांकरिता' होत जाणे आणि स्त्रीच्या कौमार्याचे, चारित्र्याचे नवे स्तोम माजवले जाणे, यामुळे लैंगिक उत्कटतेचा विचार स्त्रीयांच्या बाबत जगभरात कुठेच शिल्लक राहिला नाही. निसर्गाने मानवास ठराविक वयानंतर लैंगिक इच्छा दिल्या.. त्या इच्छांच्या योग्य नियमनासाठी मानवाने स्वतः विचारपूर्वक विवाहसंस्था अस्तित्वात आणली.. ते जरुरीचे होते/असेल.. पण पूर्वी वयात येताच मुलामुलींची लग्ने होत असत. आता मात्र गेल्या काही दशकांपासून लग्नाचे वय वाढत गेले.. तशात चित्रपटातील सेक्सी नृत्ये आणि बेडसीन्स, अर्धनग्न फोटोज, पोर्नोग्राफी, टीव्हीवरील अंगप्रदर्शन व सेक्सी जाहिराती, फोन आणि सोशल मिडियाचा वापर वाढला.. जणू काही सेक्सचा विस्फोटच झाला.. एकीकडे, सेक्सची इच्छा किशोरवयात (teenage) जागृत होते आणि लग्न मात्र सरासरी २५ व्या वर्षी होतं. तोपर्यंत या भावनिक ऊर्जेचं नियमन कसं करायचं या प्रश्नाचा विचार भविष्यात प्रत्येकालाच करावा लागणार आहे.. फुटबॉलला लाथ मारल्यावर सगळी उर्जा बाहेर निघते. स्विमिंग, सायक्लिंग, ट्रेकिंग असे खेळ थोडाफार परिणाम करू शकतात खरंतर.. पण त्यालाही मर्यादा आहेत.. मैदाने संपली, मुलं कॉम्प्युटर गेम खेळायला लागली. केवळ खेळ खेळणं ही अपुरं पडू लागलं.. शारीरिक आनंद लुटण्याचे मार्ग बंद झाले आणि उर्जेचं उत्सर्जन बंद झालं.. आता मुलांची उर्जा दुसऱ्या (अवैध) रुपानं बाहेर पडतेय. छेडछाड, चिडचिडेपणा, मारामाऱ्या, व्यसनाधीनता, वाढतं डिप्रेशन आणि वाढत्या आत्महत्या ही त्याचीच फलितं आहेत.. मागे एका मानसोपचार तज्ञाने फक्त तरुणांसाठीची, (गुंडांचा अथवा पोलिसांचा अजिबात त्रास नसणारी) "लव्हर्स पार्क" असण्याची गरज असल्याचे लिहिले होते.. त्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी त्या पार्कमध्ये मुलं केवळ 'बसणार' नाहीत तर, अश्लील चाळेही करतील अशी भीती व्यक्त केली होती.. पण त्या मानसोपचार तज्ञाच्या लेखामागचा मूळ मुद्दा बहुतांश जणांना समजलाच नव्हता.. मुलामुलींनी "त्या पार्कमध्ये नैसर्गिक 'लैगिंक कृती' कराव्यात म्हणून तर पार्क हवा" असं त्या तज्ञांचं म्हणणं होतं.. आपल्या समाजाच्या भाषेत मात्र त्याला आपण अश्लील चाळेच म्हणणार.. "विवाहपूर्व लैंगिक कृती" समाज आज कायदेशीरदृष्ट्या अथवा नैतिकदृष्ट्या मान्यच करणार नाही.. पण भविष्यात केवळ वरवरच्या कृतींनाच नव्हे तर विवाहपूर्व लैंगिक संबंधांना (sexual relations ना) देखील आपल्याला सामाजिक मान्यता द्यावीच लागणार आहे.. एकीकडे विवाहाचं वाढलेलं वय आणि दुसरीकडे अगदी कमी वयापासून मुलांवर मिडियातून होणारं सेक्सचं आक्रमण याला आपण फार काळ थोपवू शकणार नाहीये.. पाश्चात्य देशांप्रमाणे योग्य वयात लैंगिक शिक्षण आणि परस्पर संमतीने (सुरक्षित) विवाहपूर्व संबध, हा त्यावरचा उपाय आपण जेवढ्या लवकर अवलंबू तेवढी आपण आपल्या पुढच्या पिढीची हानी टाळू शकू.. उगीच 'तुमची मुलगी अशी दहा जणांबरोबर फिरली तर चालेल का?' वगैरे प्रश्न विचारून आपण फार दिवस वेळ मारून नेऊ शकणार नाही.. मुलांचे मोबाईल पॉर्न फोटो आणि व्हिडीओनी का भरलेले असतात? मौका मिळताच सामान्य माणसांकडून पण लैंगिक छळाचा आनंद का घेतला जातो? पुरुष गर्दीत वा अंधारात स्त्रीची छेडछाड करण्याची संधी का शोधतात? एरव्ही नॉर्मल असलेली माणसे अचानक पाशवी बलात्कार का करतात? स्त्रिया अंगप्रदर्शन करण्याच्या आहारी का जातात? स्त्री पुरुष सायकोसोमॅटिक आजारांनी त्रस्त का असतात? राखी सावंतचे चुंबन असो किंवा ब्रिटनचा रॉयल किस असो, भारतीय स्क्रीनवर भडिमाराने हे का दाखवले जाते? या प्रश्नांचा आज 'नव्याने' विचार करण्याची गरज आहे..
मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. नागपूर : मानवाचे स्वास्थ्य हे पृथ्वीच्या स्वास्थ्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण व मेंदूचा घनिष्ठ संबंध असतो. जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या रोगामुळे पर्यावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 'कोविड-१९' हा प्राणिमात्राची संबंधित रोग आहे. मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ते 'लोकमत'शी बोलत होते. डॉ. मेश्राम म्हणाले, कोरोनासंदर्भात आणखी एक बाब संशोधनातून सामोर आली. या रोगामुळे फुफ्फुसे निकामी होतात आणि रुग्ण दगावतो. मेंदूमध्ये विषाणूचा प्रभाव झाल्याने विशेषतः मेंदूमध्ये श्वासाचे जे केंद्र आहे, त्यात बिघाड झाल्यामुळे असे होते. डॉ. मेश्राम म्हणाले, पर्यावरणातील प्रदूषणामुळे व वायुप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जगात दरवर्षी वायुप्रदूषणामुळे ९० लोक मृत्युमुखी पडतात तर भारतात ही संख्या साधारण १८ लाख एवढी आहे. एड्स, क्षयरोग व मलेरिया या सर्वांमुळे जेवढे लोक दगावतात त्यापेक्षा जास्त लोक एकट्या वायू प्रदूषणामुळे दरवर्षी दगावतात. नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे हे लक्षात आले की, ३० टक्के पक्षाघाताला वायूप्रदूषण कारणीभूत ठरते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील ९० टक्के लोक प्रदूषित वायूमध्ये श्वास घेतात. यामुळे पक्षाघाताशिवाय, स्वमग्नता, लक्षात न राहणे, एकाग्रता न होणे हे रोग लहान मुलांमध्ये होतात, तर मोठ्यांमध्ये स्मृतिभ्रंश व पार्किन्सनसारखे आजार होतात. आवाजातील प्रदूषणामुळे 'आॅबर्शन'ाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातूनही समोर आले असल्याचेही डॉ. मेश्राम म्हणाले. जगातील ३०० कोटी लोक स्वयंपाकासाठी घातक इंधनाचा वापर करतात. भारतात दोन तृतियांश लोक घातक इंधनाचा वापर करीत असल्याचेही समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात सर्वाधिक २० प्रदूषित शहरे आहेत त्यापैकी १६ शहरे एकट्या भारतात आहे. यामुळे आजच्या घडीला सर्वांनी मिळून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.
पुणे, दि. १२ जुलै २०२२ः सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथे मंगळवारी (दि. १२) सकाळी ७. ४५ वाजता विद्युत अपघातामध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरणच्या पर्वती विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये उपरी लघुदाब वाहिनीची तीन फेजपैकी एक वीजतार तुटून खाली पदपथावर लोंबकळत असल्याचे आढळून आले. ही वीजतार तुटल्याक्षणीच फ्यूज गेला व तारेतील विद्युत प्रवाह देखील तात्काळ बंद झाला. मात्र वीजप्रवाह नसलेली ही तार अनधिकृत व्यक्तीने हटविण्याच्या किंवा ओढण्याच्या प्रयत्नामध्ये उर्वरित दोन फेजच्या तारांमधील वीज लोंबळकणाऱ्या तारेत प्रवाहीत झाली व त्याचा धक्का बसून दुर्दैवी प्राणांतिक अपघात झाला अशी शक्यता आहे. या अपघातप्रकरणी महावितरणकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाला कळविण्यात आले. संबंधित विद्युत निरीक्षकांनी अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करून चौकशीला सुरवात केली आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबियास तातडीची २० हजार रुपयांची प्राथमिक आर्थिक मदत महावितरणकडून देण्यात येत आहे.
सातगाव (डोंगरी), ता. पाचोरा : सातगांव डोंगरी येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हिराजी इस्माईल बागवान (५१) हे १० रोजी दुपारी घरात आपल्या नातीला झोका खेळवित असताना झोक्याची दोरी गळ्यात अडकल्याने ते डोक्यावर पडले व जागीच गतप्राण झाले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांनी पाचोरा दवाखान्यात नेण्याचे सांगितले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमित सोळुंके यांनी त्यांना मृत घोषित केले.
दापोली भारतरत्नांची भूमी! । Sakal\nDr Sagar Deshpande Writes Dapoli History Famous Pjp78\nदापोली भारतरत्नांची भूमी!\nमहाराष्ट्राच्या विविध भागांतल्या खेड्यांना, गावांना मोठा इतिहास आहे. त्यांची म्हणून एक परंपरा आहे. ही गावं किंवा खेडी बदलत्या जीवनप्रवाहाची साक्षीदारदेखील आहेत. या सदरातून अशा गावांचा मागोवा.\nनिसर्गसौंदर्यानं नटलेलं कोकण ही महाराष्ट्राची जणू स्वप्नभूमीच आहे. समृद्ध निसर्ग, पर्यटकांना आकर्षण ठरणारे समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक ठिकाणं, या सगळ्यापेक्षाही जीवनाच्या विविध क्षेत्रांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांगीण योगदान देणाऱ्या स्त्री-पुरुषांची भूमी म्हणून कोकणचं वेगळंच वैशिष्ट्य सांगता येईल. कोकणातल्याच रत्नागिरी जिल्ह्यातला दापोली तालुका या सगळ्या वैशिष्ट्यांसह आणखी एका, कदाचित अशा एकमेव कारणानं भारतभरात स्वतंत्र ओळख ठेवून आहे. ती ओळख म्हणजे या एकाच तालुक्यानं आपल्या देशाला तीन भारतरत्नं दिली आहेत.\nस्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दीन-दलित-वंचितांचे कैवारी म्हणून विश्ववंद्य असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि उद्धारासाठी आयुष्यभर त्यागपूर्वक प्रचंड योगदान देणारे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि धर्मशास्त्राचा इतिहास अनेक खंडांच्या स्वरूपात लिहिणारे डॉ. पां. वा. काणे या तीन भारतरत्नांसह त्याच तोडीची कामगिरी करणाऱ्या महापुरुषांचा तालुका म्हणून दापोलीचा परिसर सर्वपरिचित झाला आहे. लोकमान्य टिळक, कवी केशवसुत, साने गुरुजी, रँग्लर परांजपे, प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे आणि अशा कितीतरी दिग्गजांची मूळ गावं याच दापोली परिसरातली, आजही त्यांच्या आठवणी जागवणारी; त्यांच्या वास्तू नि वस्तू जपून ठेवणारी!\nही सगळी दिग्गज माणसं जन्मली ती बहुतांशी खेडेगावांमध्येच. सगळ्याच प्रकारची प्रतिकूलता आणि त्या परिस्थितीशी संघर्ष करताना करावं लागणारं स्थलांतर, ज्या भागात जाऊ तिथं पुन्हा पाय रोवून उभं राहण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्यातून पुढं शिक्षणासह जगण्यासाठी, देशकार्यासाठी करावा लागणारा संघर्ष... याच परिस्थितीतून या बहुतेक महापुरुषांना जावं लागलं आहे. त्यांच्या दापोली परिसरातल्या मूळ गावी पोहोचलं की, थोरा-मोठ्यांकडून ऐकलेला, पुस्तकांतून वाचलेला, नाटक-चित्रपटांतून पाहिलेला सारा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो.\nदापोली-दाभोळ रस्त्यावरचं 'वळणे' हे छोटंसं गाव. 'एक तुतारी द्या मज आणुनि', 'एक खेडं' या कवितांसह अजरामर झालेले कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुतांचं हे मूळ गाव. नदीकाठची वस्ती, रहाटगाडग्याच्या विहिरी, जुनी कौलारू घरं, कड्यांचा करकर आवाज करणारे झोपाळे, विहिरीवरची दगडी डोण.... कवितेतल्या खेड्याचं वास्तव दर्शन घडवणारं हे गाव. या गावी केशवसुतांचं मूळ घर. त्या काळात मराठी साहित्यात केशवसुतांच्या कविता हा एक मानदंडच होता. मंगेश पाडगावकरांच्या वडिलांचं नावही केशव! केशवसुतांच्या कवितांचा उल्लेख करताना त्यात आपल्या नवऱ्याचंही नाव घ्यावं लागेल, म्हणून पाडगावकरांच्या बालपणी त्यांची कविताप्रेमी आई, "मंग्या, तू आता ये. तुका मी दामल्यांची कविता वाचून दाखवते हां!" असं म्हणायच्या, अशी मजेदार आठवण मला खुद्द पाडगावकरांनीच सांगितली होती. अशा कितीतरी आठवणी मग जाग्या होतात. कोकण मराठी साहित्य परिषदेनं गणपतीपुळ्यानजीक मालगुंड इथं केशवसुतांचं स्मारक उभारलं आहे, तेही पाहण्याजोगं आहे.\nलोकमान्य टिळकांचा जन्म जरी रत्नागिरीतला, तरी त्यांचं मूळ गाव दापोली तालुक्यातलं चिखलगाव. त्यांच्या मूळ वास्तूच्या ठिकाणी आज स्मारकाच्या स्वरूपात लोकमान्यांचा पुतळा उभा आहे. त्यांचं लग्नही याच गावात झाल्याचे संदर्भ सापडतात. कारण त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचं गावही जवळचंच लाडघर. तिथल्या बाळ घराण्यातल्या माहेरच्या त्यांच्या आठवणीही सांगण्यात येतात. गावातील नाटकात लोकमान्यांचा सहभाग असलेला फोटो न. र. फाटक यांच्या पुस्तकात असल्याचा संदर्भ आवर्जून दिला जातो. चिखलगावाचं लक्ष्मीनारायण हे टिळकांचं कुलदैवत. टिळकांची मूळ जमीन जयंतराव टिळक यांनी लोकसाधना ट्रस्टला दिली; पण त्याच्या आसपासची जागा घेऊन डॉ. राजा दांडेकर, रेणू दांडेकर दाम्पत्यानं चिखलगावात उभारलेलं शिक्षण आणि समाजविकासाचं काम हे लोकमान्यांचं स्मारक म्हणता येईल. डॉ. दांडेकरांचे आजोबा रामचंद्रबुवा दांडेकर हे कीर्तनकार होते. लोकमान्यांशी त्यांचा स्नेह होता. टिळकांनी सही केलेली 'गीतारहस्य'ची प्रत दांडेकरांच्या संग्रही आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू इथं झाला; पण त्यांचं मूळ गाव आंबवडे हे याच तालुक्यातलं. तिथल्या प्राथमिक शाळेनंतर दापोलीतल्या ए. जी. हायस्कुलात त्यांचं शिक्षण झालं, तिथल्या वसतिगृहात ते राहात असत. कोट्यवधी वंचितांना प्रेरणा देणाऱ्या या महामानवाच्या या मूळ भूमीत आलं की, अक्षरशः त्या वास्तू पाहून अंगावर रोमांच उभे राहतात.\nइथूनच जवळ महर्षी कर्वे यांचं मूळ गाव मुरुड. त्या मुरुडला जाताना वाटेत लागणारं वणंद हे गाव म्हणजे आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचं मूळ गाव. शासनानं इथं त्यांचं स्मारक केलंय. बालपणाची काही वर्षं आपल्या मुरुड या गावी घालवून पुण्यात आलेले महर्षी कर्वे यांचा वाडा नामशेष झालाय. त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याजवळ गल्लीच्या टोकाशी असलेल्या प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर महर्षींचा छोटासा पुतळा बसवण्यात आला आहे, तीच त्यांची आठवण. पुण्यात गेल्यावर विधवा विवाह केला म्हणून, त्यावेळच्या रूढी-परंपरा मोडल्या म्हणून ग्रामस्थांचा महर्षी कर्वे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही राग होता. वडिलांच्या पुनर्विवाहाचा त्रास त्यांचे सुपुत्र रघुनाथ यांनाही भोगावा लागला. पुढे 'भारतरत्न' सन्मान मिळाल्यावर महर्षींचा मुरुडवासीयांनी आवर्जून सत्कार केला. पण, तोपर्यंत त्यांना हयातभर उपेक्षा सहन करावी लागलीच. आता मुरुडमध्येच एका खासगी पर्यटक निवासात महर्षी कर्वे स्मृती संग्रहालय उभारण्यात आलं आहे. मुरुडकडे जाताना आणि तिथून पुढं हर्णेच्या परिसरातील अनेक आठवणी आपल्याला 'गारंबीच्या बापू'सह श्री. ना. पेंडसे यांच्या साहित्यकृतींपर्यंत आपसूक नेऊन पोचवतात.\nजवळच्याच पालगडमध्ये साने गुरुजींचं घर आणि शाळा. हर्णेहून नव्या खाडी पुलावरून गेलं की आंजर्ले आणि तिथून जवळच असलेलं मुर्डी हे गाव म्हणजे रँग्लर परांजपे यांचं गाव. गणितज्ञ आणि पुढं रँग्लर पदवी मिळवलेल्या र. पु. परांजपे यांचंच नाव इथल्या प्राथमिक शाळेला देण्यात आलं आहे. पालगडमध्येच साने गुरुजींचं ज्या शाळेत शिक्षण झालं, तिथल्या जनरल रजिस्टरवर त्यांच्या नावाची नोंद आहे. आता त्यांच्या मूळ जन्मघरात गुरुजींचं स्मारक करण्यात आलं आहे. पुढं साने गुरुजी खानदेशातील अमळनेर इथं राहिले, ती त्यांची कर्मभूमी झाली.\nखुद्द दापोलीमध्ये ब्रिटिशांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून आपला कॅम्प ठेवला होता. अनेक ब्रिटिश वरिष्ठ अधिकारी इथं राहात. 'फॅमिली माळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथं एक इमारत आहे (मंजिल म्हणून ती ओळखली जाते), ते म्हणजे भारतरत्न पां. वा. काणे यांचं घर. त्यांचं शिक्षण इथंच झालं. पुढं मुंबईतून एम.ए. झाल्यावर ते रत्नागिरीत शिक्षक म्हणून काम करू लागले. पाच खंडांमध्ये त्यांनी लिहिलेला धर्मशास्त्राचा इतिहास आणि त्यांचं अन्य संशोधन म्हणजे एखाद्या मोठ्या संस्थेइतकंच काम होतं. तीन भारतरत्नांचा तालुका ही ओळख म्हणजे चिरंजीवच राहणारी आहे.\n(सदराचे लेखक डॉ. सागर देशपांडे पत्रकार, लेखक आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे मनोरंजक तर कधी खरतनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओने चक्क धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. कारण एक कपल चक्क मुंबई लोकलमध्ये रोमान्स करत आहेत. या कपलला किस् करणे अनावर झाल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते. (Couple Kissing in Mumbai local Video Viral on Social media) या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कपल लोकलमध्ये बसले होते. त्यावेळी ते रोमान्स करत होते. संबंधीत मुलगा हातात मोबाईल घेऊन बसला होता. त्यावेळी त्याच्या बाजूला बसलेली तरुणी त्याला किस करण्यासाठी जवळ येत असल्याचे दिसते. तसेच कालांतराने त्यांच्यात रोमान्स होते. विशेष म्हणजे या कपलला आपण लोकलमध्ये बसल्याचे भान राहत नाही, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ट्विटरवरील Viral Baba या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. दरम्यान, आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक जोडपी दिसतील. त्यांपैकी काही जोडपी बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदाराशी अश्लिल गोष्टी करताना दिसतात. त्यांचे असे वागणे अनेकदा लोक इग्नोर करतात. पण कधीकधी ही जोडपी स्वतःचं इतके अती करतात की लोकांनी नाही म्हटले तरी, लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जातेच. असेच काहीसे एका जोडप्याच्या बाबती घडले.
करून धृतराष्ट्र पुत्र कालवश झाले. तेव्हां आतां आम्हांला गति तरी कोणती मिळणार ? दुर्योधन खरोखर भाग्यवान् होय, कारण आपली ही दुरवस्था पहाण्यास तो राहिला नाहीं. तुमच्या घाताला मींच कारण असून मित्रवधाचेंहि पाप मजकडून घडलें आहे. दुःखित होऊन भूमीवर पडलेल्या तुम्हांला पहात असतां मला शांति मिळणे शक्य नाहीं. कुलकलंक असा दुष्ट दुर्योधन आपल्या सैन्यासह व बन्धुगणांसह क्षत्रियोचित अशा या युद्धांत वध पावला; तुम्हांला भूमीवर पडलेले पहाण्याला तो आज येथें नाहीं; म्हणून मला मरणच श्रेयस्कर वाटतें, जगणे तसे वाटत नाहीं. मला सुद्धां जर शत्रूंनीं बंधूंसह युद्धांत ठार केलें असतें, तर बाणांनीं विद्ध होऊन दुःख पावत असलेल्या तुम्हांला पहाण्याचें माझ्या दैवीं आले नसतें ! खरोखर आम्हीं पापीच जन्मास आलों म्हणावयाचे ! महाराज, आतां या लोकीं तर नाहींच, पण निदान परलोकीं तरी आम्हीं त्या पापापासून कसे मुक्त होऊं हें सांगा. माझें प्रिय करावें असें जर तुम्हांला वाटत असेल, तर एवढे करा. (२) भीष्मः - युधिष्ठिरा, वस्तुतः तूं कालादिकांच्या अधीन असतां स्वतःलाच कर्माचें कारण कसें बरें मानतोस ? हा विचार मोठा गूढ व सूक्ष्म आहे. याविषयीं मृत्यु व गौतमी यांचा काळ, लुब्धक आणि सर्प यांशीं झालेला प्राचीन संवाद सांगत असतात. युधिष्टिरा, गौतमी नांवाची एक वृद्ध व शांतवृत्तीची स्त्री होती; तिचा पुत्र सर्पानें दंश केल्यामुळे मरण पावला. त्याच्या मृत शरीराकडे ती पहात असतां, अर्जुन नांवाचा एक लुब्धक त्या सर्पाला पाशांनी बांधून तिजकडे घेऊन आला आणि तिला म्हणाला, " हाच तो तुझ्या पुत्राला मारणारा दुष्ट सर्प. हे महाभागे, याला आतां मीं कोणत्या रीतीनें ठार करूं, तें सांग. याला अनींत जाळून मारूं, कीं शस्त्रानें याचे तुकडे करूं ? बालकाचा वध करणारा हा दुष्ट जीवंत रहाण्यास मुळींच पात्र नाहीं. गौतमीः - हे अर्जुना, तूं या सर्पाला सोडून दे. तुला वस्तुस्थितीची जाणीव नाहीं. हा सर्प वध होण्यास पात्र नाहीं. पुढे काय होणार याचा विचार न करतां निष्कारण पापाचें ओझें शिरावर कोण बरें घेईल ? अरे, धर्माच्या साह्याने लोक शोकसागर तरून जातात, पण पापाचा भार अंगावर घेतल्यास तेच पाण्यांत पडलेल्या शस्त्राप्रमाणे त्यांत बुडून जातात. अरे, याला मारल्यानें माझा पुत्र जीवंत होईल काय ? आणि याला जीवंत ठेवल्यास तुझें तरी काय वांकडे होणार आहे ? याला ठार केल्यास मात्र तुला नरकाची प्राप्ति होईल. लुब्धकःचांगले वाईंट जाणणाज्या हे देवि, मोठे लोक इतरांच्या दुःखाने दुःखित होतात हें मीं जाणतों. पण असले हे उपदेश ज्यावर कठिण प्रसंग आला नाहीं, तोच करतो. यास्तव मीं या सर्पाचा वध करणार. ज्यांना शांतिच केवळ पाहिजे, ते कालान्तरावर भिस्त ठेवितात, पण ज्यांना तत्काळ अर्थसिद्धि पाहिजे असते, ते त्याच रीतीनें वागून दुःखपरिहार करून घेतात. यास्तव मीं या दुष्ट सर्पाला मारून टाकितों, तूं दुखः सोडून दे. गौतमीः- बाबारे, आमच्यासारख्यांना दुःखच होत नाहीं. सज्जन लोक नित्य धर्मपरच असतात. हा माझा पुत्र केव्हांतरी मरावयाचा होताच. तेव्हां या सर्पाचा वध करण्यास संमति देणें मला शक्य नाहीं. ब्राह्मणांना कधीं रागच जर येत नाहीं, तर रागामुळे ते कोणाला यातना तरी कशी देतील ? तर हे साधो, थोडा मऊपणा धारण कर आणि या सर्पाला क्षमा करून सोडून दे. लुब्धकः - असें नाहीं. शत्रूला मारल्यानेंच परलोक हित होतें. हा लाभ जो करून घेतो, त्यालाच सर्वांत श्रेष्ठ समजतात. हा सर्प दुष्ट असल्यामुळे याच्या वधानेंच खरा लाभ होईल. पण याला न मारिल्यानें तो तुला होणार नाहीं. गौतमीः - शत्रूला पकडून मारल्याने काय बरें मिळणार ? आणि त्याला सोडून न दिल्यानें अशी इष्टप्राप्ति तरी काय होणार ? यास्तव या सर्पाला मी क्षमा कां न करावी ? आणि याची मुक्तता तरी काय म्हणून करूं नये ? लुधब्कः-गौतमि, या एकाचा वध करून इतर अनेकांचें रक्षण करावयाचें आहे; अनेकांपासून कांहीं याचें रक्षण करावयाचें नाहीं. धर्मंश लोक अपराध्याचा त्यागच करतात, तरी या सर्पाला तूं ठार कर. गौतमीः- लुब्धका, या सर्पाला ठार केलें असतां माझा पुत्र पुनः जीवंत होईल असें नाहीं हें जर निश्चित, तर त्याला मारावयाला मला तर कांहीं कारण दिसत नाहीं, तरी त्याला सोडून दे. लुब्धकः - गौतमि, देवराज इंद्र वृत्राला मारून मोठा झाला. प्रत्यक्ष शंकरानेंहि यज्ञाचा विध्वंस केला, तेव्हांच तो भाग्यशाली झाला. म्हणून तूंहि त्या देवांचें अनुकरण कर आणि निःशंकपणें या सर्पाला सत्वर मारून टाक. भीष्मः - याप्रमाणे लुब्धकानें गौतमीला पुनः पुनः सांगितलें असतांहि तिला सर्पाला मारून टाकण्याची बुद्धि झाली नाहीं. तेव्हां संकटग्रस्त असा तो पाशानीं जखडलेला सर्प हळुहळू श्वास टाकीत धीर धरून मनुष्यवाणीनें बोलूं सर्पः- हे अर्जुना, मीं पराधीन आहे व अगतिक अशा मला मृत्यूनें प्रेरणा केल्यामुळे मीं या बालकाला दंश केला, तेव्हां त्यांत माझा काय बरें दोष ? मीं कांहीं रागानें किंवा मनांत एखादा हेतु धरून याला दंश केला नाहीं. यास्तव यांत पाप असलेंच तर मृत्यूला तें आहे, मला नाहीं. लुब्धकः - हे सर्पा, पराधीनपणें तूं पाप केलें असले, तरी प्रत्यक्ष तें तुझ्याच हातून घडलें असल्यामुळे तूंहि पापाचा धनी आहेस. मातीचें भांडें करण्यांत जशीं चाक, दांडा इत्यादि साधनें म्हणून लागतात, तसाच तूंहि या कामांत आहेस. तुझाहि संबंध पापाशीं आहे, म्हणून त्या अपराधामुळे तूं माझ्या हातून मरण्यास योग्य आहेस. पापाचें कारण तूं आहेस हें तूंहि म्हणतोस. सर्पः- दांडा, चाक, इत्यादि साधनें जर्शी परतंत्र असतात, तसाच मीं आहें. म्हणून तुझ्या म्हणण्याप्रमाणे पाहिले तरी मी दोषी ठरत नाहीं. आतां तुझें म्हणणें जरी असे असले, तरी मग मारण्याचीं आयुधादि साधनेंहि एकमेकांचीं प्रेरक असल्यामुळे, हा कार्यकारणभाव कोठपर्यंत न्यावयाचा ? म्हणून मीं दोषी नाहीं व त्यामुळे तूं मला पापी समजून मारणेंहि योग्य नाहीं. कारण यांत जर कोठें पाप असले, तर तें सर्वानाच आहे. लुब्धकः - हे सर्पा, या पापाला जर तूं कारण झाला नसतास तर तुझ्याकडे कर्तृत्वाचा दोषहि येता ना; पण ज्या अर्थी या बालकाला तूं मारिलें आहेस, त्या अर्थी तूं वघास पात्र आहेस असेंच मला वाटतें. दुष्ट कृत्य केलें असतांहि जर पापाचा दोषी कोणी होणार नसेल, तर मग निंद्य कर्म करण्याला हें सबळ कारणच होईल. यास्तव तूं फार कशाला बडबडतोस, तूं वधास पात्र आहेस. सर्पः- कार्यच करावयाचें नसल्यास, त्यासाठी लागणारी साधनसामग्री असली किंवा नसली, तरी त्याची क्रिया कशी घडेल ? यास्तव कोठें झालें तरी मूळ हेतूलाच प्राधान्य असल्यामुळे, तोच विशेषतः विचारांत घेतला पाहिजे. लुब्धका, या बालकवधाच्या बाबतींत तूं जर मला कारण समजत असशील, तर मला प्रेरणा करणारा जो दुसरा कोणी तोच पापी ठरला पाहिजे. लुब्धकः - हे दुष्ट सर्पा, दुष्टपणें या बालाचा नाश करणारा तूं माझ्या हातून मरण्यासच पात्र आहेस. व्यर्थ कशाला बडबड करतोस ? सर्पः - लुब्धका, यज्ञप्रसंगीं अनींत हविर्भाग टाकणाऱ्या ऋत्विजांना जसें त्या यज्ञांचें फळ मिळत नाहीं, तसें या बालकवधाचें फल मलाहि मिळणें योग्य नाहीं. भीष्मः - याप्रमाणे मृत्यूच्या प्रेरणेवरून सर्प बोलत असतां, प्रत्यक्ष मृत्यूच तेथें आला आणि सर्पाला म्हणूं लागला. मृत्युः - हे सर्पा, काळानें प्रेरणा केल्यावरूनच मीं तरी तुला दंश करावयास लाविलें म्हणून या बालकघाताचा हेतु तूं नाहींस, तसा मीहि नाहीं. वायु जसा मेघांना इकडून तिकडे ओढून नेतो, तसाच काल मला नेतो. मीं त्याच्या अधीन आहे. जे कांहीं सात्विक, राजस किंवा तामस गुण प्राणिमात्रांत असतात, ते सर्व कालामुळेच होत. या भूमीवर किंवा आकाशांत जे कांहीं स्थावरजंगम पदार्थ आहेत, ते सारे, हे सर्पा, कालस्वरूपीच आहेत. सारें जगच कालस्वरूपी आहे. या लोकीं ज्या प्रवृत्ति किंवा निवृत्ति दिसतात, किंवा त्यांचे जे परिणाम घडतात, त्या सर्वांना कालस्वरूपीच म्हटले आहे. सूर्य, चंद्र, विष्णु, जल, वायु, इन्द्र, अग्नि, आकाश, पृथ्वी, मित्रदेवता, पर्जन्य, वसु, अदिति, नद्या, समुद्र, ऐश्वर्य, विपत्ति, या सर्वांना कालच उत्पन्न करतो व कालच त्यांचा संहार करतो. हे सर्व तुला ठाऊक असतां, हे सर्पा, तूं मला दोषी म्हणतोस हें कसें ? आणि मग जर मी या स्थितींत दोषी असेन, तर तूंहि तितकाच दोषी आहेस. सर्पः - हे मृत्यो, तूं दोषी आहेस कीं निर्दोषी आहेस, असें मीं कांहींच म्हणत नाहीं. माझें म्हणणे एवढेंच कीं, तुझ्या प्रेरणेवरून मी या बालकाचा घात केला. या बाबतींत काल दोषी ठरो वा न ठरो. दोषी कोण हे मी ठरवीतच नाहीं. तो आपला अधिकार नाहीं. माझ्या बोलण्याचा हेतु एवढाच कीं, या बालकघाताचा दोष मजवरून काढून टाकावा, तसाच तो मृत्यूवरूनहि भीष्मः - मग तो सर्प अर्जुनाला म्हणाला, 'अरे तूं मृत्यूचें भाषण ऐकिलेंसना ? तरी आतां मला निरपराध्याला पाशांनीं जखडून ताप देणें तुला योग्य नाहीं. ' लुब्धकः-मी मृत्यूचें भाषण ऐकिलें तसें, हे सर्पा, तुझेंहि ऐकिलें, पण तेवढ्यावरून तूं निर्दोष आहेस असें कांहीं ठरत नाहीं. मृत्यु तसाच तूंहि या बालकाच्या घाताला कारण आहेस. दोघेहि कारण असतां, नाहीं म्हणून भागणार नाहीं. दुष्ट, क्रूर आणि सज्जनांना दुःख देणाऱ्या मृत्यूला धिक्कार असो ! पापाचें कारण होणाऱ्या तुज दुष्टाला मी आतां ठार करतों. मृत्युः -कालाच्या आज्ञेत वागणारे आम्ही तो सांगेल तेवढेंच करतों; आम्हीं पराधीन आहों. तुला जर योग्य विचार करतां येत असेल, तर तूं आम्हांला दोषी समजणार नाहींस. लुब्धकः मृत्यु व तूं असे तुम्ही दोघे जर कालाच्या आधीन आहां, तर उपकारकर्त्याविषयीं आनंद आणि अपकारकर्त्यांविषयीं द्वेष उत्पन्न तरी कां होतात, हे समजून घेण्याची माझी इच्छा आहे. मृत्युः - लुब्धका, जगांत ज्या कांहीं गोष्टी घडत असतात, त्या साज्या कालाच्या प्रेरणेनेंच होतात, हें मीं तुला पूर्वी सांगितले आहेच. तेव्हां आम्हीं दोषी नाहीं. भीष्मः - याप्रमाणे धर्माच्या अर्थाविषयींचा संशय उत्पन्न होऊन वाद चालला असतां, प्रत्यक्ष काल तेथें आला आणि सर्प, मृत्यु, लुब्धक व अर्जुन यांना उद्देशून बोलू लागला. कालः लुब्धका, स्वतः मी, हा मृत्यु, तसाच हा सर्प यांतील कोणीहि या बालकघाताचे प्रेरक नसल्यामुळे त्याचा दोष आम्हांला नाहीं. या मुलानें जें जें कर्म केलें तें तेंच आम्हांला प्रेरक झालें. अर्जुना, याच्या नाशाला दुसरे कोणीहि कारणीभूत नाहीं. हा आपल्या कर्मानेंच मरण पावला. कर्मच त्याच्या नाशाचें कारण. आम्ही सगळे कर्माधीनच आहों. सारे लोक कर्माचेंच फल भोगणारे आहेत. कर्मे जशीं एकमेकांना प्रेरक होतात, तसे आम्ही होतों. कुंभार मातीच्या गोळ्यांतून त्याला पाहिजेत त्या बस्तु जशा बनवितो, तसा मनुष्य आपण केलेल्या कर्माचेंच फळ उपभोगितो. प्रकाश आणि छाया यांचा संबंध जसा नित्य आहे, तसाच कर्म व त्याचा कर्ता यांचाहि नित्य संबंध असतो. याचा विचार करतां मी, मृत्यु, सर्प किंवा तूं आणि ही वृद्ध ब्राह्मणी गौतमी यांतील कोणीहि या बालाच्या नाशाला कारण नसून तो स्वतःच त्याचें कारण होय, असे दिसून येईल. भीष्म म्हणाला, युधिष्ठिरा, याप्रमाणें काळाचें भाषण चालले असतां, ती वृद्ध गौतमी सारे लोक कर्मानेंच बद्ध झालेले आहेत, असें समजून आल्यामुळे अर्जुनाला म्हणूं लागली. गौतमीः- माझ्या मुलाच्या मरणाला काल, मृत्यु किंवा सर्प यांतील कोणीहि कारण नसून, आपल्या कर्मानेंच तो नाश पावला आहे. जे कर्म मी केलें त्यामुळेच माझा पुत्र मरण पावला. तरी काल व मृत्यु यांनीं आतां आपआपल्या ठिकाण जावें; आणि अर्जुना तूं या सर्पाला सोडून दे. भीष्मः ३- मग काल, मृत्यु व सर्प हे सर्व आपआपल्या मार्गाने निघून गेले आणि अर्जुन व गौतमी हीं दोघेंहि शोकमुक्त झालीं. युधिष्ठिरा, ही कथा तूं ऐकिलीस, तरी आतां शांति धारण कर व शोकमग्न होऊं नको. सगळे जण आपआपल्या कर्मानें मिळणाऱ्या फलांचीच प्राप्ति करून घेतात. सर्व राजमंडळाच्या नाशाचें हें कर्म तूं केलेलें नाहीं, तसेंच दुर्योधनानेंहि नाहीं. कालाचाच हा सारा खेळ आहे असे समज. वैशंपायन म्हणाला, राजा, हें भीष्माचें भाषण ऐकून युधिष्ठिराचा खेद दूर झाला, आणि तो पुनः भीष्माला प्रश्न करूं लागला. १३.१.१. अध्याय २ रा [१ गृहस्थाला कोणत्या धर्मानें मृत्यु जिंकितां येतो असा युधिष्ठिराचा प्रश्न. २ भीष्माचें त्याला उत्तर; इक्ष्वाकुवंशी दुर्योधन राजाच्या सुदर्शना कन्येचा वृतान्त, अग्नीशीं तिचा विवाह; त्यांच्या सुदर्शन नामक पुत्राच्या गृहस्थाश्रमाचें वृत्त; अतिथिसत्काराचें महत्त्व. ] ( १ ) युधिष्ठिरः - हे पितामह, आपण सुज्ञ असून सर्व शास्त्रे जाणतां. तुमच्याकडून आणखीहि धर्म ऐकण्याची माझी इच्छा आहे. तरी कोणत्या धर्माचा आश्रय केला असतां गृहस्थाला मृत्यूवर विजय मिळवितां येतो तें सर्व मला तच्वतः सांगावें. (२) भीष्मः - या विषयासंबंधानें पूर्वीचा थोडा इतिहास आहे. तो असाःप्रजापति मनूला इक्ष्वाकु नांवाचा पुत्र असून त्याला पुढे सूर्यासारखे तेजस्वी असे शंभर पुत्र झाले. त्यांतील दहावा पुत्र दशाश्व नांवाचा होता. तो धर्मशील आणि पराक्रमी असून माहिष्मतीचें राज्य करी. त्याचा मदिराव नांवाचा मुलगा फार धार्मिक, सत्यवक्ता, तपस्वी व दानशूर असून धनुर्वेद तसेच इतर वेद यांत निष्णात होता. मदिराश्वाला द्युतिमान् हा पुत्र झाला. तो फार भाग्यवान् तेजस्वी व बलवान् होता. द्युतिमानाचा मुलगा सुवीर हा सर्व लोकांत प्रख्यात असून फार धार्मिक वृत्तीचा होता. त्याचा कोश मोठा असून तो जणूं दुसरा इन्द्रच वाटे. सुवीराचा पुत्र दुर्जय. तो सर्व शस्त्रधाज्यांत प्रसिद्ध होता. दुर्जयाला आश्विनीकुमारांप्रमाणें सौंदर्यशाली असा दुर्योधन नांवाचा मुलगा होता. तो रणांगणांतून कधींहि माघारा फिरणारा नव्हता. त्याच्या राज्यांत इन्द्र श्रीमन्महाभारतार्थ - १३ अनुशासनपर्व. अ. २. नित्य हवी तशीच वृष्टि करी, त्यामुळें तें धन, धान्य, पशु इत्यादि संपत्तीनें परिपूर्ण असे. त्याच्या राज्यांत कृपण, दरिद्री, रोगी, कृश, असा कोणीहि माणूस दिसत नसे. तो स्वतः नम्र, गोड बोलणारा, क्षमाशील, इंद्रियांचें नियमन करणारा, धर्मशील, कनवाळू, पराक्रमी पण बढाई न मारणारा असा होता. तो बुद्धिमान् इंद्रियदमन करणारा, ब्राह्मणांविषयीं आदर बाळगणारा, सत्यप्रतिज्ञ असून त्यानें यज्ञ केले होते. तो कोणाचा अपमान करीत नसे, तसाच तो दानशूर असून वेदवेदांगांत निष्णात होता. पवित्र अशा देवनदी नर्मदेचें त्याच्यावर प्रेम बसलें व ती त्याची पत्नी झाली. त्यांना पुढे अत्यंत सुंदर अशी कन्या झाली व तिचें नांव सुदर्शना असेंच तिच्या रूपाला जुळते असे ठेवण्यांत आलें. युधिष्टिरा, तिच्याइतकी सुंदर स्त्री पूर्वी झालीच नव्हती. त्या राजकन्या सुदर्शनेवर अग्निदेवाचें प्रेम बसल्यामुळें तो ब्राह्मणरूपानें येऊन दुर्योधन राजाजवळ तिला मागणी घालूं लागला. पण हा दरिद्री व ब्राह्मण म्हणून असवर्ण होय असे समजून दुर्योधनानें त्या ब्राह्मणाचें म्हणणे मान्य केलें नाहीं. तेव्हां राजाचा यज्ञ चालू झाला असतां, अग्नि एकाएकीं गुप्त झाला; ते पाहून राजा दुःखी झाला आणि ब्राह्मणांना म्हणाला, 'हे विप्र हो, कृतघ्न पुरुषांवर केलेले उपकार व्यर्थ जावेत तसा आपला अग्नि नष्ट झाला आहे. तेव्हां मजकडून किंवा तुमच्याकडून कांहीं दुष्कृत्य घडलें कीं काय? माझ्या दृष्टीनें तर तसें कांहीं अल्पहि दुष्कृत्य दिसत नाहीं. पण बारकाईनें त्याचा विचार केला पाहिजे.' राजाचें हैं भाषण ऐकून ते ब्राह्मण कांहींएक उत्तर न देतां नम्रपणें अग्नीलाच शरण गेले. तेव्हां अग्नीनें शरहतूंतील सूर्याप्रमाणें तेजस्वी होऊन त्यांना दर्शन दिले आणि तो त्यांना म्हणाला, " दुर्योधनाच्या कन्येला बरण्याची मला इच्छा आहे." हे ऐकून ब्राह्मण दुसऱ्या दिवशीं सकाळीं राजाकडे गेले व त्यांनीं अग्नीचें म्हणणें त्याला कळविलें. त्यांचें बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि अग्नीची मागणी त्यानें मान्य केली. पण उलट अनि आपल्याजवळ नित्य रहाबा असेंहि त्यानें मागून घेतलें व अम्मीनेंहि तें मान्य केलें. तेव्हांपासून माहिष्मती नगरींत अग्नि नित्य दिसून येतो. मग दुर्योधनानें कन्येला सुंदरवस्त्रालंकारांनीं भूषित करून महात्म्या अग्नीच्या स्वाधीन केलें व अग्नीनेंहि यज्ञांतील घृताच्या धारेप्रमाणे तिचा बेदनिर्दिष्ट बिधीनें स्वीकार केला. तिचें रूप, शील, कुल, सौंदर्य इत्यादिकांनीं अनि अगदीं संतुष्ट झाला व तिला पुत्र व्हावा अशी त्याला इच्छा झाली. तदनुसार तिला
गुंड सचिन शिंदेचे श्रद्धांजली फलक लावणाऱ्यांना पोलिसांचा दणकून प्रसाद...\nAbhivan Deshmukh is active in breaking the cycle of bullying\nकुख्यात गुंड सचिन शिंदेच्या हत्येनंतर श्रद्धांजलीचे फलक लावणाऱ्या युवकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.\n15 Feb, 2021, 11:45 am\nशिक्रापूर (जि. पुणे) : कुख्यात गुंड सचिन शिंदेच्या हत्येनंतर श्रद्धांजलीचे फलक लावणाऱ्या युवकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांनी या युवकांना चोप देऊन त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले आहेत. शिक्रापूर, कोरेगाव, कोंढापूरी, वढू बुद्रूक, चौफुला, तळेगाव-ढमढेरे या गावांमध्ये मोठे फलक लावण्यात आले होते.\nजिल्हा पोलिस अधिक्षक अभिवन देशमुख यांनी पुणे-नगर महामार्गावरील गावांमधील गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पोलिसांचे गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष आहे. संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.\nहेही वाचा : ते जिवंत सापडण्याची शक्यता धूसर, आतापर्यंत ५४ मृतदेह हाती...\nखून, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे असे गुन्हे दाखल असलेल्या गुंड सचिन शिंदे याची पाच दिवसांपूर्वी लोणीकंद येथे हत्या करण्यात आली. शिक्रापूर व लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो एका हत्या प्रकरणातून काही महिन्यांपूर्वीच येरवडा कारागृहातून सुटला होता.\nà¤2तà¤3⁄4दीदी, ठ̧चिठ̈ ठ̈à¤μ्à¤1े à¤à¤3⁄4जà¤aच्ठ̄à¤3⁄4 आठ̄टी ठ̧ेà¤2ची चौकशी... #Sarkarnama #LataMangeshkar #SachinTendulkar #AnilDeshmukh #FarmersProstests #CelebrityTweetshttps://t.co/YTb4ttrazQ\n— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 15, 2021\nपुणे-नगर महामार्गावरील वाघोली, लोणीकंद, पेरणे, कोरेगाव-भिमा, तळेगाव-ढमढेरे, कोंढापूरी, रांजणगाव, कारेगाव, वढू, आपटी, वाजेवाडी, करंदी, पिंपळे-जगताप, चौफुला याभागात शिंदे याला माननारे अनेक युवक आहेत. शिंदेने स्थापन केलेल्या एका ग्रुपचे शेकडो युवक सदस्य आहेत. त्यामुळे त्याची हत्या झाल्यानंतर या गावांमध्ये शिंदेवर स्तुतीसुमने उधळणारे व त्याच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे अनेक फलक लावण्यात आले.\nआज सकाळी या सर्व फलकांची पोलिसांकडून माहिती घेण्यात आली. या फलकांवर नावे असलेल्या युवकांना शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेवून सर्वांना चोप देण्यात आला. या शिवाय या सर्वांवर सरकारी जागेचे विद्रुपीकरण तसेच याच अनुषंगाने काही गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अटकही करण्यास सुरूवात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली. सुरज तिखे (शिक्रापूर), शुभम मांजरे (चौफुला), मोन्या उर्फ शुभम भंडारे (वढू बुद्रूक) यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे तावसकर यांनी सांगितले.\nस्वतंत्र पथक स्थापन...\nगंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडांचे उद्दातीकरण किंवा त्यांच्या नावाचे फलक झळकविणाऱ्या युवकांवर यापुढे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले असून कारवाई सुरू केली आहे. पुढील काळात अशा युवकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा तावसकर यांनी दिला.
चाळीसगाव प्रतिनिधी । जगप्रसिद्ध छायाचित्रकार कलामहर्षी केकी मूस यांच्या कलाकृती या जगाच्या नकाशावर याव्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील कलाप्रेमींना त्या पाहता याव्यात यासाठी कलादालनाच्या वतीने व्हर्च्युअल आर्ट गॅलरीचे निर्मिती करण्यात आली असून तीचा लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. जागतिक दर्जाचे कलाकार बाबूजींचा हा समृद्ध कलाकृतीचा ठेवा व त्यांची जागतिक वारसा स्थळ असलेली अमूल्य इमारत जगाच्या पाठीवर सर्वांना बघता येणार असल्याने चाळीसगाव तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार असल्याचा आनंद असल्याची भावना उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्ष तथा कलामहर्षी कै.केकी मूस कलादालन व सांस्कृतिक केंद्राच्या विश्वस्त संपदाताई पाटील यांनी व्यक्त केला आहे. आज दुपारी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात कलामहर्षी केकी मूस आर्ट व्हर्चुअल गॅलरीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला संस्थेचे सचिव कमलाकर सामंत, संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार संजय सोनार ,व्यापारी आघाडीचे अजय वाणी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूदादा पगार, मंदार सामंत ,स्वप्नील देशमुख ,ग्रंथपाल मनोज घाटे, अनिल चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला कलामहर्षी केकी मूस यांच्या जीवन प्रवास तसेच आर्ट गॅलरीविषयी भूमिका मांडली. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून कलामहर्षी केकी मूस आर्ट गॅलरी कलादालन व सांस्कृतिक केंद्रासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला असुन आज येथे भव्य-दिव्य इमारत साकारली गेली असून या इमारतीमध्ये जागतिक दर्जाच्या कलाकृतीचा नजराणा भावी कलाकारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. अशी भावना आपल्या प्रास्ताविकात सचिव कमलाकर सामंत यांनी विशद केली. संपदाताई पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप वरील कळ दाबून आर्ट गॅलरी जागतिक कलाप्रेमींना कलाकृती पाहण्यासाठी सुरू करण्यात आली. याप्रसंगी संपदाताई पाटील पुढे म्हणाले की सध्याच्या कोरोना महामारीमध्ये डिजिटल ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार वेगाने वाढत असताना जागतिक दर्जाची आर्ट गॅलरी एका क्लिकवर जगाच्या कानाकोपऱ्यातील कलाप्रेमीला पाहता येणार आहे. स्व. बाबूजींच्या अनमोल कलाकृती त्यांची जागतिक दर्जाचे छायाचित्रे, विविध पैलूंचे त्यांचे जीवन सचित्र बघावयास मिळणार आहे, जागतिक दर्जाचे कलाकृती देणाऱ्या बाबूजी यांच्या गॅलरीच्या आज जागतिक हेरिटेज दिनानिमित्त लोकार्पण होत आहे. संस्थेचे सचिव कमलाकर सामंत व त्यांचे सर्व सहकारी यांनी हा अमूल्य ठेवा जतन करुन ठेवल्याबद्दल संपदाताई पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले ज्येष्ठ पत्रकार संजय सोनार यांनी आभार मानलेे.
यशस्वी वैद्यकीय व्यवसायी असतानाच येथील हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी त्यांचे जन्मगाव असलेले अंजनगाव बारी येथे गरजुसांठी दोन शौचालयांचे बांधकाम करून दिले. अमरावती : यशस्वी वैद्यकीय व्यवसायी असतानाच येथील हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी त्यांचे जन्मगाव असलेले अंजनगाव बारी येथे गरजुसांठी दोन शौचालयांचे बांधकाम करून दिले. आपल्या मूळ गावाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना ठेवून ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांनी समाजभान ठेवत हे कार्य केले. शिवाय हागणदारीमुक्तीच्या मोहिमेत सहभागी होऊन सामाजिक जबाबदारीही पार पाडली. सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते ही दोन्ही शौचालये हस्तांतरित करण्यात आलीत. येथील दिव्यांग नागरिक रतन सुरजुसे व विधवा वच्छला खडसे यांना हे शौचालय हस्तांतरित करण्यात आले आहे. हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत नेहमीच विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवित असतात. शासनाने शंभर टक्के गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. याअनुषंगानेच निचत कुटुंबाने येथील दोन गरजुंना स्वखर्चाने शौचालये उभारून दिली आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. गावातील शेतीच्या सिंचनाची याकरिता शेततळे व विहिरींच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार बगळे, हद्यरोगतज्ज्ञ मनोज निचत, अंजनगावबारी येथील सरपंच मंदा कळंबे, उपसरपंच लक्ष्मण कदम पंचायत समिती सदस्य मीनल डकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज निचत यांनी केले. संचालन नीलेश दातीर यांनी, तर आभार वसंत सोनार यांनी मानले. गावातील चार गरीब व गरजू कुटुबीयांना शौचालय बाधूंन देण्याचा यानंतरही आपाला संकल्प असल्याचे मत मनोज निचत यांनी व्यक्त केले. ( प्रतिनिधी)
हा दिवा दहा दिवस विझु दिला जात नाही. Also Check: Top 10 Happy Ganesh Chaturthi Wishes Images Quotes Messages Shayari SMS. Please: आम्हाला आशा आहे की हा नवरात्री / Navratri Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच .... सर्व देवांच्या आधी भगवान गणेश यांचे पूजन केले जाईल असा आशीर्वाद ब्राह्मणी भगवान गणेशला दिला होता. अनुकूल बातम्या कळतील. तसच दिवाळी हा प्रकाशाचा आणि उत्साहाचा एक सण आहे जो दस.या नंतर 20 दिवसांनी साजरा केल्या जातो. आनंदाची बातमी मिळेल....अधिक वाचा, पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. गणेश चतुर्थी हा सण 11 दिवस चालणारा भारतातील सर्वात मोठा सण आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात. नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसांमधे दुर्गेची पुजा केली जाते जीला उर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातं. गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वच राज्यांमध्ये साजरा केला जातो पण मुख्यतः महाराष्ट्रामध्ये हा सण खूपच मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतो कारण केले गणेश चतुर्थीची सुरुवात महाराष्ट्र मधून झाली याचे सर्व श्रेय लोकमान्य टिळक यांना जाते. प्रत्येक दिवशी या घटावर फुलांची माळ सोडली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ... सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ... दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ... वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. नंतर भाविक त्यांना नवे वस्त्र आणि भेटवस्तु देखील देतात. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा....अधिक वाचा, प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. गणेश चतुर्थीचा हा दहा दिवसांचा काळ महत्वपूर्ण असतो, यादिवशी साक्षात भगवान श्री गणेश आपल्या घरांमध्ये स्थान बंध होतात. गणेश चतुर्थीची तयारी काही दिवस अगोदर सुरू केली आहे. या दिवशी लंकाधीश असुर रावणाचा पुतळा बनवुन त्याचे दहन केले जाते. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल...अधिक वाचा, महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. भाविक या दिवसांमधे देवीचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे कार्य समजतात. नवरात्री गरबा भारतात नृत्याचा सर्वाधीक प्रसिध्द आणि लोकप्रीय प्रकार आहे, या नृत्याला महिला आणि पुरूष दोघेही सोबत करू शकतात. Ganesh Chaturthi Chi Mahiti Ani Mahatav गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे भारतातच नव्हे तर परदेशातही मध्ये राहणारे नागरिक सुद्धा या सणाला तितक्यात मोठ्या उत्सवात साजरा करतात. आणि त्यांच्याच प्रयत्नातून Ganesh Chaturthi या सणाला महत्त्व प्राप्त झाले. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. दहा दिवसाच्या पूजेनंतर अकराव्या दिवशी भगवान गणेश चे विसर्जन केले जाते. अनुकूल बातम्या कळतील. पुजेत पाच प्रकारची फळं ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो. Your email address will not be published. Happy Ganesha Chaturthi Images in Marathi. गणेश चतुर्थीला लोक दररोज लोक मंत्रोच्चार करतात आणि गाणे आणि आरती करून गणरायाची पूजा करताना. नृत्य साधारणतः महिलाच करतात पण वर्तमान काळात पुरूष देखील यात सहभागी होतांना दिसुन येत आहेत. दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. नवीन कामे, योजनांच्या...अधिक वाचा, शत्रू पराभूत होतील. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी. गरबाच्या सर्वसाधारण प्रकारात स्त्रिया गरबा खेळतांना डोक्यावर दिवे ठेवतात आणि गोल गोल फेर धरतात, फिरतांना त्या गाणे देखील म्हणतात आणि टाळया देखील वाजवतात. आपल्या भारत देशाचा संस्कृतीशी संबंध आहे आणि त्या संस्कृतीचा संबंध पुढे सुद्धा असणार आहे. Happy Vinayaka Chaturthi..!!! नवरात्री गरबा भारतात नृत्याचा सर्वाधीक प्रसिध्द आणि लोकप्रीय प्रकार आहे, या नृत्याला महिला आणि पुरूष दोघेही सोबत करू शकतात. अशा प्रकारे भगवान गणेशला पुन्हा जीवन मिळाले. नंतर त्या कन्यांना जेऊ घातले जाते. सार्वजनिक मंडळांमधे मोठया मोठया मुर्तींची स्थापना करण्यात येते. या सोबतच सुरेख आणि आकर्षक आभुषण देखील घालतात. सकाळ संध्याकाळ आरती आणि धुप पेटवला जातो. Shubh Ganesh Chaturthi. श्रीगणेशांना खूप मोठ्या उत्सवात घरामध्ये आणले जाते. वेळः खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो.ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. पूजा करणार्या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. या मिळालेल्या जोगव्यातुनच कुळाचाराच्या दिवशी स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो. गरबा खेळत असतांना मध्यभागी सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवले जाते त्यावर नारळ देखील ठेवतात जे पवित्र कंुभाचे प्रतिनिधीत्व करते. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. अष्टमीला होमहवन करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो. मंत्रः 'हे माता पृथ्वी! Pet Friendly Accommodation Tumut, Docbook Tutorial, City Of Westminster Uk, Navratri Colours 2019, Zino Davidoff, Caduceus Wine Review, 2011-12 Premier League, Keep Calm Images And Quotes, Cmt Music Awards 2020, Ilovemakonnen Dead, Story Outline Worksheet, Jacarepaguá Circuit, Gone Girl Hbo, Bangkok Fair 2020, Is Kate Middleton A Princess Or Duchess, Satudarah Mc Documentary, What Happened To Reed Flake Youtube Channel, The Voices (2020 Film), Iracing Community, Ronaldo Top Speed 2020, Kenny Beats Contact,
Video : थेट सिंहासमोर जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागला हा व्यक्ती - Majha Paper\nजरा हटके, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / दिल्ली, प्राणी संग्रहालय, सिंह / February 20, 2022 February 20, 2022\nदिल्लीच्या एका प्राणी संग्रहालयात एक हैराण करणारी घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती थेट सिंहाच्या कुंपणातच उडी मारून त्याच्या समोर जाऊन बसला. यावेळी सिंह त्याच्या अंगावर देखील आला मात्र त्या व्यक्तीला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.\nया व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नसून, निजामुद्दीन पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीचे मानसिक आरोग्य व्यवस्थित नाही. या 28 वर्षीय व्यक्तीचे नाव रेहान खान असून, तो बिहारचा आहे.\nसोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हे वेडेपणाचे कृत्य असल्याचे म्हटले तर काहींनी या व्यक्तीच्या हिंमतीला दाद दिली.\nकाही दिवसांपुर्वी अमेरिकेतील महिलेचा देखील अशाच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. महिलेने सिंहासमोर उड्या मारत त्याला चिढवण्याचा प्रयत्न करत होती. या व्हिडीओनंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.
दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीची मोजणी, नव्या मालकाने सांगितलं जमिनीचा वापर कसा करणार\nHomeदाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीची मोजणी, नव्या मालकाने सांगितलं जमिनीचा वापर कसा करणार\nCrime News Report April 08, 2021 0\nसाफेमाच्या (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सी) अधिकाऱ्यांच्या उपस्थित जमिनीची मोजणी होत आहे. (Dawood Ibrahim Ratnagiri Mumbke Property)\nरत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबके गावातील मालमत्ता लिलावानंतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मालमत्तेचे नवे मालक वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी जागेचा वापर कसा करणार, याचा मानसही बोलून दाखवला. (Dawood Ibrahim Konkan Ratnagiri Mumbke Property bought by Delhi Lawyer)\nसाफेमाच्या (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सी) अधिकाऱ्यांच्या उपस्थित जमिनीची मोजणी होत आहे. भूमी अभिलेख विभागाने ही मोजणी सुरु केली. जमिन मोजणीची प्रकिया आणखी दोन दिवस चालणार आहे. लिलावात मालमत्ता विकत घेतलेले वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज या मोजणीसाठी मुंबके गावात दाखल झाले आहेत.\nदहशतवाद विरोध पथकाचे उपक्रम राबवणार\nभारद्वाज यांनी लिलावात विकत घेतलेल्या जागेची पाहणी केली. प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. जमिन नावावर करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे या मालमत्तेचा उपयोग दहशतवाद विरोध पथकासारखे उपक्रम राबवण्यासाठी करण्याचा मानस भूपेंद्रकुमार यांनी बोलून दाखवला.\nदाऊदच्या मालमत्तेची विक्री कितीला\nदिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या आहेत. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या आहेत. तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे.
आगामी निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. यादरम्यान, शरद पवार यांनीही मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जवानांच्या वाहनांवर जेंव्हा हल्ला झाला, तेंव्हा देशभरातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी लष्काराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा तसेच राजकारण आणायचे नाही असा निर्धार केला. मात्र सत्तेतील लोकच त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. हल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलविली. पण प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, भाजपचे पक्ष प्रमुख अशी मंडळी उपस्थित नव्हती. असे शरद पवार यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हल्यानंतरही कामांची उद्घाटने करत, पक्षाचा प्रचार करत फिरत होते. तरीही आम्ही त्यावर टिका केली नाही. निवडणुका येतील आणि जातील. अशा कठीण प्रसंगात लष्कराच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे. याचबरोबर, मोदी सरकार शहिद झालेल्या जवानांच्या त्यागाचा राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवित असून ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. असेही त्यांनी म्हंटले. मोदी सरकारने, सर्वसामान्यांच्या हिताचा कारभार केला नाही तर आपल्या लोकांच्या फायद्यासाठी सत्तेचा गैरफायदा घेतला. अशा प्रवृत्तींना दूर करण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. असे म्हणत मोदींनी सरकारच्या कामाचा पंचनामा करुन तो जनतेसमोर मांडावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, आर. के. पोवार आदी उपस्थित होते. केंद्र सरकारची मोठी घोषणा , ग्रॅच्युइटी करमुक्त !
एमपीसी न्यूज - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरजू, होतकरू आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा मानस आहे. यासंदर्भात ठाणे येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. ठाणे येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे नव्याने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने या इमारतीमधील व्यवस्था, सोयीसुविधा आणि संरचना आदींची पाहणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप, समन्वयक गिरीष झेंडे, व्याख्याते अरुणराज जाधव, कौस्तुभ बोंद्रे, व्याख्यात्या अमिषा मायावी आदींचा समावेश होता. यानंतर शिष्टमंडळाने महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या समवेत नवीन प्रशासकीय प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीबाबत विस्तृतपणे चर्चा केली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या चर्चेवेळी क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा विभागाचे राजेंद्र नागपुरे आदी उपस्थित होते. विकास ढाकणे यावेळी म्हणाले, सध्या महापलिकेच्या वतीने विविध भागात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले आहेत, तेथे अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. शहरातील गरजू, होतकरू आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता, गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे सामर्थ्य असूनही प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळविण्याच्या प्रयत्नांना बळ देता यावे आणि स्पर्धा परीक्षांद्वारे त्यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जावे यासाठी मनपा हद्दीत प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक विविध विषयांबाबत तज्ञांचे मार्गदर्शन करण्याची सोय उपलब्ध असेल. शिवाय आवश्यक पुस्तके देखील येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या केंद्रामध्ये कोणकोणत्या सोयी असाव्यात, प्रवेश प्रक्रिया कशी असावी, रचना कशी असावी आदींबद्दल शिष्टमंडळाने मार्गदर्शन आणि सूचना केल्या.
बीड : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आता भारतही कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली आहे. महाराष्ट्रात आज पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ४१ झाली आहे. पिंपरी चिंचवड आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शासनासोबत समाजातील काही व्यक्तींनी आपली जबाबदारी लक्षात घेत काही कार्यक्रम रद्द करण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे. असा एक पुढाकार बीड येथील बीड येथिल प्रसिद्ध संगीतशिक्षक, गायक सुदर्शन धुतेकर यांनी घेतला आहे. बीड येथील प्रसिद्ध संगीतशिक्षक, गायक सुदर्शन धुतेकर यांचा मुलगा युवा उद्योजक कौशिकचा शुभविवाह १९ मार्चला योजिला होता. पण त्यासाठी त्यांनी मंगल कार्यालयही बूक केले होते. पण आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करून घरीच मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होणार आहे. धुतेकर कुटुंबाने घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे. घरातले पहिले मंगलकार्य असल्यामुळे काही महिन्यांपासून तयारी सुरू होती. मोठ्या थाटामाटात हा सोहळा होणार होता. परंतु ऐनवेळी आलेले कोरोना संकट लक्षात घेऊन हा सोहळा पुढे न ढकलता घरीच करायचे ठरवले. तसेच बाहेर गावच्या नातेवाईकांना, मित्रांना न येण्याची विनंतीही केली. शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत ,सामाजिक भान जपत धुतेकर आणि कुलकर्णी परिवाराने घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. संपर्क टाळणे हाच कोरोनापासून बचाव आहे. कौशिक-श्रावणी यांनीही या लग्नाला होकार दिल्याने सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
Mangalgad, Sahyadri,Shivaji,Trekking, Hiking,Marathi,Maharastra\nमंगळगड (Mangalgad) किल्ल्याची ऊंची : 2475\nसह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्यांनी नटलेला आहे. या जावळीच्या खोर्यावर मोरे घराण्याने पिढ्यान पिढ्या राज्य केल त्यांना "चंद्रराव" हा किताब मिळाला होता.\nसावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्यातील भोप घाट, वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला.\nकांगोरी गड चंद्रराव मोर्यांनी जावळीच्या खोर्यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून "मंगळगड" ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी 'मंगळगड' जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अधिकार्यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.\nपूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट असलेल्या मंगळगडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. प्रवेशद्वाराबाजूचे भग्न बुरुज आणि तटबंदी मात्र अजुन शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याकडे जाते व डाव्या बाजूची वाट पूर्वपश्चिम पसरलेल्या माचीवर जाते. माचीवर कांगोरी देवीचे मंदीर आहे. मंदीराकडे जाताना उजव्या हाताला दगडात खोदून काढलेल पाण्याच टाक लागत. या टाक्यात उतरण्यासाठी दगडात खोदून काढलेल्या पायर्या आहेत.\nडाव्या हाताला दगडात कोरलेल पण आता बुजलेले टाक दिसत. या टाक्याजवळ किल्ल्यावर सापडलेल्या अनेक मुर्ती ठेवलेल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदिर दगडी जोत्यावर बांधलेले आहे. १० पायर्या चढून मंदिरात गेल्यावर प्रवेशद्वाराची विटांनी बनवलेली अर्धवर्तुळाकार कमान दिसते. देवळावरील मुळ छत काळाच्या ओघात नष्ट झालेल आहे. गाभार्यात भैरवाची व कांगोरी देवीची अशा दोन दगडी मूर्त्या आहेत. मंदीराच्या गाभार्याबाहेर भिंतीला टेकून दगडी भग्न मूर्त्या ठेवलेल्या आहेत.\nमंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर आपण अरुंद होत जाणार्या माचीच्या टोकावर पोहचतो. या माचीला दोनही बाजूंनी तटबंदी बांधून काढलेली आहे. माचीच्या टोकावर विस्तिर्ण अर्धगोलाकार बुरुज व ध्वजस्तंभ आहे. माचीच्या या टोकावरुन विस्तिर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.\nमाचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाताना कड्याच्या टोकाला एक अरुंद पाण्याचे टाक दिसत. बालेकिल्ल्यावर पाण्याच विस्तिर्ण टाक आहे. तेथून वर चढून गेल्यावर दोन वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एका वाड्याच दगडी जोत फक्त शिल्लक आहे, दुसर्या वाड्याच्या पडक्या भिंतीही शाबूत आहेत. वाड्याच्या मागील वाट आपल्याला पश्चिम टोकावरील बुरुजावर घेऊन जाते. किल्ला चढताना किल्ल्याचे नाक सतत दिसत असते. त्या नाकावर आपण पोहचलेलो असतो. बालेकिल्ल्याला फेरी मारतांना अजून दोन पाण्याची टाक दिसतात. यात बारमाही रुचकर पाणी असते. बालेकिल्ला उतरुन माचीवरील प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.\n१) ठाण्याहून रात्री सुटणार्या पिंपळवाडी बसने दुधाणेवाडी/कांगोरीगड या बस थांब्यावर उतरावे. बस थांब्यावरच कांगोरी सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच टेकडी आहे. मंदिरामागून शेताच्या बांधावरुन जाणारी वाट आपल्याला टेकडीच्या माथ्यावर अर्धा/पाऊण तासात घेऊन जाते. (टेकडीवर जाताना जेथे वाटेला २ फाटे फुटतात तेथे उजव्याबाजूची वाट पकडून टेकडीच्या माथ्यावर जावे. (डाव्या बाजूला जाणारी वाट मोठी (ठळक) आहे. परंतू ती डाव्या हाताला दूर दिसणार्या घराकडे जाते.) टेकडीच्या माथ्यावर विस्तिर्ण पठार आहे. हा झाला पहिला टप्पा. इथून डाव्या हाताला गडावर कांगोरी देवीचे मंदीर व समोर पश्चिम टोकावरील बुरुज दिसतो. त्या बुरुजाकडे तोंड करुन सरळ चढत जाणार्या वाटेने चालत गेल्यावर मध्ये छोटासा दगडांचा टप्पा(रॉक पॅच) पार करावा लागतो. तो चढून गेल्यावर आपण दुसर्या टप्प्यावर येतो. इथून डावीकडे जाणारी वाट आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. या टप्प्यावर उभा चढ चढावा लागतो.\nमुंबई, ठाण्याहून पिंपळवाडीला जाण्यासाठी थेट बस न मिळाल्यास महाड बस स्थानकातून बीरवाडीला जावे. तेथून बीरवाडी -पिंपळवाडी बस दर दोन तासांनी आहे. तसेच बीरवाडीतून माणशी रुपये २०/- दराने जीप किंवा १० आसनी रिक्षा दुधाणेवाडीत जाण्यासाठी मिळतात.\nपावसाळा सोडून इतर ऋतुत १० जणांची देवळात रहाण्याची सोय होऊ शकते.\nजेवणाची सोय गडावर नाही, स्वतः करावी.\nबारामाही पाण्याची सोय आहे.\nकिल्ल्यावर जाण्यास दुधाणेवाडीतून २ तास लागतात.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे निवडणूक प्रभाग निहाय सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी येणा-या खर्चासह विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांच्या विषयांना स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. शहरातील पथ विक्रेत्यांचे खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. साधारणपणे ३० दिवसांच्या कालावधीत सर्व्हेक्षण पुर्ण केले जाईल. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्व्हेक्षणाला सुरुवात होईल. सकाळी ८ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंतच्या दोन वेळांच्या सत्रामध्ये सर्व्हेक्षणाचे कामकाज केले जाणार आहे. प्रत्येक वॉर्डाच्या निवडणूक प्रभाग निहाय या कामाचे नियोजन असेल. सर्व्हेक्षण करताना खासगी संस्थेव्दारे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पथ विक्रेत्याचे त्याच्या व्यवसायासह छायाचित्र घेतले जाईल. शिवाय आवश्यक माहिती शासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये तसेच महापालिकेने विकसीत केलेल्या नमुन्यामध्ये भरली जाणार आहे. मनुष्यबळ, सर्व्हेक्षण, माहिती जमा आणि अपलोड करणे, ओळखपत्र देणे, पथ विक्रेता प्रमाणपत्र देणे आणि आवश्यकतेनुसार दुरुस्त्या करणे ही जबाबदारी संबंधित खासगी संस्थेची असणार आहे. याकामी महापालिकेच्या वतीने रितसर वृत्तपत्रीय जाहिरात देऊन इच्छुक संस्थांकडुन दर मागविण्यात येणार आहे. विहित केलेल्या अटी शर्तीनुसार शहरातील पथ विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणुक करण्यास आणि याकामी येणा-या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिकेच्या अ, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणा-या विविध उद्याने यांच्या देखभाल आणि संरक्षणासाठी सुमारे ५ कोटी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. कासारवाडी येथे सुमारे १ कोटी ९० लाख रुपये खर्च करुन भाजी मंडई विकसीत करण्यात येणार आहे. अ, ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात प्रभाग क्र. १९ तसेच २१ च्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ३४ लाख रुपये खर्च येणार आहे. प्रभाग क्र. ८ मधील जयगणेश साम्राज्य चौक ते क्रांती चौका पर्यंतच्या परिसरात फुटपाथ कलर पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. औंध वाकड सांगवी रस्त्यावरील मुळा नदीवरअस्तित्वात असणा-या ८ मीटर रुंदीच्या पुला शेजारी वाढीव २२ मीटर रुंदीचा पुल बांधण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये हा पुल उभारण्यासाठी येणारा खर्च विभागला जाणार आहे. दोनही महापालिकांमध्ये आपसात ठरल्यानुसार बांधकामाची निविदा काढणा-या अथवा पुलाचे बांधकाम करणा-या महापालिकेकडे ५० टक्के खर्च जमा करायचा आहे. हा पुल पुणे महापालिका बांधणार असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाटयाला येणारी सुमारे २० कोटी रक्कम पुणे महानगरपालिकेला अदा करण्यात येणार आहे. हा खर्च अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह. भ. प. बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री. शिंदे म्हणाले. महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.
टिबुकली(डॅबचिक) हा पाठीचा भाग भुर्या रंगाचा, पोटाकडे रेशमी पांढर्या रंगाचा, शेपटी नसलेला, गुबगुबीत असा साधारण कबुतराएवढा (२३ ते २९ सें. मी.) पाणपक्षी आहे. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात तर विणेच्या काळात नराच्या डोक्याचा आणि मानेचा रंग गडद तपकिरी होतो. टिबुकली संपूर्ण भारतासह, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान येथे जोडीने किंवा लहान थव्यात लहान-मोठ्या तलावात, झिलाणीत राहते. टिबुकलीच्या रंग आणि आकारावरून किमान नऊ उपजाती आहेत. भारतात आढळणारी एकमेव उपजात Tachybaptus ruficollis capensis ही आहे. टिबुकली हा पाणकीटक, बेडूक, अळ्या व इतर छोटे जलचर खाणारा पक्षी आहे. याचे घरटेही पाण्यात तरंगणारे व छोटे असते. ते काटक्यांचे बनविलेले असते. विणीचा हंगाम एप्रिल ते ऑक्टोबर असून टिबुकली मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढर्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती. नाशिक : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून यापुढे चांगले भोजन देण्याच्या अटी-शर्तीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले 'अन्नत्याग' आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेण्यात आल्याची माहिती वसतिगृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती. सोमवारी रात्री आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे, विद्यार्थी तसेच वसतिगृह प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अटी भोजन पुरवणा-या संस्थेकडे मांडून वसतिगृहातच हाताने बनविलेल्या पोळ्या बनवून देणे तसेच रोज जेवणात दिल्या जाणा-या भाजीचा दर्जा सुधराविण्याच्या अटीवर मंगळवारी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. पेठरोड एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात चारशेहून अधिक विद्यार्थी राहतात. इयत्ता सहावी ते १२वीपर्यंतचे ३५० विद्यार्थी शिक्षण घेतात भोजन पुरविण्याचा ठेका टाटा कंपनी सेंट्रल किचन संस्थेकडे दिला आहे. संस्थेकडून पुरवठा केले जाणारे भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सोमवारी दिवसभर जेवण नाकारले होते. भोजन पुरवठा करणा-या संबंधित कंपनीला वारंवार लेखी तक्रार करून जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करून शाळेचे प्राचार्य देवरे, गृहपाल एन. एस. चौधरी यांच्याकडे तक्रार करून आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. यापुढे वसतिगृह आवारातच हाताने पोळ्या बनवून देणार तसेच दैनंदिन जेवणात दिल्या जाणा-या भाजीत रस्सा भाजी दिली जाणार अशा अटींवर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेत मंगळवारी दुपारी भोजन घेतल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल चौधरी यांनी दिली.
18 वर्षावरील व्यक्तींनी कोरोना ची लस घेण्यासाठी काय करावे ? "शेवयांची स्वादिष्ट खीर रेसिपी" दिल्लीच्या गादीवर आजवर अनेक राजघराण्यांनी राज्य केले आहे. समग्र भारताचा जणू काय केंद्रबिंदूच दिल्लीची गादी हीच होती आणि हे सत्य सुध्दा आहे कारण ज्या घराण्याच्या ताब्यात दिल्ली चे राज्य असायचे त्यांचे ईतर राजे व प्रांतावर वर्चस्व असायचे. मध्ययुगीन भारतात तुघलक घराण्याचे दिल्लीवर राज्य होते ज्यांनी सुलतानशाही म्हणून भारतीय इतिहासात अनेक वर्ष राज्य केल्याचा उल्लेख आहे. तुघलक घराणेशाही काळात अगदी सुरुवातीच्या काळातील बांधलेला हा किल्ला आज जरी पडक्या व तुट फुट अवस्थेत असला तरी तत्कालीन काळातील पुष्कळश्या गोष्टींचा उलगडा ह्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिल्यावर होतो. ह्याच तुघलकाबाद किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही देणार आहोत, ज्यामध्ये मध्ययुगीन भारताची वास्तुकला व शासन पद्धतीचा इतिहास कुठेतरी जवळून प्रत्यक्ष अनुभवल्याचा नक्कीच भास होईल. तुघलकाबाद किल्ला हा जवळपास सहा किलोमीटर ईतके क्षेत्रफळाने व्यापून आहे , जो भारताची राजधानी दिल्ली येथे स्थित आहे. तुघलक घराण्याचा संस्थापक घैसुद्दिन तुघलक याने १३२१ साली या किल्ल्याची निर्मिती केली होती परंतु खूपच अल्प काळात म्हणजेच १३२७ साली त्याला हा किल्ला त्यागावा लागला. किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराला तुघलकाबाद म्हणून ओळखण्यात येते, तुघलक घराणेशाही काळात कुतुब - बदरपूर रस्त्याचे निर्मितीकाम झाले होते जो रस्ता आज मेहरुली -बदरपूर ह्या नावाने सुध्दा ओळखला जातो. घैसुद्दिन तुघलकाला स्वप्नामध्ये अनेकदा सुंदर किल्ले दिसायचे ज्यामुळे त्याला ते वास्तवात उतरवण्याची फार ईच्छा असायची ह्याकरिता त्याने दिल्लीतील सर्व मजुरांना केवळ आपल्याच दरबारी काम करण्याचा आदेश दिला होता. ह्यामुळे सुफी संत निजामुद्दीन औलिया हे चिडून उठले कारण त्यावेळी त्यांच्या विहिरीचे बांधकाम सुरु होते व ह्या कामात खंड निर्माण झाला कारण सुलतानाच्या आदेशामुळे सर्व मजूर दरबारात कामाला लावण्यात आले होते. ह्याचा परिणाम असा झाला की निजामुद्दीन औलिया यांनी शाप शब्दाचा उल्लेख केला ते शब्द या प्रकारे होते ,"यारहेयुज्जर याबसेयगुज्जर " म्हणजे येथील लोक येथेच राहतील व येथे केवळ गुज्जर राज्य करतील. पुढील काळात तुघलक घराण्याचे पतन होवून तिथे गुज्जर लोकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. संपूर्ण तुघलकाबाद ह्या किल्ल्यातच वसलेले पाहायला मिळते. पुढील काळात आणखी एक संत हुनुज दिल्लीदुरुस्त यांनी घैसुद्दिन तुघलकला शाप दिला होता ज्यानंतर घैसुद्दिन आपला पुत्र मोहम्मद बिन तुघलक याला भेटायला गेला होता जिथे भव्य मंडप सुलतानच्या अंगावर पडून झालेल्या प्रकारात घैसुद्दिन तुघलक १३२४ साली चेंगरून मरण पावला होता व हे सर्व कटकारस्थान त्याचाच पुत्र मोहम्मद बिन तुघलकचे होते. सध्या किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली पाहवयास मिळते परंतु इतिहासातील दाखल्यावरून सदर किल्ल्याला एकूण ५२ द्वारे होती व सोबतच जवळपास १५ मीटर उंचीची नागमोडी वळणाची भिंत सुध्दा बांधण्यात आली होती. हल्लीच्या स्थितीत केवळ १३ दरवाजे उपलब्ध आहेत, तुघलकाबाद किल्ला विषेतः प्रसिध्द आहे तो ह्याच्या अतिभव्य दगडी बांधकामामुळे. सोबतच तुघलक शासनकाळात किल्ल्यात अनेक छोट्या वास्तू बांधण्यात आल्या होत्या त्या आज नामशेष झाल्या सारख्या आहेत. किल्ल्या नजीकच दक्षिण भागात घैसुद्दिन तुघलक याचे थडगे बांधण्यात आले आहे. किल्ल्याच्या आतील पुष्कळसे बांधकाम हे लाल दगड व ग्रेनाईट दगडाचे आहे , घैसुद्दिन तुघलकाच्या थडग्याच्या बाजूला दोन थडगे आहेत ज्यामध्ये एक त्याची पत्नी व दुसरे पुत्र मोहम्मद बिन तुघलकाचे थडगे आहे. संपूर्ण थडगे हे सुंदर संगमरवराचा वापर करून बांधण्यात आले आहे. किल्ल्याच्या दरवाजावर काही शिलालेख सुध्दा कोरण्यात आले आहे जे किल्ल्याबद्दल माहिती देतात. शेवटी किल्ल्या बद्दल सांगायचे झाल्यास किल्ल्याच्या दक्षिण भागात कृत्रिम जलाशये उपलब्ध आहेत व आजूबाजूला अनेक काटेदार वनस्पती आहेत, तत्कालीन किल्ल्याच्या आजूबाजूला आज आधुनिक काळातील लोकांचा वावर बघावयास मिळतो. अश्या प्रकारे मध्ययुगीन भारतातील एक वास्तू म्हणून आपण ह्या किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष सर्व गोष्टी बघू शकता , जरी पुष्कळश्या बाबी आज खंडित अवस्थेत आढळतात तरी बांधकाम गत काळात नक्कीच मनाला ओढून नेते.. आशा आहे दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल, असेच आमचे ईतर माहिती देणारे लेख वाचून पर्यटन करण्याची संधी मिळाल्यास अवश्य अश्या स्थळांना भेट द्या.
नवी दिल्लीः 5G Users:तुफान स्पीड देणारी 5G सेवा अखेर देशात सुरू झाली आहे. Reliance Jio आणि Airtel च्या 5G सेवा काही शहरांमध्ये लाइव्ह झाल्या असून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी सारख्या शहरांतील युजर्सना 5G Signal देखील मिळायला लागले आहेत. Jio ची 5G सेवा बीटा ट्रायल अंतर्गत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी येथे सुरू झाली आहे. तर, Airtel ची 5G सेवा Airtel 5G Plus नावाने आठ शहरांमध्ये सुरू झाली आहे. पण, आता 5G सुरू झाल्याने सायबर चोरही सक्रिय झाले आहेत. 5G सिम अपग्रेड नावाच्या लिंकवर क्लिक करताच काहींच्या बँक खात्यातून पैसे गायब होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी लोकांना सतर्कही केले आहे. वृत्तानुसार, 5G सिम अपग्रेडबाबत अनेकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. 5G सिम अपग्रेडच्या नावाने आलेल्या मेसेजच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा लोकांचा दावा आहे. त्यांच्या टेलिकॉम कंपनीने सिम अपग्रेड करण्यासाठी लिंक पाठवली आहे असे लोकांना वाटत आहे. Cyber Criminals लोकांच्या 5G बद्दलच्या उत्साहाचा फायदा घेत असून हॅकर्स लोकांचे फोन हॅक करत आहेत आणि मेसेजसोबत आलेल्या लिंकद्वारे डेटा चोरत आहेत. हे हॅकर्स लोकांच्या फोनमध्ये रिमोट App इन्स्टॉल करून नंतर रिमोटली फोन कंट्रोल करत आहेत. पोलिसांच्या सायबर टीमने लोकांना अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये 4G वरून 5G वर अपग्रेड करण्याची चर्चा आहे. याशिवाय, टेलिकॉम कंपन्यांनी असेही म्हटले आहे की, तुम्हाला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही. अशी टाळा फसवणूकः सायबर विंगने युजर्सना अनोळखी नंबरवरून आलेल्या "4G वरून 5G वर स्विच करा" अशा मेसेजवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे. हे करण्यापूर्वी सिम प्रदात्याच्या अधिकृत साइटला भेट देऊन तपशील तपासणे केव्हाही चांगले.
फिक्सर या वेब सीरिजच्या शूटिंगवेळी काही जणांकडून सेटवरील लोकांना मारहाण करण्यात आली. यावेळी सेटवर अभिनेता आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलियां आणि बॉलिवूड अभिनेत्री माही गिल हे उपस्थित होते. तिग्मांशू धुलिया यांनी स्वतः आपल्या सोशल अकाऊंटवरून याची माहिती दिली. ठाण्यातील घोडबंदर भागात फिक्सर वेब सीरिजचे शूटिंग सुरू असताना ही घटना घडली. सेटवर अभिनेता शब्बीर अहलुवालिया हे देखील यावेळी उपस्थित होते. या प्रकरणी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. फिक्सर नावाच्या वेब सीरिजमधील कलाकार एका रुग्णालयाबाहेर उभे असल्याचे सोशल मीडियातील पोस्टमध्ये दिसते आहे. कॅमेरामन संतोष तुंडियाल याच्या डोक्याला पट्टी लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. काही जण मद्यपान करून आले होते. आणि त्यांनी आमच्या टीममधील सदस्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी सेटवरील सामानाचीही तोडफोड केली, असे या कलाकारांनी सांगितले. फिक्सरचे निर्माते साकेत साहनी यांनी म्हटले आहे की, तोडफोड करणारे सर्व गुंड होते. त्यांनी कॅमेराही तोडण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी कॅमेरामनने त्यांना रोखले त्यावेळी त्यांनी त्याच्या कपाळावर मारहाण केली. सेटवर असलेल्या महिलांशीही त्यांनी वाईट वर्तणूक केली. हे सगळे घडत असताना माही गिल तिथेच होती. पण ती स्वतःला वाचविण्यासाठी लगचेच आपल्या गाडीकडे पळाली.
Jio चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, डेटा, मोफत कॉल आणि मेसेजचे फायदे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत ! 7th Pay Commission : 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! वाचा सविस्तर. . Gold Price Today : 30165 रुपयांना सोने खरेदी करण्याची उत्तम संधी, येथे जाणून घ्या कॅरेटची किंमत ! 7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 4500 चे नुकसान होऊ शकते, 31 मार्चपूर्वी काम पूर्ण करा. .
विद्यमान संचालक : रवींद्र आपटे, विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, अनुराधा पाटील, पी. डी. धुंदरे, दीपक पाटील, विलास कांबळे. या प्रमुखांनी केले अर्ज : नविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, अजित नरके, चेतन नरके, प्रवीणसिंह पाटील, रवीश पाटील-कौलवकर, अरुंधती घाटगे, रेखा कुराडे, विजयसिंह मोरे, शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, किरणसिंह पाटील, एड. प्रकाश देसाई, अभिजित तायशेटे, अरुण इंगवले, बाबासाहेब देवकर, किशोर पाटील-शिरोलीकर, सचिन घोरपडे, रवींद्र मडके, सदाशिव चरापले, हिंदुराव चौगले, प्रा. किसन चौगले, दिनकर कांबळे, दौलतराव जाधव, प्रतापसिंह पाटील-कावणेकर, प्रकाशराव चव्हाण, वसंतराव धुरे, एस. के. पाटील, भारत पाटील-भुयेकर, पुंडलिक रावजी पाटील, अरुण इंगवले.
मुंबई प्रतिनिधी, ११ जुलै २०२१ :- मुंबईतील एका विशेष न्यायालयाने 13 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील गोष्टी करण्याच्या आरोपाखाली बस कंडक्टरला एक वर्ष तुरंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संबंधित प्रकरणातील आरोपी चंद्रकांत सुदाम कोळीला POCSO कायद्याच्या कलग 12 अंतर्गत दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीला 15 हजाराचा दंड ठोठावला असून तो दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. ही घटना जुलै 2018 ची असून मुंबईत घडली आहे. पूर्व उपनगरमध्ये राहणारी एक 13 वर्षांची मुलगी दररोज सरकारी बसने शाळेत ये-जा करत होती. परंतु, घटनेच्या दिवशी बसमध्ये 2 ते 3 जण प्रवास करत होते. दरम्यान, बस कंडक्टर चंद्रकांत कोळी पीडीत मुलीजवळ येऊन बसला आणि तुला सेक्सबद्दल काही माहित आहे का? अशी विचारणा करू लागला. यावर पीडीताने मला असे प्रश्न विचारु नका असे उत्तर देत खडसावले. कंडक्टर काही वेळासाठी निघून गेला. परंतु, परत आल्यावरदेखील त्याने त्या पीडीताला असेच प्रश्न केले. त्यावर पीडीतानेदेखील मला असे काही विचारु नका म्हणून म्हटले व बस स्टॉप येताच ती खाली उतरली. काही दिवसांनंतर मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यामुळे आईने तीला विचारले असता तीने माहिती दिली नाही. परंतु, आईने पीडीताच्या मित्र मैत्रिनींना विचारले असता तीला खरे कारण समजले. त्यानंतर आईने पीडीताला घेऊन बस डेपोत आली आणि आरोपीची ओळख करायला लावली. त्यानंतर आईने त्या आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी चंद्रकांत सुदाम कोळी केवळ 12 दिवस तुरूंगात गेला होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. कोळीच्या वकिलांनी शिक्षा स्थगितीसाठी न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे होता. त्यानंतर न्यायालयाने हे मान्य करूनही शिक्षा 30 दिवसांसाठी तहकूब केली होती.
व्याख्या : व्यवहार तारीख म्हणजे ज्या तारखेला एखादा व्यापारी एक्सचेंजवर किंवा दलाली पेढीक़डे ऑप्शन (कॉल / पुट) वापरण्याचा निर्णय घेतो ती तारीख होय. म्हणजेच करारात नमूद केलेल्या वास्तविक अधिकाराचा वापर हा त्या दिवशी 'व्यवहारा'त आणला जात असतो. हे ऑप्शन ज्या शैलीवर (अमेरिकन किंवा युरोपियन) आधारित आहेत त्यानुसार, मुदतपूर्ती (एक्स्पायरी) तारखेला किंवा आधी ही व्यवहार तारीख असू शकते. अमेरिकन शैलीच्या ऑप्शनच्या बाबतीत, मुदतपूर्ती तारखेच्या आधी व्यवहार तारीख ठरवण्याचा अधिकार, ऑप्शन धारक किंवा ऑप्शनच्या मालकाकडे असतो. युरोपियन शैलीच्या ऑप्शनच्या बाबतीत, मुदतपूर्ती तारीखच व्यवहार तारीख असते. काही ठिकाणी, जर व्यापाऱ्याने व्यवहारविषयक सूचना निर्दिष्ट केलेल्या नसतील, तर अशा वेळी नियामक यंत्रणेकडून स्वतः पुढाकार घेऊन सक्तीने व्यवहाराधिकार वापरात आणला जातो आणि त्या दिवसाला त्या ऑप्शनसाठी व्यवहाराची तारीख म्हणून संबोधले जाते. विवरण : भारतीय संदर्भात, व्यवहार तारखेला फारसा अर्थ नाही. कारण ऑप्शन हे रोखीत चुकते अथवा फेडले जातात. म्हणून, ऑप्शन धारकाकडे मुदत संपण्याच्या तारखेला किंवा त्यापूर्वी एखादे साधन खरेदी किंवा विक्री करण्याचा पर्याय असण्याचा वास्तविक अधिकार वापरण्याची शक्ती नसते. बहुतांश ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स मुदतपूर्तीच्या तारखेपूर्वी किंवा त्यापूर्वी व्यवहारात आणले जात नाहीत. कारण ऑप्शन खरेदी किंवा विकण्याची परवानगी ही एक्स्चेंजवरच दिली जाते आणि ते धारक / इतर पक्षाद्वारे बंद किंवा निकालात काढले जाऊ शकते. व्यवहार तारीख ही शेवटच्या दिवसासाठी देखील निर्धारीत केली जाऊ शकते ज्यासाठी व्यापारी हे त्यांच्या उद्दिष्टाच्या देवाणघेवाणीचे निमित्त म्हणून कॉल किंवा पुट ऑप्शन वापरण्यासाठी एक्सचेंजला सूचित करू शकतात. व्यवहाराची तारीख प्रामुख्याने ऑप्शन ट्रेडिंगमध्ये महत्त्वाची आहे. ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्सच्या मालकास त्याच्या/तिच्या कराराचा वापर एका विशिष्ट तारखेला करण्याचा अधिकार आहे, आणि म्हणूनच, आर्थिक व्यवहार हे कॉन्ट्रॅक्ट्सच्या वैशिष्ट्यांनुसार असणे आवश्यक आहे, ज्याची निश्चिती ही दोन पक्षांदरम्यान केली गेलेली असायला हवी. जर धारकाने व्यवहार तारखेला अंतर्निहित साधन खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतला, तर तो किंवा ती करारानुसार त्याच स्ट्राइक किंमतीवर ऑप्शनचा वापर करेल. World Heart Day 2021 : हार्ट अटॅक येणा-यांमध्ये 'या' लोकांचा आहे सर्वाधिक समावेश, आजच बदला या वाईट सवयी नाहीतर...! Conceiving Tips : भरपूर प्रयत्नांनंतरही आई-बाबा बनण्यात येतंय अपयश? मग कंसीव करण्यासाठी पीरियड्सच्या दिवसांत करा 'ही' ५ कामं!
मुंबई विद्यापीठ निकालाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने आता विद्यापीठ कंबर कसून कामाला लागले आहे. गुरुवार, २४ आॅगस्टपर्यंत विधि शाखेचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठातून वकिलांना मेसेज गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई : मुंबई विद्यापीठ निकालाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने आता विद्यापीठ कंबर कसून कामाला लागले आहे. जात असून, वकिलांच्या हाती विद्यार्थ्यांचे भवितव्य असल्याची टीका सुरू झाली आहे. दुसरीकडे वाणिज्य शाखेच्या मुख्य अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी काळजीत आहेत. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय आता विद्यापीठाच्या चांगलाच अंगाशी आला आहे. आॅगस्ट महिना संपत आला असला तरीही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. प्राध्यापक मिळत नसल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे आता विधि अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने चक्क वकिलांशी संपर्क साधला आहे. विधि अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळ आधीपासूनच सुरू होता. आता यातून मार्ग काढण्यासाठी विद्यापीठाने ही शक्कल लढवली आहे. पण, वकिलांना आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी तसेच अभ्यासक्रम, उत्तरपत्रिकांविषयी माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. आहे. आता वाणिज्यच्या छोट्या शाखांचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पण, वाणिज्यच्या प्रमुख विषयांचे निकाल रखडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करावे, याचे उत्तर कोणाकडेच नाही. वाणिज्यच्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे दरवाजे बंद झाले आहेत. विद्यापीठ चौथी डेडलाइन पाळणार? विद्यापीठाने ७ सप्टेंबरची नवीन डेडलाइन जाहीर केली आहे. या डेडलाइनवर विश्वास ठेवावा का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठ चौथी डेडलाइन तरी पाळणार का, हे पाहण्यावाचून हाती काहीच शिल्लक नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
बालरंगभूमीवर गाजलेलं 'अलबत्या गलबत्या' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय. या नाटकात वैभव मांगले यांना चेटकिणीचं रुप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती रंगभूषाकार उलेश खंदारेनं. काही वर्षांपूर्वी दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या चेटकिणीपेक्षा हीचं रुप वेगळं आहे असं उलेश सांगतो. 'रंगभूमीवर दिसणारी ही चेटकिण भयंकर असली, तरी ती विद्रूप दिसून नको होती. ती थोडी प्रेमळही वाटायला हवी होती. आजवर लहानपणापासून गोष्टींतून जे ऐकत आलोय तसं चेटकिणीचं रुप दिसावं असा माझा प्रयत्न होता. त्यानुसार ती साकारली आहे. त्याचा फोटो पाहिल्यावर दिलीप प्रभावळकरांनाही ती आवडली', असं उलेशनं 'मुंटा'शी बोलताना सांगितलं. वेगवेगळ्या भूमिका जिवंत करण्यामध्ये रंगभूषाकारांचा वाटा महत्त्वाचा असतो. पण ते नेहमी दुर्लक्षित राहतात. नाटकांच्या जाहिरातीत क्वचितच रंगभूषाकारांचं नाव लिहिलं जातं. आम्हालाही नाव मिळावं आणि चेहरे रंगवणाऱ्या हातांना ओळख मिळावी, अशी अपेक्षा उलेश व्यक्त करतो. येत्या ११ मे रोजी 'अलबत्या. . . 'चा पहिला प्रयोग होणार आहे. धारावीच्या एका चाळीत राहणाऱ्या उलेशचं नाव रंगभूमीवरील कलाकारांसाठी नवीन नाही. दिवंगत ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांच्या हाताखाली त्यानं रंगभूषेचे धडे गिरवले आहेत. बोरकरांप्रमाणेच उलेशचा हात चेहऱ्यावर फिरतो, असं अनेक कलाकार सांगतात. अभिनयाची आवड असल्यामुळे उलेशनं रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. एकांकिकाविश्वात अभिनयाची पारितोषिकं त्याला मिळाली आहेत. त्यानंतर दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या 'झुलवा' या नाटकाच्या निमित्तानं उलेशची कृष्णा बोरकर यांच्याशी गाठ पडली. उलेशनं आजवर ५५ हून अधिक नाटकांसाठी काम केलं आहे. 'महाराष्ट्राचा मी मराठी', 'तिसरी घंटा', 'अलबेला', 'तुम्ही आम्ही', 'छडा', 'ग्रेसफुल', 'शोधा अकबर', 'बॉम्बे १७' अशा मराठी नाटकांसाठी तर 'शोभायात्रा', 'चाणक्य' यासारख्या हिंदी नाटकांसाठी आणि काही गुजराती नाटकांसाठी त्यानं रंगभूषाकार म्हणून काम पाहिलं आहे. यापूर्वी २०१५ रोजी उलेशला संगीत नाटक अकादमीच्या युवा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. सध्या 'आमच्या हिचं प्रकरण', 'हॅम्लेट', 'आबालाल अडकित्ते. . . ' या नाटकांसाठी तर आगामी 'अलबत्या गलबत्या', 'टूरटूर' या नाटकांसाठी उलेश रंगभूषा करतोय. मुंबई विद्यापीठाच्या 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस'मध्येही तो विद्यार्थ्यांना रंगभूषेचे धडे देतो.
OnePlus Nord 2 5G भारतात सादर : सोबत Buds Pro सुद्धा उपलब्ध! सर्वात तरुण आणि सर्वात वृद्ध अंतराळवीर ठरण्याचा विक्रम सहभागी अंतराळवीरांच्या नावे झाला आहे. आता क्लिपीचंसुद्धा पुनरागमन होत आहे! हे एक कुठेही घेऊन जाता येईल असं गेमिंग पीसी उपकरण आहे!
नागपूर :- नागपूरात सध्या कोरोनाचे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन होऊ शकते असे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भात राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. लोकांनी गर्दीत जाऊ नये आणि गर्दीही करू नये असे आवाहनही त्यांनी केले. नागपूर मेडिकल कॉलेज आणि अन्य ठिकानी लोकांना कॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन पूर्ण खबरदारी घेत आहे. मात्र लोकांनी आपणहून काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. देशभरात आज तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली असून त्यात 12 जणांचा समावेश आहे. यामध्ये 5 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. मुन्नारमधल्या एका रिसॉर्टमध्ये ते थांबले होते. कोची विमानतळावर असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारपर्यंत देशात 173 कोरोनाबाधित होते. त्यात दिवसभरात 50 नव्या रुग्णांची भर पडली असून ती संख्या आता 223 वर गेली आहे.
दीपनगर फुलले : ६८ प्रजातींचे पक्षी, मुकूटधारी वटवट्यांची नोंद । Jalgaon Live News\nदीपनगर फुलले : ६८ प्रजातींचे पक्षी, मुकूटधारी वटवट्यांची नोंद\nजळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरात पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे यांच्या माध्यमातून ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान, पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. या पक्षीनिरीक्षणात ६८ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यात प्रथमच मुकुट धारी वटवट्याची नोंद झाल्याने निरीक्षकांचा उत्साह वाढला. पक्षी तज्ज्ञ मारुती चितामपल्ली आणि सलीम अली यांच्या वाढदिवसाचे अवचित साधत हा उपक्रम राबवण्यात आला.\nनिरीक्षणासाठी या जागा निवडण्यात आल्या,\nपक्षीनिरीक्षणासाठी परिसरातील मारुती मैदानाजवळील दलदलीचा भाग, चांदणी गार्डन, गणपती मंदिर परिसर, काही निर्जन परिसर अशा जागा निवडण्यात आल्या. दररोजच्या पक्षी निरीक्षणात ३० ते ४० पक्ष्यांची नोंद करून 'ई बर्ड' या जागतिक व्यासपिठावर छायाचित्रे, चलचित्रे आणि आवाजांच्या नमुन्यांसह माहिती जमा करण्यात आली. पक्षी निरीक्षणात वेगवेगळ्या पक्षांना जवळून पाहता आले, त्यांचे आवाज ऐकता आले.\nया पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली.\nकोकिळा, भारद्वाज, हळद्या, पांढऱ्या छातीचा धीवर, चिरक, दयाळ, लालबुड्या बुलबुल, सूर्यपक्षी, करण पोपट, सुतार, शिंपी, नाचण, गोमेट, कवडी रामगंगा, सातभाई, चष्मेवाला, सुभग, धनेश आणि वेडा राघू या नेहमीच्या स्थानिक पक्ष्यांसह राखी डोक्याचा पिवळा माशीमार, लाल कंठाचा आणि लाल छातीचा माशीमार, छोटा शुभ्रकंठी वटवट्या, ब्लीथचा वटवट्या, पिवळ्या पोटाचा वटवट्या, मुकुट धारी वटवट्या या स्थलांतरीत पक्ष्यांनीही उपस्थिती दाखवली. दलदलीच्या भागात जांभळी पाणकोंबडी, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, बगळे, कमळपक्षी, अडई यांची नोंद झाली. मुलांनी कापशी, शिक्रा, मधुबाज हे शिकारी पक्षी देखील पाहिले. मधुबाजला पळवण्यासाठी करण पोपट, पोपट आणि कोतवाल यांनी एकत्र हल्ला करताना मुलांनी बघितले. दीपनगर परिसरात सुमारे ६८ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली. या सप्ताहात मुकुटधारी वटवट्याची प्रथमच छायाचित्रित नोंद झाली. विशेष म्हणजे मुलांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.\nमृदू कवचाच्या कासवाची नोंद\nपक्षी निरिक्षण करताना पक्षिप्रेमी परिसरातील जैवविविधतेचे इतर घटक फुलपाखरे, कोळी, मधुमाशा, मुंग्या, झाडे, वेलींचे निरीक्षण करत होती. त्यात शेवटच्या दिवशी मृदु कवचाच्या कासवाची नोंद झाली. पक्ष्यांचे रंग पाहत असताना त्यांचे वागणे, एकमेकांना मदत करणे यासाठी जागेवरच काही चित्रफिती, छायाचित्रे वेळोवेळी दाखवण्यात आली. गरजू पक्षीप्रेमींना महाराष्ट्रातील पक्षी हे छोटी माहिती पुस्तिका भेट देण्यात आली. पक्षी निरीक्षणात सहभागी मुलांसोबत लक्ष्मीकांत नेवे व पदाधिकारी.\nपक्षी सप्ताहात लक्ष्मीकांत नेवे, बाबासाहेब जावळे, अपर्णा नेवे, लौकिका नेवे, श्रावणी जावळे, गार्गी कबाडे , फरिन तडवी, आयत तडवी, अनन्या कारवाल, ओंकार मोहितकर, प्रशांत लेनेकर, ऋषभ लेनेकर, सम्यक सोनोने, निकिता फेगडे, सम्मीका वाघमारे, यशश्री वाघमारे, अर्हंत सोनोने, पारमी सोनोने, ज्ञानेश झांबरे, श्रृती बोडले, श्रेयस बोडले, गिरिश बोडले, दिव्यांश कुनघाडकर, नैतिक झांबरे, दीपाली झांबरे, दिनेश कुनघाडकर, गणेश झांबरे आदी पक्षिप्रेमी उपस्थित होते.
एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावर निर्णय घेण्यासाठी आज म्हणजे बुधवारी (दि. 24) ऑनलाइन मुख्य सर्वसाधारण सभा (जीबी) आयोजित केली होती. परंतु सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविकांकडून उपसूचनांचा पाऊस पाडण्यात आल्यामुळे कुठलाही निर्णय न घेता सत्ताधाऱ्यांवर जीबी तहकूब करण्याची नामुष्की ओढावली. पुणे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला सातवा वेतन आयोग लागू करण्यावर आजच्या ऑनलाइन जीबीत अंतिम निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवक - नगरसेविकांनी घरभाडे भत्ता, धुलाई भत्ता अशा वेतन आयोगा संदर्भात उपसूचनांचा पाऊस पाडला. या सर्व उपसूचनांवर चर्चा करून निर्णय घेणे शक्य नसल्याचे कारण पुढे करत अवघ्या पाच मिनिटात जीबी तहकूब केली. सभागृह नेता गणेश बीडकर यांनी तहकुबीचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान तहकुबीपुर्वी शहर उपनगरातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी केली. परंतु महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यावर भाष्य न करता तहकुबीची घोषणा केली. पुढील महिन्यात 10 मार्च रोजी खास मुख्य सभेत वेतन आयोगाची अंमलबजावणीसह अन्य उपसूचनांवर साधक बाधक चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या हजारो प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे.
नवरी मुलगी म्हणा किंवा मुलगा 'तो' दिवस असतो त्यांचा. त्यांनी कसं सजावं, नटावं, काय घालावं हे पूर्णपणे त्यांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतं. तरीही आजची पिढी ही इतकी फॅशनकॉन्शस आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या या 'स्पेशल' दिवसाची आखणी फार अगोदरच करायला घेतलेली असते. म्हणूनच आज तुमच्या समोर सध्याचे 'लग्नातले फॅशनट्रेंड्स' घेऊन आलो आहोत.
तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली. बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली. मात्र संततधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी बुधवारी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२. २१ मिमी इतके आहे. जून-जुलै महिन्यात आजतागायत ९२० मिमी इतके पर्जन्यमान झाले आहे. पाच दिवसांच्या संततधार पावसाने मानोरा परिसरातील भाताचे पऱ्हे नेस्तनाबूत झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भाताची रोवणी करण्यासाठी दुबार पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. बी-बियाणे, खते, मजुरी व शेतीच्या मशागतीचा खर्च दुसऱ्यांदा करावा लागणार आहे. यामुळे मानोरा परिसरातील धान उत्पादक शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे. मानोरा भागात मुख्य व्यवसाय शेतीचा असून गावाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने हातात येणारे पीक नष्ट झाले. परिणामी शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. दुबार पेरणी करण्यासाठी बी-बियाणे व आर्थिक मदत पीडित शेतकऱ्यांना देण्याची मागणी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व बल्लारपूर पंचायत उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी केले. यावेळी माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, मानोरा येथील सरपंच सविता धोडरे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, कोर्टीमक्ताचे उपसरपंच गोविंदा उपरे, धोडरे व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
पुण्यातील मनीष ठोकरे आणि मनोज कदम या दोन तरुणांनी कोणताही मोबदला न घेता मदत मागणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळवून देण्याचा जणू ध्यासच घेतला आहे. कोरोना काळात त्यांनी 321 जणांना नोकरी मिळवून दिली आहे. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक तरुणांना त्यांनी नोकरीविषयक विनामूल्य मार्गदर्शनही केले आहे. एमपीसी न्यूज - नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या फ्रेशर आणि अनुभवी उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी दोन तरुण आपली नोकरी सांभाळून प्रयत्न करत आहेत. नोकरीसाठी शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन याची गरज असते पण ते मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात हे तरूण मात्र ते काम मोफत पुरवतात. गरीब तसेच ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व इच्छित नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. कोणाचीही फसवणूक न करता मदत मागणा-या प्रत्येकाला नोकरी मिळवून देण्याचा ध्यास त्यांनी केला आहे. मनीष ठोकरे आणि मनोज कदम असे या दोन तरुणांचे नाव आहे. दोघेही स्वतःची नोकरी सांभाळून नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या गरजूंना विना मोबदला मदत करतात. कोरोना या अभूतपूर्व संकटामुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचारी कपात, वेतन कपात यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकाळात बरेच तरुण बेरोजगार झाले आहेत. काही फ्रेशर विद्यार्थ्यांना होणाऱ्या कर्मचारी भरतीबद्दल माहिती मिळत नाही त्यामुळे ते संधी गमावून बसतात, तसेच मिळालीच माहिती तर कसा आणि कुठे अर्ज करायचा, मुलाखत कशी द्यायची, रिज्युम कसा बनवायचा याबाबत माहिती नसते त्यामुळे विविध अडचणी निर्माण होतात. या सर्वांना मनीष ठोकरे आणि मनोज कदम मदतीचा हात देत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना सोशल मीडिया जसं फेसबुक, व्हाट्सअप, लिंकड्इन वरून विविध कंपनीतील रिक्त पदे यांच्या बाबत माहिती दिली जाते. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने दर आठवड्याला मार्गदर्शन केले जाते. नोकरीची माहिती देणारी विविध संकेतस्थळं उपलब्ध आहेत त्यावर आपलं प्रोफाईल कसं बनवायचं याबाबत माहिती दिली जाते. तसेच, इतर ठिकाणी काम कसे शोधायचे, रिज्युम कसा तयार करावा, मेल कसा लिहावा, मुलाखतीची तयारी त्यात विचारले जाणारे विविध प्रश्न, आत्मविश्वास वाढवणे याबाबत तयारी करून घेतली जाते. एकएकाच्या मुलाखती घेऊन त्यांना सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते. या उमेदवारांना मुलाखतीसाठी संलग्न असलेल्या विविध कंपन्यांमध्ये पाठवले जाते. एखाद्या उमेदवारांची काही कारणास्तव निवड झाली नाही तर ज्या ठिकाणी तो कमी पडला यावर लक्ष केंद्रित करून त्याला प्रशिक्षण दिले जाते. मनीष ठोकरे आणि मनोज कदम यांनी 2016 पासून या कामाला सुरवात केली असून आज जवळपास 25 हजारांहून अधिक अनुभवी ते फ्रेशर मुलं - मुली त्यांच्याशी जोडली गेली आहेत. विशेष म्हणजे आजवर त्यांनी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत. कोरोनाच्या काळात त्यांनी 321 पेक्षा अधिक उमेदवारांना नोकरी मिळवून दिली आहे. गरजूंना नोकरी मिळवून देण्याचा आमचा ध्यास असल्याचे ते दोघेही सांगतात आणि विश्वासार्हता यामुळे खूप लोक आमच्याशी जोडले गेल्याचेही ते सांगतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना शहरात येऊन नोकरी कशी मिळवावी याबाबत फारशी माहिती नसते. रिज्युम कसा असावा, मुलाखत कशी द्यायची, आत्मविश्वास कसा वाढवायचा याबाबत अपुरी माहिती असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांना नोकरी मिळत नाही. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अंगी असलेल्या कौशल्यांचा वापर करणे आवश्यक असते. आम्ही आमच्या माध्यमातून ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या नोकरी व्यतिरिक्त या गोष्टींची देखील माहिती पुरवतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे अथवा फी घेतली जात नाही. नोकरी मिळवल्यानंतर लोकांना जो आनंद मिळतो त्यातच खरं आमचे समाधान आहे. जास्तीत जास्त उमेदवारांना यांचा फायदा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. असं मत मनीष ठोकरे यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना व्यक्त केले. नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनुभवी अथवा फ्रेशर उमेदवारांनी आम्हाला संपर्क साधावा, असे आवाहनही मनीष ठोकरे यांनी केले आहे. फोन करून अथवा व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांना संपर्क साधता येईल.
तरुण पिढीची स्पंदने टिपणाऱ्या 'गर्लफ्रेंड' या आगामी चित्रपटाची टीम आज (१२ जुलै) वाचकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्यासह रसिका सुनील, दिग्दर्शक उपेंद्र सिधये आणि निर्माते अनीश जोग आणि रणजित गुगळे हे कलाकार सहभागी होणार आहेत. नवी पेठेतील पत्रकार भवनात दुपारी ३. ३० वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून, त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. "गर्लफ्रेंड' मिळायला हवी राव! ' असे म्हणणाऱ्या नचिकेत प्रधानला (अमेय वाघ) अलिशा नावाची मुलगी भेटल्याचे चित्रपटाच्या पोस्टर आणि टीजरमधून दिसते. मात्र, तीच त्याची 'गर्लफ्रेंड' होणार का? अशी उत्कंठा हा चित्रपट वाढवतो. यात नचिकेत 'सिंगल' असून, त्याचा वाढदिवस १४ फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाइन डे'ला असतो. 'गर्लफ्रेंड' नसणे आणि 'व्हॅलेंटाइन डे'ला वाढदिवस असणे, याचे दुःख नेमके काय असते हे यात दाखवण्यात आले आहे. अमेय आणि सई यांच्यासह सागर देशमुख, ईशा केसकर, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे, यतीन कार्येकर, कविता लाड, उदय नेने अशी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. यातील 'नच्या गॉट अ गर्लफ्रेंड' हे गाणे सध्या गाजत आहे. सगळी गाणी क्षितिज पटवर्धनने लिहिली असून, हृषीकेश-सौरभ-जसराज यांनी संगीत दिले आहे. कलाकारांना भेटण्यासाठी आणि 'मटा कल्चर क्लब'च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क : ९६५७०३२६०९. (सकाळी ९ ते दुपारी २ याच वेळेत फक्त. )
शेंदूरजनाघाट : कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी 'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' ही योजना सरकारने राबवली. यामध्ये राज्यातील अनेक शिक्षकांनी आपआपल्या परीने नवनवीन माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेंदूरजनाघाट येथील जनता गर्ल्स हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक संजय पंजाबराव ढोक यांनी ई-बूक तयार करून दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययनास मदत केली. संजय ढोक यांनी शैक्षणिक व्हिडीओची निर्मिती करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याहीपुढे जाऊन विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचा व्हिडिओचा संग्रह एका क्लिकवर पाहता यावा, यासाठी ई-बूक ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यातूनच इयत्ता दहावीचे इतिहास व राज्यशास्त्र आणि कुमारभारती (पद्य) या विषयांचे ई-बूक तयार केले. अमरावती येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते १९ मार्च रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तेजराव काळे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल कोल्हे, विशेष कार्य अधिकारी संजय कडू, राहुल मोहोड, माया हिवसे, पंकज व्हेराटे, चेतन डोंगरे उपस्थित होते.
मुंबई, दि. ३ - शरजिल उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन दिले. ३० जानेवारी या दिवशी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे देशमुख म्हणाले. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात १५३ अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होतते. भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणार्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध लोककलावंत तसेच विविध बोली भाषांमध्ये प्रभावी संदेश देऊ शकणाऱ्यांचा उपयोग करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी प्रशासनाला दिल्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध लोककलावंत तसेच विविध बोली भाषांमध्ये प्रभावी संदेश देऊ शकणाऱ्यांचा उपयोग करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी प्रशासनाला दिल्या. नाशिक विभागातील कोविड उपाययोजनांचा व मोहिमेचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ही मोहीम तळागाळापर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे असून, त्यासाठी माध्यमही त्यांच्या जवळचेच असायला हवे. बहिणाबाईंनी अहिराणी भाषेत आद्य शब्दांत जीवनाचे तत्त्व समजावून सांगितले होते. त्यामुळे या मोहिमेसाठीसुद्धा बोली भाषांचाच चांगला उपयोग करायला हवा. शाहिरी, खडी गमंत, वाघ्या मुरली, दशावतार करणारे कलाकार यांच्या मदतीने सध्याच्या परिस्थितीत कल्पकतेने या मोहिमेतील संदेश लोकांपर्यंत जाईल अशी उपाययोजना करण्याचेही त्यांनी सांगिलते. राज्याला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काही जिल्ह्यांनी अजून आरटीपीसीआर चाचणी वाढवण्याची गरज आहे. मोहिमेत सारी आणि आयएलएस रुग्णाचा शोधही व्यवस्थित घेतला पाहिजे. मोबाइल अॅपद्वारेच मोहिमेतील माहिती भरा असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ, दादाजी भुसे, के. सी. पाडवी, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरुण पिढी बाहेर पडू लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरू केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे आणि रुग्णाला डॉक्टरसोबतच औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे. औषधे उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्यांचा वापर करण्याचा निर्णय आणि जबाबदारी ही डॉक्टरांची आहे. त्यासाठी आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
वाई येथील कोविडं रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन, कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संचित कोविडं रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. पाचवड (ता. वाई) येथील ६५ वर्षे वयाचा एक व्यक्ती चार दिवसांपूर्वी करोनाबाधीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना वाई येथील संचित कोविडं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत होती. शनिवारी रात्री त्यांनी मुलाला फोन करून माझी प्रकृती उत्तम आहे मला आता घरी घेऊन जा, असे म्हटले होते. मात्र त्यांना करोना आजारामुळे नैराश्यं आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचारही बोलून दाखवला होता. अखेरीस आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांनी रुग्णालयातून कृत्रिम प्राणवायूची यंत्रणा (ऑक्सिजन)काढून फेकून देत, आरोग्य सेविका व डॉक्टरांना धक्काबुक्की करून पळ काढला. यावेळी डॉक्टर आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घातलेली असल्याने त्यांना या रुग्णामागे पळता आले नाही. दरम्यान, डॉ.विद्याधर घोटवडेकर यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब रात्रगस्ती वरील पोलिसांच्या मदतीने या रुग्णास पकडून रुग्णालयात आणले व त्यांना समजूत घालून विश्राती घेण्याचा सल्ला दिला. शिवाय, या प्रकाराची नातेवाईकांना देखील कल्पना देण्यात आली. पुढील उपचारासाठी त्यांना बेडला बँडेज पट्टीच्या साहाय्याने बांधण्यात आले होते. मात्र, आपल्याला करोना झाला आहे याचेच त्यांना फार वाईट वाटत होते. त्यांनी रुग्णालयाकडे घरी सोडण्याची मागणी केली होती. मात्र उपचार व इंजेक्शनचा डोस पूर्ण होईपर्यंत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दोनतीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात येणार होते. दरम्यान आज दुपारी त्यांनी पुन्हा कृत्रिम वायू (ऑक्सिजन) यंत्रणा काढून टाकली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी व सेविकांना त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी स्वतःच्या ताकदीने बँडेज पट्ट्या तोडून खाटेवरून उठून डॉक्टर व सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला व लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली. डॉ.घोटवडेकर व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात आणले. परंतु त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी गणपती घाटावर सिरीयलचे चित्रकरण सुरु असल्याने गर्दी होती.मात्र त्यांना कोणीही उडी मारण्यापासून रोखले नाही आणि नंतर पाण्यातून काढतानाही कोणी मदत केली नाही. या ठिकाणी केवळ बघ्यांची गर्दी जमा झाली होती. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
राम मंदिर ही एका समुदायाने दुसर्या समुदायावर केलेली कुरघोडी, असा याचा अर्थ काही जण करतात. त्यांच्या जातिवादी आणि धर्मवादी राजकारणासाठी असे करणे त्यांना आवश्यक झालेले आहे. परंतु, आपण हिंदूंना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आता 'राम' जगण्याचा कालखंड सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत भूमिपूजन करण्याचे ठरल्यानंतर सेक्युलॅरिझमच्या 'शिळ्या कढिला ऊत' आणण्याचा प्रयत्न अनेकांनी सुरू केला. शरद पवार म्हणाले, "भूमिपूजनाचे मला निमंत्रण आले तरी मी जाणार नाही." शरद पवार शिंकले तरी त्यावर टीव्हीवर 'डिबेट' घडवून आणणार्या काही वाहिन्या आहेत. त्या लगेच ठरलेल्या लोकांना बोलावून 'डिबेट' प्रारंभ करतात. शरद पवार आताच का शिंकले, कोणत्या वाक्यानंतर शिंकले, त्यांना काय सुचवायचे आहे, ते कसे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, अशी चर्चा 'रंगतदार' होते. अखिल भारतीय राजकारणात असदुद्दीन ओवेसी हे असे थोर पुरुष आहेत. बोकड दाढी आणि इस्लामी टोपी घातलेला त्यांचा चेहरा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. तेही स्वतःला महान 'सेक्युलॅरिस्ट' समजतात. जिनांच्या वंशावळीतील नेता भारतात सेक्युलर असतो, नव्हे तसे मानले पाहिजे. महाराष्ट्रातील एक बुद्धिवादी जिनांचे परमभक्त आहेत. ते अधूनमधून जिना आणि सेक्युलॅरिझम यावर भरपूर लिहित असतात. इंग्रजी दैनिकांमध्ये त्यांचे लेख येतात. असदुद्दीन ओवेसी म्हणतात की, "पंतप्रधानांनी राम मंदिराचे भूमिपूजन करणे हे, घटनेच्या सेक्युलॅरिझमच्या विरुद्ध आहे. घटना रक्षणाची त्यांनी शपथ घेतली आहे. ते घटनेच्या शपथेच्या विरुद्ध आहेत. जेथे बाबरी मशीद उभी होती तेथे बाबरी मशीदच असेल. सेक्युलॅरिझम हा घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च असेल; पण ते चुका करू शकत नाही, असे नाही." ओवेसींना म्हणायचे आहे की, आम्हाला सोयीचा निर्णय आला असता तर, सेक्युलॅरिझमचे रक्षण झाले असते. गैरसोयीचा निर्णय आला तेव्हा ओवेसी म्हणू लागले की, सर्वोच्च न्यायालय चूक करूच शकत नाही, असे नाही. हा सेक्युलॅरिझम नेमका काय आहे? १. तो पुस्तकी आहे. २. तो 'सेमेटिक फॅनॅटिझम' आहे आणि ३. पूर्णतः अभारतीय आहे. पुस्तकी पंडितांनी तो पाश्चात्त्य जगातून घेतलेला आहे. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन इत्यादी देशांत राजसत्ता आणि धर्मसत्ता सत्तेच्या रथाची दोन चाके होती. धर्मसत्ता, राजसत्तेच्या माध्यमातून जे ख्रिश्चन नाहीत त्यांना ठार करीत असे, भयंकर छळ करीत असे. पुढे ख्रिश्चन धर्मात 'कॅथॉलिक', 'प्रोटेस्टंट' आणि 'कालविनिस्ट' असे भेद झाले. ज्या पंथाचे लोक सत्तेवर येत, ते अन्य ख्रिश्चनांच्या कत्तली करीत. अनेक शतकांच्या महाभयानक रक्तपातानंतर राज्याला धर्मापासून वेगळे करण्यात आले. हा हिंदूंचा इतिहास नाही, हे आपल्या पुस्तकी पंडितांना कधीही समजलेले नाही. हा 'सेमेटिक सेक्युलॅरिझम' आहे. ख्रिस्तनीती, इस्लाम आणि जुडाईसम हे सेमेटिक धर्म आहेत. ते अत्यंत कडवे असतात, ते अत्यंत असहिष्णू असतात. आपला धर्म न मानणार्यांना ते जगू देत नाहीत. भारतातील सेक्युलॅरिझमची ही मानसिकता आहे. त्यांचा विचार न मानणार्यांना ते सुखाने जगू देत नाहीत. हिंदू विचारधारेची त्यांनी कशी ससेहोलपट केली, याचा इतिहास आपल्याला माहीत आहे. रामजन्मस्थानावर जे तीन घुमट होते, त्यातील एक घुमट पुस्तकी, दुसरा सेमेटिक आणि तिसरा अभारतीय होते. हे तिन्ही घुमट ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी जमीनदोस्त करून टाकले आणि प्रभू रामचंद्रांच्या, सर्व उपासना मार्ग सत्य आहेत, कुणावर काही लादायचे नाही. कोणाचे काही लुटायचे नाही आणि सर्वांना सन्मानाने जगू द्यायचे, या विचारांची स्थापना केली. प्रभू रामचंद्रांनी समाजातील सर्व घटकांना जवळ केले. सोन्याच्या लंकेचा मोह ठेवला नाही. विभीषणाला लंका देऊन टाकली आणि 'जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान आहे,' असे म्हणत अयोध्येला प्रयाण केले. म्हणून ६ डिसेंबर हा दिवस राम अस्मितेचा दिवस आहे. आपली आपल्याला ओळख करून घेण्याचा दिवस आहे. ही ओळख सर्व क्षेत्रात प्रकट होऊ लागली. न्यायालयेही आपल्या ओळखीकडे जाऊ लागली. प्रथम त्यांनी हिंदुत्व म्हणजे धर्म नव्हे; ती एक जीवनपद्धती आहे, असा निर्णय दिला. गुजरात उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्याला राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहिले. राजेश सोलंकी नावाच्या एका सेक्युलॅरिस्टाने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सन्माननीय न्यायमूर्तींनी ती नुसतीच फेटाळून लावली नाही, तर सोलंकीला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. नेहरूयुगात असे शक्य नव्हते. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी हिंदूंना देऊन टाकण्याचा निर्णय केला. घटना तीच, न्यायालये तीच, न्यायमूर्तींच्या परंपराही त्याच, मग एवढा बदल कसा झाला? याला 'राम अस्मिता' म्हणतात. सेक्युलॅरिझमच्या तीन भंपक कल्पना जमीनदोस्त झाल्याचा हा परिणाम आहे. या भंपक कल्पनांना राजसत्तेचे पाठबळ देण्याचे काम पंडित नेहरू यांनी केले. त्यांचा कार्यकाळ हा कमालीचा हिंदू विरोधाचा कालखंड आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना संपविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संघाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माचार्य, हिंदू मंदिरे या सर्वांकडे त्यांनी पाठ फिरविली. कोट्यवधी हिंदूंना पवित्र असणार्या कुठल्याही मंदिरात गेल्याचा त्यांचा इतिहास नाही. त्यांचा पणतू मंदिरात जाऊन हे पाप धुऊन काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, हिंदूंचा त्याच्यावर विश्वास नाही. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा विषय सुरू झाला. पंडित नेहरूंनी त्याला विरोध केला. महात्मा गांधींनी त्याला पाठिंबा दिला होता. मंदिर बांधून झाले, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद त्या समारंभात गेले, नेहरूंनी पत्रामागून पत्र लिहून राष्ट्रपतींनी समारंभात जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. शेवटी मंदिर तर झाले, नेहरूंचा अतिशय दुःखदायक वारसा देशाला मिळाला. आता ते नेहरूही नाहीत आणि त्यांचा वारसाही धुळीला मिळालेला आहे. हा वारसा पुन्हा जागे करण्याचा प्रयत्न देशातील कम्युनिस्ट मंडळी करीत असतात. त्यांनीही पंतप्रधानांनी भूमिपूजनात जाऊ नये, असे तुणतुणे वाजविले आहे. राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत हे बसत नाही, अशी डफली वाजवायला ते विसरत नाहीत. या सर्व लोकांनी राज्यघटनेचा नव्याने अभ्यास करायला पाहिजे. आपल्या घटना समितीत 80 टक्क्यांहून हिंदू सभासद होते, या हिंदू सभासदांनी हिंदू विचार, परंपरा यांचा खूप खोलवरचा विचार करून राज्यघटनेच्या कलमांना स्वीकृती दिलेली आहे. कलमांतील शब्दांचे अर्थ डिक्शनरीतील शब्दांच्या अर्थाप्रमाणे करता येत नाहीत. एखादा मिल, लॉक, मॉन्टेस्क्यू, रुसो काय म्हणाले, यावरून करता येत नाही. आपली परंपरा काय आहे, आपले सनातन चिंतन काय आहे, आमचा वैश्विक विचार काय आहे, या आधारे कलमांवर भाष्य झाले पाहिजे. आपले सन्माननीय न्यायमूर्ती अनेक वेळा तसे करतात, त्याचा अभ्यास केला पाहिजे. जे आपल्याला सोईचे ते 'सेक्युलर' आणि गैरसोयीचे ते 'सांप्रदायिक' हा 'सेमेटिक' विचार झाला. हा विचार आता या देशात टिकणार नाही. ते न टिकण्याचे प्रतीक म्हणजे भूमिपूजन आणि भूमिपूजनांनंतर त्या जागेवर उभे राहणारे भव्य राम मंदिर आहे. ते जसे परमेश्वराचे पवित्र स्थान असेल, तसे ते राम अस्मितेचे प्रतीक असेल. राम अस्मिता ही हिंदू अस्मिता आहे. हिंदू अस्मितेचे हे तीन घटक आहेत. १. सत्याचे अधिष्ठान, जे करू ते सत्याच्या प्रस्थापनेसाठी. २. सत्य म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे न्याय. धर्म म्हणजे केवळ कर्मकांडे नव्हे किंवा धर्माच्या नावाने काही जण जो व्यापार करतात तो नव्हे. ३. सत्य, धर्म, न्याय म्हणजे विश्वकल्याण. ही सृष्टी केवळ माणसासाठी निर्माण झालेली नसून जीवजंतू वनस्पती या सर्वांची मिळून सृष्टी तयार होते, या प्रत्येकाची काळजी म्हणजे न्याय. ही आपली जीवनपद्धती आहे. तिला 'हिंदू जीवनपद्धती' म्हणा, मानवतावादी म्हणा की वैश्विक म्हणा, सर्वांचा अर्थ एकच! राम मंदिर ही एका समुदायाने दुसर्या समुदायावर केलेली कुरघोडी, असा याचा अर्थ काही जण करतात. त्यांच्या जातिवादी आणि धर्मवादी राजकारणासाठी असे करणे त्यांना आवश्यक झालेले आहे. परंतु, आपण हिंदूंना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आता 'राम' जगण्याचा कालखंड सुरू होत आहे. रामाचे वर्णन 'मर्यादा पुरुषोत्तम' असे केले जाते. रामाने सर्व नाती जपताना आदर्शाचा मापदंड निर्माण केला आहे. शेवटी समाज म्हणजे तरी काय असतो? समाज म्हणजे नातेसंबंधांचा समूह. या नाते समूहात कर्तव्याला सगळ्यात मोठे स्थान असते. कर्तव्याचे पालन करणे हाच सामाजिक आचारधर्म असतो. आपण हिंदू त्याचे कमी अधिक प्रमाणात पालन करतो. येथून पुढे ते अधिक डोळसपणे आणि जागृतपणे करावे लागेल. मंदिर उभारणी म्हणजे राष्ट्रउभारणी हा संकल्प त्यातूनच पूर्ण होईल.
दिल्ली : जगभरात आज करोना विषाणूने थैमान घातले आहे. लॉकडाउन केला, निर्बंध कठोर केले तरी सुद्धा हा आजार अजूनही आटोक्यात आलेला नाही. आता तर या विषाणूच्या दुसऱ्या लाटेने जगातील अनेक देशात परिस्थिती आधिकच बिकट बनली आहे. या आजारावर कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र, यातही हलगर्जीपणा होत आहे. करोना रोखण्यात अनेक देशांनी गाफीलपणा केला. जागतिक आरोग्य संघटनेने जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. एका पाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेतले गेले. त्यामुळे आज करोनाने असे विक्राळ रुप धारण केले आहे. लाखो लोकांचे प्राण गेले आहेत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेसही जबर फटका बसल्याचे धक्कादायक वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. करोना महामारीपासून बचाव आणि योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय समितीच्या अहवालात या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात म्हटले आहे, की करोना महामारीबाबत इशारा देण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटना खूप आधीच करोनाबाबत सावधान करू शकत होते. मात्र, या संस्थेने तसे केले नाही. लाइबेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष एलेन जॉनसन सरलीफ यांनी सांगितले, की करोना विषाणूमुळे जग आज ज्या स्थितीत आहे त्यास थांबवता येणे शक्य होते. करोनाला रोखण्यासाठी योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे आज आपण या स्थितीत पोहोचलो आहोत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कार्यवाही तर करण्यात आली मात्र, वेळेवर कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे आज जगास नुकसान सहन करावे लागत आहे. या अहवालात करोना व्हायरसचा प्रसार का वाढला याची काही कारणे दिली आहेत. यामध्ये करोनास महामारी घोषित करण्यास उशीर करण्यात आला. ३० जानेवारी मध्येच चीनमध्ये परिस्थिती बिकट बनली होती. मात्र, ११ मार्च रोजी महामारीची घोषणा करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीने प्रवासावर तत्काळ बंदी आणण्याची शिफारस केली नाही. याबाबत वेळेवर घोषणा केली असती तर महामारीस नियंत्रणात ठेवणे शक्य झाले असते. जगातील अनेक देश हा आजार नेमका काय आहे, हे लवकर समजू शकले नाहीत. ३० जानेवारी रोजी इशारा देण्यात आला होता. परंतु, त्यानंतरही आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. ११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने करोनास महामारी म्हणून घोषित केले. तोपर्यंत सरकारांनी विशेष काही केले नाही.
Akhilesh Yadav And Yogi Adityanath : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "जर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यंदा देखील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकले तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील" असं विधान केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार पुन्हा आले तर काय होईल? असा प्रश्न अखिलेश यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. "पुन्हा एकदा जर योगींनी निवडणूक जिंकली तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील. आतापासूनच डबल इंजिनची टक्कर होते आहे, भाजपावाल्यांनी याचा विचार करावा" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. पंचायत आजतक या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'UP+YOGI खूप आहे UPYOGI', असे म्हणत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'अनुपयोगी' म्हटलं आहे. तसेच केंद्र आणि राज्याच्या 'डबल इंजिन' विधानावरही निशाणा साधला आहे. "यंदा जनता भाजपाला राज्यातून हद्दपार करणार" "पंचायत निवडणुकांच्या वेळीच जनतेने जळपास निर्णय केला होता. मात्र, सरकारी यंत्रणेमुळे बहुतांश जणांना अर्जही भरता आले नाहीत. निवडणुकी दरम्यान महिलांची साडी ओढणे, कपडे फाडणे आदी घटनांच्या छायाचित्रांमुळे महाभारताची आठवणी झाली होती. अशा घटना लोकशाहीत कधीच कोणी पाहिल्या नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत ज्या प्रकारे बेईमानी झाली त्याची शिक्षा जनता भाजपाला नक्कीच देईल. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने भाजपा सरकार पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे यंदा जनता भाजपाला राज्यातून हद्दपार करणार आहे" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. "मोदी पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती होतील तर योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील आणि उत्तर प्रदेश. . . " भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टिकैत हे सोमवारी आजतक या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील काय़? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर दिलं आहे. "त्यांना (योगी) पंतप्रधान बनवा. . . हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
आर्क्टिक सर्कल हा ग्रहातील सर्वात मोठा व्हर्जिन क्षेत्र आहे. एक कायम हिवाळा वंडरलँड की अत्यंत हवामान आणि काही महिन्यांपर्यंत अंधार असूनही आर्क्टिकचे आयुष्य चांगले आहे. काही सर्वात क्रूर प्राण्यांनी हे ठिकाण त्यांचे घर बनवले आहे, हा एक प्रचंड महासागर आहे ज्यात वेढ्याभोवती जमलेले आहे आणि प्रशांत आणि अटलांटिकशी जोडणार्या छोट्या छोट्या अडचणींनी ते उघडलेले आहे. या पाण्यामध्ये रशिया, कॅनडा, अमेरिका, डेन्मार्क, आईसलँड, स्वीडन, नॉर्वे किंवा फिनलँड अशी अनेक राष्ट्रे एकमेकांकडे पाहतात आणि पाण्यावर तरंगणार्या बर्फापासून विभक्त होतात. जर आपणास थंडीची भीती वाटत नाही आणि आर्क्टिक सर्कल त्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे आपल्याला अद्याप अनुभवी प्रवासी म्हणून पाहण्याची बाकीची जागा आहे, तर आपण नॉर्वेमध्ये असलेल्या ध्रुवीय मंडळामधील सर्वात मोठे शहर ट्रोम्सो येथे जावे. नॉर्दर्न लाइट्स फक्त जादूई आहेत! आपण इकोटोरिझम प्रेमी असल्यास, कदाचित आपण ट्रॉम्सोला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रसिद्ध नॉर्दर्न लाइट्स पहाणे. फोजोर्ड्स, बेटे आणि पर्वतीय शिखरे यांच्या दरम्यान जवळजवळ 70 ° उत्तरेस असलेले हे देशाच्या उत्तरेकडील आणि रशियामधील मुर्मन्स्क नंतर आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. उत्तरी लाइट्स ओव्हलच्या मध्यभागी, आर्क्टिक सर्कलद्वारे आपले साहस सुरू करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे कारण ट्रॉम्सोमध्ये सूर्याच्या चक्रांची पर्वा न करता उत्तर दिवे पाहण्याची अधिक शक्यता आहे. सामान्यतः आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील दिवे पाहण्यासाठी, बाहेरील बाजूस जाणे चांगले आहे, परंतु जर आकाश स्वच्छ असेल तर उत्तरेकडील दिवे शहराच्या अगदी वरच दिसणे शक्य आहे. हवामान व सौर क्रिया यावर अवलंबून ही वातावरणीय घटना ऑगस्ट ते एप्रिलच्या अखेरीस दिसून येते. तसेच, गल्फ प्रवाहामुळे, ट्रॉमसोचे समान अक्षांश इतर ठिकाणांपेक्षा सौम्य हवामान आहे. हिवाळ्यातील त्याचे सरासरी तापमान -4 डिग्री सेल्सियस असते परंतु जर आपले लक्ष्य उत्तर लाइट्स पहायचे असेल तर लक्षात ठेवा की तापमान 5 डिग्री सेल्सियस ते -25 डिग्री सेल्सियस दरम्यान असू शकते जेणेकरून योग्यरित्या बंडल करणे चांगले. आपण स्वतः हून हा क्रियाकलाप घेऊ इच्छित नसल्यास, ट्रोम्सोमध्ये मुक्काम करताना या वातावरणासंबंधी घटनेबद्दल विचार करण्याचा आणखी एक शिफारस केलेला विकल्प म्हणजे मार्गदर्शकासह नॉर्दर्न लाइट्स सफारीवर जाणे. बर्याच कंपन्या आहेत ज्या आपल्याला हवामानाचा अंदाज तपासण्यापूर्वी आणि सर्वोत्तम माहिती असलेल्या ठिकाणी नेतील आणि कोठे जायचे हे ठरविण्यासाठी त्या अचूक माहितीचा वापर करतील. बसमधील प्रवासादरम्यान, मार्गदर्शक उत्तरेकडील दिवे तसेच वैज्ञानिक स्पष्टीकरण याबद्दल काही पुरावे सांगतात. याव्यतिरिक्त, एकदा पाहण्याच्या ठिकाणी, ते सर्वात चांगले फोटो मिळविण्यासाठी प्रवाशांना कॅमेरा सेट करण्यास मदत करतात आणि सर्वात प्रभावी परिणाम मिळविण्यासाठी त्यांना कसे फोटो काढावेत याबद्दल काही विशिष्ट सूचना देतात. तसेच, जेव्हा प्रवास संपेल, तेव्हा ते हायकर्सना गरम चॉकलेट आणि कुकीज देतात, जे शरीराला उबदार करण्यास मदत करतात. ट्रोमसो आर्क्टिक निसर्गाच्या मध्यभागी पर्वत आणि फजर्ड्सने वेढलेले आहे. खरं तर, ते शहराच्या मध्यभागी इतके जवळ आहेत की त्यांना मुख्य रस्त्यावरुन देखील दिसू शकते. या शहराच्या सभोवतालच्या लँडस्केप जाणून घेण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे मध्य दिशानिर्देशातून गाडीने 30 ते 45 मिनिटांच्या अंतरावर समुद्री गरुड आणि सील दाखविणा with्या उत्तरी दिवे पाहण्याचा अनुभव एकत्र करणे. आपण हकीजने काढलेल्या स्लीह राइडवर जाणे देखील निवडू शकता. पूर्वी हे वाहतुकीचे एक सामान्य साधन होते कारण हस्की बर्फ आणि बर्फाच्या माध्यमातून वेगाने स्लेड ड्रॅग करण्यास सक्षम असे मजबूत प्राणी आहेत. आर्क्टिक सर्कलच्या या भागामध्ये करणे ही एक अत्यंत शिफारस केलेली सहल आहे कारण आपल्याला वातावरणात माणूस आणि कुत्रा यांच्यात असलेले बंधन यापेक्षा कठीण वातावरणात वाटेल. बर्याच स्थानिक कंपन्या प्रवाशांच्या गरजा आणि त्यांना जगायच्या अनुभवांनुसार हा फेरफटका मारतात. वैयक्तिकरित्या बुरशी घालणे आणि त्यांची काळजी घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. जेव्हा आपण आर्क्टिक सर्कलच्या या भागाच्या स्वरूपाची अन्वेषण करणे संपविता, तेव्हा पुढील गोष्ट म्हणजे या शहराची संस्कृती भिजविणे. एकीकडे तुम्हाला ट्रोम्सोच्या वेगवेगळ्या चर्चांची माहिती आहे. त्याच्या विचित्र वास्तूसाठी ट्रॉम्स्डालेनची चर्च सर्वात फोटोग्राफ केलेले आहे. हे ट्रोम्सो कॅथेड्रल म्हणून ओळखले जाते परंतु सत्य हे आहे की हे केवळ तेथील रहिवासी आहे जे आर्किटेक्ट जान इनगे होविग यांनी बांधले होते. त्याचा आयकॉनिक पिरॅमिडल आकार निर्विवाद आहे आणि बर्याच सिद्धांत त्याच्या अर्थाबद्दल फिरतात. काहीजण म्हणतात की ते बर्फबारीसारखे दिसते आणि काही जण हाजा बेटासारखे आहेत. जरी ते कॅथेड्रल म्हणून ओळखले जाते, तथापि ट्रॉमसोमध्ये प्रत्यक्षात दोन भिन्न कॅथेड्रल्स आहेतः प्रोटेस्टंट (XNUMX व्या शतकापासूनच्या शैलीतील निओ-गॉथिक) आणि कॅथोलिक (जगातील सर्वात उत्तरी) हे दोन्ही लाकडापासून बनविलेले आहेत. दुसरीकडे, ध्रुवीय संग्रहालयाच्या भेटीवर आपण आर्क्टिक एक्सप्लोरन्सच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. हे १1830० पासून आहे आणि आत शिकार, देशाच्या उत्तरेकडील ट्रैपर्सचे जीवन, अन्वेषक अमंडसेन इत्यादींना समर्पित केलेले विभाग आहेत. पुर्वीचे जीवन कसे होते याची कल्पना मिळवण्यासाठी ध्रुवीय संग्रहालयाजवळील ट्रोमसोमधील आणखी एक मनोरंजक जागा म्हणजे शहरातील सर्वात जुने घर म्हणजे स्कॅनसेन. हे १1789 XNUMX in मध्ये कस्टम स्टेशन म्हणून बांधले गेले होते आणि १ th व्या शतकात बांधलेली लहान जुन्या घरे आणि एक सुंदर बाग आहे. थंडी असूनही, या शहरात समृद्ध सांस्कृतिक जीवन आहे आणि सामी सप्ताह, ध्रुवीय नाईट हाफ मॅरेथॉन, ट्रोम्सो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किंवा ऑरोरा बोरेलिस उत्सव अशा अनेक उल्लेखनीय घटना हिवाळ्यामध्ये होतात. अभ्यागतांसह अन्य लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये नवीन वर्षाची संध्याकाळची मैफिली आणि आर्क्टिक कॅथेड्रलमधील नॉर्दर्न लाइट्स मैफिलीचा समावेश आहे. त्यांना गमावू नका!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रअंतर्गत जलशक्ती अभियान व जिल्हा परीषद आदर्श गाव योजनेचा शुभारंभ आज कोनाळ ग्रामपंचायत हद्दीत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य श्री.लक्ष्मण नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कोरोना निर्बंधामुळे सद्यस्थितीत दळणवळण तसेच इतर बाबी बंद असल्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही व त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होण्याची शक्यता गृहीत धरुन केंद्र शासनाने मनरेगा अंतर्गत कामे सुरु ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्याचा प्रयत्न केला आहे.त्याकरिता जलशक्ती अभियानामध्ये मान्सुनपूर्वी जून २०२१ अखेर घरोघरी शोषखड्डे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी,अभियानाचे क्षेत्रिय अधिकारी श्री.सुजित गायकवाड व कोनाळ सरपंच श्री.पराशर सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस,उपसरपंच प्रितम पोकळे,सदस्य महेश लोंढे,लाभार्थी सूर्याजी लोंढे,ग्रामसेवक श्री.मस्के,आशा स्वयंसेविका शिवानी शेटवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल.. रात्रीचा खेळ चाले मालिकेचे चित्रीकरण पोलिसांनी थांबवले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघर्षाला यश.. सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ३६१ कोरोना बाधित रुग्ण तर,११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती.. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगा संदर्भात वेधले आमदार वैभव नाईक यांचे लक्ष ! आ.वैभव नाईक यांच्या वतीने कोंकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग या संस्थेस देण्यात आली ट्री कटिंग मशीन.. 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या वतीने 'हवामानातील पालट' या विषयावरील आध्यात्मिक संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर ! आता घरच्या घरीच करता येईल कोरोना चाचणी.. आज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले.. आज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले.. आमदार नितेश राणे यांनी केले कुडाळ येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..
बीड, 20 जून : ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पालकाने टॅब घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली. अभिषेक संत असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील रहिवासी आहे. 'गाव खेड्यातील शेतकऱ्यांची सध्याची परस्थिती काय आहे याची सरकारने पाहणी करावी. सरकारने ऊंटावरुन शेळ्या न राखता ऑनलाइन शिक्षण जर द्यायचं असेल तर पहिल्यांदा तर प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारने टॅब उपलब्ध करून द्यावेत,' अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, पेरणी झाल्यावर टॅब घेऊ देण्यात येईल, असं शेतकरी वडिलांनी सांगितले होते. मात्र हताश झालेल्या मुलाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या संकटात ऑनलाईन शिक्षणाच्या अट्टहासामुळे गरीब - श्रीमंत दरी आणखी गडद होत आहे. याचाच अभिषेक बळी ठरला आहे. यामुळे शिक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन शिक्षण देताना सामान्य वर्गातील विदयार्थ्यांबाबतीत विचार होणे गरजेचे आहे. ऊसतोड मजूर व शेतकरी कुटुंबातील अभिषेकच्या वडिलांची परिस्थिती हलाखीची आहे. घरी अवघी एक एकर जमीन, उसतोडीची उचल घेऊन दहावीपर्यंत दोन्ही मुलांचे शिक्षण पार पाडले. शिक्षणासाठी तो हॉस्टेलला राहायचा. लॉकडाऊनमळे व दहावीचे शिक्षण झाल्याने निकालाच्या प्रतिक्षेत गावाकडे परतला होता. पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने वडिलांकडे टॅबची मागणी केली. मात्र पैशाची चणचण असल्याने पेरणी झाल्यावर टॅब घेऊ असं अभिषेकच्या वडिलांनी सांगितले. मात्र घरची परिस्थिती पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च शिकायची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही या विचाराने नैराश्यातून आत्महत्ये चे टोकाचं पाऊल उचलले. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
कोरोना व्हायरसः गोमूत्र प्यायल्यानं कोरोनापासून रक्षण होतं का? गाईच्या तुपाचा आणि मूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल, असं मत शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. 'गोमूत्र आणि गाईचं तूप तीव्र जंतूनाशक आहे. त्यामुळे दर 3 ते 4 तासानं तूप नाकात फिरवलं, गोमूत्र दिलं तर कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होईल,' असंही भिडे यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक अजब सल्ले दिले जात आहेत. त्यापैकी गोमूत्र पिणे हा एक आहे. पण गोमूत्र प्यायल्यानं कोरोना व्हायरसवर मात करता येते का? बीबीसीनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक आजारांवर गोमूत्र किंवा शेणाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अलीकडेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदार सुमन हरीप्रिया यांनी कोरोना व्हायरसचा इलाज करण्यासाठी गोमूत्राचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "गाईच्या शेणाचे अनेक फायदे आहेत. कोरोना व्हायरसवरही यामुळं मात करता येईल, असं मला वाटतं. त्यासाठी गोमूत्राचाही वापर होऊ शकतो. " त्याचबरोबर, कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून गोमूत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एका समूहाने दिल्लीत गोमूत्र पिण्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता. दरम्यान, गोमूत्राच्या अँटी-बॅक्टेरियल गुणांविषयी याआधीही संशोधन करण्यात आलं आहे. पण, दिल्लीतल्या Indian Virological Society (IVS) चे डॉ. शैलेंद्र सक्सेना यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "आतापर्यंत असा एकही मेडिकल पुरावा सापडलेला नाही ज्यामध्ये गोमूत्रात अँटी-व्हायरलचे गुण आहेत. तसंच गाईच्या शेणाचंही आहे. त्याचा वापर केला तर ते अंगलटही येऊ शकतं. कारण, कुणास ठाऊक त्यामध्ये कोरोनाव्हायरस असूही शकतो" - वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल? - वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय? - वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय? दुसरीकडं, मुंबईस्थित काऊपॅथी हे ऑनलाईन स्टोअर 2018पासून देशी गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर करून साबण, सौंदर्यप्रसाधनं आणि इतर प्रोडक्ट्स विकत आहे. त्यापैकीच अल्कोहोलचा वापर न करता हँड सॅनिटायझर ऑनलाईन विकत आहे. यात देशी गाईचे गोमूत्र वापरले जात आहे असं म्हटलं आहे. सध्यातरी हे 'आउट ऑफ स्टॉक' म्हणजे उपलब्ध नाहीये, असं दिसत आहे. "मागणी वाढल्यानं आम्ही आता प्रत्येक ग्राहकाला ठराविक सॅनिटायझर देणार आहोत," असं त्यांच्या पेजवर लिहिलं आहे. तसंच रामदेव बाबा यांनी एका हिंदी न्यूज चॅनेलशी बोलताना लोकांनी घरातच आयुर्वेदिक (हर्बल) हँड सॅनिटायझर तयार करण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नाहीतर, कोरोनाव्हायरस दूर ठेवण्यासाठी आयुर्वेदिक काढा, गुळवेल, हळदी आणि तुळशीची पाने खाण्याचा सल्ला दिला आहे. पण जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि अमेरिकेतल्या सेंटर फॉर कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांच्या मते अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरच वापरावं असं म्हटलं आहे. तर, लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेच्या मते घरात तयार केलेला हँड सॅनिटायझर वापरू नये, कारण, त्यामध्ये सगळ्यात जास्त अल्कोहोल असणाऱ्या व्होडकाचा जरी वापर केला तरी त्यात केवळ 40% अल्कोहोल असते. शाकाहाराचा फायदा होतो का? काही दिवसांपूर्वी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी ट्विटरवरून लोकांना मांस न खाण्याचं आवाहन केलं होतं. "शाकाहारी व्हा. वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांचं मांस खाऊन जगाला धोका पोहोचवणारा व्हायरस निर्माण करू नका," असं ट्वीट त्यांनी केलं आहे. तर, आणखी एका समूहाने कोरोना व्हायरस हा मांस खाणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यासाठी आला आहे, असा दावा केला आहे. पण, जसं चिकन आणि अंड्यांची विक्री घटू लागली तसं भारत सरकारने अशा भ्रामक कल्पनांचं खंडन करत एक नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये कोरोना व्हायरस आणि चिकन/अंडी यांचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय. तसंच, भारतीय खाद्य नियामक मंडळाचा हवाला देत केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री गिरिराज सिंह यांनीही हा दावा फेटाळला आहे. चिकन, मासे आणि अंडी हे प्रोटिनचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत. ते कोणतीही शंका न बाळगता खा," असं म्हटलं आहे. कोरोनापासून वाचवणाऱ्या गाद्या? अमुक सामान कोरोनापासून तुम्हाला वाचवेल असा दावा करत काहीजण व्यवसाय करत असल्याचंही दिसून आलं आहे. उदाहरणार्थ, 15 हजार रुपयात 'अँटी-कोरोना व्हायरस गाद्या' घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा अशी जाहिरातही मुंबईतल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात आली होती. त्यावर भिवंडीच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. Arihant Matress या कंपनी अशा गाद्या विकत होती. त्यावर बीबीसीने या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमर पारेख यांच्याही चर्चा केली. ते म्हणाले, "ही एक अँटी-फंगल, अँटी अॅलर्जी, डस्ट-प्रूफ आणि वॉटरप्रूफ गादी आहे. त्यामुळे यात काहीही घुसू शकत नाही. " पण आता ही जाहिरात हटवली आहे. "माझ्यामुळं कुणाचं नुकसान होऊ नये म्हणून मी ही जाहिरात मागे घेतली आहे" हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. 'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा. )
Holi Special : रंगांमुळे शरीराला होतात हे नुकसान, 'असा' करा बचाव! होळीला अनेकच रंग खेळण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. पण नैसर्गिक रंगांचा वापर केला तर रंगांत रंगण्याचा तुम्ही वेगळाच आनंद घेऊ शकता. (Image Credit : www. beingrepublic. com) होळीला अनेकच रंग खेळण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. पण नैसर्गिक रंगांचा वापर केला तर रंगांत रंगण्याचा तुम्ही वेगळाच आनंद घेऊ शकता. पण बाजारात अनेक केमिकल्सयुक्त रंगांचा भरना झाला आहे. होळीला सर्वच प्रकारचे चांगले-वाईट रंग आपल्या संपर्कात येतात. याने आपल्या त्वचेचं-शरीराचं नुकसान होतं. रंग खेळताना किंवा खेळून झाल्यावर याकडे आपण फार गांभीर्याने बघत नाही. पण पुढे जाऊन हे फार गंभीर ठरू शकतं. कारण केमिकलयुक्त रंगाने शरीराला अनेक नुकसान होतात. काय काय होतात नुकसान? 1) रंग खेळताना रंग डोळ्यात जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. डोळ्यात रंग गेल्यावर जळजळ होणे आणि डोळे लाल होणे ही सामान्य बाब आहे. त्यासोबतच केमिकलयुक्त रंग डोळ्यात गेल्याने डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते. २) केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेचं फार जास्त नुकसान होतं. रंग लावल्यावर खाज येणे, डाग पडणे आणि सूज येणे अशा समस्या होतात. तसेच स्कीन कॅन्सर होण्याचा धोकाही असतोच. ३) लोकांचं असं मत असतं की, कोरड्या रंगांनी रंग खेळणे अधिक सुरक्षित असतं. पण असं होत नसतं. कोरडा रंग हवेतून आपल्या नाकात आणि तोंडाच्या माध्यमातून शरीरात जातो. यामुळे दमा किंवा श्वासासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. ४) बाजारात मिळणारे केमिकलयुक्त रंग केसांनाही प्रभावित करतात. केसांना रंग लावल्यानंतर केसगळती, डॅंड्रफसारखी समस्या होते. कसा कराल बचाव? 1) होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही रंगांमध्ये मेटल ऑक्साइड मिश्रित केलेलं असतं. ज्यामुळे केसांचं फार जास्त नुकसान होतं. त्यामुळे रंग खेळण्याआधी खोबऱ्याचं किंवा मोहरीचं तेल केसांना लावा. २) रंग खेळायला जाण्याआधी शरीरावर तेल लावा. याने रंग शरीरावर जास्त वेळ टिकणार नाही. त्यासोबतच कान, नाक, डोळ्यांच्या आजूबाजूला व्हॅसलीन लावा. असे केल्याने हानिकारक रंग त्वचेच्या आत जाणार नाहीत. ३) रंग काढण्यासाठी अनेकदा लोक गरम पाण्याचा वापर करतात, पण असे केल्याने रंग आणखी घट्ट शरीरावर बसतो. त्यासोबतच त्वचाही कोरडी पडते. त्यामुळे रंग काढण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. ४) अनेकदा लोक रंग काढण्यासाठी केरोसीन ऑइल, पेट्रोल याचाही वापर करतात. असे केल्याने शरीरावर पुरळ येण्याची शक्यता असते. रंग काढण्यासाठी घरी तयार केलेल्या बेसनाची पेस्ट शरीरावर लावा.
ती पेशवेकालीन शोधक बखरकारांनाहि उपलब्ध नसावी, किंवा खंडो बलाळानें तयार केलेल्या बखरी त्याच्याच घराण्यांतील प्रसिद्ध बखरकार मल्हार रामराव चिटणीसास उपलब्ध न व्हाव्या इत्यादि अनेक उदाहरणांवरून आपणाला तत्कालीन दप्तरखान्याच्या व्यवस्थेचा बोध करून घेतां येतो. असो, शाहूनंतरचीं किंवा पेशवे कालीन घराणीं बहुतेक नवीनच उदयास आल्यानें व विशेषतः राजारामकालीन महाराष्ट्रावरील संकट हेंच स्वामीकाजाचें मुख्य व महत्वाचें स्थान झाल्याने या पेशवेकालीन घराण्यांतील तकरीरासाठीं जी माहिती मिळविणें जरूर होतें ती सर्व या नूतन कीर्दीतूनच मिळविल्याने कार्यभाग साधे. त्यामुळे या घराण्यांतील तकरीरांत विशेषतः राजारामकालीनच वर्णन दृष्टीस पडतें व फार तर स्वतःचे कागदपत्रांवरून सांपडणारी वंशवेल किंवा थोडीबहुत शिवकालीन माहिती त्यांत दिली जाई. यावरून आपणांस असे अनुमान काढतां येतें कीं या घराण्यांना ही पहिली खतावणी उपलब्ध नव्हती व राजाराम, संभाजी व शिवाजी यांचे अमदानीतील पुरुषांचा उल्लेख करितांना या कालांतील राजकीय घडामोडींचा उल्लेख करणें जेव्हां जरूर पड़े तेव्हां तो मोघम व ऐकीव माहितीच्या जोरावरच करणें भाग असे. अर्थात्च अशा ऐकीव माहितीची जोड करून देतांना या मंडळीना तत्कालीन माहिती जभेस घरावी लागे व अशा तऱ्हेनें मिळविलेल्या माहितीनें ही मंडळी शाहूकाल सुरु केलेल्या कीर्दीची पूर्तता करीत असत. अर्थात्त्र या शकावलीच्या पूर्वकालीन नोंदीचे रचनेंत राजाराम कालीन हकीकत प्रत्यक्ष पहाणान्या मंडळीच्या स्मृतीमुळेच विपुल सांपडणें जसें शक्य आहे तसेच त्यांत शिवाजी व संभाजी कालीन माहिती सांपडणें कालमानाने झालेल्या विस्मृतीमुळे कठीण असे. अशा तऱ्हेनें या दोन प्रकारच्या कीर्दी अस्तित्वांत येऊन आजच्या शकावल्यांचा प्रसार झाला व नकलावरून नकलाहि तयार करण्यांत येऊं लागल्या. भाऊबंदकीचे खटले जसजसे वाढू लागले तसतसा या शकावल्यांचा प्रसार प्रत्येक घराण्यांत अधिकाधिक होऊं लागला. ३. आतां वर केलेल्या स्पष्टीकरणाप्रमाणें या राजकीय घडामोडींच्या जमाखर्चाच्या नोंदी अगदीं तत्कालींच झाल्याने या शकावलीतील माहितीला ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्व प्राप्त होत आहे ही गोष्ट जरी सिद्ध असली तरी या शकावलीच्या नोंदींत कोणत्या चुका आढळणे साहजिक आहे व अ सल्या शकावल्यांतील माहिती इतिहासास घेतांना आपल्याला तिचें परिक्षण करण्यास कोणत्या कसोटीस उतरवून घेणें जरूर पडेल त्याचें विवेचन करूं. मूळ प्रतीच्या अभावी, तकरीरा अगर करिने तयार करण्याकरीतां केलेल्या नक लांबद्दल आपण नंतर विचार करूं. प्रथम मूळ कीर्दीच्याच प्रामाण्याबद्दल ऊहापोह करूं. सरकारांत माहिती पुरविणाऱ्या माणसांचे मनांत विकल्प नसला व ती लिहितांना मुख्य बाबीबद्दलची माहिती जरी अगदीं बिनचुक असली तरीहि एखाद्या अनुषंगिक बारिकसारिक बाबींतील काल अगर किरकोळ भागाविषयीं अप्रत्यक्ष रीतीनें मिळविलेल्या माहितींत गैरसमजुतीचा प्रकार शिरणें साह - जिक असते. परंतु असले प्रसंग क्वचितच आढळतात. कारण विशेषतः शकावलींतील टिपणं अगदी ठळकठळक बाबींचीच असतात. माहिती कळविणान्या अगर ती संकलित लिहून ठेवणाऱ्या माणसांकडून नावांतील वर्णन्यासांत वगैरे हस्तदोष अगर इतर शब्दलोप अगर मुसलमानी वगैरे नांवाबद्दलच्या अज्ञानामुळे त्या नावांतील वर्णन्यासांत कांहीं दोष या शकावल्यांत शिरकले जातात. उदाहरणार्थ, 'शहादीखान' 'शहाबादीखान' इत्यादीनें 'शहाबुद्दनि' खानाचा नामनिर्देश करणें वगैरे. तसेच एखाद्या सरदाराचें अगर राजाचें नांव देणें वगैरे तें टोपण नांवानी देणें वगैरेहि दोष दृष्टीस पडतात. परंतु हे दोष कोणत्याहि कालीं घडणारे व सामान्य असतात. अर्थात् अशा प्रकारचे दोष दृष्टीस पडल्यानें या कीची बिनचुकता नाहींशी होत नाहीं हें जरी खरे असले तरी संशोधकानें असल्या चुका सुधारून शुद्ध प्रत लोकांपुढे ठेवणें हेंच त्याचें कार्य असतें. मूळ प्रतीत किंवा असल्या कीर्दीच्या लेखनांत आणखी एक चूक राहाण्याचा संभव असंतो; ती चूक म्हणजे एखाद्या शकाचे नंतर त्या शकांतील मजकूर लिहून आला व आपल्या मजकुराचा कालनिर्देश नंतर " एका महिन्यांनीं ' वगैरे सारख्या मोघम शब्दांत मोघम शब्दांत लिहून आला असला व हें टांचण तितकें नीट काळजीपूर्वक उतरून न घेतलें गेलें तर ती नोंद दुसन्या किंवा नंतरच्या शकांत जाणे साहजिक असतें; तसेंच कोणताहि शोध देणें तो जर एखाद्या अक्षराला गिरवूनच दिल्यास वाचनांत दुर्बोधता आणणें किंवा शोध घातला असतांहि त्या शोधाची नक्की जागा दाखविणारें काकपद न लिहिणें असलेंहि बारिक सारिक दोष मूळ कीर्दीत राहणे शक्य आहे. अर्थातच अशा दोषामुळे त्यावरून नक्कल करणाराची समजूत न पटल्य मुळे ते दोष अधिकच विपर्यस्त झालेले आहेत. वर ज्या दोषावलीचा निर्देश केला ती मूळ कीर्दीतील आहे असा म्हणण्याचा माझा मुळींच आशय नाहीं. व मूळ प्रत पाहावयास मिळाल्याखेरीज असे विधान करणे चुकीचे होईल हीहि गोष्ट माझ्या लक्षांत आहे. परंतु उपरिनिर्दिष्ट विवेचन करण्याचे कारण इतकेंच कीं त्यायोगें आपणाला एकच चूक सर्व अगर बन्याच नकलांत कां दृष्टीस पडते याचा उलगडा करतां येतो. असो. या प्रकारें शकावलीत सामान्यतेनें आढळणारे गुणदोष कसे कसोटी लावून सुधारावयाचे याचें स्पष्टीकरण केल्यानंतर प्रत्येक व्यक्तिशः नकलेत किंवा नकलेवरून केलेल्या नकलेत चुका कोणत्या रीतीनें घडून येतात व शोधानंतर त्या कोणत्या मार्गानीं सुधारतां येणें शक्य असतें याचा विचार करूं नकलकारांचे हस्तदोष दोन प्रकारचे आहेत. एक मोडी लिपीचें वाचन चुकीचें केल्यामुळे किंवा दिलेल्या नोंदीचा नोंदीचा मूळ अर्थ न समजल्यामुळे अर्थविपर्यासाने एखादें अक्षर अगर शब्द बदलण्यानें दोष घडून येतात; व दुसरे लिहितांना सहज अजाणतेपणे हस्तदोषानें एकादा शब्द, वाक्य अगर ओळ गाळण्यानें अगर एखाद्या शब्दाबद्दल चुकीचा शब्द नजर चुकीनें लिहिण्यानें दोष घडून येतात. कित्येक आधुनिक नकलकारांनी जुनी भाषा काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे असल्या नोंदींत बराच अर्थविपर्यास होऊन मजकूर लिहिलेला आढळतो. परंतु असल्या दोषांबद्दल लिहिण्याचें येथे प्रयोजन नाहीं. आपण असल्या नकलांना नवीन सुधारलेली आवृत्ति म्हणूं व या बाबीचा ऊहापोह करण्याचें येथेंच सोडून देऊं. सारांश, वर सांगितल्याप्रमाणें दोन्ही प्रकारच्या घडून येणाऱ्या चुकांचें शुद्धीकरण आपणाला आंतील अनुमानिक अगर तदवलंबी मजकुरावरून करितां येण्यासारखें असतें. 'ब', 'द', 'ह', 'ल', 'ला', 'क' इत्यादि अक्षरवाचनाच्या चुका संदर्भावरून तेव्हांच शुद्ध करितां येतात. अक्षर, शब्द, अगर सबंध ओळ अगर वाक्य गळले असेल तर तें दुसऱ्या नकलेवरून भरून काढतां येतें. तिथी, वार, पक्ष, मास, शक, व संवत्सर यांतील हस्तदोष गणिताच्या सहाय्याने दूर करितां येतात. एकाद्या शकांतील प्रथम अगर शेवटचें कलम नजरचुकीनें पूर्वीच्या अगर नंतरच्या शकांत घुसडलें गेलें असेल तर त्या नोंदीचा शक मागें अगर पुढे होतो तो गणिताच्या प्रमाणानें अगर प्रत्यंतर पुरावा पाहून सुधारतां येतो. या चुका विशेषतः एखाद्या शकाच्या शेवटच्या पौष- फाल्गुनादि एकदोन महिन्यांतील नोंदी प्रथम येऊन त्यानंतर प्रथमचे चैत्रवैशाखादि महिने आले असले तर होतात. नकल करितांना हे या शकाचे शेवटचे महिने पूर्वील शकांतील असें समजून लेखन केलें जातें; किंवा एखाद्या शकाचे चैत्रादि प्रथम महिने शेवटीं आले म्हणजे या प्रथम महिन्यांच्या नोंदी नंतरच्या शकाखालीं घालण्याचा नकलकारांना मोह पडतो. वस्तुतः मूळ नोंदीचा क्रमांक माहितीच्या पोहोंचेवर अवलंबून असतो. मुसलमानी व युरोपियन नांवांतील चुका इतर पुराव्यांवरून दुरुस्त कराव्या लागतात. असो. अशा प्रकारें नकलांतून वगैरे जसे लेखनदोष दृष्टीस पडतात तसेच विसाव्या शतकांतील माणसांस घोंटाळ्यांत घालणारे कांहीं विशेष सोळासतराव्या शतकांतील लेखनांत पहावयास सांपडतात. ह्या लेखनपद्धतीतील कांहीं प्रकार पुढें देतों. एखाद्या बाबीची नोंद करितांना जेव्हां तदनुषंगी परंतु तत्पूर्वी घडलेल्या एका अगर अधिक बाबींची नोंद करावयाची असते तेव्हां ती 'ऊन' प्रत्ययांत धातुरूपें योजून नंतर या बाबीपुढे मुख्य बाब दिलेली असते. परंतु या सर्व बाबी एकाच कार्याच्या भागमात्र असतात. अर्थात् ज्या तिथीपुढे अशी माहिती दिलेली असते तींतील मुख्य बाबीचा त्या तिथीशीं संबंध घरावयाचा असतो, व 'ऊन' प्रत्ययांत धातुरूपानें दर्शित केलेल्या बाबी तत्पूर्वी घडल्या, असें समजावयाचें नोंद करितांना ज्यावेळी दोन अगर अधिक बाबी स्वतंत्र परंतु एकमेकांशी संबंधित असून एकाच तिथीला अगर मितीला घडल्या असें दाखवावयाचें असतें तेव्हां 'ते समई', 'तेव्हां' यासारखीं क्रियाविशेषणें योजून संबंधित परंतु स्वतंत्र बाबी दर्शविल्या जातात. जर एखाद्या गोष्टीचें विवेचन करितांना नंतर घडलेल्या तत्कार्यसंबंधीहि बाबी सांगणें जरूर किंवा इष्ट वाटल्यास 'मग', 'नंतर', 'उपरि' इत्यादि शब्दांचा उपयोग केला जातो. अर्थात् ज्या तिथीला ही नोंद केलेली असते त्या तिथीशीं मुख्य बाबीचा संबंध असून 'मग', 'नंतर' वगैरे पुढे येणारी कलमें त्या तिथीनंतरचीं आहेत असे समजावें. एकाच तिथी अगर मितीपुढे येणाऱ्या स्वतंत्र बाबीची नोंद करितांना या बाबींतील स्वतंत्रपणा दर्शविण्यासाठीं या बाबींतील प्रत्येकीपुढे '१' हा आंकडा घातलेला असतो. एखाद्या मुख्य बाबीची फोड करितांना जर तत्पूर्वी घडलेल्या गोष्टी अनुसंधानवाचक अगर कारणात्मक म्हणून लिहिणें जरूर असल्यास हीं कारणात्मक किंवा अनु संघानवाचक वाक्यें एकापुढें एक परंतु पूर्ण क्रियापदांनी युक्त अशा अगदर्दी स्वतंत्र वाक्यांचा उपयोग करून कोणत्याहि कारणात्मक अव्ययाची योजना न करितां एकापुढें एक संगतवार लिहिलेली असतात. अशा वेळीं अनुसंधानवाचक सर्व वाक्यांनीं दर्शविलेल्या स्वतंत्र बाबींची कालमर्यादा भिन्न असून मुख्य बाबीच्या तिथीच्या बरीच पूर्वीची असते. अर्थात् दिलेल्या तिथीचा अगर मितीचा संबंध मुख्य बाबीकडे घ्यावयाचा असतो हे सांगावयास नकोच. तसेंच एकाद्या नक लेंत चूक अगर द्विरुक्ति असेल तर या नकलेवरून दुसरी नकल करून घेतांना नकलकारती न सुधारतां तशीच देऊन तीपुढें तो 'रुजू' हा शब्द लिहितो. असो. आज जिला आपण शकावली म्हणतो त्या राजकीय घडामोडीच्या कीर्दीच्या इतिहासाचें व तिच्या सामान्य स्वरुपाचें हें ठोकळ मानानें विवेचन केलें आहे. शकावलीबद्दलचा विचार अधिक सविस्तर रीतीनें मीं माझ्या ' मराठी राज्याची उदयकाल - शकावली' या निबंधांत केला असून हा निबंध मीं भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १३व्या संमेलन प्रसंगी ता. ३० मे १९२५ रोज वाचला आहे. तसेच शकावल्यांच्या अनेक प्रती मिळवून त्या संकलित किंवा एकत्रित करून व त्यांतील नोंदींचीहि मांडणी तारीखवार देऊन मीं एक संशोधनपूर्ण शकावलीहि प्रकाशनार्थ मंडळास सादर केलेली आहे. ती प्रकाशित झाल्यानंतर साधारण वाचकालाहि तिचा उपयोग करण्यास फारच सोपें जाईल. असो. या लेखांत आजपर्यंत छापल्या गेलेल्या अगर उपलब्ध असलेल्या शकावल्यांचें व्यक्तिशः परक्षिण वगैरे करण्याचे प्रयोजन दिसत नाहीं म्हणून येथेंच मीं वाचवा. सी. बेंद्रे. १९ शिवाजी महाराजांची स्वराज्यकल्पना. ( ले - चिं. वि. वैद्य ) हिंदुस्थानांत स्वराज्य स्थापण्याचें श्रेय शिवाजी महाराजांसच आहे असें आम्हांस वाटतें. शहाजीनें मोठ्या सैन्याच्या जोरावर पुष्कळ सत्ता मिळविली व भोगली, तरी मुसलमानांच्या ताब्यांतून महाराष्ट्रास सोडवितां येईल आणि येथें स्वराज्य स्थापन करितां येईल ही गोष्ट अशक्य आहे असें त्यास वाटत असावेसे दिसते. यासाठी स्वराज्यस्थापनेचें अविभाज्य श्रेय शिवाजी महाराजांसच आहे. ही शिवाजी महाराजांची स्वराज्यकल्पना पुष्कळशी अलिकडच्याच प्रकारची होती अशी आमची समजूत आहे. शिवाजी महाराजांनींच स्वराज्य शब्द हिंदुस्थानाच्या इतिहासांत प्रथम उच्चारला. आणि तो शब्द दादाभाई नौरोजीनी उचलून अलिकडील राजकीय चळवळींत पुढे आणला. असा शब्द व अशी कल्पना परराज्यानंतरच उत्पन्न होणें शक्य आहे. मुसलमानांच्या तीनचारशे वर्षांच्या परकीय अमलानंतर खऱ्या स्वराज्याची कल्पना महाराष्ट्रांत उत्पन्न झाली व ती शिवाजी महाराजांच्या प्रथम डोक्यांत आली 'हे देणें ईश्वराचें'. प्राचीन काळ आपल्याच राजांचें राज्य हिंदुस्थानांत नांदत असल्यानें हिंदुस्थानांत खरी स्वराज्याची कल्पना उत्पन्न न होणें साहजिक आहे. हिंदुस्थानांतील लोकांच्या राजकीय कल्पनाहि चुकीच्या होत्या व हें स्वराज्याची योग्य कल्पना उत्पन्न होण्यास पुष्कळ काळ पावेतों आडवें आलें, होहे मान्य करावे लागेल. राज्य किंवा राष्ट्र लोकांचें आहे ही कल्पना अति प्राचीनकाळीं हिंदुस्थानांत असली तरी ती लौकरच नष्ट झाली. वैदिककाळीं किंवा भारतकाळी क्रुरु, पांचाल, मद्र वगैरे लोकांचींच नांवें देशास व राजास असत. परंतु पुढे राजसत्ता चोहीकडे प्रबल होऊन राजांची नांवें देशास पडूं लागलीं. किंवा राजधानीच्या नांवानेंहि राज्य ओळखूं लागले. राज्य शब्दांतच ही चुकीची राजकीय कल्पना प्रतिबिंबित झालेली दिसते. राजाचा मुलूख तें राज्य अशा अर्थानें राष्ट्र शब्द मागें पडून राज्य शब्द पुढे सरसावला. त्यामुळे देश राजाचा ही कल्पना रूढ व प्रसृत झाली. हिंदुस्थानांतील राज्य म्हणजे राजांचे देश असाच शब्द - व्यवहार चालू झाला. राष्ट्रभावना नष्ट होऊन राजभक्ति चोहींकडे आदरणीय झाली. राजास जें राज्य मिळतें तें परमेश्वराच्या कृपेनें मिळतें, लोकांच्या संमतीने नव्हे, असाहि सिद्धांत राजकीय तत्त्वज्ञानांत प्रविष्ट झाला. आणि देशावर प्रचलित राजवंशांत जन्मलेले पुरुष यांचीच मालकी अशी लोकांची समजूत झाली. संसारांतील हजारों घडामोडी कल्पनांवर कशा चालतात हे पाहिले असतां आश्चर्य वाटते. संकल्पावर संसारांतील हजारों व्यवहार चालतात व उच्च नीच संकल्प उत्कर्षापकर्षास कारण होतात. युक्त व पायाशुद्ध राजकीय कल्पना नसल्यानें हिंदुस्थानांतील लोकांचें फारच नुकसान झाले आहे. देश राजाचा, ही कल्पना रूढ झाल्यानें हिंदुस्थान देशावर मालकी दिल्लीच्या बाद - शाहाची ही कल्पना कित्येक शतकें लोकांत रूढ होती. यांचा उगम कल्पनेनें पांडवांपर्यंत पोहोचविला. हिंदुस्थानचे सार्वभौम पांडव, त्यांचे वंशज तंवर, त्यांचे स्थानापन्न मुसलमानी बादशाहा असा संबंध लागून 'मुलूख बादशाहाका ' अशी समजूत हिंदुस्थानांत अगदी अलिकडेपर्यंत होती. या समजुतीला धक्का न बसावा म्हणून इंग्रजांनी बंगाल्यांत सत्ता चालविली तेव्हां बादशाहापासून बंगाल खंडानें घेतलें !! आणि 'मुलूख बादशाहाका अमल अंग्रेज सरकारका ' अशी द्विदल राज्यपद्धति दर्शनी सुरू केली. दक्षिणेंतहि बेदरचे बादशहा दिल्लीच्या बादशहाचे प्रतिनिधि, ईश्वरकृपेनें सत्तावान्, अशीच समजूत शेकडों वर्षे होती. त्या वेळचे मराठी लेख पाहिले म्हणजे बेदरचे बादशहा म्हणजे दक्षिणचे मालक ही सर्वव्यापी समजूत दिसते. तीच समजूत बेदरचे पांच तुकडे झाले तेव्हांहि राहिली. नगर किंवा विजापूरचे बादशहा हे परमेश्वरकृपेनें महाराष्ट्राचे मालक आहेत असेंच लोक समजत. स्वामिभक्तीनें म्हणा किंवा लोकांच्या समजुतीनें म्हणा शहाजीस सामर्थ्य होतें तरी निजामशाहीचा वारस लहान मुलगा मांडीवर घेऊन शाहाजी गादीवर बसे, तेव्हां त्या मुलास अधिकार का आणि मी महाराष्ट्राचा राजा कां नाहीं ? ही कल्पना त्यास सुचत नव्हती. कदाचित् सुचली असती तरीसुद्धां लोकांच्या कल्पनेंत जोपर्यंत परिवर्तन झाले नव्हतें तोपर्यंत त्यास कांहींच करितां आलें नव्हतें. निजामशाहीच्या वंशांतील अल्पवयी मुलगा हाच देशाचा मालक अशी सर्व लोकांची समजूत होती. तात्पर्य, बादशहा हा हिंदुस्थानचा मालक ही समजूत प्रथम घालविणें जरूर होतें. राज्याचे मालक लोक आहेत हैं प्रथम शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनांत ठसविलें विजापूरहशतील जुलूम व मोगलशाहांतील औरंगजेबाचा घर्मच्छल यामुळे ही कल्पना रूढ होण्यास मदत झाली ही गोष्ट खरी. पण एक कल्पना घालवून दुसरी कल्पना प्रसृत करणें व तीस योग्य नांव देणें, हें जें महान् व्यक्तीचें लक्षण तें शिवाजी महाराजांस लागूं पडतें. महाराष्ट्र विजापूरच्या बादशहाचें नसून महाराष्ट्रीयांचें आहे ही भावना त्यांनी जागृत केली व यासच त्यांनी स्वराज्य हें नांव दिलें. शिवाजी महाराजानंतर ही भावना महाराष्ट्रांत पुष्कळ वर्षे जोरांत होती. पण पेशवाईच्या उतरत्या काळांत ती नष्ट झाली असे म्हणावें लागतें. याचे अनेक दाखले देतां येतील, पण शेवटचा दाखला म्हणजे दुसन्या बाजीरावानें इंग्रजांच्या हातावर मराठी साम्राज्याचें उदक घातलें तो होय, लोकांची समजूत अशी दिसते कीं, मराठी साम्राज्याचे मालक पेशवे आणि खासगी मिळ(१२५) कतीप्रमाणें हें राज्य पेशव्यांस वाटेल त्यास देतां येणें शक्य आहे; पण खरा राजकीय सिद्धांत म्हटला म्हणजे राष्ट्र लोकांचें आहे, राजाची खासगी मिळकत नव्हे; राजा लढाईत हारला तरी राष्ट्र शत्रूचें होत नाहीं; आणि राजाच्या सनदेनें किंवा लेखानें राज्य किंवा राष्ट्र दुसऱ्याकडे जात नाहीं. असा सिद्धांत पाश्चात्य देशांत संमत झाला आहे. तिसन्या नेपोलियनच्या वेळेला जेव्हां फ्रान्सचा पराभव होऊन नेपोलियन जर्मनीच्या स्वाधीन झाला, तेव्हां जर्मनीनें नेपोलियनशीं तह करून कोणताही संधि केला नाही किंवा कोणताही मुलूख घेतला नाहीं. पॅरीस येथें नवें लोकसत्ताक राज्य बनल्यावर त्या राज्याशीं तहाचें बोलणें जर्मनीनें केले. हल्लींसुद्धां पाश्चात्य देशांत कोणत्याही तहाच कलमें लोकसभेपुढें मंजूर करून घ्यावी लागतात. राजास स्वतंत्रपणें राष्ट्राची किंवा प्रांताची विल्हेवाट करण्याचा अधिकार नसतो. असो. राष्ट्र राजाचें आहे ही कल्पना हिंदुस्थानच्या लोकांच्या मनांत खिळलेली नष्ट होऊन त्याऐवजी राष्ट्र लोकांचें आहे व राजा हा लोकांचा प्रतिनिधि आहे ही पायाशुद्ध कल्पना खिळली पाहिजे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रांतील लोकांच्या मनांत ही कल्पना भरवून जोराची राष्ट्रीय भावना कशी जागृत केली हे आपण पाहू. शिवाजी महाराजांचें स्वराज्य म्हणजे भोसल्यांचें राज्य नव्हे, किंवा उच्चवर्ण मराठे क्षत्रियांचोंहि राज्य नव्हे. राज्य बादशाहाचें किंवा राजाचें ही कल्पना नष्ट करून राज्य लोकांचें ही कल्पना लोकांच्या अन्तःकरणांत शिवाजी महाराजास उसवावयाची होती. त्याप्रमाणें राष्ट्र महाराष्ट्रीयांचें आहे असें ते लोकांच्या मनांत बिंबवीत. याचा प्रत्यंतर पुरावा अफझुलखानाच्या वेळीं मावळच्या देशमुखांमध्यें जी भवतिनभवात झाली त्याचें वर्णन करणारें एक पत्र सांपडलें आहे त्यांत मिळतो. विजापूरच्या बादशाहानें या देशमुखांना असा हुकूम पाठावला होता की बादशाही गार्दास स्वामिभक्तीनें मदत करून शिवाजीचा उच्छेद होईल अशी व्यवस्था करावी. त्यावेळी देशमूख लोक जमा होऊन अफजुलखानास मदत करावी किंवा शिवाजीस करावी, या प्रश्नाचा विचार सुरू झाला असतां; बादशाही गादी कोठून आली, " हे महाराष्ट्र राज्य आहे; " आपल्यास शिवाजीसच मदत करावयास पाहिजे असे त्यांनी ठरविलें. 'म्हहाष्ट्र' हा संस्कृत शब्द त्यांनी वापरला, मराठी शब्द वापरला नाहीं, हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे. महाराष्ट्रांत महाराष्ट्रीयांचें राज्य म्हणजे स्वराज्य अशी ही कल्पना असून ती सर्व लोकांत पसरली व स्वराज्य शब्दांत याप्रमाणें मोहिनी भरून लोकांत उमेद उत्पन्न झाली. याच कल्पनेंत स्वधर्माची कल्पनाहि अन्तर्भूत होती; आणि रामदासांचा धर्म हा शब्द याच अर्थाने भरलेला होता. महाराष्ट्रांत महाराष्ट्रीयांचें स्वधर्मयुक्त म्हणजे वैदिकधर्म-युक्त राज्य, म्हणजे महाराष्ट्रधर्म अशी
बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन ही जोडी सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असून ही जोडी "क्रिश-4'मध्ये एकत्रित झळकणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण एका पार्टीत हृतिक रोशनला दीपिका पादुकोण केक खाउ घालत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. तेव्हापासून लोकांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. तसेच चाहत्यांनाही ही जोडी सिल्वर स्क्रीनवर पाहण्याची इच्छा आहे. "क्रिश-4′ चित्रपटाबाबत दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत सांगितले की, मी यापूर्वी असे कधीही ऐकले नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी बाब आहे. दीपिका पुढे म्हणाली की, हृतिक रोशनबरोबर तिला नक्कीच काम करायला आवडेल, असे तिने सांगितले. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दीपिका पादुकोण "83′ चित्रपटात रणवीर सिंहसोबत झळकणार आहे. लग्नानंतर या चित्रपटात रणवीर-दीपिका प्रथमच एकत्रित काम करत आहेत. या चित्रपटाशिवाय ती "द इंटर्न'मध्ये ऋषि कपूर आणि शकुन बत्रा यांच्या "अनाम'मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत काम करत आहे. दुसरीकडे हृतिक रोशनचा "वॉर' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमविला होता. आता हृतिकच्या चाहत्यांना "क्रिश-4'ची उत्सुकता लागलेली आहे.
भारतात खेड्यापाड्यात अनेक होतकरू खेळाडू घडत आहेत, पण दुर्दैवाने त्यांचा मार्ग हा त्यांच्या आयुष्याप्रमाणे खाचखळग्यांचाच आहे. त्यांना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजूनही प्रत्येक टप्प्यावर झगडावे लागत आहे आणि त्यात घरच्यांची जबाबदारी खांद्यावर असल्यास त्यांना दुहेरी कसरत करावी लागते. याच दुहेरी कसरतीतही सर्व खेळाडू यशस्वी होतीलच असे नाही, परंतु जे यशस्वी होतात ते अनेकांसमोर प्रेरणा ठेवून जातात. असाच एक प्रेरणादायी पल्ला पुण्याच्या पूनम सोनुने हीने गाठला आहे. धावपटू बनण्याच्या स्वप्नाबरोबरच मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या खर्चाचा भार तिने स्वतःच्या खांद्यावर घेतला. शर्यतीतून मिळत गेलेल्या बक्षीसातून तिने बहिणीचे लग्नही लावून दिले. परंतु तिला मात्र बहिणीच्या डोक्यावर अक्षता टाकता आल्या नाही. पूनमचे वडील शेतमजुरी करून पत्नी, तीन मुली आणि मुलाच्या संसाराचा गाडा हाकतात. तुटपुंजा मजुरीवर त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. पूनमची आई शहरात जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय करते. अशात पूनमच्या वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नाचा निर्णय घेतला. आपले वडील लग्नाचा आर्थिक भार पेलू शकत नाही, याची कल्पना असल्याने पूनमने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील सागवान गावची पूनम नाशिक येथील विजेंद्रसिंह यांच्याकडे सराव करते. मोठी बहीण रुपालीचे लग्न झाले आणि दुसरी मोठी बहीण साधनाचे बीएपर्यंत शिक्षण झालेले आहे. तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली. साधनाच्या लग्नाचा खर्च उचल्याचा निश्चय करत पूनमने पुणे येथे पुनावाला क्लिन सिटी मॅरेथॉन होती. 21 किलोमीटरचे अंतर धावण्याचा पूनमला सराव नसतानाही ती शर्यतीत उतरली. ती केवळ शर्यतीत उतरली नाही तर 1.25 लाखांचे बक्षीस जिंकून तिने लग्नाचा भार उचलला. पण, ज्यासाठी तिने ही धडपड केली, त्या लग्नाला मात्र तिला हजर राहता आले नाही. आगामी दक्षिण आशिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आणि बहिणीचे लग्न व स्पर्धा एकाच वेळी आली. आता पूनमला ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. खेळाच्या माध्यमातून नोकरी लागल्यास तिला वडिलांनी घेतलेले कर्जही फेडायचे आहे.
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मानंतर WTC मध्ये २००० धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय ठरला. २०२३ मध्ये कसोटीत ५०० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. केमार रोचने विंडीजला दुसरे यश मिळवून देताना शुबमन गिलला १० धावांवर बाद केले. यशस्वी ७४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर बाद झाला आणि रोहितसह त्याची १३९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रोहित शर्मापाठोपाठ युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचेही अर्धशतक. . . भारताच्या बिनबाद ११८ धावा. टेलीविजन : 'तारक मेहता'मधील नट्टू काकांनी व्यक्त केली अखेरची इच्छा, म्हणाले- 'शेवटच्या श्वासापर्यंत. . . ' टेलीविजन : टेलीविजन : टेलीविजन : टेलीविजन : टेलीविजन : देवमाणूस या मालिकेतून दिव्या सिंगची होणार एक्झिट? टेलीविजन : टेलीविजन : टेलीविजन : टेलीविजन :
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) बी. ए. (BA) आणि बी. कॉम. च्या (BCom) पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून परीक्षा दोन भागात होतील. ऑगस्टमधील परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होतील. बी. ए. आणि बी. कॉमच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून सुरु होणार होत्या. त्याऐवजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेंबरला, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या विभागीय केंद्रात ४ सप्टेंबरपासून परीक्षा सुरु होतील. द्वितीय वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकात काही बदल असून, ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी ही माहिती दिली. तुकडी क्रमांक एक : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्रांचा समावेश. तुकडी क्रमांक दोन : नाशिक, नगर, धुळे, जळगांव, नंदूरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्रांचा समावेश. विद्यार्थ्यांनी आपली तुकडी किती तारखेला आहे, ते काळजीपूर्वक तपासून त्याचदिवशी त्या विषयाची परीक्षा वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेमध्ये द्यावी. बी. ए. , बी. कॉमच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या काही विषयांसाठी विद्यार्थी संख्या अधिक असल्याने त्यांना सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत पेपर देता येऊ शकेल. काही विषयांसाठी संख्या कमी असल्याने सकाळी ८ ते दुपारी १ अथवा दुपारी ३ ते रात्री ८ अशी पेपरची वेळ असेल. तुकडी निहायपरीक्षा बी. ए. दुसऱ्या वर्षासाठी पर्यावरणशास्त्र या विषयाची परीक्षा पहिली व दुसरी तुकडी अनुक्रमे १२ आणि १३ ऑगस्टला असेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी तुकडीनिहाय परीक्षा नसेल. मात्र 'स्लॉट टाईम' विद्यार्थी संख्येनुसार काही विषयांना सकाळी ८ ते रात्री ८ असा असेल. विद्यार्थ्यांनी आपण देणार असलेल्या पेपरची वेळ काळजीपूर्वक पाहून त्यानुसारच ऑनलाईन परीक्षेला उपस्थित होउन परीक्षा द्यावी. परीक्षांबाबतचे सविस्तर वेळापत्रक ycmou. digitaluniversity. ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. ऑनलाईन परीक्षा चांगली देता यावी यासाठी विद्यापीठाने https://ycmou. unionline. in संकेतस्थळावर १ ऑगस्टपासून सराव चाचणी (मॉक टेस्ट) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ ९ ऑगस्टपर्यंत घेता येईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सराव चाचणी आवश्य द्यावी, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत. - भटुप्रसाद पाटील (परीक्षा नियंत्रक) मुक्त विद्यापीठात ऑगस्ट २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी १२१ शिक्षणक्रमाचे १ हजार ३७६ अभ्यासक्रम असून सुमारे ६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकाचवेळी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखाहून अधिक आहे. अधिक विद्यार्थी संख्या असल्याने परीक्षेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत, परीक्षा सुरळीत व्हावी म्हणून एकाच विषयाची परीक्षा विभागनिहाय दोन दिवस ठेवली आहे. विद्यापीठच्या आठ विभागीय केंद्रांचे दोन गट करण्यात आले असून त्या दोन गटांतर्गत परीक्षा दोन दिवस घेण्यात येतील. - डॉ. दिनेश भोंडे (कुलसचिव, मुक्त विद्यापीठ)
एमपीसी न्यूज : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारतातल्या जलाशयांच्या जनगणनेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Jalyukta Shivar) राबविलेली जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल ठरली आहे. देशभरातल्या सिंचनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्वक दूरदृष्टीने राबविलेल्या या योजनेस संपूर्ण देशाची आता अधिमान्यता मिळाली आहे. जल संवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या पहिल्या गणनेचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातूनच जलयुक्त शिवार योजनेचे यश अधोरेखित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार तयार केल्यानंतर या जलयुक्त शिवार योजनेस त्या सरकारने नख लावले ती योजना स्थगित केली होती. (Jalyukta Shivar) मात्र आता ठाकरे पवार सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांच्या दूरदृष्टीतली जलयुक्त शिवार योजना सरकारने पुन्हा राबवायला सुरुवात केली असून याच जलयुक्त शिवार योजनेस देशात अव्वल क्रमांक मिळाला आहे. जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्राला जलसंवर्धनात प्रथम क्रमांकावर आला. या योजनेमुळे दुष्काळग्रस्त 18 हजार गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला. मराठवाड्यात भूजल पातळी सरासरी 3 मीटर ने वाढली भूजल तज्ञांचा रिपोर्ट. शेतकरी दुहेरी पिके घेऊ लागला. शेतकऱ्यांच उत्त्पन्न वाढले. जनावरांना 12 महिने चारा मिळू लागला.
छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. १४ एप्रिलरोजी सकाळी ६ वाजेपासूनच मध्यरात्री १२ वाजेपर्यंत विविध ठिकाणी रॅली व मिरवणूका काढल्या जातात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा बदल करण्यात आल्याची माहिती प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली. मुख्य मिरवणूक क्रांतीचौक येथून सुरू होऊन पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, मुख्य पोस्ट ऑफिस मार्गे भडकलगेट येथे पुतळ्याजवळ विसर्जित होतात. तसेच सिडको भागातही रॅली व मिरवणूका निघतात. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांची व वाहनांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियमन करण्यात आल्याचे प्रभारी सहायक आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले. दरम्यान, ही अधिसुचना पोलिस, अग्निशमन व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू असणार नाही. मिल कॉर्नर ते भडकल गेट. एन १२, नर्सरी- गोदावरी पब्लिक स्कुल-टि. व्ही. सेंटर- एन ९- आयोध्यानगर- शिवनेरी कॉलनी- एन ७- शॉपिंग सेंटर या मिरवणूक मार्गावरील वाहतुक मिरवणूक सुरू असेपर्यंत एकेरी मार्गावरून वळविण्यात येईल. जळगावकडून येणारी वाहने हर्सुल टी-जळगाव टी- जालना रोड-अमरप्रित चौक-दर्गा चौक-गोदावरी टी- महानुभव आश्रम-चौक- रेल्वेस्टेशन चौक-महाविर चौक मार्गे जातील व येतील. सतीश मोटार्स- सावरकर चौक- निरालाबाजार-औरंगपुरा या मार्गाने जातील. चेलीपुरा, कामाक्षी लॉज, महापालिका कार्यालय या मार्गाने जातील. दिल्ली गेटकडून येणारी वाहने ही टाऊन हॉल उड्डाणपुलाखालुन- मकईगेट-बेगमपुरा- विद्यापीठ मार्गे पुढे जातील.
टेलिव्हिजन जगतात अनेक लोकप्रिय मालिका आहेत. या मालिकांमध्ये 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेने नेहमीच तिचे वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या 12 वर्षापासून मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि त्यांची भूमिका. मालिकेत असणाऱ्या प्रत्येक पात्राची एक वेगळीच खासियत आहे. दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे, 1968 मध्ये झाला होता. त्यांचे मूळ गाव हे चे गुजरातमधील पोरबंदरपासून 10 किमी पुढे बसेगोसा हे आहे. एका मुलाखतीत त्यांच्या करिअरबद्दल त्यांनी सांगितले होते की, त्यांनी एक बॅक स्टेज कलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांना प्रत्येक भूमिकेसाठी 50 रुपये मिळत होते. त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांना कोणी काम देत नव्हते. अवघ्या 50 रुपयांपासून करिअरला सुरुवात केलेला हा कलाकार आज 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये एवढी फी घेतो. ते महिन्यातील 25 दिवस शूटिंग करतात. 25 दिवसाचा अंदाज लावला की, तर ते महिन्याभरात 36 लाख रुपये कमावतात. दिलीप जोशी यांनी वयाच्या 12 व्या वर्षी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला एका पुतळ्याची भूमिका केली होती. त्यांनी याबाबत एका मुलाखतीत सांगितले होते की, या नाटकात ते जवळपास 7-8 मिनिट पुतळा बनून उभे राहिले होते. त्यांनी दोन वेळा इंडियन नॅशनल थिएटर अवॉर्डमध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड जिंकला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, दिलीप जोशी यांना महागड्या गाड्यांची देखील आवड आहे. त्यांच्याकडे 80 लाख रुपयांची 'ऑडी क्यू 7' ही कार आहे. यासोबतच त्यांना टोयोटा, इनोव्हा एमपीव्ही या गाड्या चालवायला आवडतात. दिलीप जोशी यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी 'हम आपके है कौन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'हमराज', 'दिल है तुम्हारा' यांसारख्या जवळपास 15 हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी जयमाला यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना ऋत्विक आणि नीयती हे दोन अपत्य आहेत.
प्लेटमधील समोसामध्ये पाल असलेले फोटो सोशल मीडिया व वृत्तपत्रांत देऊन, दुकानाची बदनामी करण्याची भीती घालून कसबा बावडा येथील दुकानमालकाकडून १० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सोमवारी (दि. ११) आणखी एक गुन्हा दोघा सराईतांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. कोल्हापूर : प्लेटमधील समोसामध्ये पाल असलेले फोटो सोशल मीडिया व वृत्तपत्रांत देऊन, दुकानाची बदनामी करण्याची भीती घालून कसबा बावडा येथील दुकानमालकाकडून १० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सोमवारी (दि. ११) आणखी एक गुन्हा दोघा सराईतांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. संशयित स्वप्निल सुरेश सातपुते (वय ३०, रा. यादवनगर), विजय रघुनाथ शिंदे (३५, रा. कळवा, ठाणे) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनी हल्ला, लूटमार, हाणामारी, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी सांगितले, कसबा बावडा येथे शशींद्रन चातुकुट्टी काराई (५४) यांचे मिठाईचे दुकान आहे. ५ आॅक्टोबरला दुपारी संशयित स्वप्निल सातपुते आणि विजय शिंदे यांनी प्लेटमधील समोसामध्ये पाल असल्याचे दाखवून त्याचे फोटो सोशल मीडिया व वृत्तपत्रांत देऊन दुकानाची बदनामी करण्याची भीती दुकानमालकांना दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने १० हजार रुपये घेतले होते. यापूर्वी राजारामपुरीतील नवव्या गल्लीतील दीपक भुराजी पुरोहित यांच्या मिठाईच्या दुकानात अशा प्रकारची भीती दाखवून खंडणीची मागणी केली होती. त्यामध्ये संशयितांना अटक केल्यानंतर आपल्या ठिकाणी अशीच फसवणूक झाल्याचे फिर्यादी काराई यांच्या लक्षात आले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांत दोघांविरोधात फिर्याद दिली. संशयितांनी अशा प्रकारे आणखी किती दुकानदारांना भीती दाखवून खंडणी वसूल केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत. सध्या दोघेही राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
ठेवू नये नावं; चांगलं तेवढं घ्यावं. उदबत्ती- खरंच ग बाई पणती, वेडी तरी मी किती ! रूप नाही म्हणून आता नाही रडणार. बाहेरच्या भपक्याला आता नाही भुलणार. वासाचा घमघमाट तोच माझा थाट ! होईल माझी राख; पण मिरवीन दिमाख ! मेणबत्ती - पणती ग पणती, चुकलंच माझं, खरं आहे तुझं. ठेवू नये नावं, चांगलं तेवढं घ्यावं. सेवेचा गुण आपण घ्यावा; गुणांचा लाभ सर्वांना दयावा. १. उदबत्तीने आपली कोणती दुःखे पणतीला सांगितली ? २. पणती व उदबत्ती यांच्याकडे पाहून मेणबत्तीने नाक का मुरडले? त्यांना ती काय म्हणाली ? ३. उदबत्ती, पणती व मेणबत्ती यांचे कोणते चांगले गुण या पाठात वर्णन केले आहेत ? 'देवाची आरती, जेवणाची पंगत, उदबत्तीवाचून त्याला नाही रंगत.' यासारख्या या पाठातील तुम्हांला आवडणाच्या ओळी शोधून काढा. ८. सायंकाळची शोभा पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे बाहुनिया दूर. झाडांनी किति मुकुट घातले डोकिस सोनेरी कुरणावर, शेतात पसरला गुलाल चौफेरी ! हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळींचे झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! सोनेरी, मखमली, रुपेरी पंख कितीकांचे रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे! अशी अचल फुलपाखरे फुले साळिस जणु फुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती ! झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती ! हिरे, माणके, पाचू फुटुनी पंखचि गरगरती ! पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा. कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा ? १. सायंकाळी झाडे कशी दिसतात ? का? २. साळीचे शेत झोके घेत आहे, असे का म्हटले ? ३. फुलपाखरांचे रंग कसे होते ? ४. पाखरे कोठे गोळा झाली होती ? ५. सोन्याचा गोळा कोणास म्हटले आहे ? का ?
पोंक्षे! म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय; पण तुमची हलकट. . ? काय म्हणाले मोटकरी? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?
- अँडरसनच्या थीसिस अॅबस्ट्रॅक्टनुसार, 'शोटा वाचताना [व्यक्ती] लैंगिक आनंद कसा अनुभवतात हे समजून घेणे' हा या अभ्यासाचा उद्देश होता. - अँडरसन आणि मँचेस्टर विद्यापीठावर सोशल मीडियात टीका, त्याच्या प्रबंधाला 'हस्तमैथुन वर पीएचडी' असे नाव दिले. Viral News :नवी दिल्ली : पीएचडी (PhD) करणे हे अतिशय प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे समजले जाते. जगभरातून लाखोंच्या संख्येने पीएचडी केल्या जात असतात. पीएचडीसाठी असंख्य विषय निवडले जातात. मात्र आता एक पीएचडी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तुम्ही कल्पनादेखील करू शकणार नाही अशा विषयात एक विद्यार्थ्याने पीएचडी केली आहे. इंग्लंडमधील एका विद्यापीठात एका विद्यार्थ्याने चक्क हस्तमैथुन (PhD on masturbation) या विषयावर पीएचडी केली आहे. एका विद्यार्थ्याला हस्तमैथुन विषयात पीएचडी प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल इंग्लंडमधील एका विद्यापीठाला फटकारण्यात आले आहे. कार्ल अँडरसन (Karl Andersson)या विद्यार्थ्याला मँचेस्टर विद्यापीठाने (University of Manchester) एक लेख प्रकाशित करण्याची परवानगी दिली होती ज्यात त्याने हस्तमैथुन केल्यानंतर 'शोटा' म्हणून ओळखल्या जाणार्या कामुक उपसांस्कृतिक जपानी कॉमिक्सवर लिहिले होते. (In UK university Karl Andersson publishes PhD thesis on masturbation) अधिक वाचा : Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनानंतर 'या' तीन तारखांना बांधू नका राखी! अँडरसनच्या पीएचडी प्रबंधानुसार, कॉमिक्समध्ये 'लहान मुलाचे पात्र गोंडस किंवा बहुतेक वेळा लैंगिकदृष्ट्या स्पष्टपणे' समाविष्ट आहे. अँडरसनच्या संशोधन प्रबंधानुसार, 'शोटा वाचताना [व्यक्ती] लैंगिक आनंद कसा अनुभवतात हे समजून घेणे' हा या अभ्यासाचा उद्देश होता. "या प्रयोगादरम्यान पॉर्नच्या 'दूध आणि मुसली'पासून दूर राहण्यासाठी पुरेसे मेहनती असणे आवश्यक होते," असे त्याने स्पष्ट केले. या तीन महिन्यांच्या संशोधनादरम्यान, अँडरसनने दावा केला की त्याने सेक्स आणि सर्व प्रकारच्या पोर्नोग्राफीपासून दूर राहिल्याचे द टेलिग्राफच्या वृत्तात म्हटले आहे. त्याच्या संशोधनासाठी त्याने सुरुवातीला सर्वेक्षण आणि मुलाखतीही घेतल्या. अँडरसन म्हणाला की जेव्हा त्याने संशोधन सुरू केले तेव्हा तो दीर्घकाळापासूनच्या मैत्रिणीपासून दुरावला होता. "या प्रयोगादरम्यान मी एकटाच राहिलो होतो, आणि दीर्घ संबंधानंतर मी नवीनच अविवाहित झालो होतो - या घटकांमुळे कदाचित ही पद्धत एक्सप्लोर करण्याची माझी इच्छा आणि उत्सुकता कारणीभूत ठरली आहे," असे द टेलिग्राफने उद्धृत केले. शोधनिबंधाची अंतिम शब्द संख्या 4,000 पर्यंत आली. या पीएचडी प्रबंधात 'शोटा' हे स्व-प्रकाशित कामुक कॉमिक्सची एक शैली म्हणून वर्णन केले आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या लेखाचे शीर्षक आहे 'मी एकटा नाही - आम्ही सर्व एकटे आहोतः जपानमधील शोटा सबकल्चरवरील संशोधनात हस्तमैथुनचा एक एथनोग्राफिक पद्धत म्हणून वापर'. "म्हणून, मी कॉमिक्स वाचायला सुरुवात केली त्याच प्रकारे माझ्या संशोधन सहकाऱ्यांनी मला सांगितले होते की त्यांनी हस्तमैथुन करताना हे केले होते," असेही पुढे त्यात म्हटले आहे. लेखाचा हा भाग घेतला असला तरी, अँडरसन आणि मँचेस्टर युनिव्हर्सिटीवर सोशल मीडिया युजर्सकडून आणि राजकारण्यांकडून टीका करण्यात आली. त्यांनी या प्रबंधाला 'हस्तमैथुनावर पीएचडी' असे नाव दिले होते. त्यानंतर विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची पुष्टी केली आहे. एका प्रवक्त्याने सांगितलेः "आता पीएचडीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याच्या कामाच्या गुणात्मक संशोधनातील अलीकडील प्रकाशनाने महत्त्वपूर्ण चिंता आणि तक्रारी वाढवल्या आहेत ज्या आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत. "
शिक्रापूर (जि. पुणे) : शिवसेना (Shivsena) उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आहे. 'मातोश्री'वरुन (Matoshri) विचारणा झाल्यास आढळराव-पाटील यांना शिरुरमधूनच उमेदवारी द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवावी आणि आढळराव पाटलांना शिरुरमधून उमेदवारी देण्यात यावी, असे पत्र वरिष्ठांना दिल्याचे शिवसेना जिल्हा सल्लागार अनिल काशिद यांनी स्पष्ट केले. (Shiv Sainiks oppose decision of seniors to send Shivajirao Adhalrao Patil to Pune) दोन दिवसांपूर्वी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यासमोर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत सांगण्यात आले. मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य मानून आढळराव यांनी कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, 'मातोश्री'वरील बैठकीत घेण्यात आलेल्या भूमिकेबद्दल शिवसैनिकांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यामागे राष्ट्रवादीचे असल्याचे शिवसैनिक खासगीत आरोप करत आहेत. त्यामुळे आढळरावांना शिरुरमधूनच उमेदवारी द्यावी, यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले. मातोश्रीवरील बैठकीत आढळराव पाटील यांना जे सांगण्यात आले, त्याबद्दल पक्षसंघटना म्हणून आमचे मत कोणीही जाणून घेतलेले नाही. ज्या मतदार संघात आढळरावांचा संपर्क आहे. मतदारांशी जिथे नाळ जोडलेली आहे. जिथे पक्ष संघटना मजबुतीने त्यांनी बांधलेली आहे आणि ज्या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत, तो मतदारसंघ सोडून पुण्यात का जायचे? आमच्या मतदारसंघातील सामान्य शिवसैनिक आणि संघटनेतील प्रत्येक पदाधिकारी हेही पुण्याच्या उमेदवारीबाबत आचंबित झालेले आहेत. वरिष्ठांकडून मला विचारणा झाल्यास मी खुलासेवार बोलणार आहे. तसेच, वस्तुस्थितीचा अहवालही सादर करणार आहे, असे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी स्पष्ट केले. आपली महा विकास आघाडी आहे, हे राष्ट्रवादीने लक्षात घ्यावे. महाआघाडी नसताना राष्ट्रवादीकडून २०१९ मध्ये शिवसेनेचा पराभव झाला आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीला आमची गरज असेल तर आता शिरुरची जागा त्यांनी आढळराव पाटलांसाठी सोडावी आणि त्यांनी पुण्यात आपला उमेदवार उभा करावा, त्यांना आम्ही पुण्यात मदत करु. तसा पत्रव्यवहार आपण वरिष्ठांना केल्याचेही काशिद यांनी सांगितले. शिरूर मतदारसंघाबाबत निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती विचारात घ्यायला हवी होती. सध्याच्या घडामोडीमुळे शिवसैनिक आधीच संतप्त आहे. त्या पार्श्वभूमीवर आढळराव-पाटील यांचा कोणताही संपर्क नसलेल्या पुण्यातील उमेदवारीबाबत भाष्य करणे, हे केवळ आढळराव-पाटलांवर अन्याय करण्यासारखे नाही तर संपूर्ण शिरुर मतदार संघावर अन्याय करण्यासारखे आहे. असे काही निर्णय घेतले गेल्यास आम्ही जनआंदोलन उभे करू , असे शिवसेनेचे शिरूर विभागप्रमुख जदीप ताठे यांनी सांगितले. Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
#Encroachment #HousingSociety #CommissionerAmanMittal #MaharashtraTimesलातूर शहरातील नांदेड रोडवरील वैभव मागासवर्गीय गृह निर्माण सोसायटीतील आतिक्रमणावर महापलिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हातोडा मारला. चार घरांची कंपाउंड वॉल जेसीबीने तोडली. त्यामुळे स्थानिक नागरिक व मनपाच्या अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यात चांगलीच खडाजंगी झाली. मनपा आयुक्तांच्या आदेशाने हे अतिक्रमण काढण्यात येत होते. स्वतः आयुक्त अमन मित्तल उपस्थित होते. वैभव सोसायटीने 27 जुलै रोजी ले-आउट दाखल केलेले असताना त्यास मंजुरी न देता संचिकांच गायब केली असे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी सांगितले. आणि मनपा ले आउट मंजूर नसल्याचे कारण पुढे करीत अतिक्रमण काढत असल्याचे म्हटले आहे.
भुसावळ : येथील जामनेर रस्त्यावरील रहिवासी सोपान तुकाराम कोळंबे (८९) यांचे दि. ४ जून रोजी पहाटे ३-४५ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून,जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते नाक, कान, घसा तज्ञ डॉ. विकास कोळंबे यांचे वडिल होत.
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण केले असून, काही महिन्यातच व्यापारी संकुल निर्मितीला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विनावापर जागेचा कायापालट होऊन रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहे. अमरावती : अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण केले असून, काही महिन्यातच व्यापारी संकुल निर्मितीला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विनावापर जागेचा कायापालट होऊन रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहे. राज्यातील ३८ रेल्वे स्थानकांचा बीओटी तत्त्वावरील पुनर्विकासात समावेश असून, 'अ' वर्गात मोडणाऱ्या अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. अतिरिक्त जागेचा व्यवसायासाठी वापर करण्याचे प्रस्तावित आहे. साकारलेल्या भव्य मॉडेल रेल्वे स्थानकाची देखभाल, दुरुस्तीसाठी मोठी यंत्रणा लागत असल्याने रेल्वेला आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परंतु, येत्या काळात अमरावती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास झाल्यास उत्पन्नातून येणारी रक्कम या स्थानकावर खर्च करून प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा देण्यावर भर राहणार आहे. इर्विन परिसरात अतिरिक्त जागा असून या जागेवर व्यापारी संकुल उभारल्यास मोठी रक्कम रेल्वेला मिळेल, असा अंदाज आहे. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना अतिरिक्त जागेवर व्यापारी संकुल निर्माण करताना खासगी क्षेत्रासह सर्व इच्छुकांकडून स्पर्धात्मक निविदा मागवण्यिाचे धोरण आहे. या नव्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयीसुविधा पुरविताना कोणताही खर्च लागणार नाही, हे विशेष. या अतिरिक्त जागेच्या अनुषंगाने निविदाकर्ता कल्पकतेनुसार व डिझाईननुसार रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करेल, असे या योजनचे स्वरुप आहे. काही वर्षांपासून ओस पडलेल्या अतिरिक्त जागेचा कमर्शियल वापर होणार असल्याने रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध होईल. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांच्या आदेशानुसार या अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण झाले आहे. अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाच्या अतिरिक्त जागेवर साकारण्यात येणाºया व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी पुणे येथील कन्सलटंसीने जागेचे सर्वेक्षण केले आहे. अतिरिक्त जागेचे मोजमाप करून व्यापारी संकुल निर्मितीसाठी वापर योग्य जागेचा अहवाल रेल्वेच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत व्यापारी संकुल निर्मितीच्या ई-निविदादेखील काढण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. अमरावती रेल्वे स्थानकाच्या अतिरिक्त जागेसंदर्भात यापूर्वीच सर्वेक्षण झाले आहे. इर्विन रूग्णालयाच्या बाजूकडील जागेवर व्यापारी संकुल प्रस्तावित आहे. त्यानंतरची कार्यवाही डीआरएम कार्यालयस्तरावरून होत आहे.
नवी दिल्ली : आपण सर्वचजण स्मार्टफोनवर स्क्रॅच पडू नये अथवा नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेत असतो. मात्र, विचार करा आयफोनवर जर गरम लाव्हा टाकला तर? एका युट्यूबरने असाच एक प्रयोग केला असून, याचा व्हिडिओ WowExperiments चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये व्यक्ती आयफोन १२ वर लाव्हा टाकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती बॉक्समधून आयफोन १२ ला बाहेर काढतो व सोबतच लाव्हा गरम करत आहे. त्यानंतर लाव्हाला एका होल्डरच्या माध्यमातून iPhone 12 च्या स्क्रीनर टाकतो. हा लाव्हा फोनच्या स्क्रीनवर पसरतो व यामुळे अर्धी स्क्रीन दिसत नाही. लाव्हा टाकल्यानंतर आयफोनच्या स्क्रीनवर काळा डाग दिसून येतो. व्यक्ती स्क्रीनवरून लावा काढण्याचा देखील प्रयत्न करतो, मात्र काहीही होत नाही. विशेष म्हणजे तप्त लाव्हा टाकल्यानंतर देखील आयफोनची स्क्रीन फुटत नाही. परंतु, व्हिडिओमध्ये ज्या फोनवर लाव्हा टाकण्यात आला आहे, तो आयफोन १२ नसून त्याचे एक क्लान आहे. हा अँड्राइडवर चालणाऱ्या स्वस्त आयफोन क्लोन असल्याचे स्पष्ट दिसते. युट्यूबवर याआधी देखील DistractifyYT, Power Vision PRT आणि Superkot सारख्या चॅनेल्सवर असे प्रयोग केलेले व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे. यात दिसो की, लाव्हा टाकल्यानंतर फोनचा स्फोट होतो. दरम्यान, लाव्हा टाकल्यानंतरही या फोनचा स्फोट न झाल्याने पाहणारे देखील आश्चर्यचकित झाले. प्रयोगासाठी कोणता फोन वापरला हे मात्र समजू शकले नाही. परंतु, असा प्रयोग घरात करणे नक्कीच धोकादायक ठरू शकते.
थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन - दरोड्याच्या गुन्ह्यात हवे असलेले दोन फरार दरोडेखोरांच्या मुसक्या लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आवळल्यात यश आले असून ते पोलिस कोठडीत आहेत. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2019 मध्ये वाघोली येथे दरोडा पडला या संदर्भातील तक्रार लोणीकंद पोलिस स्टेशन मधे दाखल होती यातील दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकातील पोलिस हवालदार बाळासाहेब व पोलिस काॅन्स्टेबल ॠषीकेश व्यवहारे यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील दोन दरोडेखोर लोणीकंद येथील हाॅटेल सप्तमी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. यावर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून दत्ता रंगनाथ गायकवाड जे जे नगर वाघोली व किशोर विश्वनाथ जाधव दुबे नगर वाघोली यांना ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे मान्य केले. त्याच्याकडून रु 1,54,000 किमतीचे 29 मोबाईल हस्तगत केले. ही कारवाई हवेलीच्या विभागीय पोलिस अधिकारी डाॅ सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलिस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलिस नाईक श्रीमंत होनमाणे, पोलिस काॅन्स्टेबल संतोष मारकड, दत्तात्रय काळे, समीर पिलाने, ॠषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली.
दौंड पंचायत समितीचे मावळते सभापती गायकवाड यांनी राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाले होते. पंचायत समितीतील एकूण बारा सदस्यांपैकी अकरा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. सर्व सदस्य माजी आमदार रमेश थोरात समर्थक मानले जातात. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील धनगर समाजाच्या मतांचे गणित लक्षात घेऊन देवकाते यांना सभापतीपद देण्याच्या राजकीय हालचाली काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामुळे माजी आमदार थोरात यांच्या आदेशावरून गायकवाड यांनी राजीनामा दिला. रिक्त झालेल्या सभापतीपदाची निवडणूक आज दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात ठेवण्यात आली होती. सभापतीपदासाठी फक्त ताराबाई देवकाते यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होत. ताराबाई देवकाते या राजेगाव पंचायत समिती गणातून निवडून आले आहेत. त्या मलठण गावच्या रहिवाशी आहेत. त्यांचे माहेर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील आहे.
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!' या सिंहगर्जनेला गतवर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. पण लोकमान्य टिळकांची स्मृतीही कुणाला झाली नाही. खरं तर त्यांच्या सिंह गर्जनेपलिकडे किंवा फार तर शेंगांच्या टरफला पलीकडे लोकमान्य टिळक मराठी माणसालाही कितपत माहीत आहेत याची शंकाच आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना तर 'बाळ गंगाधर टिळक वॉज अ मॉडरेस्ट' या एका तुटपुंज्या ओळीच्या पलीकडे टिळकांचा इतिहासच शिकवला जात नाही. नेते मंडळी तर काय फक्त राजकारणासाठी व्यक्तींचा वापर करत असतात. फक्त एकच विचाराचा, एकाच व्यक्तीचा उदोउदो व्हावा म्हणून टिळकांना 'लोकमान्य' म्हणायलाही काही नेते तयार नसतात. टिळक पुण्यतिथीला त्यांच्या गिरगाव चौपाटीवरील स्मृतिस्थळाला साधा एक पुष्पहारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्पण केला जात नाही, हे केवढं दुर्दैव! अर्थात लोकमान्यत्व हे नेत्यांच्या ठरवण्यावरून नाही तर बहुतांशी लोकांच्या श्रद्धेवरून ठरत असतं. आजकाल लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पलीकडे टिळक या नावाचं अस्तित्वही पाहायला मिळत नाही. 'दे दी आझादी बिना खड्ग बिना ढाल' असं म्हणताना काही तथाकथित लोकनेत्यांची जिभही कचरत नाही. आणि तेच संस्कार पाठ्यपुस्तकातून मुलांच्या मनावर बिंबवले जात आहेत. 'स्वराज्य' हा शब्द जसा लोकमान्य टिळकांनी रूढ केला, तसाच 'बहिष्कार' (जो महात्मा गांधीजींनी पुढे शस्त्र म्हणून वापरला) हा शब्दही टिळकांनीच सामान्यांना शिकवला. फक्त शिकवलाच नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात विदेशी मालाची होळी केली तेव्हाही त्या होळीसमोर भाषण करण्यात टिळक अग्रेसर होते. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' असं टिळकांनी कधीच केलं नाही. उलट क्रांतीच्या मार्गाने जायचा संदेश क्रांतीकारकांना देतानाही टिळकांनी त्यातली जहालता, त्यामुळे होणारा परिणाम, ओढवणारी आपत्ती यांची वारंवार सूचना केली. तरीही या मार्गाचा अवलंब करून पुढे झळकलेले हिरे म्हणजे अर्थातच चापेकर बंधू, बाबाराव सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट. टिळक हे फक्त पेशानेच शिक्षक नव्हते, तर स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा गुरुमंत्र त्यांनी शिकवला. लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्यातील योगदान म्हणाल, तर शक्य त्या सर्व मार्गांनी त्यांनी देशाच्या जडणघडणीत घेतलेला सहभाग. मग ती राजकीय सुधारणा असो वा सामाजिक. फक्त इंग्रजांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सुधारणा लोकांच्या बोकांडी बसवणं त्यांना अमान्य होतं. ज्या काळात मुलगी ८ वर्षाच्या आत सासरी धाडायची असा लोकचार होता; त्या काळात कोणत्याही निर्बंधाचा (कायद्याचा) आधार न घेता, पुण्यातल्या सनातनी लोकांना न जुमानता स्वतःच्या मुलीचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षी करणारे टिळकंच! टिळक तरतरीत, उग्र होते, मानी होते. पैशांसाठी, पदासाठी स्वाभिमान धाब्यावर बसवणे टिळकांसारख्या सिंहाला कधीच पटणारं नव्हतं. 'इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा प्रश्न जो राज्यकर्त्यांना विचारू शकतो त्याची अफाट शक्ती, मनाची तयारी आणि येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची छाती या गोष्टी किती उच्च पातळीवरील होत्या हेच सिद्ध होतं. फक्त अर्ज-विनंत्या करून स्वराज्य मिळत नाही, तर त्यासाठी शक्य ते सर्व करण्याची तयारी त्यांनी दर्शवली; प्रसंगी तुरुंगवासही पत्करला. काळानुसार काही पद्धती, जुने मार्ग बदलावे लागतात याचंच हे द्योतक नाही का? 'गांधी आमचे, सावरकर तुमचे' असं म्हणताना काँग्रेसच्या तथाकथित राजपुत्राला लोकमान्यांचं स्मरण झालेलं कधीच दिसलं नाही. टिळक काँग्रेसमध्ये होते हे तरी या राजपुत्राला माहित असेल की नाही शंकाच आहे. असो. पूर्वी जेव्हा सुरत काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा जहाल आणि मवाळ हे पक्ष भिन्न झाले आणि लोकांनी मावाळांपेक्षाही जहाल काँग्रेसला डोक्यावर घेतली. लोकमान्य विद्यमान असेपर्यंत काँग्रेस पूर्णपणे आपल्याकडे ठेवणं महात्मा गांधींना कधीही शक्य झालं नाही. टिळकांचा लोकांमधील दरारा आणि मनाचं इतका होता की, 'टिळक महाराज' जे म्हणतील ते ते सर्व करण्याची लोकांची तयारी असायची - निदान महाराष्ट्रात तरी! महाराष्ट्रात टिळकांना शह देणं केवळ अशक्य होतं. त्यामुळे ज्या दिवशी टिळकांनी मुंबईत शेवटचा श्वास घेतला त्याच दिवशी मोहनदास गांधी नामक व्यक्तीने मुंबईतच सभा बोलावून आपल्या महात्मा पर्वाला प्रारंभ केला. २३ जुलै १८५६ ला जन्मलेल्या या कर्मयोग्याचा १ ऑगस्ट १९२० ला न्यूमोनियाने बाळी घेतला. माणूस संपला तरी विचार संपत नाहीत...आणि टिळकांसारख्या असामान्य साधुपुरुषाचे विचार कधीच संपणार नाहीत. आवश्यकता आहे ती ता विचारांना नवा उजाळा देण्याची !
रेल्वे द्वारा प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या धावणार आहे. . 1) 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष (दैनिक) दि. १. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 05018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दैनिक) दि. १. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 2) 05102 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष (दर गुरुवारी) दि. ८. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 05101 छपरा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दर मंगळवार) दि. ६. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 3) 02598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- गोरखपूर विशेष अतिजलद (दर बुधवारी) दि. ७. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 02597 गोरखपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अतिजलद (दर मंगळवार) दि. ६. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 4) 02741 वास्को दी गामा -पटना विशेष अतिजलद (दर बुधवार) दि. ३०. ०६. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 02742 पटना -वास्को दी गामा विशेष अतिजलद (दर शनिवार) दि. ३. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 5) 07323 हुबली -वाराणसी विशेष अतिजलद (दर शुक्रवार) दि. २५. ०६. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 07324 वाराणसी-हुबली विशेष अतिजलद (दर रविवार) दि. २७. ०६. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 6) 06229 मैसूर -वाराणसी विशेष अतिजलद (दर मंगलवार, गुरुवार) दि. २९. ०६. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 06230 वाराणसी -मैसूर विशेष अतिजलद (दर गुरुवार, शनिवार) दि. १. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 7) 06502 यशवंतपुर-अहमदबाद विशेष अतिजलद (दर रविवार) दि. २७. ०६. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 06501 अहमदबाद-यशवंतपुर विशेष अतिजलद (दर मंगळवार) दि. २९. ०६. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 05030 पुणे- गोरखपूर विशेष (दर शनिवारी) दि. ३. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 05029 गोरखपूर -पुणे विशेष (दर गुरूवारी) दि. १. ७. २०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. टीप : 05030/05029 विशेष २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी अशा सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल. टीपः या गाड्यांच्या मार्गांमध्ये, वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. आरक्षण : विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www. irctc. co. in या आधीच सुरू करण्यात आलेले आहे. या विशेष ट्रेनच्या तपशीलवार थांबे आणि वेळांसाठी कृपया www. enquiry. indianrail. gov. in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.
एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील गुजराती खरक समाजाच्या लोकांनी महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी पाठींबा जाहीर केला. गुरुवारी (दि. १०) झालेल्या कार्यक्रमात समाजाच्या सर्व लोकांनी मिळून हा निर्णय घेतला. यावेळी भुपत मांजीभाई पटेल, गणेश रामजी भाई पटेल, अशोक नरशी भाई कमालीया, अरविंद अर्जुन भाई सेंटा, गिरीधर रामजी भाई कपाडिया, नरान काबा भाई कपाडिया, गिरीधर घुसा भाई सेंटा, भारत राघव भाई भूत, कल्पेश भीमजी भाई कपाडिया, बिपीन भुपत भाई भालारीया, जितेंद्र काबा भाई धेधी, हरेश मढाभाई वालिया, जगदीश मांजी भाई पटेलीया, हृषीकेश भेगडे, संदेश साळुंके, राजन पटेल, हेमंत शिर्के, विक्रांत सरोदे, अमित परदेशी आदी उपस्थित होते. गुजराती खरक समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन साधुराम कार्यालय येथे झाले. या कार्यक्रमासाठी महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार महेश लांडगे उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत गुजराती खरक समाजाच्या सर्व नागरिकांनी त्यांना पाठींबा जाहीर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांनी २०१४ पासून भोसरी विधानसभा मतदारसंघात केलेली कामे वाखाणण्याजोगी आहेत. कोट्यावधी रुपयांची कामे सध्या सुरु आहेत. विविध समाजांना एकत्रित करून प्रत्येक नागरिक सामोर ठेऊन सर्वसमावेशक विकासाला आमदार महेश लांडगे यांनी चालना दिल्याची भावना यावेळी गुजराती खरक समाज बांधवांनी व्यक्त केली.
मुंबई : दोन वर्षाच्या काळानंतर नाताळ सणाची लगबग आपल्याला पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या सणानिमित्त मुंबई शहर लाल, पांढरे, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगांनी सजलेले पाहिला मिळत आहे. सध्या मुंबई शहराचा प्रत्येक कोपरा ख्रिसमसच्या सजावटीने सजला आहे . वांद्रे येथील पारंपारिक ठिकाणांपासून ते दादर आणि ठाणेपर्यंत,मुंबई ख्रिसमसच्या रंगात आणि रोषणाईच्या उजेडात न्हाऊन निघत आहे. मुंबईच्या बाजारपेठा नाताळच्या गिफ्ट्सनी भरला आहे. सामान्य मुंबईकर दुकानातील डिस्प्लेवर लागलेल्या ख्रिसमस गिफ्टच्या सौंदर्यात रममाण होत आहे. मुंबईचा वांद्रे संपूर्ण परिसर नाताळच्या रोषणाईने आणि रंगांनी नटलेला आहे . नेत्रदीपक दृश्यानी परिसर उजळला आहे. या गल्ल्यांमधून फक्त एक फेरफटका मारल्यास तुम्हाला ख्रिसमसच्या सणामध्ये गुंफल्यासारखे वाटेल. जुन्या शैलीतील घरे आणि व्हिला सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसतात. ख्रिसमस काळात या परिसरातील गल्ल्या रोषणाई, तारे , कंदीलानी फुललेली आहे. रंगीबेरंगी रोषणाई करणारे दिवे झाडांना सजवतात आणि संपूर्ण सुट्टीचा उत्साह देतात. दरवर्षी आयोजित केला जाणारा 'विंटर लाइट फिएस्टा' कोरोना प्रादुर्भावामुळे 3 वर्षांनी साजरा करण्यात येत आहे. आजूबाजूचे अनेक परिसर सजलेले असून थाटामाटात ख्रिसमस साजरा करण्याची तयारी करत आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने सेंट अँड्र्यू चर्च, हिल रोड सारखे परिसर पाहण्याजोगे आहेत. मुंबईत या वर्षी मॉल्स आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सजले आहे. जवळजवळ 3 वर्षांनी मॉल्स नाताळ निम्मीत खुले असणार आहे. कोरोना काळात प्रतीबंधामुळे गेली 2 वर्ष मोठा फटका बसला होता. 24 डिसेंबरपासून सुरू होऊन 1 जानेवारीपर्यंत, मॉलमध्ये आकर्षक सजावट, ख्रिसमस मार्केट आणि वेगवेगळ्या ऑफर ग्राहकांना देत आहेत . तसेच लहान मुलांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना गिफ्ट देण्यासाठी काही मॉल्स मध्ये संटाक्लौज ठेवण्यात आला आहे. लहानग्यांना आनंद घेण्यासाठी मजेदार गेम्स सुद्धा काही मॉल्स मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. काही हॉटेल्सनी अनेक ऑफर ठेवल्या आहेत. तर काही हॉटेल्सनी खास मेनू तयार केला आहे . सर्व वयोगटातील व्यक्तीना उत्साहाचा आणि उत्तम वातावरणाचा आनंद घेता येणार आहेत. पिझ्झाचे स्पेशल कॉम्बोज, फिंगर फूड्स , ख्रिसमस पार्टी ऑफर रेस्टो, पबतर्फे दिल्या जात आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची 'गोकुळ'च्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी गोकुळ च्या एमआयडीसी कार्यालयात शुक्रवारी आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत अधिकार्यांना घेराव घातला. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी संचालक मंडळाच्या येत्या बैठकीत हा निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, 7 सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास 'गोकुळ'मध्ये शिवसेना सत्तेत आहे, हे विसरून दूधपुरवठा रोखण्यासह चिलिंग सेंटर बंद पाडू, कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा जाधव यांनी दिला. शिवसैनिकांनी शुक्रवारी प्रशासन अधिकारी डी. के. पाटील आणि बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील यांना घेराव घालत मागील संचालक मंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यात जाधव यांच्या संचालकपदाची मंजुरी देण्याची मागणी केली. लेखी पत्राशिवाय कार्यालयातून कोणालाही बाहेर सोडणार नाही, असा पावित्रा शिवसैनिकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, घाणेकर यांना येण्यास उशिरा झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी शंखध्वनी करीत गोकुळ प्रशासन आणि सत्ताधार्यांचा निषेध केला. गोकुळ प्रशासनास शासन आदेश मानावाच लागेल असे सांगत, घाणेकर यांनी येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियुक्तीचा विषय पत्रिकेवर घेण्याची लेखी हमी आंदोलकांना दिली. यावेळी मधुकर पाटील, महादेव गौड, साताप्पा भवान, रवींद्र माने, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासन आदेश झाल्यानंतर संचालकपदाची नियुक्ती होण्यात कोणतीच अडचण नसते. चेअरमन विश्वास पाटील यांना जाधव यांच्या नियुक्तीच्या शासन आदेशाबाबत माहिती दिली होती. संचालक मंडळापुढे विषय ठेवण्याची विनंती केली होती; पण दुर्दैवाने निर्णय न झाल्याने शिवसैनिकांना आंदोलन करावे लागल्याची खंत डी. व्ही. घाणेकर यांनी व्यक्त केली. वीरेंद्र मंडलिक यांना पाडणारे हेच? केंद्रीय मंत्र्याला सुट्टी दिली नाही, हे विसरू नका. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्राचा अवमान करण्याइतका गोकुळ दूध संघ मोठा झाला काय? असा संतप्त सवाल करीत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीने गोकुळ परिसर दणाणून सोडला. दरम्यान, वीरेंद्र मंडलिक यांचा पराभूत करण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच जबादार आहेत, असे सुचित करीत मुरलीधर जाधव म्हणाले, कट्टर हिंदुत्ववादी असल्यानेच मुश्रीफ यांचा आपणास विरोध आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेनाचा उमेदवार निवडणूक लढवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
तपोवन तांडा (ता. भोकरदन) येथील एका मुलाने मुलीस पळवून नेले, मुलाच्या साथीदारांनी चिमुकल्या मुलीच्या अंगावर मोटारसायकल घातली, पत्नीस बेदम मारहाण केली तरीही पोलीस काहीच कारवाई करत नाही, असा आरोप करत मुलीच्या आईसह नातेवाईकांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत राजूर पोलीस चौकीत ठिय्या मांडला. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण निवळले. राजूर : तपोवन तांडा (ता. भोकरदन) येथील एका मुलाने मुलीस पळवून नेले, मुलाच्या साथीदारांनी चिमुकल्या मुलीच्या अंगावर मोटारसायकल घातली, पत्नीस बेदम मारहाण केली तरीही पोलीस काहीच कारवाई करत नाही, असा आरोप करत मुलीच्या आईसह नातेवाईकांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत राजूर पोलीस चौकीत ठिय्या मांडला. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण निवळले. तपोवन तांडा येथील एका मुलाने शुक्रवारी एका मुलीस पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांनी राजूर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. या मुलीचा अद्यापही शोध लागलेला नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी पळवून नेणा-या मुलाच्या साथीदाराने तपोवन तांड्यावर घरासमोर खेळणा-या चिमुकलीच्या अंगावर दुचाकी घालून जखमी केले. त्यानंतर हे कुटुंब राजूर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी जात असताना मुलाच्या साथीदाराने रस्त्यात अडवून मारहाण केली. पोलीस अन्याय करणा-यांना मदत करतात, असा आरोप करून मुलीच्या नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी राजूर चौकीत ठिय्या मांडून आक्रोश केला. यावेळी जखमी महिलेस कुणीही दवाखान्यात नेण्यास तयार नव्हते. आरोपींना अटक करा तरच उपचार घेऊ, असा पवित्रा या कुटुंबियांनी घेतला. दुपारपासून सुरू असलेल्या गोंधळाने चौकीत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने या महिलेला रुग्णवाहिकेतून जालन्याला उपचारासाठी हलवण्यात आले. याबाबत हसनाबाद ठाण्याचे सपोनि किरण बिडवे यांना विचारले असता, वार्षिक तपासणी असल्यामुळे चौकीतील काही कर्मचा-यांना हसनाबादला बोलावण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
'हॅलो. . . मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी. . . 'माझा फोन गेल्यानंतर बहुतेक जणींच्या भावना अनावर होतात. त्यांना रडू कोसळते. ड्युटीवर असणाऱ्याबद्दलची काळजी त्या व्यक्त करतात. ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलाबाळांना देखील नीट जवळ घेता येत नाही. पुणे : "हॅलो. . . मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी," असा फोन गेल्यावर पहिल्यांदा त्यावर विश्वास बसत नाही. गृहमंत्र्यांच्याच पत्नी बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र पोलिस पत्नींच्या भावना अनावर होतात. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख या पोलिस पत्नींसोबत संवाद साधत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसदलाचा कुटूंबप्रमुख या नात्याने जास्तीत जास्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क ठेवण्याचे धोरण स्विकारले आहे. गृहमंत्र्यांच्या 'होम मिनिस्टर' असणाऱ्या त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी देखील याच पद्धतीने संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्या बोलतात ते पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नींशी. दररोज राज्यातल्या किमान वीस पोलिस पत्नींशी त्या संवाद साधतात. आपुलकीने आणि वडीलधाऱ्याच्या मायेने आरती देशमुख बोलू लागतात तेव्हा संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची पत्नी भारावून जाते आणि फोन संपेपर्यंत आत्मविश्वासाने भरून जाते. आरती देशमुख यांनी प्रसारमाध्ममांशी बोलताना सांगितले, "गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात दौरा केला. अनेकांना भेटत असून, रुग्णालयांमध्ये जातात. अशावेळी पत्नी म्हणून माझ्या मनातही सतत काळजी असते. त्यामुळेच ज्यांच्या घरातील माणूस ड्युटीवर आहे, त्यांच्या मनात काय भावना येत असतील याची कल्पना मी करु शकते. यातूनच मला वाटले की आपण पोलिसांच्या घरातल्या महिलांशी बोलले पाहिजे. त्यांना धीर दिला पाहिजे. याच भावनेतून मी रोज जास्तीत जास्त पोलिसांच्या घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. " 'माझा फोन गेल्यानंतर बहुतेक जणींच्या भावना अनावर होतात. त्यांना रडू कोसळते. ड्युटीवर असणाऱ्याबद्दलची काळजी त्या व्यक्त करतात. ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलाबाळांना देखील नीट जवळ घेता येत नाही. ड्युटीवर असताना कुठून संसर्ग होईल याची धास्ती त्यांना असते. आपल्यामुळे माझ्या घरच्यांना कोरोनाची लागण होऊ नये, याचीही काळजी त्यांच्या मनात असते. कोरोनाने जीवनच बदलून गेल्याचे त्या सांगतात. त्यावर मी त्यांना दिलासा देते. तुम्ही एकट्या नाहीत. सरकार, समाज तुमच्या पाठीशी आहे, हे सांगते. यातून त्यांची उमेद वाढते,' असेही आरती देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेला असताना आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. (ncp nawab malik says now there will be no alliance or lead in local bodies election) या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले ११४ उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यानंतर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशीही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाबाबतचा डेटा वेळेत मिळाला नाही आणि निवडणुका लागल्या तरी आम्ही ओबीसींना पूर्ण न्याय देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली आहे. तेव्हा भाजप विरोधात होता. त्याचे काम आमच्या काळातील आहे. भाजपने उगाच याचे श्रेय घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदी सरकारची 'या' कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे! दरम्यान, परमबीर सिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांनी गुरुवारी कामथे उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्टिंग व्हॅनची पाहणी केली. त्यावेळी अजूनही दिवसाला सातशे ते आठशे इतकेच अहवाल मिळतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत ही संख्या वाढण्यासाठी सूचना केल्या. तसेच उत्तर रत्नागिरीतील स्वॅबही कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवावेत, असे आवाहन जाधव यांनी केले. याआधी झालेल्या आढावा बैठकीत आमदार जाधव यांनी चिपळूण व खेड येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामथेमध्ये जाऊन या मोबाइल टेस्टिंग व्हॅन पाहण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी व्हॅनमार्फत होणाऱ्या तपासणीची माहिती घेतली; पण त्यावर समाधान न झाल्याने गुरुवारी आमदार जाधव कामधे उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. मोबाइल व्हॅनमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली व या ठिकाणी असलेल्या एमएससी व्हायरॉलॉजिल्ट ऐश्वर्या पाखले यांच्याकडून माहिती घेतली असताना अजूनही दिवसाला ७०० ते ८०० अहवाल मिळतात. एवढीच क्षमता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी पाखले यांनी सांगितले की, अधिक नमुने आले तर आम्ही दुसरी व्हॅन मागवू; पण एकही अहवाल मागे ठेवणार नाही. ही माहिती घेत असताना अजूनही गुहागर, दापोली, खेड, मंडणगड येथील नमुने हे चिपळूणला तपासण्यासाठी येत नाहीत, असे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणी करून नमुने चिपळूणला पाठविण्याबाबत त्या त्या ठिकाणच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करण्याकरिता सांगण्यात आले. रत्नागिरी येथील तपासणी केंद्रावर ताण पडत असल्याने हजारो नमुन्यांचे अहवाल आठवडाभर मिळत नाहीत. परिणामी, एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास त्याच्यावर वेळेत उपचार होत नाहीत. त्यामुळे सर्वांनी चिपळूणला नमुने तपासण्यासाठी पाठवावेत, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाचीही पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, बांधकाम विभागाच्या उपअभियंता नीलम माने, कामथे रुग्णालयाचे डॉ. असित नरवणे उपस्थित होते.
सेवाग्राम रस्त्यावर असलेल्या परिसरात अनेक झाडे गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेली आणि जोपासलेली आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यात पुरेसा संवाद साधण्याची आज गरज आहे. आरती चौक ते वरुड फाटा, सेवाग्राम या भागात १५. ५ मीटर रुंदीच्या चौपदरी रस्त्यासाठी सुमारे १६८ झाडे कापण्याची अनुमती दिली गेली आहे. त्यापैकी ७० झाडे कापलेली आहेत. वर्धा : एकही झाड न तोडता शक्य तितका रुंद आणि पक्का रस्ता बांधवा, मशीनने केलेल्या खोदकामात मोठ्या वृक्षांच्या मुळा उघड्या पडल्या आहेत त्या झाडांना जगविण्यासाठी उपाययोजना करा, आदी विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी वृक्ष बचाओ नागरिक समितीकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सेवाग्राम रस्त्यावर असलेल्या परिसरात अनेक झाडे गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेली आणि जोपासलेली आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यात पुरेसा संवाद साधण्याची आज गरज आहे. आरती चौक ते वरुड फाटा, सेवाग्राम या भागात १५. ५ मीटर रुंदीच्या चौपदरी रस्त्यासाठी सुमारे १६८ झाडे कापण्याची अनुमती दिली गेली आहे. त्यापैकी ७० झाडे कापलेली आहेत. रस्ता रुंदीकरणाकरिता मशीनने खोदकाम केल्याने अनेक झाडांच्या मुळ्यांना इजा झाली आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार न केल्यास ती झाडेही अल्पावधीतच उन्मळून पडू शकतात. वृक्षतोडीस सुरुवात झाल्यावर नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत रस्त्याच्या रुंदीची मोजणी केली असता दुतर्फा असलेल्या झाडांमधले अंतर ११ मीटर असल्याचे दिसले. हे अंतर १० मीटर (३३ फूट) रुंद रस्ता बांधण्यास पुरेसे आहे. इतक्या रुंदीच्या रस्त्यातून तीन कार किंवा दोन बस-ट्रक सहज जाऊ शकतात. बंगलोर, पुणे, दिल्लीसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरातही जुन्या वृक्षांची जपणूक करुन पक्क्या रस्त्यांची बांधणी केली आहे. वर्ध्यासारख्या शहरातही तसे नियोजन करण्याची गरज आहे. सेवाग्राम रस्त्याच्या दुतर्फा अनेक शाळा, कॉलेजेस, मोठे हॉस्पिटल आणि रहिवासी क्षेत्र आहे. या क्षेत्रात वाहनांचे अतिशय वेगाने धावणे विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या जीवावर बेतणारे आहे. गांधीजींच्या आश्रमाकडे जाणाºया रस्त्याला 'शांतिपथ' बनवित मर्यादित वेगाने वाहतूक होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात बांधकाम विभागातील अधिकाºयांशी तसेच शासनाच्या वृक्ष सल्लागारांशी चर्चा केली असता त्यांनी हे वृक्ष मुळासकट उचलून दुसºया जागी लावण्यास असमर्थता दर्शवली आहे. नागपूर महामार्ग बनवताना लाखो वृक्षांचा बळी घेण्यात आला. त्या मोबदल्यात किती झाडे लावली आणि किती जगविली ? वर्ध्यासारख्या शुष्क वातावरणात झाडे जगण्यासाठी ५ ते ६ वर्षे त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. नव्याने केलेल्या वृक्षरोपणाला समितीचा विरोध नाही. पण, जुन्या वृक्षांची कटाई केल्याने होणारी हानी छोट्या रोपट्यांनी कधीच भरून निघत नाही. त्यामुळे हा रस्ता दोन किंवा तीन पदरी ठेवल्यास भविष्यकालीन वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि मोठमोठी झाडेही वाचतील, सार्वजनिक हिताचे निर्णय घेताना शासनाने स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे आणि सार्वजनिक कामांचा तपशील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी वृक्ष बचाओ समितीकडून करण्यात आली आहे.
पणजी : फ्रान्समध्ये पॅरीसमधील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मिरामार, पणजी व काही महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत. गोवा पोलीस खात्याचे सशस्त्र जवान राज्यात काही ठिकाणी तैनात केले आहेत. पर्यटकांची गजबज असलेल्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यात पणजीतील मिरामार समुद्रकिनारा आणि सांता मोनिका जेटीजवळ तसेच कळंगुट, बागा व इतर ठिकाणीही सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत. पोलीस मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली. पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे साध्या केवळ साधा अलर्ट जारी केला आहे. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडून ओळखपत्रे घेतल्याशिवाय त्यांना राहायला न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू, हालचाली वगैरे दिसल्यास पोलीस नियंत्रण कक्षात म्हणजे १०० क्रमांकवर अशी माहिती तातडीने द्यावी, असे आवाहन केले आहे.
गेल्या आठवड्यापासून म्हणजेच ५ जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली आहे. दर गुरुवारी यासंदर्भात आढाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगर पालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल. नव्याने घेण्यात आलेले निर्णय ठरल्याप्रमाणे १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून त्या त्या जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येतील.